दोन चमचे काळी मोहरी
अर्धा एक चमचा लाल मोहरी
जिरे अर्धा चमचा
हिंग अर्धा चमचा
काळी मिरी 5,6
लाल तिखट एक चमचा
हळद अर्धा चमचा
हिंग एक चमचा
मेथी दाणे थोडे
दही एक चमचा
मीठ पांढरे , काळे दोन्ही अर्धा एक चमचा
साखर एक चमचा
गाजर कांजी करायला एक गाजराचे लांब तुकडे
भरपूर पाणी
मोहरी, जिरे , मिरे , हळद , तिखट , हिंग , मेथी , मीठ मिक्सर मधून एकत्र वाटून घ्यावे
ते ताटात काढून दही घालून हाताने कालवावे.
त्याचे दोन भाग करून दोन जारमध्ये भरले. त्यात भरपूर पाणी घातले. दोन्हीत अर्धा चमचा साखर घातली, एका जारात गाजर तुकडे घातले.
आता तीन दिवस असेच ठेवायचे.
तीन दिवसांनी होळीच्या दिवशी / दुसऱ्या दिवशी त्यात मूग / उडीद डाळीचे वडे करून सोडतात
मी वडे करीन किंवा अप्पे करीन
1.या पाण्यात बुंदी घालून थंड पेय म्हणून पितात.
2.भांडे काच किंवा चिनी मातीचे वापरतात, मी प्लास्टिक वापरले.
धातूचे भांडे अजिबात वापरू नये.
3.राजस्थान, युपी, बिहार येथे दिवाळी व होळीला करतात म्हणे.
4.काळे गाजर असले तर जास्त चविष्ट होते , पण ते नसेल तर कुठलेही वापरा.
5.असेच बीट कांजीही करतात.
बीट गाजर मिक्स कांजीही करतात.
काही लोक गाजर , बीट अर्धवट शिजवून घेतात. ते तुकडे लोणच्याप्रमाणे वापरता येतात.
6.काही लोक दही न घालताही करतात.
7.अगदी पारंपारिक पद्धतीत मातीच्या मडक्यात करतात आणि फडक्याने तोंड बांधून ठेवतात.
8.याला हिंगाची धुरीपण देतात. एक निखारा गॅसवर फुलवून घेतात. तो एका वाटीत घेतात , त्यावर हिंग आणि थोडे तेल टाकतात. मग धूर येतो, लगेच त्यावर मोठे भांडे / जार उलट धरतात व सर्व धूर कोंडून घेतात. मग लगेच त्यात कांजीचे मटेरियल , पाणी ओतून झाकण लावतात. धुराचा स्वाद पाण्यात उतरतो.
======================================
धुळवडीच्या दिवशी सुट्टी असल्याने वडे केले.
उडीद डाळ अर्धी वाटी आधल्या दिवशी संध्याकाळी भिजत घातली होती , रात्री ती मिक्सरमधून वाटून घेऊन झाकून ठेवली होती. आज सकाळी दीड वाटी पिवळी मूग डाळ 3 तास भिजत घातली. तीही मिक्सरमधून वाटून घेतली. पाणी पूर्णपणे काढून वाटली.
दोन्ही एकत्र करून चमच्याने भरपूर फेटले. त्यात एक चमचा गव्हाचे पीठ घातले व मिसळून फेटले. त्यात हवा पकडली गेली पाहिजे. हवा भरपूर पकडली गेली , याची टेस्ट म्हणजे थोडे बॅटर चमच्याने पाण्यात टाकले तर ते वर तरंगते.
त्यात मीठ , थोडी कोथिंबीर , लाल तिखट , जिरे , धणेपूड घातली . कांदा लसूण आले घातले नाही.
आमचे पीठ थोडे पातळ वाटले , म्हणजे चमच्याने तेलात सोडता येईल असे. त्यामुळे धपाटे / चपटे करणे शक्य नव्हते.
तळल्यावर मस्त स्पॉंजी झालेत. मग ते अर्धा तास पाण्यात सोडले. मग दाबून पाणी काढून कांजीत सोडले.
थोडे अप्पेही केले. पण तळणे जास्त सोयीचे आहे.
वडे नुस्तेही मस्त लागतात. दहीवडेही करता येतील.
छान. पिंपरी कॅम्पात ह्या
छान. पिंपरी कॅम्पात ह्या दिवसात असतात बहुदा विकायला. तिथेच होळीच्या दिवसात सिंधी स्टाईल घेवर जिलेबी पण मिळते
हे फर्मेंट होणार का? चव कशी
हे फर्मेंट होणार का? चव कशी लागेल काही इमॅजिन होईना.
