चित्रपट कसा वाटला - ६

Submitted by गारंबीचा शारूक on 15 April, 2022 - 12:05

आधीच्या धाग्याने अठराशे प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर.
आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/80722

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मास्टर अफजुलखान
(शेर शिवराज मधे होता Wink ) >>> Lol

ते वाघची बायडी, कदीकदी जंगलमदे पन अस्ते

शंकर्‍याने त्याच्या 'फादर'ला 'चित्रपट कसा वाटला' धाग्यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहायला एक 'चिकवा - पुलं स्पेशल' धागा काढावा लागेल.

उंटावरून आठवले.
एकदा शाळेच्या युनिफॉर्ममधे डेक्कनवर टाईमपास करत असताना एक म्हातारा पोलीस आला.
"पोराहो , इथं का बसलाय ? बापाला माहिती आहे का ? अभ्यास करा, नाहीतर चला कुस्ती खेळायला आखाड्यात नेतो " म्हणाला.
यातली एक पण गोष्ट सोयीची नसल्याने आम्ही गांगरलो. थातूरमातुर उत्तरं दिल्याने त्याला चेव चढला आणि म्हणाला,
"कमिशनर ऑफीसला एक उंट आणलाय. टाचा वर न करता जो टिंब देऊन त्याच्या गाडीचा मुका घेईल तो पोलीस भरतीत सिलेक्ट. चला येताय का ?"
तिथून काढता पाय घेऊन नंतर सगळे हसत बसलो होतो.

एक असामी असामी धागा होऊनच जाऊदे अंगुर धाग्या सारखा.
माला मल्होत्रा चा इंजिन मध्ये कोळसे टाकणारा घालतो तसा टॉप आणि खाली पॅन्ट आणि वर चिमणी च्या विस्कटलेल्या घरट्यासारखी हेअरस्टाईल

टिंब देऊन त्याच्या गाडीचा मुका घेईल >>> Lol हे भारी आहे

चिकवा - पुलं स्पेशल >>> हपा - जरूर काढा. रेडी एनीटाइम Happy बाकी त्या कल्चरल शॉक धाग्यावरच्या तुमच्या पोस्टमधे "म्हैस" दिसल्यावर टोटल फुटलो.

चन्द्रमुखी पाहिला, नाही आवडला !
सुरवातीचा १ तास तर जाम कंटाळवाणा आहे , उत्तरार्ध थोडा बरा आहे, कथा पुढे जाते पण अपेक्षित वळणाने !
मुळात चन्द्रा-दौलतराव प्रकरणाला लव्हस्टोरी वगैरे लेबल देऊच नये, याला फक्त अय्याशी/रंगरलिया इ. म्हणणे योग्य आहे , तिच्या साइडने आहे एकतर्फी प्रेम !
तो दौलत बायको आवडत असूनही अचानक पुन्हा एकदा दुसर्‍याच बाईच्या नादी लागतो, तिला समाजापासून दूर रखैल म्हणून छुप्या फार्महाउसवर ठेवतो आणि तरी त्याला तो प्रेम म्हणतो Wink
मोहन आगाशेचं कॅरॅक्टर पटलं नाही !
जावई कितीही लाडका असो, अवति भोवती अनेक लोकांची लफडी पहायची सवय असली तरी जावयाचं लफडं इतक्या कॅज्युअली घेऊन त्याचीच बाजु घेणारा /मुलीलाही त्याला सपोर्ट करायला लावणारा बाप काही पटत नाही , तेही तो स्वतः इतका पॉवरफुल असताना ! मंत्री पदासाठी तरी जावई कशाला हवा असतो त्याला ? मुलीलाच बनवायचं कि मंत्री !
असो, अ‍ॅक्टिंग मधे अमृता खानविलकरने प्रयत्नं खूप चांगला केलाय , दिसते खूप सुंदर पण अस्सल तमासगिरीण नाही वाटत , भाषा एफर्टलेस नाही वाटत !
आदिनाथ, मृण्मयीने चांगलं काम केलय !
गाणी सिनेमा बघताना तेवढी नाही भावली, आधी चांगली वाटली होती !

