राजकीय आणि सामाजिक विषयांवर चर्चा

Submitted by सॉक्स on 13 April, 2022 - 00:44

मायबोली वर राजकीय आणि सामाजिक विषयांवर उत्साहाने चर्चा होतात. त्या कधीकधी खूप माहितीपूर्ण असतात, आणि कधीकधी गोलाकार असतात, त्यांना ना सुरुवात असते ना अंत.

मला अशा चर्चांमध्यें सहभागी असलेल्या सदस्यांना एक प्रश्न विचारायचा आहे, कधी मायबोली वरील चर्चेमुळे एखाद्या विषयावर मतपरिवर्तन झाले आहे का ?

जर मत बदलले असल्यास कोणत्या विषयावर बदलले आणि कशामुळे बदलले ?-

१. आजपर्यंत माहीत नसलेली नवीन माहिती मिळाली ज्यामुळे मत बदलले.
२. विचार पद्धतीमध्ये किंवा मतापर्यंत पोहोचण्याच्या पायऱ्यांमध्ये त्रुटी आढळली, त्यामुळे मत बदलले.
३. तात्विक भूमिका आणि व्यवहारिक भूमिका यामध्ये फरक असू शकतो हे समजले.

मतपरिवर्तन झाले ते कसे होते ?
१. कट्टर भूमिका होती ती मवाळ झाली.
२. आतापर्यंत होती त्याच्या विरुद्ध भूमिका पटली.
३. मत बदलले नाही, पण विरुद्ध मताबद्दल आदर वाढला.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पालथे घडे आहेत

कुणी ह्या पक्षातून त्या पक्षात जाणार नाहीत

हिंदू असूनदेखील पूर्वी हिंदू धर्मावर ताशेरे ओढण्यात समाधान वाटायचे पण मायबोलीवरील काही फुरोगामी सदस्यांच्या एकांगी फोल चर्चेमुळे हिंदू धर्माचे महत्व लक्षात यायला लागले .
आणि वाल्मीकीचा वाल्या झालो Happy

चला व्हा सुरू Happy

तुमचा गैरसमज झालाय. तुमचा वाल्मिकीचा वाल्या झालाय. वाल्मिकींच्या मनात करुणा ओतप्रोत भरलेली होती. वाल्याच्या मनात काय होतं ते सांगायला नकोच.

वाल्याने कुर्हाड सोडून पेन हातात घेतले.

2014 चे सरकार तरुणांना पेन टाकायला सांगून काठी, तलवार, कुर्हाड देत आहे.

2014 चे सरकार तरुणांना पेन टाकायला सांगून काठी, तलवार, कुर्हाड देत आहे.
आणि एक वाडगे पण. देणग्या मागायला Lol

राजकारणाच्या धाग्यावर चार इकडचे आणि चार तिकडचे वेगवेगळ्या आयडीतून भांडत असतात. त्यात काहीच नवे नसते. वेगळा अँगल जर आपापल्या पक्षाच्या भूमिकेशी विसंगत असेल तर त्याला खास आयडींकडून अपमानित करून हाकलले जाते.
भारतीय जनता पक्षाला एकूण मतदानाच्या ३४% मतदान मिळून तो पक्ष ३०० पेक्षा जास्त जागा घेऊन निवडून आलेला आहे. एकूण मतदान ६०% झालेले आहे. काँग्रेस हा सुद्धा देशभर पसरलेला पक्ष आहे. २०१४ साली ८२ कोटी मतदारांपैकी ५३ कोटी मतदारांनी मतदान केले. त्यात भाजपला ३१% मतं मिळाली आणि हा पक्ष २८२ जागा घेऊन बहुमतात आला. काँग्रेसला १९% मतं मिळाली आणि ४० ते ५० जागा मिळाल्या.
जवळपास ३० कोटी लोकांनी मतदानात भाग घेतला नाही. भाजप आघाडीला ३४% मतं मिळाली.