मला स्वतःला हे करून खावसे
मला स्वतःला हे करून खावसे वाटले म्हणून मी घरी याबाबत चर्चा केली तर इतर सर्वजण माझ्याकडे अशा नजरेने बघू लागले की विचारता सोय नाही...
चांगलं लागेल.. थंड रस्सम
चांगलं लागेल.. थंड रस्सम सारखं.. पण त्यात तळलेलेच वडे हवेत.. अप्पे नको
आप्पे/वडे घातल्यावरचे ही फोटो
आप्पे/वडे घातल्यावरचे ही फोटो द्या प्लीज.
हे पाणी आंबत असेल ना आणि
हे पाणी आंबत असेल ना आणि चढतही असेल का म्हणजे मोहरी फेसतात लोणच्यासाठी वगैरे तेव्हा चढते ना खाताना (नाकात, मेंदुत झिणझिण्या येतात ना), तसं होत असेल का यात मोहरी असल्याने, वडे चढतील का, असं मनात आलं.
म्हणजे थंडीसाठी/
म्हणजे थंडीसाठी/ उन्हाळ्यासाठी पितात?
हे उन्हाळ्यात सरबत म्हणून
हे उन्हाळ्यात सरबत म्हणून पितात
फरमेन्ट होते , माईल्ड अल्कोहॉलिक असते , 1 to 2.5%
पाचक असते
दही न घालताही करतात
पाचक >> आहेच .
पाचक >> आहेच .
सुगरणीचा उरक आहे. हॅट्स ऑफ.
सुगरणीचा उरक आहे. हॅट्स ऑफ.
आज मिश्रण निवळले आहे
आज मिश्रण निवळले आहे
तयार झाले की राई वर येऊन तरंगू लागते
सुग्रीव
सुग्रीव
ह्याच्या जोडीला गोड म्हणून
ह्याच्या जोडीला गोड म्हणून शाही तुकडा करतात म्हणे
पण आंबवलेला तिखट पदार्थ प्लस दुधाचा गोड पदार्थ चालते का ?
नैतर पोटात भांग होऊन बसायची
छान लिहीले आहे. उरक दांडगा
छान लिहीले आहे. उरक दांडगा आहे तुमचा.
ह्याच्या जोडीला गोड म्हणून शाही तुकडा करतात म्हणे
पण आंबवलेला तिखट पदार्थ प्लस दुधाचा गोड चालते का ?
नैतर पोटात भांग होऊन बसायची
Proud>>>>> अजीबात दूध किंवा त्याचे पदार्थ खाऊ नका यावर. ढवळुन उलटी होण्याची शक्यता जास्त. एकदा पाणीपूरी खाल्ल्यावर मी दूध घेण्याचा वेडेपणा केला होता. जाम त्रास झाला.
मलाही तीच शंका आहे
मलाही तीच शंका आहे
याच्याबरोबर फार फार तर गुलाबजमुन चालेल , नाहीतर बुंदीचा लाडू , जिलेबी इ
पातळ दुधाचा पदार्थ मला तरी पटत नाही
पण तिकडे सर्रास खातात
अप्पे आणि वडे दोन्ही करून
अप्पे आणि वडे दोन्ही करून बघणार आहोत
मूग उडीद मिश्र पीठ
एकदा मी इडली सांबार खाऊन दुध
एकदा मी इडली सांबार खाऊन दुध पीलं होतं.. भयंकर त्रास झालेला.
राई वर येऊन तरंगत आहे
राई वर येऊन तरंगत आहे.
वास मस्त येत आहे
चिंधड्या करीन राई राई एवढ्या
आता तीन दिवस असेच ठेवायचे. >>
आता तीन दिवस असेच ठेवायचे. >>>>>>>>>>> फ्रिज मध्ये कि बाहेर अंधाऱ्या जागी ?
काही ठिकाणी उन्हात ठेवा
काही ठिकाणी उन्हात ठेवा म्हटले आहे
काही ठिकाणी तसेच ठेवा म्हटले आहे.
पण फ्रीजबाहेर.
जेंव्हा सर्व्ह करणार तेंव्हा मात्र वडे व कांजी घालून दोन तीन तास फ्रीजमध्ये ठेवल्यास मस्त लागतात म्हणे
धन्यवाद .
धन्यवाद .
(No subject)
आज गाजर कांजीतील एक गाजर व थोडे पाणी काढून प्लेटमध्ये घेतले.
