कशाला त्या सायकियाट्रिस्टच्या डोंबल्यावर पैसे घालायचे? घडा घडा बोलावं. धडाधडा काम करावीत. रिकाम मन सैतानाचे घर. रिकामटेकडेपणातून हे नसते उद्योग सुचतात. तो काय सांगणार? आम्ही जे सांगतो तेच ना! मित्रमंडळींशी, घरच्यांशी शेअर करा, बोला. कामात गुंतवून घ्या! पण फी देउन हेच ऐकल की बरं वाटत. आम्ही सांगितलं तर त्याची किंमत नाही. प्रत्येक गोष्टीवर शंका घेत बसले की मग नस्ते आजार मागे लागतात. हे होतय ते होतयं. लवंग खाल्ली कि उष्णता होती आन वेलची खाल्ली की सर्दी होते. आम्ही बघा! जातो का उठसुट डॉक्टर कडे? आपली रोगप्रतिकार शक्ती असतेच ना! एकदा औषध गोळ्या मागे लागल्या कि घेत बसा आयुष्यभर. हा डॉक्टर पटला नाही तर कि तो डॉक्टर. दुष्टचक्रात अडकायच. सगळे मेले लुटायलाच बसलेत. इथेतर बकरा स्वत:हून येतोय. त्या आरोग्य पुरवण्या वाचल्या की प्रत्येक रोग आपल्यालाच झाला आहे असे वाटायला लागते. मी नाही वाचतं हे असल काही! स्वत:चे फाजील लाड करायचे नाहीत. भरपुर पैसा कमवावा.भरपुर खर्च करावा. कशाला आंथरुण पाहून पाय पसरायचे? आंथरुण वाढवा ना! आनंदी जगावं. मौजमजा करावी. काही केमिकल लोच्या वगैरे नसतात. सायकियाट्रिस्ट लोकांनी पसरवलेल खूळ आहे.हे सगळे रिकमटेकड्या मनाचे खेळ आहेत. खाजवायला फुरसत नाही मिळाली की सगळं बरोबर होतय. हातावर पोट असणार्यांना होत का काही? झक्कत रोज काम कराव लागतं. त्यांना बर काही होत नाही? असल्या फालतू गोष्टींसाठी त्यांच्याकडे वेळच नसतो. ही सगळी नाटकं संपन्नतेची देणगी आहे. पैसा जास्त झाला की मग असले उद्योग सुचतात. आम्हा बायकांच बर असत. त्या निसर्गत:च चिवट असतात परिस्थितीशी तोंड द्यायला. घरचंही सांभाळायच शिवाय बाहेरचही पहायचं.मी शेवटपर्यंत काम करत राहणार. पैशापरी पैसा मिळतो शिवाय वेळही मजेत जातो. वेगवेगळी माणसे भेटतात आमच्या धंद्यात. तुमच्या त्या व्याखान, चर्चासत्र, वेबिनार यात काय ते पुस्तकी किडे सांगणार? नुसते अकॅडमिस्ट! व्यवहारात शून्य! असो! मला फालतू वेळ नाही. भरपूर कामे पडली आहेत.
मायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.
आणि मग असे बोलणारे लोक
आणि मग असे बोलणारे लोक आसपासच्या लोकांचे आयुष्य कसे नकोसे करतात तो एक अनुभवच असतो. 'लग्न पहावे करुन- घर पहावे बांधुन' त्या चालीवर आयुष्य रेटावे मनोरुग्ण व्यक्तीबरोबर!! इथे (अनमॅनेज्ड) मनोरुग्ण असे म्हणायचे आहे.
शिवाय स्त्रियांना घटस्फोटाची भीती घातली की तरी त्या मुकाट्याने सायकोथेरपिस्ट कडे मुकाट येतात. पुरुष ओसीडी असली तरी त्याचाच अभिमान बाळगत बसतात. "हो पण याच स्वभावामुळे मी करीअरमध्ये पुढे येऊ शकलो" ते करीअर घाल तुझ्या @#$%. जीव नकोसा केलायस इतरांचा त्याचे काय.
कंटाळा असतो घरात एक जरी (अनमॅनेज्ड) मनोरुग्ण व्यक्ती असली तरी कंटाळा कंटाळा असतो.
