आम्ही सार्‍या चंद्रसख्या

Submitted by सामो on 25 January, 2022 - 04:55

अनुराधाकडे आज संध्याकाळी, सगळ्याजणी जमणार होत्या. अनुची गडबड सकाळपासूनच सुरु झाली. स्वत:च्या रेशमी केसांना शिकेकाई लावून मस्त आंघोळ करुन, आख्खा दिवस घर आवरण्यात गेल्यानंतर साधारण उत्तरदुपारी, सुंदरसा प्रसन्न पेहराव तिने केला. आणि सख्यांची वाट पहात ती सौधावर जरा वारा खात ऊभी राहीली न राहीली तोच तिला अश्विनी लगबगीने येताना दिसली. काय डौल होता तिच्या चालण्यातही. नखशिखान्त चैतन्य शक्तीने ओतप्रोत अशी, उत्साही अश्विनी नेहमीच सर्वांच्या आधी येत असे. उमदं सौंदर्य ल्यालेल्या तिने , अनुला खालूनच हात करुन अभिवादन केले व झपाझप, पायऱ्या चढत ती येती झाली. "ये गं आशु. बरं झालं वेळेवर आलीस. किती वाट पहात होते मी." असे स्वागत करुन, अनुने तिला बसण्याची विनंती केली. दोघींच्या गप्पा सुरु होणार न होणार इतक्यात, ...........
पुष्य आली ते हातात लाडवा-चकल्यांची थाळी घेउनच. "अगं हे काय ! दर वेळेस खायला प्यायला आणलच पाहीजेस का" अशी प्रेमळ दटावणी, अनु करताच, पुष्य तिला म्हणाली "अगं पण गेल्या वेळेस मी फक्त शंकरपाळेच आणू शकले होते. तुम्हाला या वेळेस लाडू व चकल्या आणल्यात पहा. हीच संधी मिळते गं तुम्हाला सख्यांना खाऊ घालण्याची" असे पुष्य म्हणते न म्हणते तोच, ...........
उघड्या दारातूनच पूर्वाफाल्गुनी आणि मघा हसत खिदळत येताना दिसल्या.मघाचे उंची, निळे (रॉयल ब्लु) वस्त्रप्रावरण अक्षरक्ष: नजरबंदी करणारे होते. आल्यावरती मघा मस्तपैकी "होस्ट चेअर" वरती जाऊन विराजमान झाली. यावर पूर्वा तिला टोकणार तोच मघाच नेत्रपल्लवी जाणुन, बोलती झाली "गपा ग! मी इथेच बसणार. सिंहासनावर हक्क माझाच" यावरती सगळ्याजणी हसल्या व मूड एकदम हलका होउन गेला. रॉयल टेस्टमध्ये मघाला टक्कर देउ शकेल अशी एकच होती धनिष्ठा जिच्या नावातच धनाची धन-धन आहे बघा. पण खरं सांगायचं तर हे धन आहे अंतरंगातील धन, मनाची श्रीमंती. अर्थात त्यामुळे बाहेरची श्रीमंती उणावते असेही काही नाही परंतु, मकर ही पृथ्वी रास जेव्हा कुंभसारख्या इंटेलेक्च्युअल वायु राशीत स्थित्यंतर होते तिथे आपली धनिष्ठा जाणवते.
खरं तर अनुने आता, सर्वांना कॉफी, सरबत, कोक विचारुन झाले होते व अन्यही बऱ्याच खरं तर सगळ्याच जणी आतापावेतो जमल्या होत्या. ..........
हां रोहीणीची कमतरता मात्र जाणवेल इतकी ठळक होती. परंतु त्या सगळ्याजणींना मान्यच होते की आज काही रोहीणी येणार नाही, चंद्राने पुढील दीड दिवस , रात्र तिच्याकडे व्यतीत करायची तिची पाळी होती.
खरे पहाता विशाखाकडेही चंद्र तिच्या पाळीनुसार दीड दिवस जातच असे की. सर्व २७ जणींना त्याने समसमान वेळ वाटून दिलाच होता, पण स्वत:च्या ईर्षालु अर्थात सवतीमत्सरी स्वभावातून विशाखा चकलीचा तुकडा तीव्रतेने तोडीत नाक उडवती झाली. तिच्या मते "रोहीणी, यांची सर्वात लाडकी. तिच्याकडुन काही यांचा पाय निघत नाही." हे तिचे नेहमीचेच मत होते. ज्येष्ठनेही विशाखाची बाजू घेत भांडखोर पवित्रा घेतला न घेतला, ..........
