‘Full Body चेक - अप’ करतो तस ‘Full mind चेक अप’ - एक Innovation

Submitted by Psychology4all on 25 June, 2022 - 00:44

‘Full Body चेक - अप’ करतो तस ‘Full mind चेक अप’ - एक Innovation

सगळ्या विद्यार्थ्यांनी Assessment पूर्ण केल्याचा प्राचार्यांचा फोन आला आणि मी ताबडतोब माझ्या लॅपटॉप कडे धाव घेतली. Assessment चा consolidated रिपोर्ट बघायला मी अधीर झालो होतो. आजच्या तरुण पिढीच्या मानसिक अवस्थेचे चित्र मला त्यातून दिसणार होते. सॉफ्टवेअर वरचे GENERATE बटण मी दाबले आणि समोर आलेले graphs, आकडे बघून मन सुन्न झाले. मला वाटले बहुतेक माझ्याकडून कुठेतरी चूक झाली असावी म्हणून परत परत सगळे thresholds, formulae तपासून बघितले. दुर्दैवाने सगळे बरोबर होते.

मध्य महाराष्ट्रातील एका जिल्ह्याच्या प्रतिथयश कॉलेज मध्ये जाऊन सुमारे २५० विद्यार्थ्यांची जनरल psychological assessment आम्ही केली होती आणि त्याचे आलेले परिणाम मी माझ्या समोर बघत होतो. Mild depression सोडून दिले तरी ज्याला आपण moderate to severe depression म्हणू ते प्रथम दर्शनी तरीसुमारे १५ % विद्यार्थ्यां मध्ये होते. Anxiety disorder सुद्धा moderate to severe category मध्ये प्रथम दर्शनी १८% मुलांमध्ये होता. हे खूप जास्त वाटेल पण तुम्ही कुठल्याही तज्ञ psychiatrist किंवा या विषयात काम करणाऱ्यांना विचार त्यांना याचे अजिबात आश्चर्य वाटणार नाही इतके हे अपेक्षित आहे. ADHD विषयी तुम्ही ऐकलेच असेल. एक नंबर चा छुपा रुस्तुम मनोविकार आहे तो. माणसांची आयुष्य जातात तरी त्यांना माहीतच नसते कि आपल्याला ADHD आहे. तो १०-११% विद्यार्थ्यांमध्ये लक्षण दाखवत होता. Co - morbidity ची टक्केवारी म्हणजे दोन - तीन मनोविकार बरोबरीने होण्याचे प्रमाण बरेच जास्त होते. एवढे सगळे झाल्यावर Internet addiction २८ - ३०% विद्यार्थ्यांमध्ये असण्याचे काही आश्चर्य वाटायला नको. Social problems विषयी तर बोलायलाच नको. राहून राहून मनात हेच विचार येत होते की आजच्या तरुण मुला मुलींना नेमके झालेय तरी काय? का त्यांना एवढ्या मनोविकारांनी ग्रासलंय? आणि हे त्यांना, त्यांच्या आई वडिलांना वेळीच समजले नाही तर यांच्या पुढच्या आयुष्यात काय काय होईल?

तर मुख्य मुद्दा हाच आहे कि आपण जनरल physical चेक अप करायला कधीही तयार असतो पण त्याच धरती वर psychological चेक अप का करत नाही? कोणी विचार पूस पण करत नाही की Thyrocare जसे हजार रुपयात ६३ का ऐंशी blood टेस्ट्स करते तसे मनाचे सरसकट Psychological चेक अप होते का हो कुठे? कोणी असा आग्रह पण धरत नाही की प्रत्येक विद्यार्थ्याचे, प्रत्येक नोकरदारांचे, प्रत्येक ज्येष्ठाचे किंवा आपल्या कुटुंबातील प्रत्येकाचे असे psychological चेक अप दर वर्षी झालेच पाहिजे. हे असे का? त्यासाठी दृश्य स्वरूपात तो मानसिक आजार व्हायची वाट का बघायची? तशी वाट बघायची म्हणले तर तो आजार जे आक्राळ विक्राळ रूप घेऊन आपल्या समोर येईल ते आपल्याला सहन होणार नाही. त्यापेक्षा वर कॉलेज मध्ये केलेल्या परीक्षणात जसे या अशा मनोविकारांना आपण स्वतः हुन पकडण्याचा प्रयत्न केला, तसे प्रत्येकाला जमले तर पुढची disasters होण्यापासून अनेक कुटुंब वाचू शकतात. आणि हे मनोविकार किती मोठ्या प्रमाणावर आपल्या सर्वांच्या आसपास पोचलेत त्याचे आकडे वर दिलेलेच आहेत तेव्हा आपला याच्याशी काहीच संबंध नाही असे आपण म्हणू शकत नाही. याच विचारांना पुढे नेत Psychology testing for all ही कल्पना आम्ही एक social Innovation स्वरूपात पुढे नेली. कधी कधी खूप साध्या कल्पना मोठ्या innovative ठरतात, त्यातलीच ही एक.

