मायबोलीवरचे प्रतिसाद

Submitted by पशुपत on 17 April, 2022 - 11:21

पूर्वी , म्हणजे ३~४ वर्षापूर्वी पर्यंत चांगल्या लेखांना मनापासून वाचून, विश्लेषण - उहापोह करणारे ५~५० उत्तम प्रतिसाद येत. मूळ लेखाइतकेच तेही वाचनीय असत.
आता असे खुसखुशीत लिखाणही कमी झाले आहे आणि
आता बहुसंख्य प्रतिसाद एक-दोन शब्दांचे असतात.. जसे की
छान
सुंदर
आवडले
लिहीत रहा

आणि ते ही कथांना येतात..

तुम्हालाही हे जाणवले आहे का ?
असे होण्याची काय कारणे असावीत ?

Group content visibility: 
Use group defaults

हो ना ...
टंकाळा.. ( टंकलेखनाचा कंटाळा Happy )

<< असे होण्याची काय कारणे असावीत ? >>
याचा अर्थ लेखकाला प्रोत्साहन देणे. तुमचे लेखन वाचले, आवडले पण सांगण्यासारखे अजून काही नाही, म्हणून १-२ शब्दांचा प्रतिसाद. जर काहीच प्रतिसाद दिला नाही तर लेखकाला वाटेल की लेखन आवडले नाही की काय? लेखक नाउमेद होऊ नये यासाठी तसा प्रतिसाद देतो.

मी माझा अनुभव सांगतो.
इथे मी उत्तम उत्तम धागे, कविता, लेख, कथासंग्रह वाचत आलो आहे बराच काळ..
बऱ्याच वेळा प्रतिसाद द्यावासा वाटायचा पण द्यायचो नाही. एकतर त्यात गंड ही असायचा की आपल्याला नीट शब्दांत, आपल्याला जे वाटलं ते सगळंच्या सगळं समोरच्यापर्यंत नीट पोचवता येईल की नाही..! Happy

मग मागच्या वर्षापासून हळूहळू थोडं थोडं लिहून इथं पोस्ट करायला लागलो. सुरूवातीला त्रोटक, मोजक्या शब्दांत मिळाले प्रतिसाद.. पण तेवढेही पुरेसे होते, असं वाटतं.‌.
कदाचित ते कुणी उघडून वाचलंच नसतं किंवा उगीच त्रोटक प्रतिसाद देण्यापेक्षा न दिलेला बरा, असं वाटून सोडून दिलं गेलं असतं... आणि ते बिगर प्रतिसादांचं तसंच बेवारस पडून राहिलं असतं, तर पुढे काही लिहिण्याचा कॉन्फिडन्सच गेला असता.

बाकी मग सध्या इथले लोक आवर्जून प्रतिसाद देतात, काय आवडलं, किंवा काय आवडलं नाही ते सांगतात, किंवा किमान दखल तरी घेतात, हे बरं आहे.
शिवाय काही सदस्य आहेत इथे, की इथल्या बऱ्याचशा धाग्यांवर, पूर्ण लेखाचं सगळं सार बगळ्यासारखं अचूक चोचीत पकडून चार ओळीत मांडून टाकतात..!
साला, मला तर नेहमीच अप्रूप वाटत आलं आहे त्यांचं की आपल्याला जे पानभर लिहून नीट सांगता आलं नसतं, ते सगळं एवढ्या कमी आणि परफेक्ट शब्दांत कसं काय सांगताहेत..!
# रिस्पेक्ट _/\_

बाकी शेवटी असं आहे की आपण शेवटी लिहिताना एकटे असतो. आणि एखाद्या इश्यूच्या सगळ्याच गोष्टी आपल्या आवाक्यात येतील असं नाही.. ते अशा प्रतिसादांतून कळत जातं.. त्यातून आपली समजूत वाढत जाते.. बरं असतं ते ही..!!
Happy

मी तरी दोनचार शब्दांपेक्षा मोठा देतो प्रतिसाद .. एखादी कथा वा लेख स्वत:शी रिलेट झाला तर अनुभवही लिहितो. लेख असो, कथा असो, ललित असो, जे धागाकर्ते आहेत त्यांना प्रोत्साहन मिळायलाच हवे. ते लिहिताहेत तोवरच मायबोली चालते आहेत. कोणी लिहिलेच नाही, धागे आलेच नाहीत, तर प्रतिसाद काय एकमेकांच्या विपुत द्यायचे..

