
अनेक प्रतिभासंपन्न व हुशार माणसे त्यांच्या कलानिर्मितीमुळे समाजात लोकप्रिय असतात. ती विशिष्ट समूहांमध्ये वलयांकित म्हणून गणली जातात. परंतु ती व्यवहारात मात्र कित्येकदा (इतरांचे दृष्टीने) तऱ्हेवाईक असतात. त्यातले काही तर विक्षिप्त म्हणूनही प्रसिद्ध होतात.
या मंडळींचे अशा वागण्याचे बरेच किस्से समाजात प्रचलित असतात. त्यातले काही खरे, काही तिखटमीठ लावून वाढवलेले तर काही असत्यही असतात. अशी व्यक्ती जितकी जास्त प्रसिद्ध, तितकेच तिच्या नावावर खपवल्या जाणार्या किश्शांची संख्याही भरपूर असते.
अशा व्यक्तींची जागतिक क्रमवारी लावायची ठरल्यास त्यात बहुदा अल्बर्ट आईन्स्टाईन यांचा प्रथम क्रमांक लागेल ! त्यांच्या नावावर असलेले किंवा खपवलेले असंख्य किस्से आपण कधी ना कधी ऐकलेले असतात. महाराष्ट्रीय साहित्यिकांपुरते बोलायचे झाल्यास या बाबतीत पु ल देशपांडे यांचा प्रथम क्रमांक लागेल. कालौघात अशा किश्शांच्या खरे-खोटेपणाची शहानिशा करणेही कठीण होऊन बसते. नामवंत व्यक्तींच्या संदर्भात प्रचलित असलेल्या गमतीशीर, तऱ्हेवाईक किश्शांचे किंवा त्यांच्या जगावेगळ्या कृतींचे संकलन करण्यासाठी हा धागा आहे.
माझ्या वाचनात आलेल्या काही साहित्यिकांच्या किश्शांपासून सुरुवात करतो.
१. दुर्गा भागवत : त्यांच्या भरीव साहित्य सेवेबद्दल त्यांना ज्ञानपीठ आणि पद्मश्री असे दोन्ही पुरस्कार सरकारतर्फे जाहीर झालेले होते. परंतु हे दोन्ही पुरस्कार कणखर दुर्गाबाईंनी पंतप्रधान इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीच्या निषेधार्थ नाकारले होते.
जेव्हा कुसुमाग्रजांना ज्ञानपीठ मिळाले तेव्हा सर्वांनाच आनंद झालेला होता; अपवाद फक्त दुर्गाबाई ! त्यांनी एका माणसाला सांगितले, “नाशिकला जा आणि कुसुमाग्रजांना विचार की, तुम्हाला ज्ञानपीठ मिळालं ते ठीक आहे. परंतु आणीबाणीच्या काळात तुम्ही काय करीत होतात ?” त्या माणसाने हा निरोप खरंच कुसुमाग्रजांना पोचवला. त्यावर ते हसत उत्तरले, “हे पहा, दुर्गाबाईंचे प्रश्न दुर्गाबाईंना विचारू देत, तुमचे प्रश्न तुम्ही विचारा !” असे हे बेरकी प्रत्युत्तर.
२. जी ए कुलकर्णी : त्यांचे एक वैशिष्ट्य होते. त्यांची कुठलीही कथा अथवा लेख जेव्हा एखाद्या नियतकालिकात प्रकाशित होई, त्यानंतर तो छापील लेख ते स्वतः बिलकुल वाचत नसत. ते म्हणायचे, “जेव्हा लेख हस्तलिखित स्वरूपात माझ्याजवळ असतो तोपर्यंतच तो माझा. एकदा का तो छापून झाला की तो आता वाचकांचा झालेला असतो. त्याचे भवितव्य त्यांच्या हाती’.
जीएंची बरीच पुस्तके एका प्रकाशकांनी प्रसिद्ध केली होती. जीएंनी संबंधित प्रकाशकांशी पत्रव्यवहार भरपूर केला परंतु आयुष्यात भेट घेण्याचे मात्र टाळले. त्यांच्या काजळमाया या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. तो त्यांनी स्वीकारला देखील होता. परंतु पुढे या घटनेवर (तांत्रिक मुद्द्यावरून) साहित्य क्षेत्रात टीका झाली. त्याने व्यथित होऊन त्यांनी (प्रवासखर्चासह) तो पुरस्कार सरकारला परत केला होता.