म्हणजेच ४७% मतदार हे ना काँग्रेसकडे झुकलेले आहेत ना भाजपकडे. कदाचित काठावर असू शकतील.
मायबोलीवर मात्र ठराविक लोक ठराविक पक्षाच्या बाजूने ठराविक मुद्दे मांडत राहतात. त्यातही अर्धवट संदर्भ देणे, सोयीचे संदर्भ देणे चालत राहते. सुरूवातीस ठीक होते. पण तेच तेच किती काळ वाचणार ? त्यातून जरा वेगळे मत दोन्हीकडच्यांना सहन होत नाही. प्रत्यक्षात दोन्ही पक्ष नको असलेले असंघटीत लोक संख्येने जास्त आहेत. कदाचित काही लोक संघटीत ताकदीमुळे या दोन्हीपैकी एकाकडे मत देत असावेत.

यांना चर्चा करता येईल असा प्लॅटफॉर्म मायबोलीवर सध्या तरी नाही असे दुर्दैवाने म्हणावे लागते.

एक वाडगे पण ?
पंतप्रधान निवास योजना ची रक्कम डायरेक्ट ट्रान्सफर द्वारे अकौंट मध्ये जमा करून घेण्यात इतरांपेक्षा पुढे असणाऱ्यांनी तरी असे म्हणू नये !

का म्हणे ? काय दामोदर देतो का ते ?

आणि मी आवास योजना घेतली नाही, ज्याचे स्वतःचे घर जाग्यावर नाही, असल्या पनवती व्यक्तीकडून एक रुपायाही नको. म्हणून मी घेतली नाही.

आणि तशीही आवास योजना फसविच आहे, 2014 नंतर लोकांचे पगार वाढत नाही आहेत , 5000 ची इन्क्रीमेंट नाकारायची आणि अडीच लाख घराला द्यायचे , त्यापेक्षा वेळेवर पगारवाढ दे , माणूस स्वतः 3000 रु इएमआय भरेल की !! काँग्रेसच्या जमान्यात म्हणूनच अशा भिकारड्या योजनेची गरज पडत नव्हती.

पूर्वीच्या काळी राजे महाराजे जनतेला लुटून मग कधीतरी एखाद्याच्या अंगावर बक्षीस म्हणून अंगठी , कडे, शेला फेकत असत , मग राजाचे चेले टाळ्या वाजवणार , बघा राजा किती दानी !! ती आवास योजना म्हणजे तसा प्रकार आहे.

आणि असेच म्हटले तर मग भाजपाप्रेमीनी लहानपणी दंडाबुडात घेतलेल्या फ्री व्हेक्सीनचे पैसे काँग्रेसला द्यावेत की काय ?

पगारवाढ , पेन्शन मिळत नाही म्हणूनच भ्रष्ट्राचार च्या जागतिक क्रमवारीत भारत 85 व्या स्थानी आहे का ?

सरकारी नोकरी मिळाली की दिवसभर चकाट्या करत फिरणे , विकास योजनाची सावकाश अंमलबजावणी करणे , सामान्य जनतेशी जास्तीत जास्त फटकून / मग्रुरी वागणे , मलिदा मिळेपर्यंत कॉन्ट्रॅक्टर च्या फायली अडकवून ठेवणे यासाठी पगारवाढ हवी असते का ?
खरे म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगरवाढी अगोदर जनतेत पोल घेतला गेला पाहिजे .
जनता सरकारी लोकांच्या बाबतीत समाधानी असेल तरच सरकारी बाबूना फायदे द्यावेत अन्यथा बांबू !

स्वतःला सरकारी नोकरी नाही , ह्याची ही जलसी हो! Proud

पूर्ण सरकारी नोकरी तर मलाही नाही

सरकारी पगारवाढीचा संदर्भ इतक्यासाठीच दिला की तो एक बेंचमार्क असतो, म्हणजे सरकारी पगार 5000 वाढले की मग खाजगीतही एक दोन हजार वाढतात

सरकारी नोकर हेही जनतेचेच भाग आहेत, ते कुणी रोहिनग्या नाहीत.

सरकारी नोकरीतही लायक असेल तरच नोकरीवर ठेवतात , नाहीतर हाकलतात.

