Submitted by गारंबीचा शारूक on 15 April, 2022 - 12:05
आधीच्या धाग्याने अठराशे प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर.
आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/80722
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मलाही आवडला होता धुरळा, फार
मलाही आवडला होता धुरळा, फार चालला नाही का?
एकदा किय झालं बघायचाय.
एकदा किय झालं बघायचाय. पाहिलाय का कुणी ?
मी पाहिलाय
मी पाहिलाय
माझ्या सिनिक प्रवृत्ती ला विशेष झेपला नाही.किंवा अगदी गदगदून रिलेट व्हावं असा वाटला नाही.पण फेसबुकवर जे रिव्ह्यू येतायत ते पाहता लोकांना खूप आवडलाय.
कथा अगदीच इवली आहे.
स्पेशली बद्री कि दुल्हनिया...
स्पेशली बद्री कि दुल्हनिया... हा मुव्ही प्रचंड अंडर रेटेड आहे. >>>
@च्रप्स, अगदी अगदी.
छान आहे हा मुवी. एकाचवेळी भारत आणि इंडियात जगत असलेल्या तरुणाईचा चित्रपट आहे.
बद्री कि दुल्हनिया बघितला पाहिजे. त्याच दिग्दर्शकाचा आहे.
अवांतर - रॉकेट्रीबद्दल
अवांतर - रॉकेट्रीबद्दल इस्रोतील इतर शास्त्रज्ञांचे आक्षेप
https://www.indiatimes.com/news/india/90-of-rocketry-the-nambi-effect-is...
हा, मी याच धाग्यावर लिहिलं
हा, मी याच धाग्यावर लिहिलं होतं हे
म्हणजे जास्त माहिती नव्हतं पण तरी खटकत होतं
स्पेशली अब्दुल कलाम यांच्यासोबतचा प्रसंग
ते सगळेच प्रकरण मला too good
ते सगळेच प्रकरण मला too good to believe वाटले होते
काँग्रेस स्वतच्याच शास्त्रज्ञाना कशाला खड्ड्यात घालेल
थर्टीन लाईव्ज बघितला. आवडला.
थर्टीन लाईव्ज बघितला. आवडला.
माणुसकीचं असं दर्शन झालं की भारावून जायला होतं. ही बातमी घडली तेव्हा वाचत होते, पण चित्रपट बघताना जास्त जाणवतं.
थर्टीन लाईव्ह्ज बघितला.
थर्टीन लाईव्ह्ज बघितला. अप्रतिम सिनेमा!! कुठेही वेळ न दवडता थेट सुरू होतो आणि शेवटपर्यंत पकड सुटत नाही. कुठलाही फाफटपसारा नाही. जबरदस्त सिनेमा!! (बरं झालं बॉलीवूडने हात नाही घातला ह्या विषयात
)
धन्यवाद फेफ... अनन्या
धन्यवाद फेफ... अनन्या लावायचा विचार होता. हा ट्राय करीन आता.
बॉलिवूड असतं तर आई वडील
बॉलिवूड असतं तर आई वडील देवाला साकडे घालताना एक गाणे, मग सर्व धर्मसमभाव म्हणूंन देऊळ चर्च आणि मशिदीत प्रार्थना

रेस्क्यू करणाऱ्या एकाची घरची परिस्थिती, त्याचा बायकोशी झालेला बेबनाव, त्यांचे प्रेमाचे एक गाणे, मग तो इथे जीव धोक्यात घालताना पाहून तिला उपरती होणार मग ती त्याला फोन करणार, त्यांचे भावुक संवाद, एक भ्रष्ट राजकारणी, मग सगळ्याच इंव्हेन्ट करणारे मिडीया, मग हिरो येणार तो एकाच वेळो सगळ्यांना पाठीवर घेऊन गुहा पार करणार, सलमान असेल तर शर्ट काढून तो उघडा होणार वगैरे वगैरे
अक्षय कुमार असेल तर तो देशभक्तीपर काहीतरी बोलणार
रेस्क्यू करणाऱ्या एकाची घरची
रेस्क्यू करणाऱ्या एकाची घरची परिस्थिती, त्याचा बायकोशी झालेला बेबनाव,
>>>>
हे ॲक्चुअली अश्या टाईपच्या ईंग्लिश पिक्चरमध्ये खूप दिसते. घटस्फोट झालेले नवरा बायको. त्यांचेही एक मूल. झाल्यास बायकोचा नवीन बॉयफ्रेंड वगैरे... आणि मग त्या ॲक्शनहिरोची माणूसकी बघून पुन्हा प्रेमात पडलेली बायको. ऑपरेशन संपल्यावर त्यांच्या गोड. किसने शेवट
होय किस mandatory असतो
होय किस mandatory असतो त्यांच्याकडे
मग डायनोसॉर चा मुवि असो वा चक्रीवादळ अथवा एलियन
शेवटला किस नई झाला तर पब्लिक थिएटर मधून जाणार नाहीत अशी भीती असावी बहुदा त्यांना
शेवटला किस नई झाला तर पब्लिक
शेवटला किस नई झाला तर पब्लिक थिएटर मधून जाणार नाहीत अशी भीती असावी बहुदा त्यांना
ह.ह.पु.वा.