३. चि त्र्यं खानोलकर (आरती प्रभू) यांचा किस्सा तर अजब आहे. ते लोकांना छातीठोकपणे सांगत, "साहित्यबाह्य गोष्टींना वगळून निव्वळ गुणवत्तेच्या जोरावरच ज्ञानपीठ पारितोषिक द्यायचे ठरले तर मराठी भाषेत तरी तो मान फक्त आपल्या एकट्याकडेच जातो !"
अनेकांना हे ऐकून अचंबा वाटे.
एवढेच नाही तर खानोलकरांनी वि स खांडेकर यांच्याबद्दलही असे वक्तव्य केले होते,
" येत असतील त्यांना वाचकांची ढिगांनी पत्रे आणि तामिळनाडूतील एखादी मुलगी त्यांना पूज्य पिताजी म्हणूनही संबोधत असेल. पण ते वेगळं आणि चांगलं लेखक असणं वेगळं".
स्वतःचे साहित्यिक यश डोक्यात गेल्याने त्यांनी अनेकांना उद्धटपणे बोलून दुखावलेले होते.
आता पाहू काही विदेशी साहित्यिकांचे नमुने :
४. सॉमरसेट मॉम हे विख्यात इंग्लिश लेखक. त्यांच्या लेखनाची कठोर शिस्त होती. रोज सकाळी नऊ ते दुपारी एक पर्यंत ते त्यांच्या लेखनाच्या टेबलाशी असत आणि रोज काही ना काही लिहित. त्यामध्ये रविवार असो वा सण, किंवा अगदी स्वतःचा वाढदिवस, लेखनात कधीही खंड पडला नाही. त्यांना एका मुलाखतकाराने विचारले होते की रोज नवे लेखन खरच सुचते का ? त्यावर ते म्हणाले, “नाही, रोज नवे सुचत नाही. तरीसुद्धा मी लेखनाच्या टेबलापाशी ४ तास बसतोच. कित्येकदा काहीतरी विचार करत माझ्या स्वतःच्याच सह्या असंख्य वेळा गिरवत बसतो. पण नित्यक्रम चुकवत नाही”.
५. झोरान झिवकोविच या सर्बिअन लेखकाचे एक मत अजब आहे. तो म्हणतो, की ५० वर्ष हे वय लेखक होण्यासाठी आदर्श आहे. आयुष्यातील त्या आधीची वर्षे सखोल वाचनात घालवावीत. कारण आपण लिहायला सुरुवात करण्यापूर्वी गेल्या हजारो वर्षातल्या आपल्या आधीच्या लोकांनी काय लिहून ठेवले आहे ते वाचणे आवश्यक आहे !
६. जे डी सालिंजर हे अमेरिकी लेखक त्यांच्या कॅचर इन द राय या कादंबरीमुळे गाजले. या कादंबरीच्या पहिल्या आवृत्तीच्या मुखपृष्ठावर एक अतिशय जिवंत असे चित्र छापले होते. परंतु पुढे त्यांनी मुखपृष्ठावरील चित्र या प्रकाराचाच धसका घेतला. पुढे त्यांच्या सर्व पुस्तकांसाठी त्यांनी मुखपृष्ठावर कोणतेही चित्र अथवा छायाचित्र छापायचे नाही असा आग्रह धरला. लेखकाच्या शब्दांमधून जो काही आशय व्यक्त होतोय तीच त्या पुस्तकाची वाचकावर उमटणारी एकमेव ओळख असली पाहिजे हे त्यांचे मत. लेखकाला काय सांगायचय त्यासाठी एखाद्या चित्रकाराची मध्यस्थी नसावी यावर ते ठाम राहिले.
याच धर्तीवर एका व्यंगचित्रकारांची अशीच भूमिका आहे. त्यांचे नाव आता आठवत नाही. ते देखील त्यांच्या व्यंगचित्रांमध्ये किंवा चित्राखाली शब्दांचा अजिबात वापर करीत नसत. चित्रकाराच्या चित्रातूनच् प्रेक्षकाला जे काही समजायचं आहे ते समजले तरच ते उत्कृष्ट चित्र, असे त्यांचे ठाम मत होते. या निमित्ताने लेखन आणि चित्रकला या दोन्ही कला समांतर चालाव्यात की एकमेकांना पूरक म्हणून त्यांचा वापर करावा हा एक चर्चेचा विषय उपस्थित होतो.