या प्रोजेक्ट मध्ये आम्ही most common आढळणारे जे psychological disorders आहेत त्यांच्या जगात सर्वत्र वापरल्या जाणाऱ्या screening tests एकत्र करून त्याचे एक package तयार केले. त्यासाठी गेले दोन वर्ष या वर बरेच कष्ट घेतले. त्या टेस्ट वापरायला जरुरी त्या परवानग्या घेऊन, त्यांची निवड बरोबर आहे का नाही हे एक नाही तर अनेक तज्ञ psychiatrist लोकांकडून तपासून घेऊन, त्याची मराठी भाषांतर करून हे package तयार केले. मुद्दामून अशाच tests घेतल्या ज्या सर्व जगभर करोडो लोकांनी वापरून सिद्ध झाल्या आहेत त्यामुळे त्यांच्या वैधतेविषयी अजिबात शंका नको. उदा. डिप्रेशन साठी PHQ - 9 म्हणजे तर गोल्ड स्टॅंडर्ड. ADHD साठी WHO ने recommend केलेली ASRS 1.1 पण सर्व जगभर वापरतात म्हणून घेतली, वगैरे. अर्थातच वयानुसार मनोविकार थोडे वेग वेगळे असल्याने पौगंडावस्थेत (adolescent) असणाऱ्यांसाठी, तरुण (Adult) असणाऱ्यांसाठी आणि ज्येष्ठांसाठी वेग वेगळी packages तयार केली. आणि ती एका प्लॅटफॉर्म वर ठेवून एका लिंक द्वारे Online उपलब्ध केली. सर्वाना सहभागी होता यावे म्हणून English आणि मराठी मध्ये हे package तयार केले आहे आणि सर्वात मुख्य म्हणजे ही टेस्ट घेण्यासाठी कुठलाही प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष असा charge किंवा फी ठेवली नाहीये. तुम्हाला इच्छा असेल तर निवांत असा ३० - ४० मिनिटांचा वेळ काढा आणि आपल्या फोन / टॅबलेट किंवा कॉम्पुटर वर हे परीक्षण ONLINE पूर्ण करा. पुढील मिनिटाला तुमचा रिपोर्ट तुमच्या मेल बॉक्स मध्ये असेल.

तुम्ही सहभागी झालात तर माझी अशी विनंती राहील की परीक्षणा मध्ये विचारलेल्या प्रश्नांना तुम्ही प्रामाणिक पणे उत्तरे द्या. तुम्ही दिलेली उत्तरे किंवा माहिती संपूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल आणि परीक्षणाचा RESULT, त्याच प्रमाणे पुढील मार्गदर्शन फक्त तुम्हालाच तुमच्या वैयक्तिक ई-मेल वर पाठवण्यात येईल. तुम्हाला तुमची ओळख (पूर्ण नाव) सुद्धा द्यायची अजिबात जरुरी नाही पण उत्तरे प्रामाणिक पणे द्या. रिपोर्ट पाठवण्यासाठी ई-मेल id लागेल तीच तुमची ओळख. तुमच्या उत्तरांच्या अचूकतेवरच तुम्हाला पुढे मिळणारे RESULT आणि मार्गदर्शन अवलंबून असणार आहे हे ध्यानात ठेऊन यात प्रामाणिक पणाने सहभागी व्हा.

मायबोली वरील तरूणांना आणि वृद्धांना संगळ्यांनाच हा प्रोजेक्ट अतिशय उपयुक्त आहे. तरुणांना मी असे सांगेन तुम्ही सगळे मॅरेथॉन पळण्याचे स्वप्न बघताय हे चांगलेच आहे पण ती मॅरेथॉन पळण्यापूर्वी एकदा आपल्या पायांची ताकद अजमावूया, तसेच कुठे काही दुखते खुपते आहे का हे एकदा बघून घेऊया. काही छोटे मोठे प्रॉब्लेम्स असतील तर ते अगोदर ठीक करून मग मॅरेथॉन पळायला सुरुवात करूया. दुखणाऱ्या पायांनी जसे मॅरेथॉन पळता येणार नाही तसेच मानसिक अनारोग्य घेऊन आपण करिअर मध्ये फार मोठी मजल मारू शकणार नाही. मध्यम वयीन लोक कदाचित ह्या रेस च्या मध्यापर्यंत पोचले असतील. त्यांच्यासाठी ही असे परीक्षण तितकेच महत्वाचे आहे कारण इथे नुसतेच करिअर येत नाही तर त्याबरोबर नातेसंबंध, कुटुंब हे सर्व येते. ज्या मनाच्या आधारे आपल्याला ह्या जीवनाचा आनंद घ्यायचा आहे त्याचा कानोसा एकदा घेतलेला कधीही चांगला. नकारात्मकता भरलेल्या मनाने ना आपण करिअर मध्ये उंच मजल गाठू शकतो ना नातेसंबंधांमध्ये. मानसिक स्वास्थ्य आणि आरोग्य हा आपल्या जीवनातील अत्यंत महत्वाचा भाग आहे पण दुर्दुदैवाने आपल्या प्रार्थमिकते मध्ये तो कायमच दुर्लक्षित राहिला आहे. ज्येष्ठांच्या बाबतीत बोलायचे झाले तर त्यांचे शारीरिक स्वास्थ्य हे बऱ्याच अंशी त्यांच्या मानसिक स्वास्थ्यावर अवलंबून असते. जे काही उरलेले आयुष्य आहे ते त्यांना मजेत घालवता येण्या साठी त्यांच्या मनाचे आरोग्य उत्तम असणे फारच जरुरी आहे. म्हणून त्यांच्यासाठी पण अशा परीक्षणाचे महत्व आहे.

