Submitted by फलक से जुदा on 31 May, 2022 - 20:51
मिळताजुळता पण वेगळा धागा, 'अशी कोणती गोष्ट आहे जी एकदा ट्राय केली पण परत कधीच नाही करणार' ह्यावरून प्रेरित.
खालील ध्याग्यावर अशी कोणती गोष्ट आहे जी कधीही नाही केली पण एकदातरी ट्राय करायची आहे ह्या यादीत मोडणाऱ्या गोष्टी अपेक्षित आहेत.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शाहरुख खान ला मिठी मारुन
शाहरुख खान ला मिठी मारुन फोटो काढायचा आहे. फिल्मसिटी एवढी जवळ असुन जाता नाहि आलं अजुन..
गरीबांचा शाहरुख आहे एक.
गरीबांचा शाहरुख आहे एक.
शाहरुख खान ला मिठी मारुन फोटो
शाहरुख खान ला मिठी मारुन फोटो काढायचा आहे. फिल्मसिटी एवढी जवळ असुन जाता नाहि आलं अजुन..
>>>>
डायरेक्ट मन्नतला जाता येईल. दोन मेंबर याच धाग्यावर इच्छुक आहेत. तुम्ही आलात तर तीन. अजून तीन आले तर टेंपोच बूक करता येईल. शाहरूखच्या एखाद्या मुलाचे लग्न आले की आम्ही मंडप डेकोरेशनवाले आहोत सांगून डायरेक्ट घुसवायचा आत
मला कायम दारात उभे राहून खाली
मला कायम दारात उभे राहून खाली वाहणारी नदी बघताना उडी मारायचे भयंकर टेम्पटेशन होते >>>>> मला हे वाचतानाही धडधडल
मला आयुष्यात एकदातरी फुल्ल
मला आयुष्यात एकदातरी फुल्ल आयर्नमॅन ट्रायथलॉन करायची आहे.
मी त्याकरता २०२० साली रजिस्टरही केले होते पण करोना आडवा आला.
ट्रेनिंग सुरु केले आहे.
बहुदा ह्या वर्षी हा योग येईल अशी आशा आहे.
ऋन्मेष तुम्ही इतके मोठे फॅन..
ऋन्मेष तुम्ही इतके मोठे फॅन... खरेच अजून एकदाही शाहरुख ला भेटला नाहीय का? हे खरे असेल तर मी भेटवीन तुम्हाला... म्हणजे शूटिंग बघयला घेऊन जाईन.. माझी एक कॉलेज मैत्रीण AD आहे ...
नको च्रप्स
नको च्रप्स
भेटलो की मजा संपली
पण तुमचे धन्यवाद
>>>>>>>.भेटलो की मजा संपली
>>>>>>>.भेटलो की मजा संपली Happy
रियली??????
हो, रिअली
हो, रिअली

मला कळले जर समोरच्या गल्लीत शाहरूख आलाय तर मी रस्ता बदलून दुसऱ्या गल्लीने जाईन
तो माझा पडद्यावर दिसणारा हिरो आहे. तो माझ्यासाठी जगातला सर्वात मोठा सुपर्रस्टार आहे. तो माझ्यासाठी देव नसला तरी ईतर मनुष्यांपेक्षा वेगळा आहे. श्रेष्ठ आहे. मला त्याला प्रत्यक्षात बघून तो देखील आपल्यासारखाच माणूस आहे असा विचार डोक्यात येऊ द्यायचा नाहीये
त्याचा बंगला मन्नत माझ्यासाठी जन्नत आहे. तो मलाही आतून बघायला आवडेल. पण तो घरी नसताना ..
हर्पेन-शुभेच्छा.
हर्पेन-शुभेच्छा.
त्याचा बंगला मन्नत माझ्यासाठी
त्याचा बंगला मन्नत माझ्यासाठी जन्नत आहे. तो मलाही आतून बघायला आवडेल. पण तो घरी नसताना >>> तीन महीने कैद आहे त्यासाठी.
तीन महीने कैद आहे त्यासाठी.
तीन महीने कैद आहे त्यासाठी.
>>
तीन वर्षेही कबूल आहे
तीन वर्षेही कबूल आहे>>>>
तीन वर्षेही कबूल आहे>>>>
लवकर कृतीत आणा मग हा प्लॅन, पाहिजे तर आम्ही मदत करतो
मायबोलीचे अॅडमिन राईट्स
मायबोलीचे अॅडमिन राईट्स मिळवून आठवड्यातून इतकेच धागे काढता येतील किंवा इतक्याच पोस्ट्स टाकता येतील अस काहीतरी करायच आहे.
माबो पब्लिक कंपनी झाली तर
माबो पब्लिक कंपनी झाली तर माबोचे स्टॉक्स विकत घ्यायचेत
तीन महीने कैद आहे त्यासाठी.
तीन महीने कैद आहे त्यासाठी.
>>
तीन वर्षेही कबूल आहे Happy
Submitted by ऋन्मेऽऽष on 2 June, 2022 - 11:41
>>>>>
मग मी पण येणार मन्न्तला तुमच्या बरोबर. आपण एकत्रच जाऊ. मन्नत आणि तुरूंगातही
गरीबांची किरन. वेरी गूड, मग
गरीबांची किरन. वेरी गूड, मग ओला तशीच बूक करतो. जेल व्हाया मन्नत
बाई दवे,
हे उलटे नाही का झाले
कि आता किरनने ठरवलेय, काहीतरी वेगळे ट्राय करायचे
सर जाम बिथरलेत !!
सर जाम बिथरलेत !!