तोच मृग समजूतदारपणे बोलती झाली "कशाला भांडता गं. यांना कमी का व्यवधानं आहेत, देतात ना समान वेळ आपल्याला." रोहीणीकडुन तडक माझ्याकडे येतात ते. मी जाणते ना, आख्खं जग जरी रोहीणीला त्यांची लाडकी मानत असलं तरी त्यांच्या मनात तसं काही नाही." हरीणीच्या डोळ्यांची मृग तशी भोळीच होती. सगळ्याजणी तिला, लहान बहीणीसारख्याच मानत असत . आपलं मन स्वच्छ तर जग चांगलं..................................
स्वाती , शततारका आणि चित्राचं या सगळ्या संभाषणाकडे लक्षच नव्हते आणि त्यांना ना या गॉसिप्समध्ये रस होता. त्यांची वेगळीच लेव्हलवरती, बौद्धिक गुफ्तगु चाललेली होती. चित्रा आणि स्वाती दोघी सुंदर. स्वाती बोलकी, आणि बोलणंही कसं, व्यवस्थित, मोजकं, प्रसन्न. चित्रा एखाद्या चमचमणाऱ्या खड्यासारखी तेजस्वी. चित्राचं आणि स्वातीचं मेतकूट होतं. विद्वान, शततारका कोणतातरी थिसिस लिहीत होती आणि त्या थिसिसबद्दल काहीतरी बोलत होती. त्यामुळे त्या तीघी लाडू व सरबताचा आस्वाद घेण्यात व तारकेच्या सबमिशनबद्दल बोलण्यात अगदी गुंगून गेल्या होत्या. त्यांच्या शेजारीच उत्तम ऐकण्याची क्षमता असलेली श्रवण बसली होती. श्रवण बोले कमी पण कानावर पडलेली प्रत्येक गोष्ट, संभाषण टिपुन ठेवत असे. अ रियली गुड लिसनर. तीसुद्धा या तिघींचे बौद्धिक ऐकत सरबताचे घुटके घेत एन्जॉय करत होती. हे नेहमीचे होते - जर कोणाचे काही गैरसमज झाले, कोणी मुद्दा नीट समजून घेण्यात कमी पडली, तर श्रवण, ती बाब अधिक उत्तम रीतीने, समजावुन देउ शकत असे...........................
उत्तराफाल्गुनी कामं पटापट वाटण्यात अगदी निष्णात. तिने ग्लासवरती, चमच्याने किणकिणाट करुन, सगळ्यांना ऐकू जाइल अशा आवाजात घोषणा केली. "बाहेर सौधावरती, थंड वारा सुटला असेल आपण तिकडेच जायचं का. मस्त गार वाराही एन्जॉय करता येइल." कृत्तिका, आर्द्रा, भरणी सगळ्याच जणींनी दुजोरा दिला. व जवळजवळ सगळ्याजणी मोठ्ठ्या प्रशस्त गच्चीवरती गेल्या. काय मस्त गार वारा सुटला होता. .................
आश्लेषा, पुनर्वसु, आणि पुष्य तिघी प्रेमळ त्यात पुष्य तर सर्वाधिक म्हणजे महाप्रेमळ. तीघी, अनुराधेला मदत करण्याकरता मागे राहील्या. कोणी खोली नीटनेटकी केली तर कोणी पटापट ताटे-चमचे-पेले उचलले. त्यामुळे अनुचे काम हलके झाले ना. बराच वेळ झाला होता. रात्र होउ लागली होती. ............
तारामंडलामध्ये रेवती सर्वात शेवटची आणि म्हणुन ती शांत, स्थिरचित्त, सगळ्या गोष्टी धीराने व संथपणे घेणारी. zesty, उमद्या अश्विनीपासून सुरु झालेले तारामंडल येउन थांबते ते रेवतीपाशी. बोलण्यात , गप्पांत मध्यरात्र केव्हा उलटून गेली सख्यांना कळलेच नाही. सूर्योदयाची वेळ होउ लागली, तशी रेवतीच खरं तर जराजरा पेंगळू लागली. तिला घरचे वेध लागले होते. व तिने हळूच काढता पाय घेतला. मग धनिष्ठा, कृत्तिका, भरणी, हळूहळू सर्वच सख्या पांगल्या व घर कसे शांत शांत झाले. सूर्य बराच वर आला होता,अनुराधासुद्धा श्रांत, क्लांत अशी निद्रेच्या आधिन झाली. तेव्हा सर्व सख्यांची पार्टी तर मस्त झाली होती तेही उत्तररात्री त्यांच्या सख्याच्या चंद्राच्या साक्षीने.
-----------------------------------------------------------------------------------------
कोणाला रस असल्यास - वाचनाकरता - http://vedicartandscience.com/category/vedic-astrology/nakshatras-vedic-...