आता एक किस्सा राजकारणी व्यक्तीचा...
७. हा अटलबिहारी वाजपेयी यांच्याबद्दलचा असून ते पंतप्रधान होण्यापूर्वीच्या काळातला आहे. ते जेव्हा दुर्गम भागांत दौऱ्यांवर निघत तेव्हा बरोबर स्वतःचा एक छोटा ट्रांजिस्टर ठेवत. तो नियमित ऐकणे हा त्यांचा छंद होता. निघण्यापूर्वी ते बरोबरच्या सचिवांना विचारत, “आपण जिथे चाललो आहोत तिथे जर या ट्रांजिस्टरच्या बॅटरीज संपल्या तर त्या विकत मिळतील ना? नाहीतर बरोबर ठेवाव्यात ”. त्यावर त्यांचे सचिव फक्त मंद स्मित करीत.
आणि हा किस्सा गिर्यारोहकाचा ...
८. जगातील पहिले एव्हरेस्टवीर सर एडमंड हिलरी यांनी त्यांच्या पर्वतचढाईचे अनुभव ‘व्ह्यू फ्रॉम द समिट’ या पुस्तकात लिहिले आहेत. कालांतराने हिलरी भारतातील न्यूझीलंडचे उच्चायुक्त होते. त्यांच्या या पुस्तकाचा मराठी अनुवाद ‘शिखरावरुन’ या नावाने श्रीकांत लागू यांनी केलेला आहे. त्या अनुवादासाठी लागू यांनी हिलरी यांची परवानगी मागितली होती. त्यावर हिलरींनी ती लगेच दिली. मग लागूंनी विचारले की मानधन किती द्यावे लागेल ? त्यावर हसून हिलरी म्हणाले, “मला पैसे नकोत, फक्त तुमची पिठलं-भाकरी एकदा खाऊ घाला !”
अशी ही दिलदार वृत्ती.
असे गमतीशीर किंवा तर्हेवाईक किस्से सांगण्यासाठी मी काही क्षेत्रांतील व्यक्ती निवडल्या आहेत. हे किस्से मी कुठल्या ना कुठल्या पुस्तक/नियतकालिकात वाचलेले आहेत. प्रतिसादांमध्ये वाचकांनी कुठल्याही क्षेत्रातील नामवंतांचे असे किस्से लिहायला हरकत नाही. तुम्ही लिहिलेला किस्सा हा स्वतः वाचलेला आहे की ऐकीव आहे याचा सुद्धा उल्लेख करावा. तुमच्या माहितीतील एखाद्या व्यक्तीचा (जरी वलयांकित नसली तरी) जर काही वैशिष्ट्यपूर्ण किस्सा असेल तरी लिहायला हरकत नाही.
....................................................................................................................
लेखक खिशात हात घालायचे नाहीत
लेखक खिशात हात घालायचे नाहीत (मुळात खिशात जातेय कितीसे) आणि वाचकाला जास्त सोयरसुतक नसावे. मग घेतात सरकारी कुबड्या
सरकार आकाशातून पडलेलं नाही.
सरकार आकाशातून पडलेलं नाही. सरकारचा पैसा म्हणजे जनतेचा पैसा. सत्ताधारी जनप्रतिनिधी. त्यामुळे तथाकथित सरकारी पैसा घेणं मला चुकीचं वाटत नाही. साहित्य संमेलनांचं आयोजन करणार्या संस्थांमध्ये साहित्यिक किती असतात? लिहिणे आणि संस्था चालवणे , कार्यक्रमांचे आयोजन करणे या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्या एकाच व्यक्तीला जमल्या पाहिजेत असे नाही.
यंदाचं दिल्लीतलं अ. भा. मराठी साहित्य संमेलन सरहद या संस्थेनं आयोजित केलं. या संस्थेचा साहित्याशी काही संबंध आहे का, याची कल्पना नाही. दिल्लीत झालं म्हणून पंतप्रधान उद्घाटक आणि पवार स्वागताध्यक्ष. शिवाय पंतप्रधानांच्या सोयीसाठी एक छोटेखानी उद्घाटन समारंभ विज्ञान भवनात. आणि संमेलनस्थळी म्हणजे तालकटोरा स्टेडियममध्ये आणखी एक उद्घाटन समारंभ.
कार्यक्रमपत्रिकेत या दोन्ही कार्यक्रमांच्या यादीत संमेलनाध्यक्षांचं नाव शेवटचं आहे. सुरुवातीची नावं राजकारण्यांची आहेत.
