मायबोली गणेशोत्सव २०२२ साठी स्वयंसेवक हवे आहेत

Submitted by Admin-team on 1 August, 2022 - 02:18

यंदा गणेशोत्सव ३१ऑगस्टला सुरु होत आहे. मायबोली गणेश उत्सवाचे हे २३ वे वर्ष.

या गणेशोत्सवात माययबोलीला २६ वर्षे पूर्ण होतील. आपल्या सगळ्यांच्या सहभागामुळे आणि सहकार्यामुळे गेली २६ वर्षे मराठीतली पहिली वेबसाईट सुरु आहे.

मायबोली गणेशोत्सव २०२२ साठी ज्या मायबोलीकरांना स्वयंसेवक म्हणून काम करायची इच्छा आहे त्यांनी कृपया या धाग्यावर आपापली नावे कळवावीत. गणेशोत्सवासाठी साधारण महिनाभर दिवसातली काही मिनिटे ते काही तास इतका वेळ द्यावा लागेल. इथे नाव दिलेल्या सभासदांशी प्रशासक संपर्क साधतील.

गणेशोत्सवातील कामाचे साधारण स्वरूप हे वेगवेगळ्या स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, त्यासाठी प्रवेशिका मागवणे, त्या कलाकृती सादर करणे वा स्पर्धा घेणे, स्पर्धेचा निकाल जाहीर करणे असे असेल.
या उपक्रमांत मर्यादित सदस्यांची आवश्यकता असल्याने सर्व इच्छुक सभासदांना एकाच वेळी सहभाग घेता येईल असं नाही. या आधी अश्या उपक्रमात भाग न घेतलेल्या सभासंदांनी जरूर सहभागी व्हावे. ज्या लोकांच्या घरी इंटरनेट सुविधा आहे अश्यांना मंडळात प्राधान्य दिले जाईल.

मागच्या काही वर्षातले गणेशोत्सव इथे बघता येतील.

पराग यांनी संयोजनाच्या अनुभवावर आधारीत लिहीलेला हा लेख पहा. त्यात कामाच्या स्वरूपाचा अंदाज येईल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सी Rofl

यंदाच्या गणेशोत्सव मंडळाचे अभिनंदन. दणक्यात होऊ द्या उत्सव.>>>>+११

सि , लय भारी ..
टीम मस्त तयार झाली आहे , आता दणक्यात होईल साजरा गणेशोत्सव माबो वरचा.

छान
भारी होऊ द्या उत्सव!!
मजा आयेगा

गोल्डफिश,
धन्यवाद, तुम्हालाही ग्रूपात सहभागी केलं आहे.

Pages