चित्रपट कसा वाटला - ६

Submitted by गारंबीचा शारूक on 15 April, 2022 - 12:05

आधीच्या धाग्याने अठराशे प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर.
आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/80722

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आरती,
पाहिला OK kanmani चा ट्रेलर आणि एक गाणे. छान आहे. आमची मुंबई चे मस्त शॉट घेतलेत. मणीरत्नम आणि ए आर रेहमान जोडी आहे. कुठे आहे का तो विथ सबटाईटल्स वा हिंदी डब वगैरे..?

ऋन्मेष.. नेटफ्लिक्सवर आहे इंग्लिश सब टायटल्स सहित.
हिंदीत ओके जानू याचाच फ्लॉप रिमेक आहे.
गाणे मेंटल मनधील पहिले का ? तेही फेमस होते.

मी काल एक मल्याळम Meow सिनेमा पाहिला प्राईमवर.
दुबई मधे सुपरमार्केट चालवणार्या माणसाची गोष्ट, त्याला तीन मुलं असतात आणि त्याला मांजर अजिबात आवडत नसते आणि तो खूप चिडका आणि संतापी असतो त्याच्या चीडखोरपणाला वैतागून बायको (ममता मोहनदास) माहेरी निघून जाते नीड अ ब्रेक म्हणून...शेवटपर्यंत पेशन्स ठेवून पाहिला आणि शेवट पाहून वाटलं, का बरं दोन तास घालवले हा सिनेमा पाहायला..
हलकाफुलका, कॉमेडी, फैमिली सिनेमा आहे पण इतका काही खास नाही.

@ आरती,
ओके थॅन्क्स चेक करतो नेटफ्लिक्स. आजवर कधी असे दुसऱ्या भाषेतील चित्रपट विथ ईंग्लिश सबटायटल हा प्रयोग केला नाही. जमते का असे चित्रपट एंजॉय करायला हे चेक करायला हवे.

ओके जानू तो हम्मा हम्मावाला ना. तो नाही पाहिला. बंडल आहे हे कानावर आलेलेच.

आणि येस, गाणे मेंटल मनधील पाहिले. मुंबईदर्शनवाले Happy

तलाश कुठे पाहिला ? मला पीपल हू वॉच्ड तलाश च्या लिस्टीत नाव का दिसत नाहीये ?
>>>>>

हायला.. हे असेही चेक करता येते का? आणि लोकं करतातही? प्रायव्हसी नावाची काही चीज राहिलीच नाहीये या जगात Sad

बाई दवे,
ऋन्मेष नावाने चेक कराल तर आयुष्यात सापडणार नाही मी तुम्हाला Happy

का बरं दोन तास घालवले हा सिनेमा पाहायला..>>>
Mrunali +११११
बायको माहेरी जाण्याचं खरं कारण शेवटी कळतं ते तर अगदी अ आणि अ आहे. त्या मांजर आवडणाऱ्या मुलीचपण आधी सस्पेंस दाखवून नंतर काहीच विशेष होत नाही पुढे. त्याच्या घरी अचानक रहायला येते काय आणि नंतर विसा नाही म्हणून त्याला त्रास नको म्हणून निघून जाते काय.. तिचा रोल नक्की कशासाठी होता? बायको जेलस व्हावी म्हणून?

येनी वेज,
तलाश बघून झाला. नेटफ्लिक्सवरच पाहिला. छान होता. लोकांनी माझ्या व्हॉटसपवर येऊन सस्पेन्स फोडले. रात्रीचे कसले भुताटकीचे पिक्चर बघतोस म्हणून विचलितही केले. तरीही एंजॉय केला. आवडला.

आमीर खानचा मुलगा अपघातात जातो. त्यानंतर एका सीनमध्ये असे दाखवलेय की त्याच्या डोळ्यासमोर ती घटना पुन्हा पुन्हा येते. त्या दिवशी मुलगा खेळायला जाऊ का म्हणतो तेव्हा तो आळसावून झोपलेला असतो. त्याऐवजी तो ही सोबत गेला असता तर, किंवा स्वत:च मुलासोबत खेळला असता तर.... असे काय काय त्याला आठवत राहते. हे फारच रिलेट झाले. किती बेक्कार फिलींग असेल ती Sad

@चैत्रगंधा
अगदी आणि अर्धा डझन म्हणजे Lol

जुरासिक पार्क पाहिला

रोबोट पहिल्या भागात मोठे रोबोट दाखवून मग पुढच्या भागात लहान मायक्रो रोबोट दाखवले

तसे ह्यात ते टिंडे उर्फ टोळ की कसले किडे आणलेत, किड्याचा डीएनए , त्या कृत्रिम मुलीचा डीएनए इ इ घोळ आहेत

किड्याचा शोध लावणारा चेहरा चायनीज सदृश्य का दाखवलाय ? की रिऍलिटी दाखवायला? शस्त्रटोळी म्हणजे मुसलमाण , तसे आता कृत्रीम किडे म्हणजे चायनीज ?

