धक्का बसला ना ऐकून ?
असाच धक्का बसला होता जेव्हां पहिल्यांदा फेसबुकवर एकाच्या वॉलवर बातमीची लिंक पाहिली. आनंद तसा उशिराच पाहिला. एक तर जन्माच्या आधीचा पिक्चर. त्यात टीव्हीवर पण कधीच आलेला नाही. थिएटर मधे लागलेला आठवत नाही. त्यामुळं जेव्हां युट्यूबवर बघायला मिळाला तेव्हांच पाहिला.
मी कबूल करतो कि शाहरूख खान सोडला तर दुसर्या नटाचा हा पहिलाच पिक्चर असेल जो खूप आवडला. यात अमिताभ बच्चन दिसायला एकदमच खप्पड आहे. त्याची अँग्री यंग मॅन इमेज त्याला या पिक्चरमधे सूट झालेली नाही. तो उगीच रागावलेला वाटतो. अँग्री अमोल पालेकर वाटला होता. पण पिक्चर मधे चालून गेला.
तर बातमी वाचून टण्णकन उडण्याचं कारण कि या पिक्चरचा रीमेक होईल असे कधीच वाटले नव्हते. शोलेच्या रीमेकला उडालो ते वेगळ्या कारणासाठी. कारण शोले हा ओव्हरेटेड पिक्चर आहे. काय आहे काय या पिक्चरमधे ? नुसते घोडे इकडून तिकडे पळतात. रीमेक मधे घोड्यांची अॅक्टींग सेम टू सेम व्हायला त्या ब्रीडचे घोडे आणणार कुठून ? बच्चन या पिक्चर मधे जरा चेहर्यावर मांस उगवल्याने चांगला वाटला. संजीवकुमार हे मूळचेच ठाकूर असल्याने त्यांनी ठाकूरची खानदानी लेहजीब वागण्याबोलण्यातून सांभाळली. त्याला अॅक्टींग म्हणता येईल का ? गब्बरची अॅक्टींग तेव्हढी टॉप होती. धर्मेंद्र पेक्षा वरूण धवन चांगले काम करतो. त्यामुळे अशा ओव्हरेटेड पिक्चरचा रीमेक पडणारच होता. रामूला हे कळायला पाहीजे होते.
पण आनंद हा एक चांगला पिक्चर आहे. त्यातल्या राजेश खन्नासारखी अॅक्टींग पुन्हा कुणी करू शकेल असा विचारच मनात कधी आला नाही. आणि जुना आनंद जर माझ्यासारखे नंतरच्या पिढीतले लोक बघू शकतात तर आताच्या पिढीतले पण बघूच शकतात. नवीन काढून हात दाखवून अवलक्षण कशाला ?
पण आता रीमेक येतोच आहे तर यातली पात्रं कोण साकारणार ही उत्सुकता निर्माण झाली. आणि मग विचार करताना लक्षात आलं की राजेश खन्नांकडून त्या वेळी होऊन गेलं. आनंदची भट्टी जमून गेली. त्यामुळं राजेश खन्ना शिवाय आनंद कुणी करूच शकत नाही असा विश्वास तयार झाला. पण असं नाही काही.

काही वर्षांपूर्वी येऊन गेलेला कल हो ना हो आठवतो ना ? शाहरूख सरांनी त्यात जो अभिनय केलाय त्याला तोडच नाही. राजेश खन्ना काहीच नाही त्यापुढे. कल हो ना हो हा काही आनंदचा रीमेक नाही. देवदास आणि मुकद्दर का सिकंदर असावा तसं आहे. कल हो ना हो जास्त लॉजिकल आहे. यातल्या हिरॉइन्स सुंदर आहेत. लोकेशन्स श्रीमंत आहेत. आनंद मधे सेट्स बघून कंटाळा येतो. कुणीच ग्लॅमरस नाही. एखादे नाटक चालले आहे असे वाटते. याउलट कल हो ना हो हा चित्रपट वाटतो. पिक्चर आणि नाटकात फरक असायला पाहीजे. ऋषीकेश मुखर्जींना ते आनंद मधे जमले नाही. त्या काळात सेट उभारून पिक्चर काढणे म्हणजे भारी समजले जात असणार.
नविन आनंद मधे याचाही विचार करावा लागेल. थोडी अॅक्शन पण पाहीजे. सध्या आर आर आर, पुष्पा, के जी एफ अशा पिक्चर्सची चलती आहे. त्यामुळे कॅन्सर झालाच आहे तर एखाद्या गँगचा सफाया आनंद करतो अशी भर घातली तर पिक्चर तुफान चालेल.
यात अमिताभ बच्चनच्या डॉक्टरच्या भूमिकेसाठी अभिषेक बच्चनला सहजच घेता येईल. याच न्यायाने राजेश खन्नाच्या रोलसाठी अक्षयकुमारला घ्यायला पाहिजे होतं पण डिंपलकाकूं चा आणि राजेश काकांचा घटस्फोट (मनाने) झालेला असल्याने अक्षयकुमार कॅन्सल ! डोण्ट टेक इट लाइकली अॅज ह्युमरस सेन्स. आय हॅज किडिंग.