अजय - अतुल हे मराठीत झी टीव्ही / स्टुडीओ आणि मनसे चित्रपट सेनेशी प्रोजेक्ट्सना मेहनत घेऊन संगीत देतात हा संशय आता हळू हळू पक्का होत चालला आहे. चंद्रमुखी आणि झुंड मधे त्यांनी पाट्या टाकल्या आहेत.

त्या चंद्रा गाण्याने तर वात आणलेला आहे. जिथे तिथे रील्स.>> रील्स बघणे कंपलसरी नसते Happy (असे मी स्वतःला बर्याचदा समजावतो Happy )

आपण असामी असामी आणि पुलं कोटस चा एक धागा काढूचया.
आता ही मनात पॉप होणारी वाक्य विषयांतर टाळायला इथे न टाकता पोटात दाबून ठेवणं अवघड आहे. Happy

मला चन्द्रमुखी चित्रपट म्हणुन ओल्ड फॅशन्ड वाटला, स्टोरी प्रेडीक्टेबल, पण म्युझिक अप्रतिम कर्णमधूर वाटले.
ईथे काही लोकांना ते संगीत ही आवडलं नाही हे वाचून आश्चर्य वाटले.. बहुतेक माबो करांची लेवल काहिच्या काही अचाट असावी Wink

तो चांद राती तेजाळताना हे गाणं तर मी कित्येक दा ऐकले :डोळ्यांत बदामः

जयेशभाई टाईम पास वाटला, नसता पाहिला तरी ओके आणि पाहिला तरी नुकसान नाही असा..
हीरोईन गोड चेहेर्याची आहे, रनबीर ने मेहेनती ने काम केलेय, त्याचा केयरफ्री डान्स बघायला मजा आली Happy

ते गंभीर विषय सुरू असताना उगाच पप्पी चा टॉपीक म्हणजे कोणाचं काय तर कोणाचं काय अस झालं Uhoh
रत्ना पाठक आणि बोमन ह्यांना अगदी वाया घालवलयं पण ठिक आहे, पोटापाण्या साठी करावं लागत असावं किडूक मिडूक काम पण!

माबो करांची लेवल काहिच्या काही अचाट >>>>याची काय गरज आहे? तुम्हाला आवडलं म्हणून प्रत्येकाला थोडीच आवडायला पाहिजे?

तुम्हाला आवडलं म्हणून प्रत्येकाला थोडीच आवडायला पाहिजे?>> बरोबर आहे. माझं ओपीनियन म्हणुन वाचा..

भुभू पाहिला
छान आहे कार्तिक आर्यन बरे झाले अक्षय नव्हता. आता वयस्कर वाटतो. हा फ्रेश आहे. कॉपीही वाटला नाही त्याचा अभिनय. स्वत:ची नेहमीची छाप आहे.
तब्बूची तिची नेहमीची स्वत:ची एक स्टाईल आहे ती ईथेही पुरेपूर वापरलीय. एका गोलमालमध्येही ती मांत्रिक बाई दाखवलेली त्याची आठवण झाली.
शेवटचा ट्विस्टही तसा छान आहे.
आधी मला वाटत होते की ती कायराच भूत वा भूताची हस्तक आहे जे सगळे योगायोग घडवत लोकांना मंजुलिकापर्यंत पोहोचवतेय.
शेवटी ते टिपिकल भूताचे खेळ जरा बोअर वाटले पण आधी मनोरंजक आहे चित्रपट. वन टाईम वॉच नक्कीच.

रन वे ३४ - जोरदार आपटण्यासारखा नाही वाटला. वन टाईम वॉच आहे. लँडींगच्या थरारानंतर मग फक्त चौकशी उरते. अमिताभ बच्चनने ती छान रंगवली आहे. चौकशी अधिकार्‍याचा आक्रस्ताळेपणा इ. खटकणार्‍या काही गोष्टींकडे दुर्लक्ष करावे लागते.

Pages