मी तरी दोनचार शब्दांपेक्षा मोठा देतो प्रतिसाद .. एखादी कथा वा लेख स्वत:शी रिलेट झाला तर अनुभवही लिहितो. लेख असो, कथा असो, ललित असो, जे धागाकर्ते आहेत त्यांना प्रोत्साहन मिळायलाच हवे. ते लिहिताहेत तोवरच मायबोली चालते आहेत. कोणी लिहिलेच नाही, धागे आलेच नाहीत, तर प्रतिसाद काय एकमेकांच्या विपुत द्यायचे..

नाकापेक्षा मोती जड होऊ नये. दुसरा लेखच काढावा म्हटलं तर प्रतिस्पर्धी होईल. त्यापेक्षा बरं.
मुळात लेखकाची अपेक्षा शाबासकी /क्या मिळण्याची असते. विरोधी विचार, आपले विचार लेखाखाली येऊ नये अशी इच्छा असते. हे दोन चार वेळा अनुभव आलाय.
आपला लेख सर्व मतांचं कडबोळं व्हावं असं वाटणारे लेखक/लेखिका कमी आहेत.

उबो , पटले तुमचे.
पाचपाटील : तेच म्हणतोय...थोडफार तरी लिहायला हवं ...वाचक म्हणून तुम्हाला लेखात काय सापडलं..
ॠ , तुमचे प्रतिसाद छान असतात.
Sad..
हा ही दृष्टिकोन बरोबर आहे..

एक काळ होता की, मायबोलीवर अभ्यासु, दर्जेदार लेखक होते. आणि त्यांना प्रतिसाद देणार्या अ तुल ठाकुर, निपो, अशोक मामा, भारती ताई, अमेय पंडीत, सई, अश्या लांबलचक प्रतिसाद देणार्या ..तोडीस तोड दिग्गज व्यक्तीही होत्या.

https://www.maayboli.com/node/53339
https://www.maayboli.com/node/54838

हो बरोबर आहे, पण आत्ताचे लेखकही चांगलं लिहीतात. जसं की पाचपाटलांच्या गोष्टी, मला आवडते त्यांची स्टाईल. अजूनही आ.ले. आहेत, कविनच्याही गोष्टी आवडतात. आणि एकंदरीतच मायबोलीवर चे प्रतिसाद वाचायला आवडतात चुरचुरीत असतात.

हो , पण टायपायचा कंटाळा येतो ( मी मुळ प्रशनाचं उत्तर च दिलं नाही) आणि व्यवस्थित लिहीता ही येत नाही. त्यामुळे मी फारशी active नसते नुसतंच वाचते. आणि अगदी थोड्या धाग्यावर असते.

मलाही पाचपाटीलांसारखंच वाटतं. म्हणजे नीट लिहिता येईल की नाही.
दुसरं माझ्यासाठी महत्वाचं कारण म्हणजे मोबाईलवर टाईपायचा कंटाळ. किती लिहावं वाटलं, कुणाला उत्तर द्यावं वाटलं तरी जाउदे वाटतं.

सोमी, कायप्पा इत्यादीमुळे ट्रेंड बदलत चाललेत. पेशन्स नाही राहिल्या. लिहिताना आणि वाचतानाही. जाडजूड कादंबऱ्या लिहिणारा वाचणारा वर्ग कमी कमी होत चाललाय. शतशब्दकथा, दशशब्दकथा आल्यात. कमीतकमी शब्दात/वेळेत जास्तीतजास्त सांगणे. चांगलेच आहे म्हणा एका अर्थी.
अर्थात, छान/सुंदर/आवडले मध्ये केवळ तोच उद्देश असेल असेही नाही Happy तो असेल, अन्यही काही असेल.

अतुल +1
पशुपत तुम्ही प्रतिसाद देत असाल तर ते कसे देता? उत्सुकता.

शा मा , "मायबोलीवर शोधा" या प्रत्येक पानावर शेवटी असलेल्या दुव्यावर "पशुपत " नावाने शोधल्यावर माझे प्रतिसाद सापडतील...
उदाहरणादाखल काही प्रतिसाद

बुन्नू यांच्या शुभप्रभात या चित्रांवरील माझा प्रतिसाद..
<<खूप छान.
मी तज्ञ नाही पण कॅनव्हासच्या पांढर्या रंगाचा दोन्ही चित्रात छान उपयोग करता आला असता असे वाटले.
Submitted by पशुपत on 24 January, 2020 - 09:03>>

बिरादरीची माणसं - पल्लो मामा
या लोकेश तमगीरे यांच्या लेखावरचा प्रतिसाद..