मी ज्यांना ज्यांना या प्रोजेक्ट विषयी सांगतो त्यांना याचे महत्व लगेच पटते पण लगेच अनेक प्रश्न त्या पाठोपाठ त्यांच्या मनात येतात. म्हणूनच खाली मी FAQ देत आहे ते जरूर वाचा. ज्या कोणाला अशा assessment चा लाभ घ्यायचा आहे त्यांनी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून ती टेस्ट द्या. हा एक Social Innovation प्रोजेक्ट असल्याने यात पैशाचे कुठलेही transaction ठेवलेले नाही. तुमचे RESULT तुम्हाला मोफत कळवायचे आणि मग counseling मध्ये ओढून त्यातून पैसे कमवायचे असाही प्रकार इथे ठेवलेला नाही. तेव्हा निःसंकोच पणे याचा फायदा घ्या. याशिवाय तुमच्या संपर्कात असणाऱ्या एखाद्या कॉलेज मध्ये, ज्येष्ठ नागरिक संघामध्ये किंवा सोसायटी च्या फोरम मध्ये अशा प्रकारचे सरसकट परीक्षण करायचे असेल तर जरूर संपर्क साधा. तिथे सगळीकडे वेगवेगळे camps होताच असतात त्यामुळे आपल्याला आपला प्रश्न उपस्थित करायला चान्स आहे - ‘Full Body चेक - अप’ करतो तसा ‘Full mind चेक अप’ का नाही?

Test Links - तुमच्या वयानुसार लिंक निवडा आणि क्लिक करा -

१८ ते ६० वर्षे वयोगट - https://forms.gle/HDDv4Gf2ZJF8hQuF9

६० + वर्षे वयोगट - https://forms.gle/9hRg1BRxmMT1htDN7

For Any Question Write to psychologyonlinetest@gmail.com
For Author and Innovation details please visit www.psychologytestingforall.com
—-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Use following WHATSAPP Message to inform others -

*Full body check-up असते तसे Full mind check-up का नाही?*

Good news - की तुम्ही तसा check-up करू शकता आणि तेही मोफत. पुण्यातील एका स्वयंसेवी Social-Innovation प्रोजेक्ट द्वारे हे आता शक्य आहे. मनोविकार असण्याचा सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे ‘तो आहे’ हे समजणे. आणि नेमके हेच उद्दिष्ट या mind टेस्टिंग package ने साध्य केले आहे. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी website ला भेट द्या किंवा सरळ त्या tests घेऊनच बघा ना! तुमची उत्तरे मात्र अगदी प्रामाणिक पणे दिलेली पाहिजेत. तर आणि तरच results खरे येतील. Test English / मराठी अशी आहे, संपूर्ण online आहे, साधारण पणे ३० मिनिट्स लागतील आणि रिपोर्ट एका मिनिटात तुमच्या मेल box मध्ये. तुमची उत्तरे अर्थातच confidential ठेवली जातील पण मुळात तुम्ही तुमची खरी ओळख नोंदवायची देखील गरज नाही. आहे कि नाही Deal?

एरवी हजारो रुपये charges असणाऱ्या या tests शाळा, कॉलेज, वेगवेगळ्या संस्था आणि ग्रुप्स ना मोफत उपलब्ध करून देणारे हे एक समाज सेवी social Innovation आहे. Healthy minds create healthy nation असा त्यांचा विश्वास आहे. खालील पैकी तुमच्या वयानुसार टेस्ट निवडा आणि याचा लाभ घ्या.

