एक चहा वाफाळलेला

Submitted by किल्ली on 21 May, 2022 - 06:14
चहा

एक चहा वाफाळलेला
लघुकथा
.........................................
"आज चहा दिवस आहे, फेसबुकवर post होती कुणाचीतरी"
"What rubbish!"
"अरे खरं सांगतेय "
"प्रश्न तुझ्या सांगण्याचा नाही "
"मग? तुला नेहमीच माझ्या सांगण्यावर शंका असते, किंवा सरळ दुर्लक्ष करतोस. तेच कोणा मित्राने सांगितलं तर तासभर त्याविषयावर बोलत राहशील. मी सांगितलं तर त्या ध्वनीलहरी सोयीस्करपणे कानाच्या बाहेरून परततील "
"अगं तसं नाही काही, एक मिनिट, तुला खरंच असं वाटतं?"
"वाटायला कशाला हवंय, सत्य आहे ते, #fact, you know "
"बरं ते सोड,चहाचं काय म्हणत होतीस?"
"अरे हा, असं विषयांतर करतोस तू बघ. मी काय म्हणत होते आज आंतरराष्ट्रीय चहा दिवस आहे ना, तर आपण तो साजरा करूया."
"What rubbish?"
"Again, तू पुन्हा rubbish म्हणालास? माझं काहीच पटत नाही ना तुला "
"तुला नाही चहा दिवसाच्या concept ला rubbish म्हणालो. असा ठरवून 365 दिवसातला एक दिवस चहाचा कसा ? म्हणजे...
..
कसा ना?
चहा हा एका दिवसात 365वेळा प्यायचा असतो."
" ohh, मग तो 365 वेळा चहा पिणे ह्याला पिणे नाही ढोसणे म्हणतात आणि करणार कोण तितक्या वेळा? मी सांगून ठेवते हे असं उठसुठ चहा करणं मला जमणारही नाही. तुझं तू बघ आणि एका चहाला एक कप ह्या हिशेबाने किती कप लागतील? कप, मग glasses!! बापरे नको तू ते कागदी कप वापर हा एक एकदा विसळून वापर तेवढीच बचत आणि पर्यावरणावर दया "
"माझे बाई, कुठे गेलीस मागे ये, एक random आकडा सांगितला गं, उदाहरण म्हणून. मी काय इतका चहा घेतो का?"
"तुझा काही भरवसा नाही रे, म्हणून "
"मुद्दा काय होता बाईसाहेब?"
"हा, मी ना, मस्त तयार होते आवरून वगैरे बरं का, तू सुद्धा तयार हो आणि आपण त्या चाय कॅफेला जाऊ आणि वेगवेगळे भारी photos काढू "
"Ohh म्हणजे 365photo काढणे अपेक्षित आहे तर, photo चहाचे काढणार मग मी त्या case मध्ये "
" हो अरे चहाचेच photo, चहा दिवस आहे ना, मग चहाचा कप हवाच ना हातात prop म्हणून "
"म्हणजे? तुझे 365photos काढायचे आहेत? ठीक आहे, I have better idea. ऐक. तू छान तयार हो, मी अंघोळ करतो. मग तू तुझा खास पद्धतीचा चहा टाक. Fancy mug set काढ आहेरात मिळालेला, त्यात गाळून घे. आपण गॅलरी मध्ये बसुया. मागे फुलं ठेवतो background decorate करायला. तो नागपूरच्या काकींनी पाया पडलो तेव्हा दिलेला व्हास use करू फुलांसाठी..."
"नागपूर च्या काकींचा व्हास वापरायचाय?आता आला उंट डोंगराखाली "
" आ, म्हणजे, मी काय सांगतोय आणि तू उंट कुठून आणलास? आणि हे कोणत्या जगातली मराठीआहे, कसली म्हण आणलीस उचलून? हिंदी influncers आणि मराठी styling video बघणं बंद कर, तिथल्या अर्ध्या लोकांचं दिव्य मराठी ऐकून त्यांना त्यांनीच तयार केलेल्या अत्यंत बावळट impractical look मध्ये वाळवंटात practically विनाफोन पाठवायची इच्छा होते "
"कुठून म्हणजे, जिथून व्हास आला तिथून उंट आला. आता, तू, नागपूर च्या काकी, व्हास, उंट, influencers, style आणि मेला तो चहा हे सगळे गॅलरीत बसा मी जातेय. Kinsta वर reel videos तयार करायला. "
ती रागाने काहीतरी पुटपुटत तरातरा बाहेर पडली. तिच्या चेहऱ्याचा रंग त्याला चहा सारखा लाल वाटत होता आणि त्याला अचानक काहीतरी feel झालं, चुकीची जाणीव झाली आणि त्याने तिला कळवळून हाक मारली.
" अगं ए, चहा टाकतेस ना, तुझ्या रागाची गरमी वापर म्हणजे चटकन उकळेल. घशाला कोरड पडलीये. हल्ली फार भांडखोर झालीयेस तू.
चहा पाज लवकर "

(तिची reaction तुम्ही स्वतःच imagine करा. आंतरराष्ट्रीय चहा दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!)

लेखन : पल्लवी कुलकर्णी सुकळीकर /किल्ली

#killicorner
#InternationalTeaDay

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चहाला पण खास दिवस लागतो?
लोक कसला आंतरराष्ट्रीय दिवस काढतील सांगता येत नाही.

उद्या भांडण करायलाही आंतरराष्ट्रीय भांडखोर दिवस काढतील. मनात आलं तेव्हा च्या प्यावा आन मनात आलं तेव्हा भांडावं.

बाकी संवाद छान लिहिले आहेत.

असा ठरवून 365 दिवसातला एक दिवस चहाचा कसा ? म्हणजे...
चहा हा एका दिवसात 365वेळा प्यायचा असतो."
>>>>

अगदीच, पाणी म्हणजे जीवन असेल तर चहामुळे त्या जीवनाला अर्थ आहे Happy

छान लेख Happy

धन्यवाद
जेम्स बॉण्ड, रून्मेष, किशोर मुंढे, भांडखोर, कुमार सर Happy

Chhan स्फुट!
बाकी संवाद छान लिहिले आहेत.....+१.

छान! मजा आली वाचताना..
रच्याकने , "त्या" चे म्ह॑णणे मला तरी १००% पटले. कुठलातरी दिवस काढायचा आणि तो आम्ही कसा साजरा केला हे सोशल नेटवर्क वर दाखवण्याची एवढी काय गरज आहे?