चित्रपट कसा वाटला - ६

Submitted by गारंबीचा शारूक on 15 April, 2022 - 12:05

आधीच्या धाग्याने अठराशे प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर.
आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/80722

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जॅकी श्रॉ. ला त्याच्या तिनपाट तोंडावरून माशी न हलणार्या लेका वरून ओळखावे...हन्त हन्त..फार वाईट काळ आलाय Sad
>>>>>>>>>>>

टायगर श्रॉफ आजच्या तारखेला वा केव्हाच्याही तारखेला बॉलीवूडमधील सर्वोत्तम नर्तक आहे. कदाचित हृतिकपेक्षाही सरस.
त्याची फायटींग सुद्धा स्टाईलिश असते. असे पॅकेज दुसरे नाही. पोरांना तो त्यामुळे आवडतो. अभिनय वगैरेशी त्यांना घेणेदेणे नसते Happy

बाकी जग्गूदादा फार आवडीचा.
पण तो ही काही अभिनयसम्राट नव्हता हे ही खरेय.
आणि त्याचा हिरो म्हणून काळ केव्हाच संपलाय. त्याने जे त्या काळात पिक्चर केलेत ते आजच्या पोरांना आवडतील याची ग्यारंटी नाही. त्यामुळे त्याची ओळख टायगर श्रॉफचे बाबा अशी असणे साहजिक आहे.

टायगर श्रॉफ आजच्या तारखेला वा केव्हाच्याही तारखेला बॉलीवूडमधील सर्वोत्तम नर्तक आहे. कदाचित हृतिकपेक्षाही सरस.
त्याची फायटींग सुद्धा स्टाईलिश असते. असे पॅकेज दुसरे नाही. पोरांना तो त्यामुळे आवडतो. अभिनय वगैरेशी त्यांना घेणेदेणे नसते Happy

बाकी जग्गूदादा फार आवडीचा.
पण तो ही काही अभिनयसम्राट नव्हता हे ही खरेय.
आणि त्याचा हिरो म्हणून काळ केव्हाच संपलाय. त्याने जे त्या काळात पिक्चर केलेत ते आजच्या पोरांना आवडतील याची ग्यारंटी नाही. त्यामुळे त्याची ओळख टायगर श्रॉफचे बाबा अशी असणे साहजिक आहे.

Submitted by ऋन्मेऽऽष on 27 June, 2022 - 03:26 >>>>>>>>>>> स ह म त .
मलाही टायगर श्रॉफ, ह्रितिक नंतर फार आवडतो। कार्तिक आणि वरून धवन सुद्धा आवडतात।

टायगर हृतिक डान्समध्ये उन्नीस बीस वाटतात. कोण जास्त चांगले हे समजणे मला तरी अवघड वाटते. पण हे टेक्निकली विचार करता झाले.
पर्सनली मलाही हृतिकचा डान्स बघायला जास्त आवडतो. त्याच्या कैक स्टेप्स आयकॉनिक आहेत. रणबीरही फार आवडीचा. आता कामात आहे. पण यावर रात्री एक वेगळा धागा काढतो. बरेच दिवस मनात होते राहून गेलेले. फार आवडीचा विषय आहे Happy

बँग बँग मुव्हीतील, 'तू... तू..तू . मेरी मैं तेरा होनेलगा' आणि बँग बँग, शिवाय ,घुंगरू तूट गये, यावरी ह्रितिकचा नाच मस्तच।

मेरी जंग चे नाव बरेच दिवस मेरा जांग्या असे समजत होतो. असा कसा पिक्चर म्हणून अलंकार ला गेलो तेव्हा करेक्ट नाव कळले होते.

Submitted by शांत प्राणी on 27 June, 2022 -
. >>>>>>>>>
Lol
शांत नाही अशांत माणूस !

अलंकार वरून आठवले !
लग्नाच्या अगोदर सुटीच्या दिवशी दुपारी १२/१ पासून रात्री ९/ १० पर्यंत पुण्यातील थेट्रातील मिळतील तेव्हढे शो मित्रासोबत पहायचो ,त्यात एखादा बॉलीवूड आणि इतर हॉलिवुड असे समीकरण असायचे ....
गेले ते दिवस .

लोकहो, प्राईमवर रौद्र नावाचा मराठी चित्रपट सापडला. सर्टिफिकेटवर मार्च २०२२ तारीख आहे. नशिबात थिएटर्स नाही आली. काळी टोपी, काळा कोट धोतर अशा पेहरावातला अधिकारी जनगणना करण्यासाठी गावात आला आहे. गावातले शेंडी ठेवणारे ब्राह्मण सहाय्यक म्हणून आहेत. कुणा नानासाहेबांकडे राहण्याची व्यवस्था करण्यासाठी नेले आहे. त्यांनी त्यांच्या सहाशे वर्षांपूर्वीच्या निर्मनुष्य वाड्यात व्यवस्था केली आहे. धारपांच्या शैलीतली कथा वाटली. सात आठ मिनिटेच झाली आहेत...

अनेक बघितला का आयुषमनचा कोणी? कसा आहे?

Submitted by अंजली_१२ on 27 June, 2022 - 10:01
बरेच पाहिलेत.

Submitted by शांत प्राणी on 27 June, 2022 - 10:02
>>>>>>>>>
Lol
शांत माणूस ,
तुम्ही सिरियस होऊन कधी लिहिता ?
त्या वेळी सलाईन लावलेली असते का ?

कार्तिक आर्यन माझ्या ओळखीत टिन एज गर्ल्सना सुद्धा आवडत नाही, त्याचा जबडा आणि एक्स्प्रेशन्स बघता तोंडाला वास/ बॅड ब्रिद प्रॉब्लेम यावर सगळ्यांचं एकमत आहे Proud

रौद्र इथे नोंदवण्यात घाई झाली. आली लहर केला कहर पद्धतीचा हौशी कलाकारांचा व्हिडिओ आहे. यूट्युबवर हॉरर कथांचं वाचन विथ व्हिज्युअल्स असा प्रकार असतो, इथे सफाईदार व्हिडिओ चित्रीकरण केले आहे. आख्ख्या सिनेमात इन मिन पाच ते सहा कलाकार आहेत. एव्हढ्या मोठ्या गावात बाकि कुणी दिसत नाही.
(हे पण खूप झाले).
आनंदाची बातमी : धाकड झी 5 वर आणि पृथ्वीराज चोहान प्राईमवर येत आहे. या चित्रपटांना उत्तम प्रतिसाद देऊन नुकसान भरून काढावे ही विनंती.

Netflix वर वीरता पर्वम नावाचा पिक्चर पाहिला. साई पल्लवी आणि राणा दुगुबत्ती अशी मेन जोडी आहे. साई पल्लवी नेहमीसारखीच छान आणि सहज....पण राणा दुगुबत्ती ओळखताच नाही येत की हाच बाहुबली चा भल्लाल देव होता...एवढा बारीक झालाय की बास...तो मुळातच असा आहे..आणि बाहुबली साठी त्यांनी सिक्स पॅक बॉडी बनवली असेल तर खरंच कौतुकास्पद आहे.
बाकी पिक्चर ठीक...

Rescued by Ruby बघितला नेटफ्लिक्सवर. रुबी ह्या भटक्या कुत्रीला कसं ट्रेन करतात आणि ती कशी आणि किती उपयोगी येते तपास कामात याची छान गोष्ट आहे.

Pages