रमेश देव यांचा रोल अजिंक्य देव करू शकतो. सीमा देव यांचा रोल करायला मराठी अॅक्ट्रेस सई ताह्मणकर आहे. जॉनी लिव्हरचा रोल जॉनी वॉकर करू शकतो. मेट्रन झालेल्या प्रसिद्ध नटीचा रोल बिग बॉस मधे होत्या त्या मराठी कॅरेक्टर आंटी अॅक्ट्रेस (खाष्ट सासू असतात त्या ) करू शकतात. त्यांचं नावच आठवत नाही. पण काही हरकत नाही. मायबोलीकर हुषार आहेत. ते ओळखतीलच.
आता उरला आनंद.
त्यासाठी शाहरूख सरांसारखा अभिनेता असताना दुसर्याला हा रोल देता येऊ शकेल. जेव्हां मूळचा आनंद बनला तेव्हां या पिक्चरचे भाग्य नव्हते कि शाहरूख सर त्याआधी जन्माला येऊन आनंदच्या रोलसाठी उपलब्ध होतील. हे बॉलीवूडचे आणि रसिकांचेही दुर्दैवच. पण आता शाहरूख सर आहेत. प्रत्येक चित्रपटानुसार त्यांचा अभिनय आसामान कि बुलंदीको छू रहा है. आंबा पिकावा तसा अभिनय सुद्धा अभिनयरसाने पिकत चालला आहे.
या पिढीचे भाग्य थोर म्हणून निर्मात्याच्या नातवाला आनंदचा रीमेक बनवायची बुद्धी झाली . ज्याप्रमाणे देवदास मधे शाहरूख सरांनी काम करून दिलीपकुमार यांना विसरायला लावले , डॉन मधे काम करून अमिताभ बच्चन यांचे मार्केट डाउन केले अगदी तसेच नवीन आनंद मुळे राजेश खन्ना यांचा अभिनय लोक विसरून जातील यात शंकाच नाही. अर्थात शाहरूख सरांना काही कारणाने जमले नाही तर स्वप्नील जोशी आहेच कि !
आता उत्सुकता आहे तो कधी येणार याचीच.
आनंद रीमेकला मनापासून शुभेच्छा !
बातमीची लिंक
https://www.news18.com/news/movies/rajesh-khanna-amitabh-bachchans-anand...
ज्यांना मी शाहरूखची स्तुती
ज्यांना मी शाहरूखची स्तुती केल्याने शाहरूखचा तिटकारा वाटत असेल ते शाहरूखचे फॅन नव्हतेच कधी
मला शाहरूख आवडतो. खूप आवडतो. पण कोणी माझ्यापेक्षा मोठा शाहरूखचा चाहता निघाला तर मला आनंदच होतो. किंवा कधी मत्सरही वाटतो, कधी हेवाही वाटतो. पण त्यासाठी मी शाहरूखचा तिरस्कार करणे अनाकलनीय आहे
मी तर म्हणतो शोले पुन्हा
मी तर म्हणतो शोले पुन्हा बनवावा.
जय,वीरु,ठाकुरजी, गब्बर, सांबा, कालिया, गाववाले सगळ्यांच्या भुमिका शारुक सरांना द्याव्यात.
>>>>>
हे काम आमीरचे. त्याने कराव्यात अश्या कमल हसन पद्धतीच्या वेशभूषा. मेथड कलाकार आहेत ते. अर्थात त्यांच्याबद्दलही आदर आहे. पण तो टाईल वेगळा.
शाहरूखने मात्र शाहरूखच राहावे. तो उत्स्फुर्त कलाकार आहे. त्याचे शाहरूख असणेच आम्हा चाहत्यांना आवडते
ज्यांना मी शाहरूखची स्तुती
ज्यांना मी शाहरूखची स्तुती केल्याने शाहरूखचा तिटकारा वाटत असेल ते शाहरूखचे फॅन नव्हतेच कधी>> सत्यवचन.
मी तर म्हणतो हिंदीच कशाला मराठीतल्या माहेरची साडी सारख्या क्लासिक पिक्चरांचेही रिमेक शारुक सरांना घेऊन बनवावेत.
मला एकेक पिक्चर आठवतोय आणि
मला एकेक पिक्चर आठवतोय आणि त्यात शारुक सर कशा जोरदार भुमिका करु शकतील हे डोळ्यासमोर येतेय.
हे काम आमीरचे. त्याने
हे काम आमीरचे. त्याने कराव्यात अश्या कमल हसन पद्धतीच्या वेशभूषा. मेथड कलाकार आहेत ते. >> शारुक सर अशा भुमिका करुच शकणार नाहीत असे म्हणायचे आहे का तुम्हाला?
जे करायला ईतर आहेत ते
जे करायला ईतर आहेत ते शाहरूखने का करावे?
Pages