१८ ते ६० वर्षे वयोगट - https://forms.gle/HDDv4Gf2ZJF8hQuF9

६० + वर्षे वयोगट - https://forms.gle/9hRg1BRxmMT1htDN7

www.psychologytestingforall.com

Or Write to psychologyonlinetest@gmail.com

(Feel free to forward to whatsapp groups)
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Frequently asked questions :

(१) मानस शास्त्रीय परीक्षण कसे होते?
उत्तर - मानस शास्त्रीय परीक्षणात (टेस्ट) मध्ये तुम्हाला काही प्रश्न विचारले जातात आणि त्याची संभाव्य उत्तरे खाली पर्याय म्हणून दिली जातात. तुमच्या मनातील भावने नुसार, तुमचा स्वतःच्या अनुभवानुसार किंवा तुमच्या ability नुसार तुम्ही त्याचे उत्तर द्यायचे असते. तुम्ही अशा अनेक प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर त्या उत्तरांचे विश्लेषण करून एखादा गुण धर्म किंवा विकार तुमच्या मनामध्ये कसा आणि किती प्रमाणात आहे याचे अनुमान काढले जाते. उदा समजा तुम्ही social फोबिया संदर्भात टेस्ट देत असाल तर तुम्हाला समाजात मिसळताना तुमच्या असणाऱ्या वर्तुणीकीविषयी किंवा तुम्हाला मनात येणाऱ्या भावनांविषयी प्रश्न विचारले जातील. जर तुम्ही त्याची प्रामाणिक उत्तरे दिली तर मानस शास्त्रीय दृष्टिकोनातून तुम्हाला social फोबिया हा विकार आहे का नाही याचे प्रार्थमिक अनुमान काढले जाते की जे ८० -९० % खरे ठरते कारण हि परीक्षा, त्यातील प्रश्न हे खूप मोठ्या संशोधन नंतर आणि अनेक प्रयोगांती निश्चित केलेले असतात. तसेच या टेस्ट्स पूर्वी लाखो लोकांनी दिलेल्या असतात आणि त्याचे आलेले results हे खरे ठरलेले आढळलेले असतात. थोडक्यात त्या पूर्ण पणे सिद्ध झालेल्या असतात. अर्थात ही टेस्ट म्हणजे medical diagnosis नाही. प्रत्यक्ष psychiatrist ने तपासून मगच आपला मनोविकार हा निश्चित होत असतो. पण प्रथम दर्शनी हा विकार आपल्याला आहे हे या टेस्ट मुले आपल्याला कळते. उदा depression च्या संदर्भात विचार केला तर मधून मधून आपल्याला अनेक गोष्टी अस्वस्थ करत असतात, निराश करत असतात त्यामुळे तो depression नावाचा मनोविकार आहे का ती एक मनाची तात्पुरती निराशाजनक अवस्था आहे हे समजायला मार्ग नसतो आणि म्हणून लोकं तसेच स्वतःला खेचत राहतात. त्यामुळे आपल्या मनोविकाराची तीव्रता डॉक्टरांच्या कडे जाण्या इतपत गंभीर आहे का नाही हे ठरवायला पण हि टेस्ट उपयोगी पडते.

(२) या टेस्ट्स ने नेमके मला माझ्याविषयी काय समजेल?
उत्तर - तसा मानसशात्रीय परीक्षणाचा आवाका फार मोठा आहे. एकूण एक मनोविकारांचे परीक्षण करणे निश्चितच शक्य आहे पण त्यासाठी परीक्षा घेणाऱ्याने तेवढा वेळ द्यायची गरज आहे. साधारण पणे एका वेळेला ३० -४५ मिनिटाचे परीक्षण आपण करू शकतो. त्यानंतर परीक्षा देणाऱ्याला fatigue येऊ शकतो आणि मग त्याच्या उत्तरांची अचूकता कमी होऊ शकते. त्यामुळे आपण या परीक्षणाचे अनेक भाग पडले आहेत. पहिल्या भागात सर्वात महत्वाच्या आणि सर्वात प्रामुख्याने आढळून येणाऱ्या disorders ला आपण तपासून बघतो जसे की डिप्रेशन, चिंता, dementia, autism वगैरे. दुसऱ्या भागात अजून काही गोष्टी जसे की aggressiveness, Bi - Polar, OCD, personality disorder वगैर तपासल्या जातील.