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लिहिले आहेस सामो. पण रेवतीला पार्टीत उशीरा घेऊन इतकं लवकर का कटवलेत? फार बोलत नसली तरी तिलाही आवडतं पार्टीत रमायला.

देवकी, धनिष्ठा ग - Dhanishtha

देवकी, वंदना, भरत, दीपक पवार, रीया - सर्वांचे आभार

अग, काय मस्त लिहिले आहेस, सामो!
आपल्याभोवती या नक्षत्रकन्यां-पुत्रांचा पसारा पडला आहे असे जाणवले. Happy
<<आश्लेषा, पुनर्वसु, आणि पुष्य तिघी प्रेमळ<< पुनर्वसु, पुष्य मनमिळाऊ ..प्रेमळ समजु शकते. पण आश्लेषा??? Wink
माझ कदाचित बिघडलेलं आश्लेषा असाव. Biggrin

आर्या, पुनर्वसु येतं आर्द्रा या वादळी रुद्राच्या नक्षत्रानंतर. पुनः वसु=सूर्याचा किरण, वादळानंतरची उघडीप.
याची देवता मला वाटतं अदिती आहे. देवांची आई. कर्क म्हटलं की कोणत्या ना कोणत्या रुपात मातृत्व, खाऊ घालणं आदि येतच. तर इथे ते मातृत्व आहे अदिती.
मग पुष्य = पोषण करणारं परत आईचं प्रेम.
मग आश्लेषा - द एन्ट्वाईनर = लता/वेल यात आईचं fussy प्रेम येतं. मायेने वेष्टिलेलं. वेलीसारखं क्वचित smothering सुद्धा.
--------------------------
धन्यवाद मंजूताई.
-----------------------------
आय सी आर्या तूही कर्कच आहेस तर Happy आश्लेषा!!! मस्त.

<<<मग आश्लेषा - द एन्ट्वाईनर = लता/वेल यात आईचं fussy प्रेम येतं. मायेने वेष्टिलेलं. वेलीसारखं क्वचित smothering सुद्धा.<< ओहहह.. हे माहीत नव्हतं! माझा इतका अभ्यास नाही. Happy
<<आय सी आर्या तूही कर्कच आहेस तर Happy आश्लेषा!!!<< येस! पण तुही म्हणजे? तू पण का?