<<श्री प्रकाषजी आमटे कुटुंबीय आणि त्यांचे हेमलकसातले सहकारी हे जगताला स्फूर्ती देणारे विद्यापीठ आहे.
तुम्हा सगळ्यांपुढे कायमच नतमस्तक !
Submitted by पशुपत on 4 June, 2019 - 10:33>>

पेठवाटा या योगेश अहिरराव यांच्या लेखावरचा प्रतिसाद..
<<उत्तम धांडोरा घेतलात या किल्ल्याचा आणि भवतालाचा ...
फोटो नेहमी प्रमाणे डोळ्याना सुखावणारे...

Submitted by पशुपत on 18 February, 2021 - 20:3>>

अतुल, धनुडी , सस्मित
तुमचे प्रतिसाद नेहमीच वाचनीय असतात

मी आर्या..धन्यवाद

विरू
माझं सुंदर घर
या, डी मृणालिनी यांच्या लेखावरचा प्रतिसाद..

<<हेवा करावा असं घर , आणि त्याचे व्यक्तिमत्व इतक्या मोजक्या शब्दात पकडणारे तुमचे गूज, दोन्हीही सुंदर
Submitted by पशुपत on 5 February, 2020 - 15:16>>

पशुपत
https://www.maayboli.com/node/62030?page=1
इथले तुमचे प्रतिसाद पाहिले. आवडीच्या विषयावर असलेल्या लेखांवर असेच प्रतिसाद येतात. तुमचा मुद्दा कथा / कादंबर्‍यांबाबत आहे बहुतेक.

कथा-कादंबरी-कवितेवरती फारसे लिहीता येत नाही. पण प्रोत्साहन तर द्यावेसे वाटते. जुन्या जाणत्या, प्रतिसादू,जाणत्या,, व्यासंगी माबोकरांमध्ये येत नसल्यामुळे क्षमस्व!!
.
दर्जेदार राहीलेच त्याबद्दलही क्षमस्व!!

कोतबो धागे, बड्डे कसा साजरा करावा, राजकारण/चित्रपटविषयक धागे यावर भरभरुन प्रतिसाद येतात. त्यानंतर कथा कादंबऱ्या. कवितांना थोडा कमीच प्रतिसाद मिळतो. कवितेवर ३०-३५ प्रतिसाद असतील तर काहीतरी धमाल सुरु आहे असा अंदाजही जाणकारांना येतो. Light 1

अभ्यासू आणि सविस्तर प्रतिसाद देणारे आता इथे का दिसत नाहीत? की तेच लोक आता छोटे प्रतिसाद देऊ लागले आहेत? त्या जुन्या लोकांनी ह्यावर काही प्रतिसाद दिला तर थोडाफार उलगडा होईल.

सविस्तर आणि दीर्घ प्रतिसाद द्यायची भीतीच वाटते- आजकाल लोक प्रतिसादातले एखादे वाक्य quote करून त्याच्यावर मते मांडून विषय भरकटवतात...

साधारणपणे ज्या मुद्द्यावर वाद नाही त्यावर मोठा प्रतिसाद येत नाही.म्हणजे कथा एकदम चांगली आहे,नीट सुरुवात शेवट आहे, वाचकांना कळतेय असं असेल तर नुसतंच एकशब्दी छान आहे म्हटलं जातं.भय आणि ट्विस्ट कथाना त्यांच्यातला धक्का समजून घेण्यात किंवा समजला तर मजा कळून इतरांना किती समजलाय ते तपासायला मोठा प्रतीसाद येतो.
सर्वात जास्त प्रतिसाद कथेत एखादा रिग्रेसिव्ह(जरा जुनाटपणाकडे जाणारा) किंवा वादाचा मुद्दा असेल तर येतात(पात्राने त्याच्या बायकोबरोबर असं स्वार्थी वागायला नको होतं, हू डझ डॅट अश्या अर्थाचे)
प्रतिसाद त्रोटक दिले म्हणजे वावर कमी किंवा वाचन कमी झालंय असंही नाही.

धनुडी +1
यात अजूनही बरीच नावं ऍड होतील.
डॉ कुमारांचे कुठलेही लेख आणि प्रतिसाद यातून खूप छान माहिती मिळते. त्यामुळं सविस्तर प्रतिसाद पण लेखाईतकेच माहितीपूर्ण असतात.
आणि एक लक्षात आलंय का ऋन्मेष च्या कुठल्याही धाग्यावर असा एकशब्दी प्रतिसाद नसतो.
तरी अजून माबोने स्मायली खिरापतीसारख्या वाटल्या नाहीत नाहीतर 'छान' ' आवडले' 'वाचतेय' या शब्दांऐवजी कायप्पा सारख्या नुसत्या दोन दोन इमोजी च पडल्या असत्या.

Pages