चित्रपट कसा वाटला - ६

Submitted by गारंबीचा शारूक on 15 April, 2022 - 12:05

आधीच्या धाग्याने अठराशे प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर.
आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/80722

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फूट फेअरी बघून आलेली उद्विग्नता:(अगदी थोडे स्पॉयलर्स अहेड)
अरे काय लेको, ठिके घेतलाय कोरियन चित्रपटावरून.पण ज्यांनी तो मूळ पाहिला नाही त्यांच्यावर दया करावी ना.तुमचा तुम्ही उरलेला पेपर सोडवा इतकं तोंडाने सांगून किमान प्रेक्षकांना क्लोजर द्या ना.प्रेक्षकांनी काय नंतर कोरा वर थिअरी वाचत बसायच्या का?बरं, जो क्लु शेवटच्या नावं येण्याच्या भागात आहे म्हणतात तो आम्हाला आलाच नाही.(ओटीटी ठिके, पण एरवी चित्र स्थिर होऊन पहिलं नाव आल्यावर जिन्यावरची गर्दी टाळायला उठणारे लोक आम्ही, अशी शेवटच्या 5 सेकंदात उत्तरं सांगून कसं चालेल?)
मला कापूस कोंड्याची गोष्ट ऐकल्यावर येते ती भयाण पोकळी आली आहे.

अर्थात आधी आणलेल्या वैतागामुळे आपल्याला वाईटही वाटत नाही. >>>> Rofl भारी रिव्यु अस्मिता Lol

अस्मिता भारी रिव्यु..

जमेच्या बाजू म्हणजे रणबीर-आलिया अत्यंत सुंदर दिसलेत>>>>
हे कसे मॅनेज करतात? की इथेही पेशल एफेक्ट??

अस्मिताचे चित्रपट परिक्षण वाचून सकाळ सार्थकी लागली....
इतके निर्बुद्ध चित्रपट का आणि कसे बनवतात हे लोक ??

फूट फेअरी नेटफ्लिक्स वर
अस्मिता भारीच लिहिलंय!! ब्रम्हास्त्र कधी ओटीटी वर पाहिला तर आधी हे परीक्षण वाचून मगच पाहेन आणि पाहून आल्यावर परत वाचेन Happy

लोग आते गये कारवा बनता गया सारखे हे होते. अमिताभ आहे तर त्याच्या पात्राने अमुक एक वागायला हवे, अमुक एक निषिद्ध , हिरो असला तर तो असाच वागणार, हिरोइन असेच वागणार वगैरे बरेच स्टिरिओटाईप्स आजही आहेत.. हे सगळे संभाळुन चित्रपट बनवताना जी खिचडी बनते तीची चव बिघडते. कुठले पात्र कसे वागणार ह्याचा अंदाज ते पात्र कोणी केले यावरुन येतो. बॉलिवुड ह्या स्टिरिओटाईप्स मधुन बाहेर पडेल तो सुदिन.

अस्मिताने अत्यंत निर्लेपपणे review लिहिलाय.
वाचताना मजा आली.
OTT वर आल्यावरच बघू.
उगीच अतिकौतुक नाही fan gang सारखे आणि उगीच नावे नाही ठेवली बहिष्कार gang सारखे.
समशेरा पाहून तोंड पोळल्याने रणवीर विषयी साशंक आहे आता. तो काम करतो त्याचं चोख पण त्यात आधीसारखी मजा नव्हती समशेरा मध्ये.

चांगलं लिहीलय अस्मिता. पण बाकी सगळ्याच हीरोंचे रोल जर काही मिनिटांचे आहेत तर नक्की एवढे पावणेतीन तास आहे तरी काय पिक्चर मधे ? फक्त मेन कॅरेक्टर वरच सगळा भर असेल तर ते बघणे खरंच कंटाळवाणे होते. त्यात तोही कोण तर रणबीर :डोहामाबा:

मला रणबीर रॉकस्टार आणि ये जवानी है दिवाणी मध्ये आवडलेला.. बर्फी मध्ये प्रचंड पकाऊ होता.. त्यापेक्षा जास्त प्रियांका पकवते...