माझा एक अनुभव आहे की , एका राशीचे किंवा न्यूमरॉलॉजीकली एकच लकी आकडा असणारे लोक आपोआप एकत्र येतात! त्यांच्याबद्दल आपसूक आत्मीयता वाटू लागते!

धन्यवाद प्राचि.
-----------
होय आर्या मी पुष्य आहे.
>>>>माझा इतका अभ्यास नाही. Happy
मग माझा आहे असे वाटले की काय तुला? सॅम जेप्पी उवाच ज्ञान आहे ते.
------------------------
न्युमरॉलॉजी चा अनुभव आहे तसा. पण चं-कर्क फार नाही अनुभव. एक मित्र होता पुष्यचा. पार डोक्यात जायचा यार. आय सॉ माय फ्लॉज इन हिम. अज्जिबात पटायचं नाही Sad ......... पण तरी अध्यात्मिक बोलायला तो लागायचा Happy .... कदाचित त्याचा शुक्र सिंहेचा होता हेही कारण असेल. माझं एक सिंह शुक्र लोकांशी बेताचच पटतं.
मुलगी व मी सेम नक्षत्र / भिन्न चरण आहोत. पूर्वजन्मीचे ऋणानुबंध आहेत असे वाटते/जाणवते. पण कदाचित ते सर्वांचेच होत असावे.

मिथुन लग्न ज्यांचं आहे त्यांना एप्रिलमध्ये फायदा होणारे म्हणे. आता मिथुन लग्न म्हणजे काय असतं?

जाई तू मिथुन लग्नाची आहेस का? मीही. माझ्या माहीतीप्रमाणे जन्मवेळी पूर्वेवर उदित रास असते ते म्हणजे लग्न.
---------------
चंद्र-सूर्य तसा पृथ्वी हा घटक असतो. हा पृथ्वी घटक, म्हणजे लग्न. पहीले घर. या घरातील रास म्हणजे लग्नरास क्रुशिअल असते. त्याने जीवनाचा पूर्ण ढांचा/घट बनतो.
कारण मिथुन लग्न (१ ले घर) म्हणजे आपोआप कर्क(दुसरे घर), सिंह (तीसरे घर) ..... सो ऑन येत जाते.

सामो सांगेलच. पण माझा थोडा उतावळेपणा म्हणून : Wink Wink सांगतेय. लग्नरास वेगळी असते. जन्माच्या वेळी पूर्व क्षितिजावर जी रास असते ती लग्न रास. किंवा प्रथम स्थान ते लग्न. नेहमीच्या विवाह उर्फ लग्नाचा संबंध नाही.

हो पहिलंच! तेच लग्न घर. माझ्या सूर्योदयाच्या वेळी जन्म.. म्हणून लग्नी सूर्य! अन शुक्र अस्ताला जात होता म्हणून 12व्या घरात सूर्य! आता जी कुंडली अन तिचे 12 भाग आपण बघतो, ती म्हणजे आपल्या जन्माच्या वेळचे आकाश.. ती कुंडली डोक्यावर धरून पाहिली तर त्या त्या वेळी ग्रह कुठल्या दिशेला होते हे कळते!
लग्न घर आपले फीजिक/ शरीरयष्टी दाखवते! Happy

<<होय आर्या मी पुष्य आहे.<<किती छान! पुष्य म्हणजे देवगुणी नक्षत्र! रामाचे नक्षत्र ना!
मला उगा वाटायचं की आश्लेषाची देवता सर्प की पितर ना? त्यामुळे ते क्रूर असत की काय!
तस कर्केचा बिघडलेला चंद्र ही बघितलाय Biggrin
साधारण 2004/5 मध्ये कुंडली, न्यूमरॉलॉजी, हस्तरेखा, वास्तू, फेंगशुई वै अभ्यास केला होता. फार डीप नाही.
पण आपल्या संपर्कातल्या व्यक्ती बघून रास कळली की आपल्या अभ्यासाशी त्या व्यक्तीचा स्वभावदोष, व्यवसाय, कुटुंबियांशी संबंध वै पडताळून पहायचे खुळच लागले होते.
वास्तूशी संबंधित तसच... एखाद्या समाधानी कुटुंबाच्या घरी गेले की मनातल्या मनात घराची, किचन , एन्ट्री, जिन्याची जागा पहायची! अन आपल्या अभ्यासाशी तुलना करायची! Lol पुष्कळसे अंदाज बरोबर यायचे, काही चुकायचेही!

