यंदा गणेशोत्सव ३१ऑगस्टला सुरु होत आहे. मायबोली गणेश उत्सवाचे हे २३ वे वर्ष.
या गणेशोत्सवात माययबोलीला २६ वर्षे पूर्ण होतील. आपल्या सगळ्यांच्या सहभागामुळे आणि सहकार्यामुळे गेली २६ वर्षे मराठीतली पहिली वेबसाईट सुरु आहे.
मायबोली गणेशोत्सव २०२२ साठी ज्या मायबोलीकरांना स्वयंसेवक म्हणून काम करायची इच्छा आहे त्यांनी कृपया या धाग्यावर आपापली नावे कळवावीत. गणेशोत्सवासाठी साधारण महिनाभर दिवसातली काही मिनिटे ते काही तास इतका वेळ द्यावा लागेल. इथे नाव दिलेल्या सभासदांशी प्रशासक संपर्क साधतील.
गणेशोत्सवातील कामाचे साधारण स्वरूप हे वेगवेगळ्या स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, त्यासाठी प्रवेशिका मागवणे, त्या कलाकृती सादर करणे वा स्पर्धा घेणे, स्पर्धेचा निकाल जाहीर करणे असे असेल.
या उपक्रमांत मर्यादित सदस्यांची आवश्यकता असल्याने सर्व इच्छुक सभासदांना एकाच वेळी सहभाग घेता येईल असं नाही. या आधी अश्या उपक्रमात भाग न घेतलेल्या सभासंदांनी जरूर सहभागी व्हावे. ज्या लोकांच्या घरी इंटरनेट सुविधा आहे अश्यांना मंडळात प्राधान्य दिले जाईल.
मागच्या काही वर्षातले गणेशोत्सव इथे बघता येतील.
पराग यांनी संयोजनाच्या अनुभवावर आधारीत लिहीलेला हा लेख पहा. त्यात कामाच्या स्वरूपाचा अंदाज येईल.
वाटच पाहत होते घोषणे ची!
वाटच पाहत होते घोषणे ची!
गणपती बाप्पा मोरया!!!!
अरे वाह +७८६
अरे वाह +७८६
गणपती बाप्पा मोरया!
गणपती बाप्पा मोरया!
गणपती बाप्पा मोरया!
गणपती बाप्पा मोरया!
गणपती बाप्पा मोरया!
गणपती बाप्पा मोरया!
मोरया!!! स्पर्धा सोप्या ठेवा.
मोरया!!! स्पर्धा सोप्या ठेवा. नायतर लोक भाग घेत नाहीत आणि विजेत्यासाठी मतदानही करत नाहीत.
गणपती बाप्पा मोरया!
गणपती बाप्पा मोरया!
मस्त.. ह्या वर्षीही गणेशोत्सव
मस्त.. ह्या वर्षीही गणेशोत्सव दणक्यात साजरा होऊद्यात
गणपती बाप्पा मोरया!
गणपती बाप्पा मोरया!
गणपती बाप्पा मोरया!
गणपती बाप्पा मोरया!
गणपती बाप्पा मोरया!
गणपती बाप्पा मोरया!
मोरया!!! स्पर्धा सोप्या ठेवा.
मोरया!!! स्पर्धा सोप्या ठेवा. नायतर लोक भाग घेत नाहीत आणि विजेत्यासाठी मतदानही करत नाहीत>>>>
+100
गणपती बाप्पा मोरया!
गणपती बाप्पा मोरया!
मोरया!!! स्पर्धा सोप्या ठेवा.
मोरया!!! स्पर्धा सोप्या ठेवा. नायतर लोक भाग घेत नाहीत आणि विजेत्यासाठी मतदानही करत नाहीत>>>>
+100
लवकर लवकर टीम तयार होऊ दे आणि दणक्यात साजरा होऊ दे माबो चा गणेशोत्सव .
कोणीतरी स्वयंसेवकही बना लोकहो
कोणीतरी स्वयंसेवकही बना लोकहो. माझं एकदा होऊन झालंय आणि मी ह्या वर्षी मभादिलाही होतो, म्हणून मी आता शांत आहे. पण मस्त मजा येते. वेगळीच उर्जा येते.
कोणीतरी स्वयंसेवकही बना लोकहो
कोणीतरी स्वयंसेवकही बना लोकहो. माझं एकदा होऊन झालंय आणि मी ह्या वर्षी मभादिलाही होते, म्हणून मी आता शांत आहे. पण मस्त मजा येते. वेगळीच उर्जा येते.+1111
अर्थात ह्या वर्षीही स्वयंसेवक बनायला आवडेल, जर संख्या अपुरी पडत असेल तर मी तयार आहे, नक्की सम्पर्क करावा अशी
अँडमीन यांना विनंती
लीडरशिपची वानवा आहे.
लीडरशिपची वानवा आहे.
कमिटमेन्टच्या नावाने बोंब आहे.
अननोन टेरीटरीची (नक्की काय काम असेल) भिती वाटते.
आत्मविश्वासाची कमी आहे
त्यामुळे कमिट करायला मन धजावत नाही.
पण हे माहीत आहे
की हा अनुभव वर्स कम वर्स, समृद्ध करेल.
खरं तर यावेळेला काम केले पाहीजे - हे कळते आहे.
----------------------------------------------
बरं कविता पुरे. सध्या अनएम्प्लॉइड असल्याने वेळ आहे तेव्हा - आने दो!!!