(३) Psychology च्या अशा टेस्ट्स करून फक्त मनोविकारचं समजू शकतात का मनाच्या काही चांगल्या बाजू समजू शकतात?
उत्तर - Psychological tests चा जेवढा उपयोग मनोविकार ओळखण्यासाठी होतो तेवढाच तो स्वतःच्या विकासासाठी (Development) म्हणजे चांगल्या बाजू मजबूत करण्यासाठी होऊ शकतो. पण योग्य क्रम म्हणजे प्रथम आपल्यामध्ये काही विकार असतील तर त्याचा उपाय करून मग मनाचा विकास करणे हे जास्त उचित होते. त्यासाठी पण packages तयार करणे चालू आहे. उदा. IQ विषयी आपण ऐकूनच आहोत. तो online टेस्ट च्या द्वारे कुठल्या टेस्ट द्वारे मोजता येईल त्याचे संशोधन चालू आहे. अनेक टेस्ट्स आहेत पण सर्वच अचूक आहेत असे नाही आणि सगळ्याच मोफत पण नाहीत. IQ महत्वाचा आहेच पण एक उत्तम लीडर बनण्यासाठी IQ पेक्षा तुमचा EQ (Emotional Intelligence Quotient) महत्वाचा आहे. मग त्यासाठी असणाऱ्या वेग वेगळ्या psychological tests चा तौलनात्मक अभ्यास चालू आहे. लवकरच ती परीक्षा पण या platform वर उपलब्ध करून दिली जाईल. अशा परीक्षांचा वापर करून आपण कुठे कमी आहोत हे जाणून घेणे आणि त्यात प्रयत्नपूर्वक सुधारणा करणे आणि मग परत परीक्षण करून स्वतःमध्ये सुधारणा घडून आली आहे कि नाही हे निश्चित करणे असा त्याचा वापर असेल. सुधारणा करण्या करता लागणारे training material पण या platform वर ठेवण्यात येईल. अशा अनेक qualities आहेत ज्या आपण स्वतःमध्ये आणून एक उत्तम आणि सर्वांना हवीहवीशी वाटणारी अशी व्यक्ती बनू शकतो. हे सर्व लोकांनी psychologytestingforall या platform चा वापर करून साध्य करावे अशी अपेक्षा आहे.

(४) समजा मला या तुमच्या assessment घेतल्यानंतर कळले की माझ्यात काही disorders ची लक्षणे आहेत, तर पुढे काय? नुसत्या कळण्याचा काय उपयोग? पुढील मार्गदर्शन पण मोफत देणार आहेत का?
उत्तर - वर सांगितल्या प्रमाणे या assessment ने आपल्यामध्ये एखाद्या disorder ची प्रथम दर्शनी लक्षणे आहेत हे समजते परंतु असा online परीक्षणाने दिलेला निकाल हे म्हणजे मेडिकल diagnosis नाही. त्यासाठी qualified psychiatrist किंवा psychologist ची आवश्यकता आहे. Psychiatrist कडे गेल्यावर तो पण अशाच प्रकारची टेस्ट तुम्हाला देईल किंवा टेस्ट मध्ये असणारे प्रश्न तो अप्रत्यक्ष रित्या तुम्हाला विचारेल आणि त्यांच्या तुम्ही दिलेली उत्तरांचे तो स्वतः विश्लेषण करून त्याचा निष्कर्ष काढेल जे अर्थातच जास्त अचूक असेल. त्यामुळे या assessment चा उपयोग मुख्यत्वे आपल्याला मनोविकाराची लक्षणे आहेत किंवा मनोविकार झालेला असण्याची दाट शक्यता आहे ‘असे समजणे’ असा आहे. हे ‘समजणे’ हे अतिशय महत्वाचे आहे कारण शरीराचे आजार माणसाला अंथरुणाला खिळवतात त्यामुळे ते समजणे तसे सोपे. पण मनोविकारांचे तसे नाही. तर तुमचा प्रश्न आहे कि असा disorder आहे हे कळले तर पुढे काय? तर त्याचे उत्तर म्हणजे पुढे त्याचे psychiatrist कडून निदान करून घेणे. इथे अगदीच आर्थिक परिस्थिती खराब असेल तर free counseling करणाऱ्या संस्थांना आम्ही जोडून देतो पण त्याचा उपयोग खऱ्या गरजवंतांनीच घ्यावा अशी अपेक्षा आणि विनंती आहे. मानसिक आजारांचे उपचार सध्या खूप महाग आहेत पण त्याकडे आपण स्वतः वर केलेली investment म्हणून बघु शकतो. तर तुमच्या प्रश्नाचा दुसरा भाग आहे की ‘ नुसत्या कळण्याचा काय उपयोग?’ - हे विधान चुकीचे वाटते. आपल्याला disorder आहे हे कळणे आणि ते आपण accept करणे हे म्हणजे मनोविकाराच्या बरे होण्याच्या प्रवासातील निम्मे अंतर गाठण्यासारखे आहे. त्यामुळे केवळ कळण्याला कधीही कमी लेखू नका. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हे कळल्यामुळे अनेक गोष्टी होऊ शकतात. तुमच्या स्वतःकडून आणि कुटुंबाकडून असणाऱ्या अपेक्षा या योग्य पातळीवर येऊ शकतात आणि त्याने तुम्हाला बराच आराम मिळू शकतो. तुम्ही तुमच्या जीवन शैलीमध्ये काही बदल करू शकता. स्वतःची काळजी घेऊ शकता. तुमचे कुटुंब तुम्हाला टोमणे मारण्या ऐवजी आधार देऊ शकते. हे सर्व जर त्यांना माहीतच नसेल तर कसे घडणार? तुम्ही डॉक्टर कडे जाण्याचा निर्णय घेऊन योग्य treatment घेऊ शकता आणि स्वतःला मनोविकाराच्या दरीत अजून खोल जाण्यापासून वाचवू शकता.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा माझा आवडीचा विषय आहे. मी चाचणीत सहभागी झालो आहे. मला ही कल्पना आवडली. जर आपण शारिरिक आरोग्याविषयी जागरुक असतो तर मानसिक आरोग्याविषयी का जागरुक असू नये? सुसंस्कृत समाजात देखील याबाबत अनेक गैरसमज वा अज्ञान आहे. या बाबत मनोनाट्य हा लेख जरुर पहा. स्वानुभवावर आधारित आहे