कुठले सरकारी कर्मचारी काम करत नाहीत म्हणे?
डॉकटर करतात , नर्स मुलांना डोस देतात , बसचे ड्रायव्हर कनडकटर काम करतात , शाळेत शिक्षक काम करतात , पोलीस काम करतात , पोस्टमन करतात, सैनिक करतात. सरकारी यंत्रणेच्या जीवावरच मोदीजी विश्वातील महान व्हाक्सीनगुरू झाले. त्यांनी सरकारी सफाई कामगारांचेही चरणामृत घेतले होते म्हणे.

उलट , लोकप्रतिनिधीच काम करत नाहीत , पण दोन लाख पगार , पाच वर्षात पेन्शन घेतात

त्यांना मिळते तर सामान्य लोकांना का मिळू नये ?

2014 पूर्वी कुणालाही पगारवाढ झाली की सर्वाना आनंद वाटत होता. कुणी नोकरीत कायम झाले की आनंद वाटायचा. कुणा ना कुणाला पगार मिळाला तरी तो पैसा समाजातच येणार असतो व इतरांनाही मिळणार असतो.

पण 2014 नंतर द्वेषाचे राजकारण रुजवले आहे, एसटी वाल्याना हाकलले की आरोग्य खात्यातील लोकांना आनंद वाटतो, मग त्यांची पगारवाढ नाकारली की बँकेतील लोकांना आनंद वाटतो, मग ब्यांकातही कर्मचारी कपात सुरू होते , त्याने अजून कुणालातरी आनंद होतो.

समाजाच्या एकेक घटकांचा सरकारी तिजोरीवरील हक्क संपवून त्यांना गुलाम करणे , याची ही सुरुवात आहे.

कुणी सांगितले ?
दरवर्षी रिपोर्ट भरतात , त्याच्या जीवावर भवितव्य ठरते

आणि आता तर 7 वर्षे मोदी आहेत, मग कोण करपटेड कसा असेल ? मोदींचा अपमान करू नका.

कर्मचारी कामचुकार आहेत म्हणे, आणि मग देश विश्वात डंका वाजवत आहे, ते एकट्या मोदींच्या जीवावर का ?

दहा वर्षांपूर्वी लोकपाल साठी केवढं मोठं आंदोलन झालं!. कायदा पास झाला. आता कोणाही सरकारी करृमचाऱ्याची भ्रष्टाचार करायची हिंमतच होत नाही.

मायबोलीच असं नाही पण एकंदरीत सोशल मीडियावर almost कोणालाही फॉलो करण्याची सोय असल्यामुळे अनोळखी लोकांची मतं जाणून घेता आली. असे लोक जे रियल लाईफमध्ये समोर येण्याची , काही मैत्री होण्याची शक्यताच नाही.

त्याआधी 'पुरोगामी' विचारांचे लोक हे घरात, मित्रपरिवारात, शिक्षक, डॉक्टर, सोशल वर्कर्स, उच्चविद्याविभूषित शास्त्रज्ञ, साहित्यिक असे सगळे बघितलेले होते. ते सगळे फारच चांगले, तत्वनिष्ठ, ध्येयवादी, आदर्श होते आणि आहेत. त्यामुळे पुरोगामी म्हणजे काहीतरी छान, अनुकरणीय असं वाटत असे.
हिंसाचाराच्या बाजूने लिहिणारे, स्रीद्वेष्टे, जातीयवादी, हिंदूधर्मविरोधी, भ्रष्टाचारसमर्थक पुरोगामी सोशल मिडियावरच बघितले. त्यामुळे चांगलेच डोळे उघडले. एक स्पेसिफिक मायबोलीवरील धागा लक्षात राहिला आहे पण लिंक देता येणार नाही कारण पुरेशी गरळ ओकून झाल्यावर धागाकर्त्याने मानभावीपणे 'आता हा धागा उडवा' असं प्रशासनाला सांगितलं आणि प्रशासनाने तो धागा उडवला.

https://youtu.be/LCR4Azc5ZGc
म वी आ च्या नेत्यांना या बाईने टर्र टर्र फाडले .
भाषा व्हलगर असली तरी संताप साहजिकच आहे !

सामना, जर धागा वाचून आणि त्यातले प्रश्न वाचून सुध्दा तुम्हाला धाग्याचा उद्देश समजला नसेल तर मी तुम्हाला वेगळे समजावून सांगू शकत नाही. Happy

समजावून सांगू शकत नाही > Rofl