खुल्या अधिवेशनाच्या समारोपाच्या कार्यक्रमात मंचावर खुर्च्यांच्या तीन रांगा आहेत. पहिल्या रांगेत संमेलनाध्यक्षांखेरीज इतर सगळे राजकारणी आहेत .
आपण कुठे बसायचा याचा पोच ठेवणारे राजकारणी आता नाहीत. साहित्याविषयी खरी आस्था असणारे, पुस्तके वाचणारे राजकारणीही कमीच आहेत. शरद पवार शेवटचे ठरू नयेत.
-
वसंत बापटांनी मुंबईत सरकारी पैशांशिवाय (समांतर) साहित्य संमेलन आयोजित केलं होतं. त्याला एका राजकारण्याचं वक्तव्यच कारण होतं. त्यांच्यासारखे साहित्यिकच आता कितीसे आहेत?
--
आपल्याला घरच्या लग्नातही स्थानिक राजकारणी लागतात. महाराष्ट्रातल्या , विशेषतः मुंबई पुण्याबाहेरच्या , कोणत्याही राजकारण्याचं सोशल मीडिया पेज बघा. लग्न, खाजगी आस्थापनांची उद्घाटनं हा त्यांच्या दिनचर्येचा भाग आणि लोकसंपर्काचं अवजार (टूल) असतं.
--
संमेलनांना सरसकट तमाशा म्हणणे मला पटले नाही. तो साहित्याचा उत्सव असतो. साहित्यप्रेमींना साहित्यिक आणि पुस्तकांना जवळून पाहता येतं. तो व्यवहार अनुभवता येतो.
-
दारात चारचाकी असलेल्या आणि मुलं अमेरिकेत असलेल्या स्त्रिया लाडकी बहीण योजनेची मदत उपटतात आणि खाजगी आस्थापनांमध्ये चांगली नोकरी असलेले नावावर शेतजमीन आहे म्हणून किसान सम्मान योजनेचे पैसे सोडत नाहीत. तिथे साहित्यिकांना सरकारी मदतीच्या कुबड्या घेतात म्हणून हिणवणे दुटप्पीपणा आणि ढोंगीपणाचे वाटते. शिवाय यातले किती लोक विकत घेऊन पुस्तके वाचतात?
साधनामधली शांता गोखले यांची मुलाखत वाचली. इतर अनेक मुद्द्यांवर त्या बोलल्या आहेत. शेवटचा भाग वाचताना अमांची
आठवण आली.
संमेलनांना सरसकट तमाशा म्हणणे
संमेलनांना सरसकट तमाशा म्हणणे मला पटले नाही. तो साहित्याचा उत्सव असतो. साहित्यप्रेमींना साहित्यिक आणि पुस्तकांना जवळून पाहता येतं. तो व्यवहार अनुभवता येतो.
>>>> अनुमोदन. मलाही एकदम दुसरं टोक गाठल्यासारखं वाटलं. शिवाय ज्यांना यातून आनंद मिळतो त्यांना कमी लेखल्यासारखेही वाटले.
सरसकटीकरण करताना अतिरेक होतोच
सरसकटीकरण करताना अतिरेक होतोच. फार वर्षांपूर्वी आपल्या (कालांतराने ज्ञानपीठ मिळवणाऱ्या) साहित्यिकांच्या 'गुरूंनी' या संमेलनांची उरुस म्हणून संभावना केलेली होती.
अखेर या सगळ्यांच्या या तऱ्हा आहेत खऱ्या.
‘शांतता कोर्ट चालू आहे’ हे
‘शांतता कोर्ट चालू आहे’ हे तेंडुलकरांचे गाजलेले नाटक. त्याच्या लेखनाबद्दल काही प्रवाद दिसतात असे जालावरील माहितीवरून समजले.
१. विकीच्या मूलभूत माहितीनुसार लेखकाला हे नाटक काही तरुणांच्या अभिरूप न्यायालयाच्या चर्चेवरून सुचले.