वैयक्तित आयुष्यात या हॉलिवुड हिरो/हिरॉईनचे २-३ घटस्फोट झाले असतात, त्यांची मुले त्यांच्यापासून दूर असतात पण फिल्मी जीवनात मात्र ते प्रेमळ व मुलांची काळजी घेणारे दाखवतात.
शेवटला किस नई झाला तर >> तर
शेवटला किस नई झाला तर >> तर सेन्सॉर सर्टिफिकेट मिळत नाही म्हणे.
धुरळा बघितला. मस्त आहे. आवडला
धुरळा बघितला. मस्त आहे. आवडला.
सगळी पात्रं छान लिहिली आहेत. सगळ्यांनी कामंही छान केली आहेत.
प्रसाद ओकच्या बायकोचं पात्रही आवडलं.
फारएण्डने लिहिलं होतं, तसं बॅकग्राऊंडला काय चाललं होतं. बुजगावणं, लगान पोस्टर, भिंतीवर धोणीचं नाव,
प्रसाद ओक भर चौकात मांडव टाकून फुलांनी आजोबांची तुला करत असतो तिथे प्लास्टिकच्या खुर्चीवर त्याचा मोठा फोटो आणि शेजारी अगदी लहानसा शिवाजी महाराजांचा फोटो...
सुरुवातीला उमेश कामतचा सीन आहे, तिथे सो.कु. टीपॉयवर चहा ठेवून आत जाते. उमेश कामतच्या क्लोज-अपला मागे खोलीत तिची लाल साडी जरा वेळ दिसते. नंतरच्या क्लोज-अपला दिसत नाही. त्यावरून कळतं की ती आणखी आत निघून गेली असावी. मग अंकुश चौधरी आणि उमेश कामतमध्ये बाचाबाची होते, आवाज चढतात, त्यानंतरच्या उ.का.च्या क्लोज-अपला पुन्हा मागे लाल साडी दिसते. म्हणजे चढलेले आवाज ऐकून ती बाहेर आली आहे. आणि जरा वेळाने तिचाही क्लोज-अप दिसतो.
सो.कु. थोरल्या दिराला 'ब्रेकफास्ट रेडी आहे' सांगते. आणि लगेच जावेला 'नाश्ता झालाय' असं सांगते. (तिचा इंग्लिशचा हव्यास)
अशा बारीकसारीक गोष्टी खूप आहेत.
फक्त एकच वाटलं- अलका कुबलची क्लिप व्हायरल होते. आमदार तिच्यावर रागवतात. क्लिपवरून लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी वेगळं काहीतरी करावं लागेल म्हणतात. पण वेगळं काय ते इंडिकेट सुद्धा केलेलं नाही. माणसं जस्ट लाइक दॅट त्या क्लिपबद्दल विसरून जातात आणि ती उजळ माथ्याने सगळीकडे फिरणं चालू ठेवते.
<<<थर्टीन लाईव्ज बघितला.
<<<थर्टीन लाईव्ज बघितला. आवडला.
माणुसकीचं असं दर्शन झालं की भारावून जायला होतं. ही बातमी घडली तेव्हा वाचत होते, पण चित्रपट बघताना जास्त जाणवतं.<<
अगदि अगदि.... फार आवडला हा चित्रपट.
नकळत मन बॉलिवुडशी तुलना करतेच.
कि आपल्याकडे अश्या थिमवर चित्रपट काढला असता तर, मुळ गाभ्याशी फारकत घेउनच.