>>>> रामाचे नक्षत्र ना!
असा स्मज आहे खरा पण बहुतेक रामविजयमध्येच (नक्की नाही आठवत) रामाचे नक्षत्र पुनर्वसु वाचल्याचे आठवते.
>>>>>आश्लेषाची देवता सर्प
करेक्ट म्हणुन एन्ट्वायनर. असं गुरफटुन जाणारं.
>>>>तस कर्केचा बिघडलेला चंद्र ही बघितलाय Biggrin
हम्म्म्म!! असेलही. शनिची दॄष्टी असेल बहुतेक. राहू चंद्र युती वाईट असते का गं? काही माहीते तुला?

न्यूमरॉलॉजीची अशीच गोष्ट! तेव्हा दर बुधवारी श्वेता जुमानीचा रेडिओवर प्रोग्रॅम लागायचा.. कागद पेन घेऊन बसायचे. अन ती श्रोत्यांना कशी काय उत्तरे देते याची उत्सुकता असायची! मग आपणही आकडेमोड करायची, डोकं फुटेस्तोवर! Biggrin अस करत करत एकदाचे समजले.
त्याच काळात , त्र्यम्बकेश्वर येथील स्वामी समर्थ केंद्राचे १-२ विशेषांक निघाले होते त्यात या सगळ्याच गोष्टींचा उहापोह होता! त्याचाही फायदा झाला.
एक गंमत अशी झाली!की आमचे बाबा रिटायरमेंट नंतर तेव्हा गाड्यांचा व्यवसाय करत होते, म्हणजे जुनी चांगल्या स्थितीतल्या गव्हर्नमेंट ऑफिसेसचही गाडी घेऊन ती अजून टिपटॉप करून भाड्याने द्यायची किंवा विकायची! त्याच काळात आय टी, बीपीओ जोरात सुरू झालं अन कम्पनीला गाडी लावायची म्हणून बाबांनी नवीन इंडिका तर घेतलीच! वर इन्कम टैक्स ऑफिसच्या जुन्या चार गाड्यांचे कोटेशन निघाले! यात एक मेटेडोर होती, दोन एम्बेसिडर, अन एक ओम्नी!
मी बाबांच्या बर्थडेटप्रमाणे चारही गाड्यांचे कोटेशन काढून दिले. अन चक्क चारही गाड्या बाबांच्या नावाने लागल्या!
मग काय , त्या वर्षी दसऱ्याला ५ गाड्या दारासमोर पूजेला! Lol

<<राहू चंद्र युती वाईट असते का गं? काही माहीते तुला?< राहू - केतू म्हणजे तसाही ग्रहणच ना? माझ्या तर लग्नी सूर्य अन केतू आहेत! आपसूक सप्तमात राहू! Happy

मोटारींचा कसला भारी किस्सा आहे गं.
माझ्या ही लग्नी राहू सूर्य गुरु आहेत. पैकी गु-रा युती आहे म्हणजे चांडाळ योग . नाव भयंकर आहे पण तो योग सर्व वाईट योगांत कमीत कमी वाईट समजला जातो.
>>>>>राहू - केतू म्हणजे तसाही ग्रहणच ना?
ह्म्म!! छायाबिंदू आहेत. राहू चंद्राला व केतू सूर्याला गिळतो ग्रहणात.
>>>>>>मग आपणही आकडेमोड करायची, डोकं फुटेस्तोवर! Biggrin अस करत करत एकदाचे समजले.
त्याच काळात , त्र्यम्बकेश्वर येथील स्वामी समर्थ केंद्राचे १-२ विशेषांक निघाले होते त्यात या सगळ्याच गोष्टींचा उहापोह होता! त्याचाही फायदा झाला.
अरे वा!! किती मस्त.