कंटाळा असतो घरात एक जरी
कंटाळा असतो घरात एक जरी (अनमॅनेज्ड) मनोरुग्ण व्यक्ती असली तरी कंटाळा कंटाळा असतो.>>>बरेचसे मनोविकार हे मॅनेजेबल असतात. ते बहुसंख्यात असतात सुद्धा. तीव्र स्वरुपाचे फक्त त्रासदायक असतात. शारिरिक आजारासाठी जसे आपण डॉक्टर कडे जातो तसे मानसिक अस्वास्थ्यासाठी सुद्धा मनोविकार तज्ञाकडे जाणे आवश्यक आहे. पुरेशा जागृततेअभावी ते भारतीय समाजात तरी होताना दिसत नाहीये. आत्ताशी जागृती व्हायला लागली आहे
>>>>>ते बहुसंख्यात असतात
>>>>>ते बहुसंख्यात असतात सुद्धा. तीव्र स्वरुपाचे फक्त त्रासदायक असतात.
+९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९
कंटाळा असतो घरात एक जरी
कंटाळा असतो घरात एक जरी (अनमॅनेज्ड) मनोरुग्ण व्यक्ती असली तरी कंटाळा कंटाळा असतो. >> इथे कंटाळा हा फार म्हणजे फारच सौम्य शब्द झाला.
>>>>>>>>>>>इथे कंटाळा हा फार
>>>>>>>>>>>इथे कंटाळा हा फार म्हणजे फारच सौम्य शब्द झाला.
हाहाहा करेक्ट!!!
छान लिहीले आहे. वाचून ती पीनट
छान लिहीले आहे. वाचून ती पीनट अॅलर्जीचे शशक आठवले. काही लोकांना आजारांवर विश्वास ठेवणे कठीण असते त्यात मानसिक आजार तर अजूनच कठीण.
जागृती होतेय. कोणाचे वागणे
जागृती होतेय. कोणाचे वागणे थोडे सैरभैर वाटु लागले कि मनोविकार तज्ञाकडे घेउन जाणारे लोक इथे खेड्यातही आहेत हे चित्र मला खुप आशादायी वाटते. निदान तेवढी तरी समज आलीय.
आजूबाजूला पहात ऐकत अनुभवत
आजूबाजूला पहात ऐकत अनुभवत असलेल्या निरिक्षणांवर आधारित ही दिवाकरांच्या नाटयछटेच्या धर्तीवर सुचलेली मनोनाट्यछटा आहे. मानसिक आरोग्य क्षेत्रात जागृती करणारे अनेक लघुपट,चित्रपट,साहित्य आता वाढू लागले आहे. तरीही आपण स्वत:च्या मानसिक, मनोशारिरिक आरोग्याबद्दल उघडपणे फारसे बोलत नाही. मी अनेकदा पाहिलय की जेव्हा मी मानसिक आरोग्य, स्वेच्छामरण,मृत्युपत्र अशा विषयांवर गप्पा मारायला सुरवात केली कि लोक विषय बदलतात किंवा टाळायला सुरवात करतात. मानसिक आरोग्य क्षेत्रा काम करणार्या लोकांना मी माझी निरिक्षणे आवर्जून कळवत असतो.. मानसिक आरोग्यातील स्टिग्मा याविषयावर यापुर्वीची पोस्ट पहा.
उत्तम विषय आहे.
उत्तम विषय आहे. जिव्हाळ्याचाही.
इथे कंटाळा हा फार म्हणजे फारच
इथे कंटाळा हा फार म्हणजे फारच सौम्य शब्द झाला...... सहमत.
अनमॅनेज्ड मनोरुग्ण हे
अनमॅनेज्ड मनोरुग्ण हे आसपासच्यांचा आनंद खलास करतात खलास. सर्वांना दयनिय बनवतात. स्वतःसुद्धा त्यामुळे रागाचे, तिरस्काराचे धनी होतात. पण हीच जर डिसॉर्डर मॅनेज झाली म्हणजे केली की १००% होते, नंतर त्यांनाच स्वभान येतं. अगदी नक्की हे सर्व रोग निवळू शकतात. पण समाजात जागरुकता हवी.
चांगला विषय. मला वाटतं
चांगला विषय. मला वाटतं आयुष्यात प्रत्येकजण यातून कधी ना कधी जातच असावा, प्रत्येकाची तीव्रता आणि ड्युरेशन वेगवेगळे फक्त.