सर्वात आधी तर ते मिडीया... मोबी व्हॅन... पोलिस यंत्रणा... पालकांचा आक्रोश... त्यांचा सरकारवर दबाब. विरोधी पक्ष लगेच आपली लाल करुन घेणार, हे आलच. रेस्क्यु टिममधेपण एखादी दुश्मनी. गुहेत तुफान हाणामारी. मुलांची कोच हिरवीण. गुहेतच एखादी गाणे वै. अन सर्वात शेवटी हिरोने एकेक करुन मुलांना बाहेर आणणे.
मुले बाहेर आल्यावर सुद्धा आधी पत्रकार त्यांना, "आता इतक्या दिवसांनी बाहेर आल्यावर आप्ल्याला कसे वाटत आहे, विचारणार!
पालकांच्या डोळ्यात कृतज्ञतेने अश्रु.. द एंड
१३ लाइव्हस, इथे वाचुन पाहिला.
१३ लाइव्हस, इथे वाचुन पाहिला... अप्रतिम, वास्तव चित्रपट... मुलं जिवंत सापडतात तेव्हा डायव्हर्स ची रीअॅक्शन... सर्वांचे प्रयत्न, मिडीया, पालक सगळच अगदी वास्तवदर्शी.. पालक मुलांना आणि कोच ला पत्र पाठवतात तेव्हा कोच ची रीअॅक्शन " मला वाटलं होतं की मुलांना या इथे घेउन आलो म्हणून पालक माझ्यावर चिडले असतील पण ते मला धन्यवाद देत आहेत" बघुनच मला रडायला आलं...
बॉलिवूड असतं तर >> हा हा हा .. परफेक्ट अॅनॅलिसिस.
आणि टॉलिवुड , प्रभास, राजामौली असते तर... हिरो सर्व शक्तिनिशी एखादा मोठा दगड पाण्याच्या प्रवाहात असा टाकतो की सगळा पाण्याचा प्रवास डायव्हर्ट होतो, लक्ख उन्हं, आणी जमलेली सगळी मंडळी मिळुन जोर्जोरात नाच सुरु ..
राजकुमार राव नाव वाचुन् हिट द
राजकुमार राव नाव वाचुन् हिट द फर्स्ट केस बघितला. रारा लौकिकास जागला तरी मुळात कथाच ग्रिपिन्ग वाटली नाही. परत भुतकाळही प्रत्येक वेळेस एकेक तुकडा असा वाढत जातो व शेवटी तसाच अर्धवट राहतो. मुळ चित्रपट तमिळ, त्यातले गुन्ह्याचे कारण त्या पब्लिकला पटेलसे, बॉलिवुडचे बॉलुवुडच्या लौकिकास साजरे.. पण प्रेक्षकांना तर पटायला हवे.. असो.
राराने काम चांगले केलेय, सान्या गोड दिसलीय, त्यापलिकडे काहीही काम लिहिलेलेच नाही त्याला ती तरी काय करणार?
पोलिसांनी प्रत्येकाचे कॉल रेकॉर्ड घेऊन त्याचे पुढे केले काय हा प्रश्न पडला. जर तेच निट तपासले असते तर गुन्हेगार तिथेच पकडला गेला असता. गुन्हेगार एकदा चौकीत येतो तेव्हा धडधडीत खोटे बोलतो, त्या दिवसाचे कॉल रेकॉर्ड बघितले असते तरी खोटे पकडले गेले असते.
घटस्फोट झालेले नवरा बायको.
घटस्फोट झालेले नवरा बायको. त्यांचेही एक मूल. झाल्यास बायकोचा नवीन बॉयफ्रेंड वगैरे... आणि मग त्या ॲक्शनहिरोची माणूसकी बघून पुन्हा प्रेमात पडलेली बायको. ऑपरेशन संपल्यावर त्यांच्या गोड. किसने शेवट Happy>>>>> 2012 आठवलेला दिसतोय, डिट्टो वर्णन आहे.
यावरून एक गंमत आठवली. माझा भाचा लहान असताना डायनासोरचा कोणतातरी मुव्ही बघायला गेला होता, त्यात मध्येच असा सीन सुरू झाल्यावर हा भर थेट्रात मोठ्याने म्हणाला "आता हे काय मध्येच?" अवांतर झालं जरा.
2012 आठवलेला दिसतोय, डिट्टो
2012 आठवलेला दिसतोय, डिट्टो वर्णन आहे.
