मायबोलीवरचे प्रतिसाद

Submitted by पशुपत on 17 April, 2022 - 11:21

पूर्वी , म्हणजे ३~४ वर्षापूर्वी पर्यंत चांगल्या लेखांना मनापासून वाचून, विश्लेषण - उहापोह करणारे ५~५० उत्तम प्रतिसाद येत. मूळ लेखाइतकेच तेही वाचनीय असत.
आता असे खुसखुशीत लिखाणही कमी झाले आहे आणि
आता बहुसंख्य प्रतिसाद एक-दोन शब्दांचे असतात.. जसे की
छान
सुंदर
आवडले
लिहीत रहा

आणि ते ही कथांना येतात..

तुम्हालाही हे जाणवले आहे का ?
असे होण्याची काय कारणे असावीत ?

Group content visibility: 
Use group defaults

<<ज्योतिष लिहिणार आइडी वेगळा आहे का? >> मला ठाऊक नाही , पण मी नाही लिहीत.
मात्र तशा धाग्यावर प्रतिसाद लिहीलेत मागे.

आयफोन अ‍ॅप आल्यापासून प्रतिसादाचा उत्साह मावळला आहे माझा. त्यावर कॉपी-पेस्ट करता येत नाही. एडिटींग करणं हे एक दिव्य आहे.

त्यावर कॉपी-पेस्ट करता येत नाही Uhoh

मी तर व्हॉटसपवर पोस्ट लिहितो आणि ईथे पोस्ट करतो. मायबोलीवर थेट पोस्ट लिहायला गेले की मध्येच अक्षरे एकात एक होतात...

"मराठी कीबोर्ड मिळतो का आयफोन साठी ते शोधा. " - मराठी कीबोर्ड आहे. मुद्दा तो नाहीये. अ‍ॅप युझर फ्रेंडली नसल्यामुळे प्रतिसाद देताना मर्यादा येतात.

खरं आहे.
ॲप अजीबात युजर फऱेंडली नाही

अ‍ॅप कशाला वापरता? मी इन्स्टॉल केलं आणि विसरुन गेलो.

>> तुम्ही लाख app विसराल पण app तुम्हाला स्वतःला विसरू देणार नाही. गुगलवर मायबोली वरचा एखादा धागा शोधला आणि लिंक वर क्लिक केले तर तो धागा मायबोली app मध्येच उघडतो.. किंवा कधीकधी चक्क नुसतं app उघडतं.. धागा उघडतच नाही. आपणच app मध्ये शोधायचा मग तो धागा. :वैताग:

बाकी app वाले (फ्लिपकार्ट, अमेझॉन, कोरा, पिंटरेस्ट, फेसबुक, इंस्टा, ट्विटर वगैरे) तुमच्याकडे app असतानाही जसा तिथल्या तिथे ब्राउझरमध्येच ती लिंक उघडण्याचा ऑप्शन देतात तो ऑप्शन नाहीच !! म्हणजे तुम्ही app डाउनलोड केले आहे तर आता मायबोलीच्या कोणत्याही लिंक्स तुम्हाला app मध्येच नेणार (तिकडे तो धागा उघडेल याची कोणतीही गॅरंटी नाही). Uhoh

तिकडे तो धागा उघडेल याची कोणतीही गॅरंटी नाही >>>> ग्यारंट्र्र्र्र्र्री? माझा तर आजवर नाही उघडला. अ‍ॅपचे होम पेजच उघडते थेट..

तिकडे तो धागा उघडेल याची कोणतीही गॅरंटी नाही >>>> ग्यारंट्र्र्र्र्र्री? माझा तर आजवर नाही उघडला. अ‍ॅपचे होम पेजच उघडते थेट..

तिकडे तो धागा उघडेल याची कोणतीही गॅरंटी नाही >> माझ्या मोबाईलवर तो धागा न उघडता अ‍ॅपचे होम पेज उघडले जाण्याचीच गॅरंटी आहे.

नव्या लेखकांना प्रतिसाद मिळवायचे हातखंडा विषय माहीत नाहीत इतकेच,
कथेतील एखादे पात्र अति उजवे, अति डावे, एका विशिष्ट विचारपद्धतिला शिव्या घालणारे दाखवले तर भरपूर प्रतिसादाची बेगमी होईल Proud

झालेच तर अति फेमिनिस्ट, अति परंपरावादी, विबास ची भलामण करणे वगैरे हक्काचे विषय आहेतच

तुमचा अभ्यास कमी पडतोय. काही काही वैद्यकीय माहितीसाठी असलेल्या धाग्यात सुद्धा लोक तोंपासु प्रतिसाद देतात. धागे काढायचे सोडून रममाण झालेले धागेकुमार तर हिरीरीने पुढे दिसतील त्यात. ( नाव नाही घेतलेलं, नाहीतर माबोप्रेमी धावत येतील )

मला तर बुवा नेहेमीच प्रचंड प्रतिसाद मिळतो,
मी तुम्हा सर्वांहून वयाने खूप मोठा आहे. मला भारत सोडून ५२ वर्षे झाली.
त्यामुळे माझी मते इथल्या बहुतेक लोकांपेक्षा वेगळी असतात. त्यामुळे नाराज झालेले लोक आपली नाराजी अनेक रीत्या व्यक्त करतात. काही जण तर एकदम भयंकर भडकतात नि फारच नावे ठेवतात.
मला हे समजते, म्हणून मी मुकाट्याने कुणि काही लिहीले तरी रागावत नाही! आजकाल मी काहीच गोष्टी गंभीरपणे घेत नाही. वेळ घालवायला मायबोलीवर येतो.