आपल्यात काही डिसऑर्डर निघेल कि काय या भीतीपोटी काही लोक या टेस्ट मधे सहभागी होणार नाहीत असे आमचे भाकित आहे.. Lol Lol

हायला, मला वाटले तुम्ही नवीन आयडी आहात जे या विषयासाठी/ धाग्यासाठी म्हणून मायबोलीवर आलात. पण तुम्ही तर मायबोलीकरच निघालात. छान Happy

डिसऑर्डर निघेल कि काय या भीतीपोटी >>> प्रकाशजी, जर अशी भिती लोकांना वाटत असेल तर त्यात समाजाचे अपयश वा दोष आहे. जे अश्यांना योग्य ट्रीट केले जात नाही. म्हणून ते आपला मानसिक आजार स्विकारून समोर यायला घाबरतात.

हायला, मला वाटले तुम्ही नवीन आयडी आहात जे या विषयासाठी/ धाग्यासाठी म्हणून मायबोलीवर आलात. पण तुम्ही तर मायबोलीकरच निघालात. छान Happy

डिसऑर्डर निघेल कि काय या भीतीपोटी >>> प्रकाशजी, जर अशी भिती लोकांना वाटत असेल तर त्यात समाजाचे अपयश वा दोष आहे. जे अश्यांना योग्य ट्रीट केले जात नाही. म्हणून ते आपला मानसिक आजार स्विकारून समोर यायला घाबरतात.

ऋन्मेऽऽष टेस्ट केले तर काही तरी निघेल व डॉक्टरांचे एक दुष्टचक्र मागे लागेल त्यापेक्षा नकोच त्या टेस्ट करायला असे म्हणून शारिरिक बाबतीत सुद्धा अनेक लोक लांब पळतात. अगदीच फार नाईलाज झाला तर टेस्ट करायला तयार होतात. मानसिक आरोग्याबाबत तर अजून दूरची गोष्ट.

प्रकाशजी, बरोबर आहे. शारीरिक परिक्षणाची चाल ढकल कितीही केली तरी न केल्याचा परिणाम म्हणून तुम्हाला लवकरच दृश्य स्वरूपात symptoms आणि त्रास सुरु होतो आणि तुमचे दररोजचे आयुष्यच थांबते. मग डॉक्टर कडे जाणे होतेच. हा हि उशिरच असतो पण कुठेतरी जाऊन ते थांबते. मानसिक विकारानं बाबत चाल ढकल दुर्दैवाने खूप उशिरा पर्यंत चालत राहते कारण तुमचे आयुष्य थांबत नाही. आणि विकार बळावत राहतो. दरम्यान च्या काळात आपण गमावलेले आयुष्यातील चांगले दिवस, नाते संबंध, संधी हे नुकसान कधीच मोजले जात नाही.

अतिशय उत्तम उपक्रम! कोरोना नंतर या स्वरूपाच्या चाचण्यांची गरज वाढली आहे. या लेखाची लिंक परिचितांना नक्की पाठवेन.

@जिज्ञासा - धन्यवाद ! परीक्षणाच्या लिंक्स जरूर पाठवा. तुमचा message बघितल्यावर whatsapp पाठवायला सोपा जावा म्हणून एक READY TO COPY PASTE असा संदेश मुख्य लेखात टाकत आहे. तोही घेऊ शकता.

डॉक्टरांचे एक दुष्टचक्र मागे लागेल
>>>>
हो ते ही आहेच.
यात मध्यमवर्गीय लोकं पैश्याचा विचारही करतात.
पण जर सेल्फ टेस्ट असेल. जो काही रिझल्ट लागेल तो आपल्यापाशी तर करायला हरकत नसावी.

