ठेचिले अनंते - मिरच्यांच्या ठेच्याचे प्रकार

Submitted by BLACKCAT on 20 July, 2022 - 23:54

ठेचिले अनंते - मिरच्यांच्या ठेच्याचे प्रकार

बेसिक ठेचा

मिरची लसूण मीठ थोडे परतून भरडणे

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा! मस्त! तोंपासु धागा.

मध्यंतरी दुकानात 'योजक'चा कोकणी ठेचा दिसला म्हणून आणला. चांगली आहे चव. हे नाव त्याआधी ऐकलं नव्हतं.

योजक हा अमच्या रत्नागिरीचा खूप नावाजलेला ब्रँड आहे. शमिका भिडे (लि'ल चॅम्प) चे अजोबा होते त्यांनी तो नावारूपाला आणला. आधी लहान स्वरूपात होता. कोकम सिरप, कोकम आगळ (सोलकढीसाठी), करवंद लोणचं, पन्हे इन्स्टंट मिक्स, आवळ सरबत मिक्स, अनेक प्रकारची इतर लोणची - खास करून कोकण स्पेशल, आंबापोळी, फणसपोळी वगैरे बरेच पदार्थ उत्तम असतात.
(भिडे कुटुंबाशी अगदी घरगुती संबंध होते म्हणून आपुलकीने लिहिलंय, जाहिरात नाही)

येस, योजकची प्रॉडक्ट्स भारी असतात.
कोकम सरबत कॉन्सन्ट्रेटतर त्यांच्यासारखं कोणालाच करता येत नाही!

<<कोकम सरबत कॉन्सन्ट्रेटतर त्यांच्यासारखं कोणालाच करता येत नाही!>>>
अगदी बरोबर..
मध्यंतरी पिंचिं मधे हे मिळत नव्हते तर नाईलाजास्तव दुसरे ब्रॅण्ड घेऊन पाहिले. नुसता पश्चाताप झाला. शेवटी रत्नागिरीतील एका सहकार्याकडून मागवून घेतले.

Pages