इरफान हवा होता , मेला बिचारा

Banerghatta- मल्याळम.पाहिला.
एका रात्रीतला,रस्त्यावर, ओमनीमधे, एक नायक आणि मोबाईल इतकंच आहे सिनेमात.
प्रत्यक्षात पाच लोकं फक्त त्यातले चौघं क्लायमॅक्स ला येतात.पुर्ण सिनेमा मोबाईल वर कॉल येत राहतात, नायकाचं आणि इतरांचं संभाषण यावरच आहे..तरीही खिळवून ठेवणारा, सस्पेन्स,थ्रीलर.
पहिली दहा मिनटं काही कळत नाही काय सुरू आहे नंतरची पकड शेवटपर्यंत आहे.

विक्रम बघतोय. इंटरवलच्या आधीचा ४५ मिनिटांचा सलग थरार हॅट्स ऑफ! एव्हढे लांब सलग प्रसंग आता सोडा पूर्वीही दाखवत नव्हते.

विक्रमचा फर्स्ट हाफ उत्कंठावर्धक झाला आहे. इंटर्व्हल नंतर धक्के बसणे कमी होते आणि फक्त अ‍ॅक्शन उरते. तरी समाधानाची गोष्ट म्हणजे यात एका वेळी एक फाईट आणि दोनशे जणांचे वातावरण टाईट छाप हाणामार्‍या नाहीत. कमल हसन च्या प्रभावामुळे एरव्ही नायकाच्या भूमिकेत असणारे सूर्या / सेतुपथी विजय (थलपती वेगळा ) हे यात खलनायक म्हणून दिसतात. तर फहाद फासिल हा नायकाच्या भूमिकेत दिसतो. सुरूवातीची पंधरा मिनिटे पडद्यावर काय चालू आहे हे समजतच नाही. कानात प्राण आणून संवाद ऐकावे लागतात. नंतर उलगडत जाते.

साऊथच्या डब्ड सिनेमाप्रमाणे उगीचच अचाट धक्के देणारा चित्रपट हा नाही. थोडाफार अब्बास मस्तानच्या स्टाईलने जातो. पण तेव्हढ्यापुरता. हिरोइझम झेपणेबल आहे. आताशा अ‍ॅक्शन सिनेमे मनोरंजन करू शकत नाही. त्यात फारसे नावीन्य नसते. बिक्रमची गोष्ट सांगायची शैली हीच त्याचा युएसपी आहे. कमल हसनने वयाला साजेशी भूमिका केली आहे. आजही त्याचा अभिनय काही ठिकाणी दाद घेऊन जातो. जर कुणाला पहायचा असेल तर यावर जास्त लिहीणे योग्य नाही. ते स्पॉईलरचे काम करेल.

पूर्वी माफक हिरोइझम वर सडकून टीका व्हायची. पण नंतर साऊथ वाल्यांनी ती आधी अतीमानवी आणि नंतर अमानवी कॅटेगरीत बसवल्यानंतर टीकाकारांची तोंडंच बंद झाली. थोडक्या प्रमाणात असेल तर माणूस अपेक्षा ठेवतो. टीका करतो. पण हाताबाहेरची केस असेल तर तो सांगायला जात नाही. या शिणुमामात केस अमानवीकडून थोडी अतीमानवी आणि काहीशी हिरॉईक कडे म्हणजे हातात असलेली या वाटेने जाताना दिसते. हा सुखद धक्का आहे.

अर्जुन / घायल या सिनेम्यात कोणताही अचाट प्रकार नसतानाही त्यातली साहसदृश्ये चर्चेचा विषय बनली होती. मुंबईच्या रस्त्यावरचा पाठलाग दोन्ही सिनेम्यात वाखाणण्यासारखा होता. यातली माणसं ज्या प्रकारचे काम करतात त्यामुळे त्यांची साहसदृश्ये जस्टीफाय होण्यासारखी आहेत.
एकूणच विक्रम उठून दिसणारा आहे. ओटीटी च्या प्रेक्षकाला घरातून थिएटरात आणायचे आणि दोन अडीच तास खिळवून ठेवायचे ही कसरत विक्रम ला जमली आहे.

तरीही माफक साहसदृश्ये असणारा कहानी सारखा धक्केपट जो प्रभाव पाडतो तसा विक्रमला जमत नाही. केजीएफ / पुष्पा पेक्षा मात्र मैलोनमैल चांगला आहे.