अनमॅनेज्ड मनोरुग्ण हे आसपासच्यांचा आनंद खलास करतात खलास. सर्वांना दयनिय बनवतात. स्वतःसुद्धा त्यामुळे रागाचे, तिरस्काराचे धनी होतात. पण हीच जर डिसॉर्डर मॅनेज झाली म्हणजे केली की १००% होते, नंतर त्यांनाच स्वभान येतं. अगदी नक्की हे सर्व रोग निवळू शकतात. पण समाजात जागरुकता हवी. >>> + १११११
>>>>>>आयुष्यात प्रत्येकजण
>>>>>>आयुष्यात प्रत्येकजण यातून कधी ना कधी जातच असावा,
नाही भाग्यश्री. ओसीडी, बायपोलर, स्किझोफ्रेनिया, पॅनिक अॅटॅक्स, फोबिया हे आजार किंवा काही डिसॉर्डरच आहेत. यात ये जा नसते. हां ते ट्रिगर जरुर होतात किंवा होत नाहीत. पण त्यांना औषधोपचारच लागतात. - असे 'मला' वाटते.
नैराश्य, अँग्झायटी हाही आजार असू शकतो जेव्हा औषधच लागतात.
हां तात्कालिक नैराश्य असू शकते. किंवा स्टेज फ्राईट मुळे झाली ब्वॉ अँग्झायटी असे सुद्धा होउ शकते.
आता काय तात्कालिक आहे आणि काय केमिकल लोचा आहे ते वैद्यच (डॉक्टर) जाणू शकतात.
हम्म्. डिसॉर्डरचे ठिके , पण
हम्म्. डिसॉर्डरचे ठिके , पण मी डिप्रेशन बद्दल म्हणाले,,, काहींचं त्यांच्या नकळत जातही असेल काही काळाने,, पण,,,,,,, 'मन ' ही आजारी पडू शकतं हे ॲक्सेप्ट करणं खुप गरजेचे आहे माझ्या मते. Acceptance is first step, then treatment.
>>>'मन ' ही आजारी पडू शकतं हे
>>>'मन ' ही आजारी पडू शकतं हे ॲक्सेप्ट करणं खुप गरजेचे आहे माझ्या मते.
+१००
ते अक्कलकोट की गाणगापूर इथे
ते अक्कलकोट की गाणगापूर इथे म्हणे एक खांब आहे ज्यावर 'भूत लागलेले' लोकं चढतात वगैरे. तेही सगळं मनोरुग्ण प्रकारच वाटतो. भूत बित झूठ असावं. इथ कोणाला काही माहीती आहे का त्या प्रकारांबद्दल?
शक्तीपात याबद्दलचा हा एक भयाण व्हिडीओ एकदा पहाण्यात आलेला - https://www.youtube.com/watch?v=o8rzX-cYy3E&t=30s
कृपया आपापल्या जबाबदारीवर पहावा. अत्यंत विचित्र आहे. माझी तर दातखिळ बसायची बाकी होती. माझ्या मते हे सर्व लोक मनोदौर्बल्याचे शिकार, मूड डिसॉर्डर्स चे शिकार असावेत ज्यांच्यावरती 'सजेशन्स्/सूचनांचा' अंमल पट्टकन होत असावा.
मनोविकाराबद्दल असलेला सामाजिक
मनोविकाराबद्दल असलेला सामाजिक कलंक यामुळे बरेचदा अशा आजारांबाबत सत्य नाकारण्याकडेच कल असतो. मग दिसणार्या लक्षणांचे कारण 'बाहेर' शोधले जाते. ' बाहेरची बाधा' असे म्हटले की लोकंही लगेच सहानुभूतीने बघतात.
मानसिक आजार म्हणले तरी हा देखील शरीराचाच आजार फक्त त्याची लक्षणे ही मनोव्यापारातून दिसतात हे पटवून दिले तर स्विकार करणे जमू लागते. शरीराच्या काही व्याधी आटोक्यात रहाण्यासाठी जसे कायम औषधोपचार लागतात तसेच यातही रोजचे औषध चुकवायचे नाही म्हणजे व्याधी संभाळली जाईल हे कळते पण वळत नाही अशी परीस्थिती असते , कारण पुन्हा तो स्टिग्मा. मला मायग्रेनचा त्रास आहे असे व्यक्ती सहज सांगते, मेंदू आणि पचनसंस्थेच्या समस्येतून उद्भवणारी ही व्याधी स्विकारली जाते. मात्र त्याच दोन अवयवांच्या समस्येतून उद्भवणारी मानसिक व्याधी म्हटले की लगेच स्टिग्मा! लोकं कौतुकाने हँगओवरचे किस्से सांगत बसतात पण मला डिप्रेशनचा त्रास आहे असे कुणी म्हणाले तर लगेच नजर चुकवणे सुरु! हे बदलणे गरजेचे आहे.