२. परंतु हे नाटक एका इंग्रजी नाटकाचा स्वैर अनुवाद आहे असे काहींना वाटल्यावर त्यांनी तेंडुलकरवर वाङमयचौर्याचा खटला दाखल केला होता परंतु तो आरोप फोल ठरला.
https://www.researchdimensions.org/Management/articleupload/article336.pdf
३. काही अभ्यासाकांच्या मध्ये हे नाटक स्विस नाटककार फ्रेडरिक डयूरेनमॅट यांच्या एका नाटकावर किंवा द डेंजरस गेम या कादंबरीवर आधारित आहे.
https://ebooks.inflibnet.ac.in/engp09/chapter/vijay-tendulkars-shantata-...
https://kartavyasadhana.in/view-article/rajan-harshe-on-mushafiri
या नाटकाच्या छापील पुस्तकात लेखकाने कोणाला श्रेय दिले आहे किंवा नाही याबद्दल कल्पना नाही.
‘जग बदलणारे ग्रंथ’ हा 50
‘जग बदलणारे ग्रंथ’ हा 50 ग्रंथाविषयीचा माहितीपर ग्रंथ दीपा देशमुख यांनी लिहिलेला आहे.
या ग्रंथाला पुस्तक म्हणायचे की ग्रंथ असा संभ्रम त्यांना झाला होता. ग्रंथ हे नाव बोजड वाटते की काय असेही वाटत होते.
तेव्हा त्यांना ज्ञानेश्वरीतील खालील तीन व्याख्या मार्गदर्शक वाटल्या :
लेख = दैनंदिन व्यवहाराबद्दल लिहिलेला मजकूर
पुस्तक = आपल्यासमोर असलेला एखादा मजकूर जसाच्या तसा उतरवून काढणे.
ग्रंथ = एखाद्या महत्त्वाच्या ऐवजामध्ये स्वतःची प्रतिभाशक्ती वापरून नव्याने तयार केलेला उपक्रम/ संग्रह.
आणि म्हणूनच त्यांच्या पुस्तकाला त्यांनी ग्रंथ असे म्हटले आहे.
. . .
अक्षरनिष्ठांची मांदियाळी ( https://www.maayboli.com/node/80912) या पुस्तकात अरुण टिकेकर यांनी त्यांच्या संग्रहातील पुस्तकांचा उल्लेख सातत्याने ग्रंथ असाच केलेला आहे.
पुस्तकप्रेमी लोकांनी कुठली
पुस्तकप्रेमी लोकांनी कुठली पुस्तकं वाचत राहावीत यासंबंधी सुप्रसिद्ध जपानी लेखक हारुकी मुराकामी असं म्हणतात,
“ज्याच्याबद्दल लोक सतत बोलत असतात तेच जर तुम्ही वाचत असाल तर तुम्ही त्या लोकांसारखेच होता; परंतु ज्याच्याबद्दल लोक बोलतात त्यापेक्षा वेगळे काही तुम्ही स्वतः शोधून वाचलेत तर तुम्ही वेगळे व्हाल.
< त्यापेक्षा वेगळे काही
< त्यापेक्षा वेगळे काही तुम्ही स्वतः शोधून वाचलेत तर तुम्ही वेगळे व्हाल.> +१ सही. खूप आवडले.
>>‘जग बदलणारे ग्रंथ’ >>>
>>‘जग बदलणारे ग्रंथ’ >>> माहितीपूर्ण मुलाखत. बघितली.
>>‘जग बदलणारे ग्रंथ’ >>>
>>‘जग बदलणारे ग्रंथ’ >>> माहितीपूर्ण मुलाखत. बघितली.
बोराल यांच्याबद्दल https:/
बोराल यांच्याबद्दल https://www.maayboli.com/node/83630 इथे प्रतिसादात लिहिलय.
< त्यापेक्षा वेगळे काही
< त्यापेक्षा वेगळे काही तुम्ही स्वतः शोधून वाचलेत तर तुम्ही वेगळे व्हाल.> सहीच
*आर सी बोराल यांना " हिंदी
*आर सी बोराल यांना " हिंदी चित्रपट संगीताचे पितामह**
>>>> धन्यवाद ! चांगल्या माहितीबद्दल.
__/\__
__/\__
बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले
बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले नाटककार विद्याधर गोखले यांनी सांगितलेली एक ‘सांगीतिक’ तुलना खूप छान आहे. ते म्हणतात,
“इतर ठिकाणी राग येणे म्हणजे फार वाईट, पण आमच्या संगीतामध्ये राग येणं फार चांगलं. इतर ठिकाणी लय म्हणजे बरबादी, तर आमच्या संगीतामध्ये लय म्हणजे आनंदाची शहजादी. इतर ठिकाणी खटके खटकतात पण आमच्या संगीतामध्ये खटक्यानेच बहार उडते. इतर ठिकाणी हरकती घेणारा कुरघोड्या ठरतो पण संगीतामध्ये जागजागी हरकती घेणे फारच चांगले. इतर ठिकाणी फक्त शहाण्याला मान, पण आमच्या संगीतामध्ये शहाण्याबरोबरच अडाण्याला देखील मान !”
