चित्रपट कसा वाटला - ६

Submitted by गारंबीचा शारूक on 15 April, 2022 - 12:05

आधीच्या धाग्याने अठराशे प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर.
आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/80722

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टेनेट (नेफ्लि)
नोलनचे चित्रपट अत्यंत आवडता. म्हणूनच हा त्याचं नाव बघुनच चालू केला. साय फाय, टाईम ट्रॅव्हल, डोक्याचा भुगा करणारे चित्रपट ही आवडतात. पण हा टेनेट मधला कन्सेप्ट मला तरी कायच्या काय मुद्दामुन कॉम्प्लेक्स करायचा म्हणून चार वळसे जास्तच केलेला वाटला. अजुन सगळा पूर्ण केलेला नाही. तो बघेनच. नोलनचा आहे त्यामुळे समजला नाही तर परत एकदा बघेन. पण काल बघताना जी किक बसयला हवी होती ती नाही बसली त्याचं दु:ख झालं. माझीच अक्कल कमी पडली असू दे.

गम्मत म्हणजे सुरुवातीलाच एक डायलॉग येतो. डोंट ट्राय टू अंडरस्टँड इट, जस्ट फील इट! तो आपल्याच सांगितलाय असं वाटतं. आणि नोलन असं का सांगतोय वाटतं. अरे अंडरस्टँड नका करू म्हणजे. तेच तर करायला तुझे मुव्ही बघतो ना. नुसतं ग्राफिक नाही बघायचं आहे. भंजाळून जायला तर आलोय ना?

कार्तिकेय २ साठी फॅमिली ला जरा टेन्शन च घेऊन गेलो होतो , पण आवडला त्यांना !
सिनेमात पी के प्रमाणे हिंदू देवतांची विटंबना बिलकुल नाही आणि महिमामंडण ही नाही !
एक वेळ फॅमिली सोबत पाहण्यासारखा नक्कीच आहे.
थोडा इतिहास थोडीशी मायथोलॉजी मिक्स करून आत्ताच्या युगात सांगड घालण्याचा प्रयत्न केलेला आहे .
श्री कृष्णाने उद्धव ला दिलेले कडे आणि त्या कड्यात लिहिलेले भविष्यातील रोगराई पासून संरक्षण करण्याचे उपाय अशी थोडीशी काल्पनिक पण रंजक पद्धतीने केलेल्या मांडणीमुळे धर्मापासून दुरावत चाललेल्या पुढील पिढीला थियेटर मध्ये गुंतवून ठेवण्यात कार्तिकेय २ यशस्वी होतो.

हसताय काय ?
प्रतिक्रिया द्या की Happy

डोंट ट्राय टू अंडरस्टँड इट, जस्ट फील इट! तो आपल्याच सांगितलाय असं वाटतं.
>>>'किक' आहे की पण सलमानची Lol
(आठवा: दिलमें आता हुं समझमें नही)
मी याची वाट बघत होते हे विसरून गेले होते.

रंजक पद्धतीने केलेल्या मांडणीमुळे धर्मापासून दुरावत चाललेल्या पुढील पिढीला थियेटर मध्ये गुंतवून ठेवण्यात
पुढील पिढीला PK जास्त गुंतवून ठेवणारा वाटला असेल Lol

दिलमें आता हुं समझमें नही >> Biggrin
बघ आणि सांग. आम्ही इनसेप्शन सारखी बघू आणि चर्चा करू मोड मध्ये बसलेलो. पण झोपच आली. Wink डोकं चालवावसंच वाटलं नाही.

कार्तिकेय2 आवडला. एकदा थिएटर मध्ये पाहण्यास काहीच हरकत नाही . सहकुटुंब एन्जॉय करता येतो. हॉलीवूड आणि बॉलीवूड याच्याशी तुलना न करता पहिला . कथा, संगीत आणि सिनेमॅटोग्राफी छान जमलीय. सुट्टीचा आनंद घेता येतो.

सहकुटुंब एन्जॉय करता येतो. हॉलीवूड आणि बॉलीवूड याच्याशी तुलना न करता पहिला . कथा, संगीत आणि सिनेमॅटोग्राफी छान जमलीय. सुट्टीचा आनंद घेता येतो. >>>>>>>>>>>
नक्कीच !
करण जोहर चे तेच तेच श्टोरी असलेले सहकुटुंब सिनेमे पाहून पाहून वैताग आलाच होता . त्यातून सुटका तानाजी , बाजीराव पेशवा , कार्तिकेय ने दिली ...

१३ lives .. ॲमेझॉन प्राईम.
आठवड्याभरता दोनदा पाहिला. आधी मी एकट्याने. आणि मग कुटुंबासोबत त्यांना दाखवायला.