रणवीर चा जयेशभाई जोरदार amazon prime वर आलाय.विषय चांगला आहे पण कथेचा जीव लहान आहे .कॉमेडी करण्याच्या नादात गंभीर सीनही कॉमेडी वाटतात.शेवटी थोडं बोरही होतो पण वन टाइम वॉच. रणवीर ठीकठाक खरी कमाल बारक्या पोरीने केलीय तिचे सीन भारी आहेत. चांगले काम केलं आहे.

स्पॉयलर-भुलभुलैया च्या हँगओवर मधून बाहेर पडला नसाल तर यातही एक सीन साठी मॉंन्जोलिका आहे.

जूरासिक पार्क. पहिल्यासारखा उत्कंठावर्धक नव्हता पण तरीही आवडला कारण आयमॅक्समधे पाहिला व ती जादुच वेगळी असते. व मला हे सिनेमे आवडतातच.

की रिऍलिटी दाखवायला? शस्त्रटोळी म्हणजे मुसलमाण , तसे आता कृत्रीम किडे म्हणजे चायनीज ?>>>>>>>>>>
हो ना !
हॉलिवूडवाल्यांनी अँग्री बर्ड मध्ये पण ते लुटेरे मुसलमानी गेट अप मध्ये दाखवले आहेत .

जयेशभाई जोरदार बघितला.. टाईमपास आहे.. जयेशभाईच्या मुलीचं कॅरेक्टर सगळ्यात जास्त आवडलं .. कॅामेडी सीन्स पण चांगले घेतलेत .. फायरक्रॅकर गाणं पण मस्त आहे.. एकदा बघायला हरकत नाही

थोडक्या प्रमाणात असेल तर माणूस अपेक्षा ठेवतो. टीका करतो. पण हाताबाहेरची केस असेल तर तो सांगायला जात नाही. >> You nailed it!

मी असल्या चित्रपटांच्या वाटेलाच जात नाही..
वेळ लिमिटेड असतो, त्यात आपल्याला मनस्ताप कुठे करून घ्या..
हे चित्रपट गाजतात तेव्हा मजा वाटते मात्र!

शेर शिवराज पाहिला. चांगला आहे. आवडला. पावनखिंड च्या दुधानं तोंड भाजल्यावर हे ताक फुंकून पीत होतो. पण सर्वश्रुत घटनांवर भर दिलेला, पुष्कळश्या प्रमाणात व्हीएफएक्स इफेक्ट्स कन्व्हिन्सिंग असलेला शेर शिवराज आवडला.

शा मा, शेर शिवराज वर नवीन धागा काढा. फुल्ल पोटेन्शियल आहे. आत्ता बघता बघता प्रतिसाद देतो आहे. अफजखानाच्या सेनेत व्ही एफ एक्स आफ्रिकन हत्ती, तिशीच्या आतले असून पन्नाशीचे दिसणारे शिवबा, कोल्हापुरी 'मावळे', गनिमी कावा न वापरता उघड मारामारी करणारा बहिर्जी वगैरे... बरीच मजा मजा आहे.

हपा Lol
आफ्रिकन हत्ती आणि गँगवॉर प्रमाणे अफजलखानाने आपल्याच प्रतिस्पर्धी सरदाराचा रस्त्यात खून करणे हे पाहून बंद केला होता.

मुपो धानोरी हा चित्रपट संपूर्ण बघणार्‍याला माझ्याकडून वाडेश्वरला एक वेळचं जेवण किंवा नाश्ता ! पण खरंच पाहिला कि नाही यासाठी काही प्रश्न विचारले जातील. Wink

दिग्दर्शक स्वतः बहिर्जिंच्या भूमिकेत असल्याने उगीच फुटेज खाल्लयं. खान वधानंतरची लढाई पण लगेच आटोपली आहे.

आता आग्रा भेट !

जयेशभाई मी सुद्धा काल पाहिला.
घरच्यांना आवडला. मला ठिकठाक वाटला. बरेचसे अपेक्षित घडत होते. लहान मुलीने चांगला अभिनय केला असला तरी लहान मुलाचे कॅरेक्टर एक्स्ट्रा स्मार्ट दाखवणे हे सुद्धा क्लिशे वाटले. गंभीर विषयावर हलकाफुलका चित्रपट हा जॉनर होता. त्यात काही वेळा हसायला आले तरी हसता हसता अंतर्मुख व्हावे असे झाले नाही.