यात मध्यमवर्गीय लोकं पैश्याचा विचारही करतात.>> हे साहजिकच आहे कारण सध्या psychiatrist किंवा counselor ची fee पाचशे ते हजाराच्या आसपास गेली आहे. मी खूप लोकांच्या बाबतीतलं हे hesitation खूप जवळून बघितले आहे म्हणून इथे दोन गोष्टी add करतो. रिपोर्ट मिळाल्या मिळाल्या जर तो कसा interpret करायचा, लगेच प्रथम काय करायचे याविषयीच्या शंका असतील तर त्या विषयी रिपोर्ट मध्ये पण लिहिलेले असते आणि मी स्वतः ते मार्गदर्शन मोफत देत असतो. (हे सांगून पण लोक त्याचा फायदा घेत नाहीत हि गोष्ट वेगळी पण कोणाला पाहिजे असल्यास ते शक्य आहे.) दुसरे म्हणजे दोन स्वयंसेवी संस्थां (NGO) बरोबर Tie - up केले आहे त्याच्या तर्फे मोफत counseling केले जाते आणि कमी खर्चिक डॉक्टरांना जोडून दिले जाते. त्याशिवाय ससून सारख्या हॉस्पिटल मध्ये उपचार मोफत होतात त्यामुळे इच्छा असेल तर पैशाशिवाय सुद्धा उपचार घेऊ शकता येतात.

चांगली कल्पना आहे डॉ.लगेच टेस्ट घेऊन टाकली.
तुमचा मराठी इमेल पण आवडला.
कोणाला गरज लागल्यास तुमचे तपशील अवश्य सुचवेन.शुभेच्छा.

छान कल्पना,
वेळ मिळाल्यावर टेस्ट देणार

कुमार१ , मी_अनु, सिम्बा, Shaankari, अश्विनी ११ , भ्रमर - तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद! तुमच्या प्रतिक्रियांमुळे इतरांना निश्चितच टेस्ट घ्यायला हुरूप येईल. आज खूप जणांनी टेस्ट घेतल्या. त्यातील अनेक जण मायबोलीकर असणार याची मला खात्री आहे. धन्यवाद!

चिंगी >>- आपण परत एकदा चेक करू शकता, काहीतरी temporary issue असेल किंवा तुमच्या browser चा issue असेल असे वाटते. काल पासून शेकडो लोकांनी टेस्ट घेतली आहे. एकाला birth year update करता येत नव्हते (कि जो निश्चितच लोकल प्रॉब्लेम होता) एवढा एक incident सोडला तर कुठलाच प्रॉब्लेम रिपोर्ट झालेला नाही. तरी please एकदा चेक करा, cell फोन वरून जर करत असाल तर लॅपटॉप वरून करून बघा आणि मला कळवा. कळवल्याबद्दल धन्यवाद!

दिली टेस्ट. छान होती. सर्वांनी जरूर द्या.
काही बाबत आपण खूप चांगले वागतो तर काही बाबतीत बेक्कार हे स्वतःलाच जाणवले.

काही प्रश्नांबाबत काय सकारात्मक समजावे आणि काय नकारात्मक याबाबत कन्फ्यूजही झालो.
म्हणजे छंदांमध्ये जास्त वेळ जातो हे एका अर्थी वाईटही आहे, आणि आपण आपल्या छंदांना प्रायोरीटीवर ठेवतो हे आयुष्य जगायची पद्धत छानही वाटते.
एखाद्याला माणसांमध्ये जास्त मिसळायला आवडत नाही, हे कदाचित यात नकारात्मक म्हणून असावे. पण तसे न मिसळताही कोणी आपल्या आयुष्यात आनंदी असू शकते असेही वाटले.

लोकांसमोर एखादी गोष्ट सादर करताना धडधडते का यातही दोन वेगळे प्रश्न हवे होते असे वाटले. बरेचदा आपण जी गोष्ट जमते वा आवडते ती सादर करताना फार एक्सायटेड असू शकतो. पण तसे नसल्यास हालत पतली असू शकते. दुसरी केस तरीही ओके आहे पण एखाद्याला जमणारी वा आवडणारी गोष्टही चारचौघात सादर करायची भिती वाटत असेल तरे ते जास्त प्रॉब्लेमॅटीक आहे असे वाटते.