लोकं बोलताना 'तो/ती तापट आहे' असे सहज बोलून जातात पण तेच अँगर मॅनेजमेंटची समस्या आहे असे म्हटले तर उडवून लावतात. तापट असणे हे स्विकारार्ह असते, त्यामुळे तशा वर्तनातून इतरांना त्रास झाला तरी समजून घ्यावे ही अपेक्षा असते मात्र समस्या म्हटले की राग या भावनेला योग्य पद्धतीने हाताळले जात नाहीये हे कबुल करणे आले, योग्य पद्धतीची सवय लावून घेणे आले, जोडीला या समस्येला हातभार लावणारे- एनेबलर्स यांच्याकडेही काही प्रमाणात जबाबदारी जाते जी त्यांनाही नको असते. अशावेळी उगाच नविन काहीतरी फॅड असे म्हणून उडवून लावणे सगळ्यात सोपे.
जागरूकता हवी हा एक भाग. पण
जागरूकता हवी हा एक भाग. पण अल्झायमर किंवा अन्य प्रकारचे डिमेन्शिया या सारख्या न्यूरोसायकोलॉजिकल आजारात योग्य ते इंफ्रास्ट्रक्चरही उपलब्ध नसते. रूग्ण सहसा वयस्कर असतात त्यामुळे तसं ही वृद्धांचे इतर प्रश्न (आर्थिक, शारीरिक इ) असतातच आणि त्यात डिमेन्शियाची भर पडते. मुले-नातवंडे सांभाळू शकतील अशी परिस्थिती असेल तर बरं. नाहीतर अनेक गावात मेमरी केयर युनिट नसतात, असली तर भलती महाग असतात. परवडेल असे इंफ्रास्ट्रक्चर उभे रहाणे जरूरी आहे. ते होत नाही तोवर रूग्णाला गंडेदोरे, तीर्थक्षेत्री सोडून देणं इ प्रकार घडत रहाणार. नातेवाईकांना काहीतरी केल्याचे समाधान. शेवटी जो तो परवडेल तेच करू शकतो.
शेवटी जो तो परवडेल तेच करू
शेवटी जो तो परवडेल तेच करू शकतो. >> +१
छान लिहिले आहे, प्रतिसादही
छान लिहिले आहे, प्रतिसादही छान माहितीपूर्ण आहेत.
'मॉडर्न लव्ह' नावाची प्राईमवर एक सिरीज आहे , त्यात Anne Hatheway चा एपिसोड सुचवेन , bipolar disorder वर आहे.
ते होत नाही तोवर रूग्णाला गंडेदोरे, तीर्थक्षेत्री सोडून देणं इ प्रकार घडत रहाणार. >>> हे अत्यंत दुःखद आहे पण समजू शकते.
कुठलीही बरी न होणारी व्याधी , तुम्हाला अक्षरशः चौकटीबाहेर फेकून देते. स्वतःच त्यातून बाहेर यावे लागते किंवा त्यातून तुकड्यातुकड्यांमधे आयुष्य वेचावे लागते. त्यासाठी लागेल ती मदत घ्यावी व स्वतःला कमी लेखू नये , परिस्थितीचा पूर्ण स्वीकार करावा.