आवडलेली गोष्ट एकच म्हणजे जादू की झप्पी सारखे जादू की पप्पी. पतीपत्नीच्या नात्यातील चुंबनाचे महत्व अधोरेखित केले. जोडीदारांमध्ये लग्नानंतर शारीरीक संबंध तर प्रस्थापित होतात. कारण वंश वाढायला ते गरजेचे असते आणि ती नैसर्गिक उर्मी असते. पण एखादे चुंबन दोन्हीकडून तितक्याच ईंटेंसिटीने तेव्हाच येते जेव्हा दोघांना एकमेकांबद्दल फिलींग्स असतील. मग ते चुंबन प्रणयाचे असो वा मला तुझी काळजी आहे हे दर्शवणारे असो. एवढीच थीम घेऊन खरे तर एक वेगळा चित्रपट बनू शकेल. या चित्रपटात बरेच विषय एकत्र झाले असे शेवटी वाटले.

पण चित्रपट एकदा बघायला नक्कीच हरकत नाही. अश्या चित्रपटांकडून मला नेहमीच जास्त अपेक्षा असल्याने मनासारखा नाही वाटला तर मला मजा येत नाही ईतकेच.

रणवीर सिंग आवडताच अभिनेता आहे. यातही छान काम केले. तरी हा रोल एखाद्या आयुषमान खुराणाचा होता असे वाटले.

दिग्दर्शक स्वतः बहिर्जिंच्या भूमिकेत असल्याने उगीच फुटेज खाल्लयं >> +१ बऱ्याच लोकांचा अभिनय सुमार झाला आहे, पण दिग्दर्शकच माती खातोय म्हणल्यावर बाकीच्यांची काय कथा!

त्या बहिर्जीच्या गाण्यात तो दहा वीस लोकांना मारतो आणि त्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या लोकांच्या मध्ये येऊन बारकी बारकी मुलं आणि मुली त्याच्याबरोबर हसत हसत नाचत बागडत आहेत, असा एक मला बाष्पगद्गदित करणारा सीन येऊन गेला. त्या मुलांना ही मारामारी U रेटेड वाटली असावी.

व्ही एफ एक्स इतके बेक्कार आहेत की काही ठिकाणी मला तानाजी (की तान्हाजी) ची दाढी पण व्ही एफ एक्स वाटली.

शेवटच्या भेटीची कथा कदाचित दिग्पालने निनाद बेडेकरांच्या युट्यूब व्हिडीओत ऐकली असावी, त्यामुळे काही गोष्टी चांगल्या घेतल्या आहेत. तरीही त्यात काही स्वतःच्या गोष्टी घुसडून चांगल्या कथेचा कोथळाच काढायचा बाकी ठेवला आहे. आता तो विषप्रयोग नको हे सांगताना शिवाजी महाराज म्हणतात की आम्ही काही भ्याड नाही! हे काय लॉजिक आहे? शामियान्यात भेटल्यावर मारायच्या आधी गप्पांत महाराज इतके उघडपणे पंगा घेतील हे पटत नाही. तसा त्यांनी घेतला असता तर खान मिठी मारायला कशाला आला असता? उलट त्याला शेवटपर्यंत बेसावध ठेवणं हाच हेतू होता ना! असो, ह्यात काय बरोबर आणि काय चुकीचं ह्याची चर्चा करण्याइतपत पण चित्रपटात बाकीच्या गोष्टी लायकीच्या नाहीत. खान तुळजाभवानीची मूर्ती फोडताना बाकीचे त्याच्याच सैन्यातले लोक डोळे मिटून घेतात हे पाहून माझे डोळे भरून आले. खानाला मारा, पण ह्या लोकांना जिवंत ठेवा, चांगली आहेत बिचारी मनाने.

हपा, बरोबर आहे. खान महंमदाला मारेकर्यांकरवी विजापूरच्या वेशीवर मारण्याऐवजी, अफझलखानाचं क्रौर्य एस्टॅब्लिश करण्यासाठी त्याला विजापूरच्या बाजारात अफझलच्या हातून मरताना दाखवलंय. स्वतः दिग्दर्शकच बहिर्जीच्या भुमिकेत असल्यामुळे एकंदरीतच हेरखात्याला बराच स्कोप दिलाय (नाच, गाणी, विनोद, मारामारी, लढाई, कुकिंग). वैभव मांगले कुठल्याही रोलमधे फू बाई फू च्या स्किटचाच अभिनय करतो. भेटीच्या शामियान्यात शिवाजी महाराज अफझलखानाला गल्लीतल्या मारामारीसारखा ‘ढोस’ देतात. अश्या अनेक गोष्टी आहेत. पण पावनखिंड चा बेस पकडला तर ह्या गोष्टी जमेस धरूनही पुष्कळ चांगला प्रयत्न आहे.

Pages