>>>
मी मोजकेच ईंग्लिश पिक्चर बघतो. पण असे बरेच चित्रपटात पाहिल्याचे आठवतेय.
२१०२ येस्स तो थिएटरातच पाहिलेला.
बहुधा डाय हार्ड मध्ये असे होते. परत एक मध्यंतरी व्हाईट हाऊस वर अटेक होतो त्यातही असा काहीतरी सीन होता. अजूनही आहेत, नेमकी नावे वगैरे आठवत नाही. एका शार्कच्या चित्रपटातही असे होते. परत तो कयामत नावाचा हिंदी पिक्चर बघा कुठल्यातरी ईंग्लिश पिक्चरहून घेतलेला, त्यातही असेच काहीतरी होते अजय देवगण नेहा धुपियाचे. जर ईंग्लिश पिक्चर हिंदीमध्ये डब असेल तर समजून जातो त्यांच्यातला सीन. पण ईंग्लिशमध्येच पाहिला तर मेले नवराबायको आहेत की गफ्रे बॉफ्रे ते ही नाही समजत. एकतर मंगळसूत्र घालायचीही पद्धत नाही त्यांच्यात. त्यांची भाषा नाही कळली तर ओळखायचे तरी कसे..
असो, सांगयचे मॉरल हे की इमोशनल लव्ह ड्रामा बरेच ईंग्लिश पिक्चरातही असतोच. आपल्याकडे गाणीही टाकायची असतात चित्रपटात, त्यांचेही एक मार्केट असते. तर व्यावसायिक एंगलने जरा जास्त असेल ईतकेच.
हिट द फर्स्ट केस जबरदस्त पेस
हिट द फर्स्ट केस जबरदस्त पेस ने जातो हे आवडले. ते हिट हे फूल फॉर्म मधे विचित्र नाव आहे. टोटल गंडलेले आहे.
Homicide Intervention Team
Homicide Intervention Team (HIT)
>>>हिट द फर्स्ट केस जबरदस्त
>>>हिट द फर्स्ट केस जबरदस्त पेस ने जातो हे आवडले.
अगदी !!
एक-दोन ठीकानी फिस्सकन हसायला आले
रारा हवालदाराला सांगतो ना इसकी ड्राइंग ट्युशन स्टार्ट करवादो
वर चर्चा पाहुन धुराळा पहिला ,
वर चर्चा पाहुन धुराळा पहिला , आवडला . कार्तिकेय २ आवडला.
मागच्या काही दिवसांत पाहिलेले
मागच्या काही दिवसांत पाहिलेले सिनेमे.
1.mathu vadalara- तेलुगू पाहिला काल प्राईमवर.
वासू आणि बाबू दोन डिलीव्हरी बॉय असतात.क्वीक पैसे कमवण्यासाठी काही ट्रिक वापरता वापरता एका व्रुध्देच्या म्रुत्यु स कारणीभूत ठरतात.आणि तिथून पुढे सुरु होते खरी स्टोरी.
विनोदी, सस्पेन्स आहे..पिक्चराईजेशन पण वेगळे आहे..मजा आली बघायला.
सुरूवातीला पंधरा-वीस मिनिटे बोअर होतो मग पकड घेतो सिनेमा.
2.भीष्म-तेलुगू
युट्यूब वर हिंदीत..टैमपास आहे..टिपीकल साऊथ मसाला सिनेमा....नीतीन,रश्मिका,अनंत नाग. मुख्य भुमिकेत.
3.Dejavu- तमिळ प्राईमवर.
एका क्राईम लेखकाने प्रेडिक्ट केल्या प्रमाणे स्टेट DGP ची मुलगी किडनैप होते.. अन्डरकव्हर पोलिस मिस्ट्री सॉल्व करायला येतो..त्यात अजून एक क्राईम केस गुंतलेली असते..बराच गुंतागुंत सिनेमा पण शेवटी अनप्रेडिक्टेबली सगळा गुंता सुटतो...चांगला आहे सिनेमा बघू शकता..क्राईम इन्वेस्टिगेशन आवडत असेल तर.
4. kaduva - मल्याळम.
विवेक ओबेरॉय vs pruthiraj सुकुमारन.
हातात सत्ता असलेला उध्दट IG विवेक आणि सधन शेतकरी असलेला प्रुथ्वीराज यांच्यातील कुरघोडी.. ऐक्शन सिनेमा..चांगला आहे.