अगदी सोनेरी गोल्डन यलो रंग आला आहे.
राईचे कण हलके होऊन वर तरंगत आहेत.
एकदोन गाजर तुकडे वर येऊन तरंगत आहेत.
मस्त वास येतो.
घाबरत घाबरत चव बघितली.
अगदी मस्त चव आहे. फार आंबट नाही, सरबत म्हणून देखील पिऊ शकतो इतपत आंबट , मसालेदार आहे.
बुंदी किंवा वडे सोडल्यावर खरोखरच मस्त लागत असणार.
सरबत म्हणून पिताना बुंदी घालून पितात. गाजरदेखील मस्त लागते.
जेंव्हा सर्व्ह करणार तेंव्हा
जेंव्हा सर्व्ह करणार तेंव्हा मात्र वडे व कांजी घालून दोन तीन तास फ्रीजमध्ये ठेवल्यास मस्त लागतात म्हणे>>>> हो युट्युबवरच्या मोस्ट ऑफ क्रुतीत त्यानी थन्डगार करुन मग सर्व्ह करा अस म्हटल आहे, एक-दोन रेसिपीत त्यानी स्मोकी टेस्ट साठी १-२ मिनिट कोळश्याचि धुरी पण द्यायला सान्गितली आहे.
काहि ठिकाणि दिवाळीनतरही करतात कान्जिवडे पाचक असतात म्हणून.
प्रयोग करुन बघावा अस वाटतय,
काळाच्या ओघत काही पाककृती
काळाच्या ओघत काही पाककृती लुप्त होतात. दक्षिण सोलापूर भागात कसाबदिंडी नावाचा पदार्थ करत, आता बहुदा नाही. वरील प्रमणेच काही भाज्या पाण्यात एका माठात ठेवत, मग तो कापडाने बांधून दोन तीन दिवत उन्हात ठेवत.
Sorry for English. Dr. Malti
Sorry for English. Dr. Malti Karvarkar has also written something like this in her book.
आज वडे बनवले
आज वडे बनवले
उडीद डाळ अर्धी वाटी आधल्या दिवशी संध्याकाळी भिजत घातली होती , रात्री ती मिक्सरमधून वाटून घेऊन झाकून ठेवली होती. आज सकाळी दीड वाटी पिवळी मूग डाळ 3 तास भिजत घातली. तीही मिक्सरमधून वाटून घेतली. पाणी पूर्णपणे काढून वाटली.
दोन्ही एकत्र करून चमच्याने भरपूर फेटले. त्यात एक चमचा गव्हाचे पीठ घातले व मिसळून फेटले. त्यात हवा पकडली गेली पाहिजे. हवा भरपूर पकडली गेली , याची टेस्ट म्हणजे थोडे बॅटर चमच्याने पाण्यात टाकले तर ते वर तरंगते.
त्यात मीठ , थोडी कोथिंबीर , लाल तिखट , जिरे , धणेपूड घातली . कांदा लसूण आले घातले नाही.
आमचे पीठ थोडे पातळ वाटले , म्हणजे चमच्याने तेलात सोडता येईल असे. त्यामुळे धपाटे / चपटे करणे शक्य नव्हते.
तळल्यावर मस्त स्पॉंजी झालेत. मग ते अर्धा तास पाण्यात सोडले. मग दाबून पाणी काढून कांजीत सोडले.
थोडे अप्पेही केले. पण तळणे जास्त सोयीचे आहे.
वडे नुस्तेही मस्त लागतात. दहीवडेही करता येतील.
वॉव. हे दिवाळीत सुद्धा
वॉव. हे दिवाळीत सुद्धा करतात नॉर्थ मध्ये. चव छानच असते.
मस्त झालेत वडे. आवडले का
मस्त झालेत वडे. आवडले का कांजी वडे.
दोन्ही स्वतंत्र खाणे जास्त
दोन्ही स्वतंत्र खाणे जास्त आवडले
दोन्हीची स्पेशल चव आहे.
त्यानिमित्ताने वडे करायची पद्धत माहिती झाली.
कांजिदेखील करून ठेवणार आहे, फक्त सरबताला करायची तर थोडी माईल्ड करावी. आयत्यावेळी एखादा चतकोर लिंबू , पुदिना घालतात
हे कांजीवडे अनेकदा
हे कांजीवडे अनेकदा हरिद्वारच्या फूडटूरमध्ये बघितले आहेत. बघितले की नेहमी खावेसे वाटतात मला.