पुरुष ओसीडी असली तरी त्याचाच
पुरुष ओसीडी असली तरी त्याचाच अभिमान बाळगत बसतात. "हो पण याच स्वभावामुळे मी करीअरमध्ये पुढे येऊ शकलो">>>>सामो, यात पुरुष स्त्री असा भेद नसावा. सातत्य, चिकाटी, ध्यास, पाठपुरावा हे गुण ओसीडी मधे अप्रत्यक्षपणे असतात.समाजसुधारकांमधे असे ओसीडी वाले गुण असावेत. सगळेच समाजाशी फ्लेक्सिबल राहिले तर सुधारणेचा वेडेपणा कोण करणार? अनेक दिग्गजांमधे ओसीडी गुण असतो. परफेक्शनिस्ट हे अगदी फिट्ट उदाहरण. अमीरखान आहे ना उदाहरण. माझ्यात ओसीडी ट्रेट्स आहेत. सोशल मिडियावर तसे अनेक आहेत. मी स्वत: आयबीएस साठी सायकियाट्रिस्ट ची ट्रिटमेंट घेतली. त्यांनी माझा आयबीएस हा ओसीडी म्हणुन ट्रीट केला. त्याविषयी अन्य सायकियाट्रिस्टचे मतभेद आहेत.त्यांच्यामते नो मेडिसीन फॉर आयबीएस. थेरपीच काम करेल . मागे मी लिहिलय स्वत:च्या अनुभवावर सविस्तर इथे मायबोलीवर पण व ऐसी अक्षरेवर पण. दिग्गज सायकियाट्रिस्ट च्या मतभिन्नतेमुळे सामान्यांचा अजूनच गोंधळ होतो. असो तुर्तास इतकेच
प्रघा केवढं खरं आहे वरती
प्रघा केवढं खरं आहे वरती लिहीलेलं. मैत्रिणीचा नवरा आहे त्याला ओसीडी आहे. त्याला डॉक्टरांनी मदत ऑफर केलेली आहे. हा मनुष्य परफेक्शनिस्टच आहे. जेव्हा एनीअॅग्रॅम टेस्ट दिली त्यात त्या चा रिझल्ट - रिफॉर्मर व परफेक्शनिस्ट #१ म्हणुनच आला. काय समाजसुधारणा घडली देवच जाणे. बायकोला त्रास मात्र खूप दिला. उठल्यापासून हा तिच्यामागे कटकट कटकट कटकट्च करत रहातो कशातही समाधान नाही. प्रत्येक कृती, प्रत्येक गोष्टीत 'रुम फॉर इम्प्रुव्हमेन्ट' शोधत बसतो, तिने त्याला खूष करण्याची आटोकाट ऊरस्फोड केलेली आहे इतकी की शी ऑलमोस्ट लॉस्ट हर कॉन्फिडन्स इन हरसेल्फ. लहान लहान गोष्टीत दिवसचे दिवस ऑबसेसिव्ह रहातो. आणि हे ऑबएशन स्पेल्स दिवसचे दि वस / महीने महीने टिकतात. मग ते पेट्रोल भरण्याकरता पैसे वाचविणे असो की भांडी फडताळात कशी ठेवायची ते असो. भांडी निथळत ठेवण्याकरता अमक्या एका कोनातच ठेवली पाहीजे. व्हॉSSSSSट? कोण उठल्याउठल्या डोकं खातं याबद्दल? नेव्हर नेव्हर सॅटिसफाईड. परफेक्शनिस्ट त्यातून डिक्टेटर, डेडली कॉम्बिनेशन आहे ही व्यक्ती. पण एक मात्र ग म्माडी जंमत आहे. बायको हे सर्वव्यापी, जळ-स्थळ-काष्ठ-पाषाणाला भरुन दशांगुळे उरलेले ऑबसेशन आहे. ही डिसाईडस तिने काय खायचे-काय ल्यायचे-केव्हा झोपायचे-किती व्यायाम करायचा-कोणाशी बोलायचे. ही डिसाईडस. यात function at() { [native code] }इशयोक्ती ना-ही!!! तिला सुटकाच नाही या करकचून बांधलेपणातून.
प्रज्ञा 'मिडीएटर' आहे एनीअॅग्रॅम #९ (मिडीएटर/पीसमेकर). माझ्यासारखी. ती function at() { [native code] }ओनात अॅकॉमोडेटिंग आहे, इझी-ब्रीझी आहे. ' मनःशांती' ही तिची कोअर गरज आहे. जिची याने वाट लावलेली आहे. बरं करीअर करीअर स्वतः कर तर तेही नाही. इतका इन्सिक्युअर आहे हा माणूस (इन्सिक्युरिटीचेही ऑब्सेशन होउ शकते का? याला आहे.) तिला घोड्यासारखी खरे तर बैलासारखी पळवलेली आहे याने आयुष्यात. तिरस्करणीय नाही का हे सर्व? का नाही डॉक्टरांकडे जात हा? काय समाजसुधारणा करतो हा?
त्यांच्या सेक्स लाईफचे डिटेल्स जे तिनी मला सांगीतलेले आहेत तेही मी शेअर करत नाही पण डि-स-म-ल, मोस्ट अनरोमँटिक, हार्ट्ब्रेकिंग आहेत. ही इज अ लुझर!