मला बर्फीत आवडलेला. रॉकस्टार बघताना थेटरातच झोप लागली. पिक्चर सम्पायला आला तसे सोबतच्यांनी उठवले Happy थेटरात झोप लागण्याइतका वाईट पिक्चर आधी कधी पाहिला नव्हता.

बर्फीची गाणी खरंच मस्त होती. आज ऐकते. इतनीसी हंसी. लै भारी. पिक्चर मला पकाउ वाटला.

आज एव्हरी थिंग एव्हरी व्हेअर ऑल अ‍ॅट वन्स बघितला. एकदम मस्त आहे. चित्रपट लेखन संवाद फार बेस्ट. मिशेल यो उत्तम काम केले आहे तिचा नवरा मुलगी तिची मैत्रीण, वडील सेंट्रल पात्रे व जेमी ली कर्टिस जुन्या काळातली नटी पण आहे. टेकिन्ग बिझी वाटू शकते. पन ओव्हर ऑल मस्त.

अस्मिताचा रिव्ह्यु भन्नाट आहे, हा मुव्ही ७-८ वर्श प्लॅनिन्ग मधे होता अस वाचल , इतके वर्श काम करुन जर असल काहितरी बनवल तर कठिणच आहे .

धुरळा थोडा वेळ बघून बंद केला. समीर विद्वांस, क्षितिज पटवर्धन, सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी, अमेय वाघ, अंकुश चौधरी आदि शहरी मंडळींनी पश्चिम महाराष्ट्रातील ग्रामीण राजकारण हा विषय घेऊन काहीतरी फेक नाटुकलं सादर केल्यासारखं वाटलं. प्रतिनिधित्व या गोष्टीचं महत्व अशा वेळी कळतं. Zero authenticity. यापेक्षा काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रातलं राजकारण entertaining झालेलं असताना काही ग्रामीण भागातील युट्युबर्सचे व्हिडियो बघितले ते जास्त authentic होते.
नागराज मंजुळे किंवा इतर कोणी केला असता तर बघवला असता धुरळा कदाचित.

अस्मिता अशक्य धमाल लिहिलं आहे

एकसे एक पंचेस
मागेच उभे असतात ....
आणि आश्रमाला पुढे कुलूप मागे मोकळं .... बेक्कार हसतोय

छोटा भीम ऑन स्टिरॉइड्स हे एपिक Happy Happy

मला रणबीर रॉकस्टार आणि ये जवानी है दिवाणी मध्ये आवडलेला.. बर्फी मध्ये प्रचंड पकाऊ होता.. त्यापेक्षा जास्त प्रियांका पकवते...>>>>>>>
ज्याच्या त्याच्या आवडी !
कुटुंबा समवेत बर्फी मूव्ही टिव्ही वर तीन चार वेळा तरी पाहिला असेल .
प्रत्येक वेळी त्या दोघांच्या अभिनयामुळे आणि श्रवणीय संगीत मुळे निखळ आनंद भेटला .

विक्रम बघितला.
जबरदस्त ऐक्शन थ्रीलर सिनेमा. आवडला.