मलाहि पाचपाटील यांचे लेख आवडले.

@ नन्द्या४३ ,
हं.

झप्पी (नाव चुकले असेल )नावाच्या एका आइडीचे हेच मत होते. त्यांनी मायबोली सोडली असं वाचल्याचं अंधुक आठवतंय.

@ नन्द्या४३ ,
<< आजकाल मी काहीच गोष्टी गंभीरपणे घेत नाही. वेळ घालवायला मायबोलीवर येतो.>>
प्रतिसाद पण !!

<<मलाही मस्त प्रतिसाद मिळतात- धागे दोनशे पार करतात... त्यात पन्नास माझेच असतात...
Submitted by च्रप्स >> ही ॠ यांची जुनी आयडिया आहे!!
ॠ , हलकेच घ्या.

<<फीनिक्स >> तो प्रांत वेगळा आहे

सिम्बा, प्रतिसादां साठी किंवा चर्चेत राहण्यासाठी केलेल्या लेखनाबद्दल नाही बोलत आहे मी.

<<एका शब्दाच्या प्रतिसादात वाईट काय आहे ?>> रानभुली , वाईट काहीच नाहीये!

धागाकर्त्याची खुर्ची काटेरी असते.
प्रतिसाद द्यावेत तर धागा चालवायला प्रतिसाद देतोय हा आरोप झेलावा लागतो.
प्रतिसाद न द्यावेत तर धागाकर्ता धागा काढून कुठे पळून गेला म्हणून ओरडा खावा लागतो.
म्हणून ऐकावे मायबोलीकरांचे करावे मनाचे.


मी तुम्हा सर्वांहून वयाने खूप मोठा आहे. मला भारत सोडून ५२ वर्षे झाली.

पालुपद.
(मेरी एक टांग नकली है मै हॉकी का बहुत बडा खिलाडी था )

मायबोलीवर सध्या चांगल्या विषयांचे अनेक धागे आहेत. अशा विषयांना आवर्जून प्रतिसाद दिला तर लोकांना उदाहरणासहीत समजेल प्रतिसाद कसे, कुठे द्यायचे.

धागा बंद पडला का ?
लेखकाने मोठे प्रतिसाद म्हणजे चांगले या समजातून धागा काढला असावा असे वाटते. कीस पाडणे म्हणजे उत्तम चर्चा असेलच असेही नाही. उत्तम वाचक त्याला काय हवे हे सांगू शकतो. त्याचा फायदा लेखकाला होतो. पण कथा, कादंबरी अशी अशी हवी होती हे उत्तम कथा, कादंबर्‍या लिहीणार्‍याने सांगितलेले जास्त बरे असते. व्यवसाय कसा करावा याच्या टिपा ग्राहकाकडून घ्यायच्या कि यशस्वी व्यावसायिकांकडून ?

सोशल मीडीयात सल्ला देणार्‍यांची अजिबातच कमी नाही. त्यातच पिसं काढली म्हणजे आपण अभ्यासपूर्ण प्रतिसाद दिला असा समज असणारेही नग असतात. चुका काढल्या म्हणजे आपण विद्वान झालो या अविर्भावात देखील प्रतिसाद दिले जातात. आपला प्रतिसाद इतर लोक वाचणार आहेत हे भान काहींना टाळता येत नाही. या मुळे प्रामाणिक, कळकळीने आलेले प्रतिसाद तसे कमीच असतात.

सोशल मीडीयात लिहीणारे आपापला व्याप सांभाळून लिहीत असतात. बरेचदा लिहायला घेतले आता उरकावे म्हणूनही लिखाणकाम संपवले जाते. अशा लेखकांची बलस्थाने ओळखून त्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे असते. पूर्ण वेळ लेखक असे आता कमी कमीच दिसणार आहेत. त्यासाठी जो संयम लागतो, शिस्त लागते ती फावल्या वेळात लिहीणार्‍यांकडे येणे अशक्य असते. शिवाय त्यावर पोट भरणार का ?

डॅन ब्राऊन हा पूर्ण वेळ लेखक आहे. एकदा मांड ठोकली की तो प्लॉट पूर्ण केल्याशिवाय कोणत्याही कारणाने बाहेर जात नाही. मात्र या वेळात ठराविक अंतराने तो व्यायाम करतो. त्यामुळे त्याचा उत्साह कायम राहतो असे त्याचे म्हणणे आहे. एव्हढे सगळे फ्रीडम असूनही त्याच्या पुढच्या कादंबर्‍या तितक्याशा प्रभावी झाल्या नाहीत.

त्यामुळे फावल्या वेळात लिहीणार्‍यांना किती कडक निकष लावायचे याचाही पाचपोच हवाच की... फारच अपेक्षा ठेवल्या तर त्या पूर्ण करताना कादंबर्‍या लिहून प्रकाशित करणे सोपे नाही का ?

माझे इतकेच म्हणणे आहे कि प्रतिसाद म्हणून एक-दोन शब्दां बरोबर लेखातील काय आणि/किंवा का आवडले हे एक दोन वाक्यात लिहीले, लेख वाचून कोणते विचार मनात आले हे थोडक्यात लिहिले की लेखक-वाचक असा थोडा संवाद होईल...

Pages