प्रघा तुम्ही इथली काही नीरीक्षणे तुमच्या मानसोपचारतज्ञांच्या कंपूंमध्ये सादर करता, प्लीज हे जरुर करा.
त्यांनी माझा आयबीएस हा ओसीडी
त्यांनी माझा आयबीएस हा ओसीडी म्हणुन ट्रीट केला
>>>>
काय असते हे आयबीएस आणि ओसीडी?
ऋन्मेष मला आयबीएस म्हणजे काय
ऋन्मेष मला आयबीएस म्हणजे काय माहीत नाही पण अंदाज करते आहे - आय म्हणजे इन्ट्रोव्हर्ट- बी म्हणजे ..काहीय्तरी बहुतेक.
असावे. मला २ टेस्टस माहीत आहेत -
Jung Personality Test
INFP (introversion, intuition, feeling, perception) is a four-letter abbreviation for one of the 16 personality types identified by the Jung Personality Test. The INFP personality type is often described as an “idealist” personality.
व दुसरी एनीग्रॅम टेस्ट - https://www.truity.com/test/enneagram-personality-test .................... ही सापडली. तुमचा एनीअॅग्रॅम हा तुमचा कोअर नंबर असतो. तो आयुष्यात बदलत नाही. लहानपणीचे अनुभव आणि झालेली जडणघडण , हा नंबर ठरविते.
ओसीडी म्हणजे ऑबसेसिव्ह-कंपल्सिव्ह डिसॉर्डर
मला माहीत असलेला IBS म्हणजे
मला माहीत असलेला IBS म्हणजे Irritable bowel syndrome. पोटाची समस्या.
>>>>>>>>मी स्वत: आयबीएस साठी
>>>>>>>>मी स्वत: आयबीएस साठी सायकियाट्रिस्ट ची ट्रिटमेंट घेतली. त्यांनी माझा आयबीएस हा ओसीडी म्हणुन ट्रीट केला.
होय मला वाटतं प्रघांना ' Irritable bowel syndrome. पोटाची समस्या.'म्हणायचे आहे.
हो आयबीएस म्हणजे irritable
हो आयबीएस म्हणजे irritable bowel syndrome. तो पोटाचा असला तरी सायकोसोमॅटिक आहे असे तज्ञ सांगतात. https://www.maayboli.com/node/57131 इथे या धाग्यावर त्याची चर्चा दिसते आहे.
मी हे विचारले कारण मला
मी हे विचारले कारण मला खालीलपैकी IBD - Crohn's Disease आहे. आणि आयुष्यभर राहणार आहे. त्यामुळे शब्द परीचयाचे आहेत
माझाही आजार थेट ओळखणे शक्य नाही असे म्हणतात म्हणून आधी आतड्याच्या टीबीची सहा-नऊ महिने ट्रीटमेंट घ्यावी लागते. जर बरे झालात तर तुम्हाला टीबी झालेला आणि आता तो बरा झाला समजून पेढे वाटायचे. न झाल्यास आयुष्यभराचा एक सोबती भेटतो.
हि IBD आणि IBS या दोघांमधील फरकाची माहिती गूगाळून.
Inflammatory bowel disease, IBD, usually refers to Crohn’s disease and other serious issues affecting the bowel, such as ulcerative colitis. While Crohn’s disease is rarely fatal, it can cause life-threatening complications.
Irritable bowel syndrome, IBS, is uncomfortable and affects the colon or rectum. You have dietary and stress triggers that aggravate unpleasant digestive symptoms, but the diagnosis isn’t going to contribute to long-term poor colon health or serious complications.
>>>>
बाकी आपल्याला झालेल्या आजाराला गूगलवर जास्त शोधू नये हे तत्व मी पाळतो
बाकी आपल्याला झालेल्या
बाकी आपल्याला झालेल्या आजाराला गूगलवर जास्त शोधू नये हे तत्व मी पाळतो>>>> हो याचमुळे मला पोटाच्या डॉक्टरांनी अतिचिकित्सक लोकांना हा त्रास होतो असे सांगितले असावे. पण गुगल वर प्राथमिक माहिती फक्त घ्यावी. प्रत्येक केस तशी वेगळी असते.
पण गुगल वर प्राथमिक माहिती
पण गुगल वर प्राथमिक माहिती फक्त घ्यावी. >>>>> बरोबर आहे.मला एका डॉक्टरनीच आर.एस.डी. म्हणजे काय ते गुगलायला सांगितले होते.
Pages