मला स्वयंसेवक कमिटीमध्ये सहभागी व्हायला आवडेल. भास्कराचार्यांचे आवाहन वाचून मच नीडेड पुश मिळाला.
-------------
गणपतीवर भार सोपवून आपण उगी रहावे हे बरे कसे? गणपती बापा मोरया!! अॅडमिन अवश्य संपर्क करावा.
वा सामो तेजो, बरं वाटलं वाचून
वा सामो तेजो, बरं वाटलं वाचून . नक्की छान पार पाडाल ही जबाबदारी ...
मभा(गौ)दि संयोजनाला मजा आली
मभा(गौ)दि संयोजनाला मजा आली होती.
यंदा भरपूर बिजागऱ्यांचं काम येऊन पडलंय, त्यामुळे माझा पास. आतापर्यंत पुढे आलेल्या आणि पुष मिळालेल्या इच्छुकांमुळे आणखी उत्साही कार्यकर्त्यांना पुष मिळो ही सदिच्छा.
सामो तेजो शुभेच्छा!
सामो तेजो शुभेच्छा!
मी ही होतो एका वर्षी संयोजन मंडळात आणि त्यामुळे छान
मित्र -मैत्रीण मिळाले
मीही दोन तीन वेळा मंडळात होते
मीही दोन तीन वेळा मंडळात होते.
त्यामुळे सध्या नाव देत नाही
Team फॉर्म झाली नाही तर घेईन भाग.
छान असतो अनुभव
जिथे कमी तिथे आम्ही!!
वा वा सामो! धन्यवाद आणि
वा वा सामो! धन्यवाद आणि शुभेच्छा! तेजो तुलासुद्धा.
संयोजक मंडळास काही मदत लागल्यास हक्काने सांगा.
संयोजक मंडळाने तिसऱ्यांदा
संयोजक मंडळाने तिसऱ्यांदा संधी दिल्यास मी सुद्धा तयार आहे. १५ ऑगस्ट पर्यंत थोडासा गडबडीत आहे परंतु त्यानंतर गणपती बाप्पांच्या सेवेत पूर्णवेळ असेल.
गणपती बाप्पा मोरया _/\_
गणपती बाप्पा मोरया _/\_
मी ही सामो च्याच रांगेत मागे उभी आहे. धागा वर आला की बघूया का संयोजनात भाग घेऊन असं वाटतंय आणि जमेल का पण आपल्याला अशी धाकधूक ही आहे. खरं इच्छा ही आहे संयोजन मंडळात यायची . बाप्पा आणि अडमीन तुम्ही ठरवा आणि सम्पर्क साधल्यास आवडेल.
धन्यवाद तेजो, सामो, वर्णिता,
धन्यवाद तेजो, सामो, वर्णिता, किशोर मुंढे. संयोजनाचा नवीन ग्रूप तयार करून तुम्हाला त्यात सहभागी करून घेतो.
माझीसुद्धा संयोजनात भाग
माझीसुद्धा संयोजनात भाग घ्यायची इच्छा आहे. उशीर झाला नसल्यास माझ्या नावाचाही संयोजनाच्या कामासाठी विचार व्हावा अशी ऍडमीनना विनंती !!!
वा वा छान, नवीन संयोजकांचे
वा वा छान, नवीन संयोजकांचे अभिनंदन सामो, वर्णिता, तेजो, किशोर मुंढे, गोल्डफिश
यंदाच्या गणेशोत्सव मंडळाचे
यंदाच्या गणेशोत्सव मंडळाचे अभिनंदन. दणक्यात होऊ द्या उत्सव.
गणपतीबाप्पा मोरया!
अपिल कर्मा मोड ऑन**
अपिल कर्मा मोड ऑन**
खरं तर एक दोन फिशपाँड मारून मंडळाचे अभिनंदन करायचे होते. पण सकाळी पाहिलं तर पाँड राहिलं आमच्याकडं नि फिश गेलं मंडळात... तेव्हा काही णम्र निवेदने: सामो- गुरू कन्येत गेला, शनि वक्री झाला तरी स्पर्धेच्या डेडलाईन्स बदलू नये. पीएसटी मिडनाईट हीच मायबोलीची डेडलाईन. वर्णिता- संयोजक भी कभी स्पर्धक थी.... क्रश दि "सर्टीफिकेटचं काय एवढं" गट नि मस्त सर्टीफिकेट्स द्या. तेजो- बरीच मंडळी माझ्यासारखी असतात 'कभी काम आए पर घडी घडी पोस्ट करे' पण तुझ्यासारखी 'घडी घडी काम आए पर कभी कभी पोस्ट करे' मंडळी आहेत म्हणून स्पर्धा घडतात. भरपूर पोस्टी मारता येतील अशा स्पर्धा ठेवा. किशोर मुंढे- गणपती स्पर्धेत 'आय अॅम ग्रूट' 'वी आर ग्रूट' सारखी आश्वासक, प्रोत्साहनात्मक एक एक वाक्याची आपली पोस्ट येते. यंदा आढावा इ काही मोठ्ठं लिहा प्लीज. बाप्पा मोरया!!!!
अपिल कर्मा मोड ऑफ***
:हहहलो:
मंडळाला शुभेच्छा आणि धन्यवाद !
तुमच्यामुळे आम्हाला मजा घेता येते.
Pages