
दोन चमचे काळी मोहरी
अर्धा एक चमचा लाल मोहरी
जिरे अर्धा चमचा
हिंग अर्धा चमचा
काळी मिरी 5,6
लाल तिखट एक चमचा
हळद अर्धा चमचा
हिंग एक चमचा
मेथी दाणे थोडे
दही एक चमचा
मीठ पांढरे , काळे दोन्ही अर्धा एक चमचा
साखर एक चमचा
गाजर कांजी करायला एक गाजराचे लांब तुकडे
भरपूर पाणी
मोहरी, जिरे , मिरे , हळद , तिखट , हिंग , मेथी , मीठ मिक्सर मधून एकत्र वाटून घ्यावे

ते ताटात काढून दही घालून हाताने कालवावे.

त्याचे दोन भाग करून दोन जारमध्ये भरले. त्यात भरपूर पाणी घातले. दोन्हीत अर्धा चमचा साखर घातली, एका जारात गाजर तुकडे घातले.

आता तीन दिवस असेच ठेवायचे.
तीन दिवसांनी होळीच्या दिवशी / दुसऱ्या दिवशी त्यात मूग / उडीद डाळीचे वडे करून सोडतात
मी वडे करीन किंवा अप्पे करीन
1.या पाण्यात बुंदी घालून थंड पेय म्हणून पितात.
2.भांडे काच किंवा चिनी मातीचे वापरतात, मी प्लास्टिक वापरले.
धातूचे भांडे अजिबात वापरू नये.
3.राजस्थान, युपी, बिहार येथे दिवाळी व होळीला करतात म्हणे.
4.काळे गाजर असले तर जास्त चविष्ट होते , पण ते नसेल तर कुठलेही वापरा.
5.असेच बीट कांजीही करतात.
बीट गाजर मिक्स कांजीही करतात.
काही लोक गाजर , बीट अर्धवट शिजवून घेतात. ते तुकडे लोणच्याप्रमाणे वापरता येतात.
6.काही लोक दही न घालताही करतात.
7.अगदी पारंपारिक पद्धतीत मातीच्या मडक्यात करतात आणि फडक्याने तोंड बांधून ठेवतात.
8.याला हिंगाची धुरीपण देतात. एक निखारा गॅसवर फुलवून घेतात. तो एका वाटीत घेतात , त्यावर हिंग आणि थोडे तेल टाकतात. मग धूर येतो, लगेच त्यावर मोठे भांडे / जार उलट धरतात व सर्व धूर कोंडून घेतात. मग लगेच त्यात कांजीचे मटेरियल , पाणी ओतून झाकण लावतात. धुराचा स्वाद पाण्यात उतरतो.
======================================
धुळवडीच्या दिवशी सुट्टी असल्याने वडे केले.
उडीद डाळ अर्धी वाटी आधल्या दिवशी संध्याकाळी भिजत घातली होती , रात्री ती मिक्सरमधून वाटून घेऊन झाकून ठेवली होती. आज सकाळी दीड वाटी पिवळी मूग डाळ 3 तास भिजत घातली. तीही मिक्सरमधून वाटून घेतली. पाणी पूर्णपणे काढून वाटली.

दोन्ही एकत्र करून चमच्याने भरपूर फेटले. त्यात एक चमचा गव्हाचे पीठ घातले व मिसळून फेटले. त्यात हवा पकडली गेली पाहिजे. हवा भरपूर पकडली गेली , याची टेस्ट म्हणजे थोडे बॅटर चमच्याने पाण्यात टाकले तर ते वर तरंगते.

त्यात मीठ , थोडी कोथिंबीर , लाल तिखट , जिरे , धणेपूड घातली . कांदा लसूण आले घातले नाही.
आमचे पीठ थोडे पातळ वाटले , म्हणजे चमच्याने तेलात सोडता येईल असे. त्यामुळे धपाटे / चपटे करणे शक्य नव्हते.
तळल्यावर मस्त स्पॉंजी झालेत. मग ते अर्धा तास पाण्यात सोडले. मग दाबून पाणी काढून कांजीत सोडले.
थोडे अप्पेही केले. पण तळणे जास्त सोयीचे आहे.


वडे नुस्तेही मस्त लागतात. दहीवडेही करता येतील.
अरे कांजीवड्यांची रेसिपी आहे
अरे कांजीवड्यांची रेसिपी आहे इथे. हीच हवी होती.
Pages