ब्रम्हास्स्त्र सिनेमा पहायला गेलो. तिकीट काढायला काऊंटर वर गेलो तर काऊंटरबाॅय बोलला कार्ड, कॅश किंवा पेटीएम असेल तर तिकीट मिळेल नाही तर नाही. त्याला त्याच्या मॅनेजर ला बोलवायला लावले तो आला आणी त्याने ही हेच ऊत्तर दिले ऊद्या येऊन बघ म्हणे. मी त्याला फोनपे/गूगलपे ने पैसे द्यायला तयार होतो. पेटीएम मी वापरत नाही. पाकीट मी आणले नव्हते, बूक माय शो वर सर्वीस चार्ज म्हणून ते चाळीस रूपये जास्त घेत होते. शेवटी समोरच्या पानीपुरीवाल्याला पेटीएम केले पैसे नी कॅश घेतली. तिकीट घेतले. ह्या सर्वात अर्धातास गेला. मी आत जाऊन बसलो नी तिकीटाचा फोटो काढून आयनोक्स च्या साईटवर मेलआयडी मिळवून सदर प्रकाराबद्दल तक्रार केली. इंटरवलला मूतारीबाहेर कुणीतरी माझी वाट पाहत होतं, बाहेर आल्याबरोबर मॅनेजरसाहेबांनी नमस्कार चमत्कार करून मला साॅरी वगैरे बोलले. मेल काय करायचा छोट्या गोष्टीवर वगैरे ऊपदेशही केला. मी माझा अर्धा तास गेला व तुम्ही पेटीएम वापरत नाही तर तसं साईट वर का मेंशन करत नाही वगैरे बोललो. त्याने मला कोम्पलीमेंटरी पाॅपकोर्न ओफर केले. मी नकार दिला. दुसर्या दिवशी मला फोन आला गुगल पे नंबर विचारला गेला व तिकीटाचे पैसे परत आले.

विक्रम मधील रॉलेक्स ( सूर्या ) च्या एन्ट्री वेळी चे म्युझिक भन्नाट आहे .>>>>> येस..सूर्याला त्या अवतारात बघून सरप्राईज.. नेहमी डिसेंट भूमिकेत पाहिलेय.

*विक्रम आवडला असेल त्यांच्या साठी*:- त्याच डायरेक्टर चा नगरम-तेलुगू पण आवडेल प्राईमवर आहे..सेम डायरेक्टर चे मास्टर्स आणि कैथी तर बघितले असतील..यांच्या सिनेमात हिरोईन नसते, गाणी नसतात.. प्युअर ऐक्शन,थ्रीलर,फास्ट मुव्हींग सिनेमे.

ब्रह्मास्त्र बघायला घेतलाय.
इंटर्व्हल झाला.अजून तरी आवडतोय.खूप खूप खर्च करून vfx केलेय.मौनी रॉय आणि आलिया छान दिसते.रणवीर अभिनय करतो आणि चांगला वाटतो.शाहरुख पण आवडला.
सर्वात न आवडलेली आणि दम नसलेली गोष्ट: डायलॉग.कधीकधी समोरच्या कोनाड्यात उभी हिंदमाता बेंबटेरावांचं नाव घेते माझा नंबर पयला वाला फिल येतोय.मला उगीच 'आमच्या वेळी' वगैरे टाईप्स हे डायलॉग सलीम जावेद ने कसे लिहिले असते वगैरे असं काही वाटतंय.

“ मला उगीच 'आमच्या वेळी' वगैरे टाईप्स हे डायलॉग सलीम जावेद ने कसे लिहिले असते वगैरे असं काही वाटतंय.” - Happy नका त्या विषयावर जाऊ. उगाच हिंदूंच्या भावना दुखावण्यासाठी बॅड गाईज हिंदू आहेत वगैरे अँगल्स निघायचे त्यात Happy

धनवन्ती, अमित,आशुचँप, साधना, प्राजक्ता, भाग्यश्री, अनु,मृ,झकासराव सर्वांना थँक्स Happy

मलाही रणबीर व आलिया दोघेही आवडतात. माझी फार अपेक्षा नसते( झिम्मा आवडलेल्यांपैकी Proud ) आणि मला पैसे वाया गेले वगैरे वाटले नाही. मी बघणारच होते व बघितलाही. केसरिया गाणे, वाराणसी, आश्रमाचा परिसर, डोंगर दऱ्या वगैरे फ्रेम्स सुंदर आहेत, मला मजा आली. फक्त या कास्ट व बजेटमधे कथेला नीट बांधून, संवांदातली केमिस्ट्री व दर्जा सुधारून अजून चांगला बनवणे सहज शक्य होते. एक फ्रँचाईज म्हणून पुढे काय करतील याची उत्सुकताही आहे.