केतू हेडलेस ग्रहं आपल्या डोक्याच्या घरात म्हणजे पहील्या घरात. त्यामुळे एकंदर स्वप्रतिमेबद्दल संभ्रमित - असे वाचल्याचे स्मरते. शक्य आहे, मला कशाबद्दलच कधीच खात्री नसते.

हे आज वाचले. सुंदर कल्पना आहे. सर्व नक्षत्रांची पार्टी Happy

आमचं नक्षत्र मूळ. जन्मदात्यावर भारी म्हणे. मग साग्रसंगीत शांती, दुष्टदान वगैरे. तदनंतर काश्याच्या टोपात काठोकाठ तेल भरुन ४१ दिवसांनी पिताश्रींना त्यात आधी पुत्राचे छायादर्शन आणि मगच कडेवर घेण्याची परवानगी Happy

खुपच छान लिहिलं आहेस सामो!

प्राचीन म्हणाल्या तसं थोडं थोड शिकवायला सुरुवात कर ना. मला शिकायचे आहे पण कुठे जाऊन शिकायला सध्या वेळ होत नाहिये.

सर्वांना धन्यवाद.
>>>>>आमचं नक्षत्र मूळ. जन्मदात्यावर भारी म्हणे.
मला वाटतं चरणावरती अवलंबुन असतं. कधी कधी वडीलांवर तर कधी अन्य कोणावरही भारी असतं.
>>>>>>>>मग साग्रसंगीत शांती, दुष्टदान वगैरे. तदनंतर काश्याच्या टोपात काठोकाठ तेल भरुन ४१ दिवसांनी पिताश्रींना त्यात आधी पुत्राचे छायादर्शन आणि मगच कडेवर घेण्याची परवानगी Happy
अरे बाप रे!!! Happy
मूळ नक्षत्रामध्ये खूप ताकद असते असे वाचलेले आहे. म्हणजे समूळ म्हणतो ना आपण तसे डिस्ट्रक्शन करण्याची सॅम जेप्पी काली ची संहारक शक्ती असे म्हणतो.

छान लेख. मागच्या वर्षी निसटला होता. आज वाचला आणि आवडला.
काही traits आनुवंशिक असतात. पण एरवीही आईवडिलांचे गुण दोष, रंग रूप संततीत उतरते. तेच साम्य आईवडील आणि संतती ह्यांच्या पत्रिकेत दिसते. विशेषत: मंगळ ग्रह जर शुभ आणि dominant असला तर पुढच्या पिढीत तो नक्की उतरतो हे अनेक पत्रिकांतून पाहिले आहे.अर्थात मंगळाने दर्शविलेले गुण/ दोष पुढच्या पिढीतही दिसतात.

मूळ नक्षत्रामध्ये खूप ताकद असते असे वाचलेले आहे. म्हणजे समूळ म्हणतो ना आपण तसे डिस्ट्रक्शन करण्याची संहारक शक्ती .........

I wish !

अशी शक्ती असती तर योग्य जागी नक्की वापरली असती Happy

एखाद्याचा विनाश व्हावा इतपत राग नाही आला कुणाचा कधी.

माहीत नाही मूळ जातकांमध्ये असते का नाही ते. कदाचित या नक्षत्रात असेल. जसे या नक्षत्रावर जन्मास आल्यास अमक्या अमक्याच्या मूळावर आलाय म्हणुन शांती करतात तद्वतच. सॅमला कदाचित तसेच म्हणायचे असेल.

Pages