5. Malayankunju- मल्याळम..फहाद फासील एक इलेक्ट्रीशीयन असतो..मुसळधार पाऊस आणि landslide नंतर अख्खं गाव जमिनीखाली जातं..त्यातून तो कसा वाचतो आणि एका बाळाला वाचवतो अशी गोष्ट..सेकंड हाफ थ्रीलींग आहे.
6. लास्ट नाईट इन सोहो- इंग्रजी. सायकोथ्रीलर,हॉरर,सस्पेन्स सिनेमा पाहिला प्राईमवर..घाबरवणारा नाहीये.. खिळवून ठेवणारा आहे.
चांगला आहे..
पठाण चालवायचा असेल तर त्याला
पठाण चालवायचा असेल तर त्याला पौराणिक कथेचा तडका दिला पाहीजे.
अकरावा अवतार म्हणून पठाणच्या रूपात भगवान जन्म घेणार असतात अशी सुरूवात करून पुढे रेग्युलर फिल्म दाखवली तर हिट होईल.
नवीन Submitted by रानभुली on 20 August, 2022 - 04:10 >>>> हा हा हा हा हा सो फनी .
१३ लाईव्हज्स - खूप आवडला.
१३ लाईव्हज्स - खूप आवडला. घडलेली घटना दुर्दैवी असली तरी पॉजिटीव्ह घेतलाय हे आवडलं. नो रडारड, नो ड्रामा हे प्लस पॉईंट्स.
डाईव्ह टीम ने किती जीव तोडून कष्ट केलेत त्या मुलांना बाहेर आणायला. आतमधे ती मुलं आणि कोच कसे राहिले त्याचं फारसं काही दाखवलं नाहीये. काय मनस्थिती असेल की जिवंत राहू का नाही मदत मिळेल का नाही सगळंच अनिश्चित.
जेव्हा मुलांना फुड पॅकेट मिळतात तेव्हा तो कोच फक्त २ घास खा. बाकीचं सेव्ह करा उद्यासाठी. ते खूप आवडलं.
मलाही त्याच्या त्या सीनला भरून आलं जेव्हा म्हणतो पॅरेटंस थँक्यू म्हणत आहेत.
मुलांना मदत दिसल्यावर सगळे हात जोडून खूप वेळा आभार मानतात ते पण अगदी टची.
धुरळा धमाल आहे
धुरळा धमाल आहे
स्टारकास्ट तगडी आहे. आणि सर्वांनीच तगडा अभिनय केला आहे. सगळ्यांनी बेअरींग पर्रफेक्ट पकडले आहे.
शेवट काय ते समजले होतेच. तरी सीन टू सीन पिक्चर बघायला मजा येत होती.
सईसाठी चार शब्द तर जरूर लिहावे. आधीही मला तिच्या अभिनयक्षमतेबद्दल शंका नव्हतीच. पण ग्लॅमरस ईमेजमध्ये जरा अडकली होती. अर्थात अशी कोणीतरी असणे गरजेचेही होते मराठी चित्रपटसृष्टीसाठी. पण आता तिच्या अभिनयक्षमतेला न्याय मिळेल अश्या भुमिका ती करू लागलीय आणि काय कमालीचा अभिनय करू लागली आहे.
सुरुवातीच्या दृश्यात तिला संवाद जास्त नव्हते. पण नजरेतूनच ईतका जबर अभिनय करत होती की संवाद कमी असल्याचेही खटकले नाही. आणि मग जेव्हा तिचा रोल सेंटरला आला आणि संवाद सुरू झाले तेव्हा ते ही ठसकेबाजपणे बोलत खाऊन टाकला पिक्चर.
तिचा बुरगुंडा झाला ग्ग बाई चा प्रचार फार आवडला. रिवाईंड करून दोनदा पाहिला तो सीन
मला सई ईतर कोणापेक्षाही जास्त आवडते म्हणून तिच्याबद्दल चार शब्द. पण अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, प्रसाद ओक, सो कूल, आपला ट्टॉक अमेय वाघ आणि अगदी अलका कुबल या सगळ्यांच्या चाहत्यांनीही चित्रपट आवर्जून पाहावा.
धुरळा कशावर आहे? प्राईम?
धुरळा कशावर आहे? प्राईम?
Pages