भाग्यश्री , सिनेमात अमिताभचा रोल दीर्घ आहे पण व्यक्तिरेखा तुटक वाटत राहते. गाणी व इतर टिपी भरपूर आहे.

कॉमी व फेरफटका यांचे प्रतिसाद वाचले, आवडले.
अनैसर्गिक संवांदांबाबत कॉमी यांना अनुमोदन.
अनु , कसा वाटला लिही Happy

मागील काही पानावरील review वाचुन आणि tvवर पहायला मिळाले म्हणून हे सिनेमे बघितले. माझ्याबाबतीत वयामुळे घडतंय की काही दुसर कारण आहे, माहित नाही. पण इथे बर्‍याचजणांना आवडलेले सिनेमा, मला तरी सर्व साधारण वाटले.
१. पुष्पा: typical भडक southy movie, mainly तेलगू. Smuggling चे उदात्तीकरण केले आहे. पुर्ण सिनेमात कोणालाच हे चुकीचे वाटत नाही. अ अर्जुन हे नाव तेंव्हा कळले. आधी एक- दोन सिनेमे पाहिलेत. मला तरी सर्वच सिनेमात, उर्ध्व नजर आणि थंड डोळे (that may be acting) , same वाटला. फक्त get up वेगळा.

२. विक्रम: so ordinary movie with again typical southy fights in every 15 min. कमला हसनने आता track बदलावा. चांगले actors फुकट घालवले आहेत.

३. KGF आणि बाहुबली: max 30 min with all patience.

४. धुरळा: चांगला आहे पण somehow पटला नाही. ती निवडणूक ग्रामपंचायतीची जिल्ह्यापातळी किंवा राज्यपातळीवरील वाटते. अख्ख्या गावातील एकाच घरातील सर्वच जण एकदम शिक्षित. घरातील फक्त एकच न शिकलेला, पण तो गुणी. आणि शेवट तर typical ज्ञानदिपी.

५. कठपुतली: original पेक्षा फारच चकचकीत. मुळ सिनेमातील शिक्षिका,ती शाळा,परिसर खुपच genuine वाटतात. ह्यातील शिक्षिका कधीही "तुम्हे जो मैने देखा" म्हणेल अस वाटत. फक्त मुळ सिनेमातील suspense नंतरचा ४०-४५ मिनीटांचा फाफटपसारा टाळल्याबद्दल दिग्दर्शकाचे आभार.

हि मा वै म

हे गुप्त जागी असून गेटच्या बाजूस 'आश्रम' असे स्पष्ट लिहिलेय तरी व्हँप गँग याच्या शोधात आहे
Lol
हो तो बोर्ड कश्याला लावलेला कळले नाही. हाच आश्रम आहे हे पब्लिकला सांगायचे होते का त्यातून.
बहुधा व्हिलन गॅंग आपल्याला दिल्ली मुंबईतच शोधत राहील आणि हिमालय की चोटी पे येणार नाही असा विश्वास असावा.

शाखाचे संवाद अत्यंत भंगार आहेत. व्हिलनशी पकडापकडी खेळताना त्याला 'तू घोडा आहेस... नाही, तू तर हत्ती आहेस, गेंडा आहेस' असं अत्यंत वैताग वाटावा असं बोलत राहतो. मगं मौनी रॉय त्याला जादूने बार्बेक्यू/ब्रॉईल करत करपवून टाकते. अर्थात आधी आणलेल्या वैतागामुळे आपल्याला वाईटही वाटत नाही>>> खूपच हसले Lol
अस्मिता यु रॉक!

Pages