स्ट्रेंजर, ब्लॅक रॉबीन , एक्स मॅन सारख्या आयड्यांद्वारा सर शिवीगाळ करतात हे दाखवून दिलेच होते. आता सिंबा, फिल्मी या आयड्यांच्या अंधाधुंद फायरिंग मधे सरांचा सूड घेण्याचा स्वभाव उफाळून वर आलाय. पण बिच्चारे गलत निशाणा साधत बसलेत. यासाठीच वाहत्या पानांवर लक्ष ठेवायचे असते.
सर, तुम्ही या जन्मात माझी ओळख शोधू शकणार नाहीत. चालू द्या अशीच फायरिंग ! करमणूक तेव्हढीच
Harpen... All the very best
Harpen... All the very best
धन्यवाद मोहिनी१२३ आणि वेडोबा.
धन्यवाद मोहिनी१२३ आणि वेडोबा.
ऑल द बेस्ट हर्पेन... तु नक्की
ऑल द बेस्ट हर्पेन... तु नक्की करु शकशील...
हर्पेन तुम्हाला बेस्ट लक.
हर्पेन तुम्हाला बेस्ट लक. नक्की होणार हे.
मला डोक्याला बँडाना बांधून रेबँन गॉगल्स घालून ट्रकची नुसती चॅसिस असते व ड्रायवर केबिन तो हायवे वर चालवायचा आहे.
दुसरे म्हण जे तो घोडा नाचव तात कपड्याचा तो नाचवायचा आहे.
सांतोरिनीचा सुर्यास्त( हाय हे तो सपनाही रह जाएगा) बघायचा आहे कोणतरी स्पेशल बरोबर.
बायकोसोबत कडाक्याचे भांडण
बायकोसोबत कडाक्याचे भांडण करायचे आहे. ते ही दुतर्फा. ईगो क्लॅशेस ईतके व्हायला हवेत की प्रकरण घटस्फोटापर्यंत जाणारे. अकेले हम अकेले तुम स्टाईल. पोरांच्या कस्टडीसाठी कोर्टरूम ड्रामा. एक पोर तुझ्याकडे एक माझ्याकडे. मग पोरांची ताटातूट होऊ नये म्हणून गलबलून येत पॅच अप..
किंवा मग एखादे एक्स्ट्रा एक्स्ट्रा मॅरीटल अफेअर. वाहावत जाऊन ते झेंगाट घरीच घेऊन यायचे. मग आपली आईच सुनेची बाजू घेत आपल्याला हाकलवून लावणार. आपणही हट्टाला पेटून बायकापोरांना सोडून वेगळे राहायला जाणार. मग कालांतराने साक्षात्कार होणार की बायकोच आपली खरी जोडीदार आहे, असते आणि आपण परत येणार. जसे ते बीवी नंबर वन स्टाईल..
साला अळणी लाईफ जगून वैताग आलाय. काहीतरी हॅपनिंग घडायची वाट न बघता एखादी गोष्ट ट्राय करून ती घडवायची आहे..
मला डोक्याला बँडाना बांधून
मला डोक्याला बँडाना बांधून रेबँन गॉगल्स घालून ट्रकची नुसती चॅसिस असते व ड्रायवर केबिन तो हायवे वर चालवायचा आहे.>>>
वाहवा मामी, काय आठवण काढलीत
पूर्वी हे लोक कायम दिसायचे हायवे ला आणि मला अगदी अगदी हेवा वाटायचा
नुसती चासी असले स्टाईल मध्ये चालवत न्यायचे ते
वाहन रिलेटेड गोष्टीत
रेल्वे इंजिनात बसून प्रवास करायचा आहे
रोड रोलर चालवायचा आहे
मौत का कुवा मधली मोटर सायकल चालवून बघायची आहे (आता होतात का ते प्रकार?)
रेल्वे इंजिनात बसून प्रवास
रेल्वे इंजिनात बसून प्रवास करायचा आहे>>> मलाही!
शिवाय रेल्वेच्या डिझेल इंजिनला जे बाजूला रेलिंग असतात तिथे उभे राहून किंवा मालगाडीला सर्वात शेवटी गार्डचा डबा असतो त्यातून प्रवास करायचा आहे!
हो हो मलाही
हो हो मलाही
मला तो शेवटचा डबा पहिला की शोले ची आठवण येते
मला एक कादंबरी किंवा निदान
धन्यवाद आदित्य आणि अमा.
मला एक कादंबरी किंवा निदान दीर्घकथा लिहायची आहे.
एखादा लघूपट / एखादी डॉक्युमेंटरी बनवायची आहे.
मला पण एखादी कथा,
मला पण एखादी कथा, व्यक्तिचित्रण लिहायचं आहे.
डोक्यात १७६० विचार असतात पण लिहायला लागलं की फुस्स
मलाही आयुष्याने आपल्याला
मलाही आयुष्याने आपल्याला दिलेल्या अनुभवावर आत्मचर्रीत्राच्या अंगाने जाणारी एक कादंबरी लिहायची आहे.
प्रत्येक सामान्य व्यक्तीच्या आयुष्यात एक असामान्य कथा दडली असते यावर माझा ठाम विश्वास आहे.
अर्थात हे जख्ख म्हातारा वगैरे झाल्यावरच लिहीण्यात मजा आहे. फक्त अचानक टपकू नये...
ऊसाचा फुल्ल ग्लास रस एकाच
ऊसाचा फुल्ल ग्लास रस एकाच वेळी प्यायचा आहे.
आजवर याच्या त्याच्या ग्लासातून एक घोट चव घेणे वा कधीतरी अगदीच मोह आवरला नाही तेव्हा हिंमत करून अर्धा ग्लास ऑर्डर करून पिणे झाले आहे. पण कधीतरी फुल्ल ग्लास ऑर्डर करून टॉप टू बॉटम फिनिश करायचे आहे. ऊसाच्या रसाबाबत मनात बसलेली भिती काढायची आहे.
Pages