छान बनवला आहे. ना कुठे अतिरंजित नाट्य दाखवले आहे, ना डॉक्युमेंटरी फिल येतोय. तसेच सुरुवातीपासूनच जे घडलेय त्यावरच फोकस केलेय. ईतर फाफटपसारा बिलकुल नाही.

ही न्यूज तेव्हा लेट फॉलो केल्याने सारे डिटेल्स माहीत नव्हते जे या पिक्चरमधून समजले.
जसे की डोंगरावरून येणारे पावसाचे पाणी कसे दुसरीकडे वळवले, जे फार त्रासाचे पण तरीही महत्वाचे काम होते. कारण मिशन पुर्ण झाल्यावर लगेचच त्या गुफा पुढील आठ महिने पुर्ण पाण्याखाली गेल्या. जर ते पाणी वळवले नसते तर बचाव कार्य पुर्ण व्हायच्या आधीच ती परीस्थिती उद्भवली असती.

दुसरे म्हणजे मुलांना बेशुद्ध करून बाहेर काढले हे माहीत होते. पण तेव्हा हे लक्षात आले नव्हते की तो अनेस्थेशिया देणारा डॉक्टरलाही तिथवर पोहोचायला त्यांच्यातलाच एक असणे गरजेचे होते. त्यानंतरही एका डोसमध्ये ती मुले बाहेर निघणार नसल्याने मध्ये दुसरा डोसही देणे गरजेचे होते. विचार करूनच अंगावर काटा येतो की त्या पाण्याने भरलेल्या अंधाऱ्या चिंचोळ्या गुफांमधून ईतके वेळा ये जा करताना, ईतके तासांचा प्रवास करताना काय जीवघेणी दमछाक झाली असावी. बरं त्या पाण्याच्या प्रवाहातही फोर्स होता. स्विमिंगपूल मध्ये मारावी अशी डुबकी नव्हती. अश्या कामासाठी जे स्वेच्छेने जीव धोक्यात घालायला आले त्यांना तर हॅटसऑफच. पण एकूणच ५ हजार स्वयंसेवक तिथे जमा झाले होते. या आकड्याची कल्पना नव्हती.

पहिले आठेक दिवस ती मुले कुठल्याही मदतीशिवाय, अन्नपाण्याशिवाय, अंधाऱ्या गुफांमध्ये, ऑक्सिजन कमी होत जाणाऱ्या कोंदट जागेत शारीरीकच नाही तर मानसिक खच्चीकरणही होऊ न देता मेडीटेशन करत जिवंत राहिली हे देखील अफाट होते.

एकूणच या स्पिरीटसाठी जरूर बघावा हा चित्रपट.

पठाण चालवायचा असेल तर त्याला पौराणिक कथेचा तडका दिला पाहीजे.
अकरावा अवतार म्हणून पठाणच्या रूपात भगवान जन्म घेणार असतात अशी सुरूवात करून पुढे रेग्युलर फिल्म दाखवली तर हिट होईल.

थोडेसे सिनेमाई स्वातंत्र्य घेता येईल. कल्की अवतार पुढे ढकलता येईल.
चालला तर मग पठाण २ , पठाण ३ मधे त्याला अमानवीय दैवी शक्ती असतात असे पण दाखवता येईल.

हात दाखवून अवलक्षण, आ बैल मुझे मार या म्हणींचा अर्थ खालील लिंकवरून कळाला.
https://www.indiatoday.in/movies/bollywood/story/dobaaraa-registers-2-3-...

प्रत्येक वेळी बॉयकॉट मोहीम खोटी असते असे नाही हा धडा मिळाला.
प्रत्येक वेळी अतिरेकी गुणगाण मोहीमेमुळे पिक्चर आपटतो हा समज पण खोटा आहे का हे बघायचे राहीले आहे.

कोविड लसीचा फॉर्म्युला सोन्याच्या बांगडीत असतो

पठाणाच्या फेट्यावर मंकी पॉक्सच्या व्हक्सीनचा फॉर्म्युला असतो , असे लिहावे

मुलांनापण बघण्यासारखा आहे ना?
>>
हो अगदीच.
अश्लील, हिंसाचार, मन विचलित करणारे असे एकही दृश्य नाही.

13 लाईव्ह्ज हिंदी डब्बड नाहीये ना?
>>>
आहे हिंदी डब. तिथल्या भाषेतील संवादासाठी मात्र ईंग्लिश सबटायटल्स बघावेत. ते डब नाही केले. बाकी मला जमले, मला समजले म्हणजे मायबोलीवरच्या कोणालाही जमावे. मुलांनाही समजावे Happy

थाई संवाद जसेच्या तसेच घेतलेत
आणि मी मागेही लिहिले आहे तसे मुवि पाहिल्यावर आवर्जून युट्युब वर against the elements ही डॉक्युमेंटरी पहा

Pages