मला अशा परिस्थितीची भीती वाटते जिथे लोक माझ्यावर टीका करतात किंवा माझ्याबाबत नकारात्मक मत बनवतात
>>
या प्रश्नात मात्र अजून एक पर्याय हवा होता, किंवा अजून एक प्रश्न हवा होता - - अश्या परीस्थितीला तुम्ही एंजॉय करता का? Happy

ऋन्मेऽऽष >> तुमच्या प्रतिसादाला आणि आव्हानाला बघून अजून काही जण निश्चित टेस्ट घेतील. धन्यवाद !
प्रश्नांच्या बाबतीत तुम्ही विचारले आहे तो विषय फारच खोल आहे आणि त्याच्या पूर्ण विस्तारासकट तो इथे सांगता येणार नाही पण तरीही थोडक्यात सांगतो. हे सर्व प्रश्न हे आपल्या मनात काही विकार आहेत का याचा शोध घेण्यासाठी बनवले आहेत. त्यासाठी हि मंडळी अगोदर त्या विकाराच्या syptoms चा अभ्यास करतात आणि मग सर्व जग मान्य असे त्याचे एक manual बनते ज्यात ती symptoms नमूद होतात. त्याला DSM म्हणतात. हे document सगळ्यांसाठी एकदम प्रमाण असते. त्या symptoms ना समोर ठेऊन एका अतिशय दीर्घ आणि सखोल प्रक्रियेने हे परीक्षण आणि त्यातील प्रश्न बनवले जातात. त्याचा हजारो लोकांवर प्रयोग होतो, त्याचे इम्पिरिकेल टेस्टिंग होते आणि मग ती टेस्ट स्टॅंडर्ड टेस्ट म्हणून प्रचलित होते. त्यामुळे माझ्या सारख्याला प्रश्नाचा कान्हा मात्रा पण इकडे तिकडे करायची परवानगी नाही. पण बेस्ट पार्ट म्हणजे प्रामाणिक उत्तरे दिली तर results खूप accurate येतात, जवळ ८० - ९० % accurate.
तुम्ही उल्लेख केला ते छंदांच्या बाबतीतले प्रश्न हे autism संदर्भातले आहेत कि ज्यात ती व्यक्ती इतकी स्वतःच्या छंदांमध्ये बुडते कि त्याचा त्यांच्या दैनंदिन जीवनावर (अभ्यास / काम) परिणाम होतो. आणि नुसते छंद असणे वाईट नाहीच किंवा त्या एकट्या लक्षणाने Autism आहे असे परीक्षण म्हणत नाही. पण जेव्हा त्या व्यक्ती त्याच्या बरोबरीने स्वतःचे routine बदलायला आजिबात तयार होत नाहीत (दुसरा प्रश्न), rigidity दाखवतात, तसेच त्यांना social communication चे प्रॉब्लेम असतात (पहिले ३ प्रश्न) तेव्हा या तीन चार लक्षणांचे combination हे Autism ची दाट शक्यता दाखवते. एखाद्या व्यक्ती नुसतीच छंदात वाहून जाणारी असेल तर तिचा त्या प्रश्नाचा score जास्त असेल पण बाकीच्या प्रश्नांचा score कमी असेल आणि म्हणून तिच्या बाबतीत Autism दाखवला जाणार नाही. पण ज्यांना हि सर्व लक्षणे एकत्र आहेत त्यांचा score जास्त येईल. हे परीक्षण म्हणजे Autism चा एक screener आहे कि जो सिद्ध झालेला आहे त्यामुळे त्याचे निष्कर्ष आपण निश्चितच गांभीर्याने घेऊ शकतो. यात positive निष्कर्ष आले तर Full टेस्ट घ्यायची आणि त्यातही positive आलात तर मग डॉक्टर कडे जाऊन confirmation आणि मग ट्रीटमेंट, असा हा प्रवास आहे.
तसेच social फोबिया बाबतीतले प्रश्न बघितले तर नुसते लोकात मिसळायला आवडत नाही हा चांगला किंवा वाईट मुद्दा मानलेला नाही. कारण ह्या एका symptom वरून फोबिया सांगितला जात नाही. पण त्याच्या बरोबरीने बाकीची सहा symptoms चेक केली जातात आणि त्या सहा पैकी चार लक्षणे असतील तर statistically त्यांना असे आढळले आहे कि तो फोबिया असतो. आणि म्हणून ती शक्यता वर्तवली जाते की जी ८० -९० % व्यक्तींमध्ये खरी ठरते.
खूप interesting क्षेत्र आहे हे. तुमचा शेवटचा प्रश्न आणि पर्याय हा कुठल्याना कुठल्या परीक्षणात असेलच. नसेल तर तो टाकता येईल उदा ‘प्रवाहाविरुद्ध वाहणाऱ्या मायबोली वरच्या व्यक्ती ओळखण्या साठी' वगैरे .... Happy

सविस्तर उत्तराबद्दल धन्यवाद सर. बरेच गोष्टी क्लीअर झाल्या. प्रश्न बरेच असल्याने एका प्रश्नावरून लगेच काही ठरणार नाही हे ही खरेय.

Pages