नुकतीच लल्लनटॉपवर जावेद
नुकतीच लल्लनटॉपवर जावेद अख्तरांची दीर्घ मुलाखत बघितली. त्याचं बोलणं ऐकायला नेहेमीच मजा येते.
त्यांनीच सांगितलेला किस्सा.
'लगान'मधलं ते सुंदर भजन ऐकून एका बाईंनी त्यांना फोन केला. त्या म्हणाल्या, 'तुम्ही स्वतःला नास्तिक म्हणवता. पण तुम्ही खोटं बोलता अशी शंका आहे. कुठचाही नास्तिक माणूस असं अपार भक्तीत बुडालेलं रसाळ आणि भावपूर्ण भजन लिहू शकणार नाही..'
त्यांच्या खास शैलीत त्यांनी बाईंना उत्तर दिलं, 'तब तो आपको ये भी पता हो गया होगा की मै एक नामचीन डकैत भी रह चुका हूं. क्यों की गब्बरके डॉयलॉग भी तो मैनेही लिखे है..!'
मागील पानांवर रशियन लेखक Leo
मागील पानांवर रशियन लेखक Leo Tolstoy यांच्या Anna Karenina या कादंबरीच्या पहिल्या वाक्याबद्दल नोंद केलेली आहे :
“Happy families are all alike; every unhappy family is unhappy in its own way.”
त्यांनी हे वाक्य सन 1873 मध्ये लिहिले आणि आजही ते तितकेच कालसुसंगत आहे. या संदर्भातील एक सुंदर लेख इथे वाचता येईल.
https://news.google.com/read/CBMi1wFBVV95cUxOLTlYTnk2OHpsYm1vb2R3Zi1NcDR...
मुळात साहित्यातले हे वाक्य विज्ञान आणि एकंदरीत मानवी अनुभवांनाही चक्क लागू पडलेले आहे. मानव जातीच्या इतिहासात यशापेक्षा अपयशच अधिकाधिक बघायला मिळते, हा त्या वाक्यातून ध्वनीत असलेला अर्थ त्रिकालाबाधित सत्य ठरला आहे. कुठल्याही बाबतीत परिपूर्णता ही अतिशय दुर्मिळ गोष्ट असून अपयश मात्र सदोदित टपून बसलेले असते.
>>>>त्रिकालाबाधित सत्य ठरला
>>>>त्रिकालाबाधित सत्य ठरला आहे.
तसा तो का ठरला याचे विश्लेषण पटले. उदा - सुखी संसाराकरता अनेक गोष्टी (एक पूर्ण संच) लागतात त्यातली एक जरी निसटली तरी पूर्ण डोलारा क्रंबल होतो. त्यामुळे सुखी संसार हे साचे असतात तर मोडलेले संसार विविध कारणांनी मोडल्याने त्या दु:खात वैविध्य असते
यशस्वी स्टार्टप्सचेही तेच - मार्केट्चे ज्ञान, नफा, कस्टमर्स चे ज्ञान अमके तमके असा पूर्ण संच जर व्यवस्थित असेल तरच स्टार्ट अप्स यशस्वी होतात त्यामुळे ते एकसारखे दिसतात पण एक जरी यातील मुद्दा कमी पडला, तर स्टार्टप अयशस्वी ठरते. त्यामुळे दु:खाला / पराभवाला अनेक कारणे असतात त्यात वैविध्य असते.
+१
+१
..........
विख्यात इंग्लिश लेखक Frederick Forsyth यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या लेखनाची महती सांगणारा हा लेख अतिशय रोचक आहे :
https://www.loksatta.com/sampadkiya/editorial/loksatta-editorial-british...
त्यातील हे निवडक :
एकेकाळी ते पत्रकारिता अर्धवट सोडून पॅरिसहून लंडनला परतले तेव्हा त्यांची आर्थिक परिस्थिती हालाखीची होती. तेव्हा त्यांनी त्यांच्या पॅरिसमधील अनुभवावर आधारित ‘द डे ऑफ द जॅकल’ ही पहिलीवहिली कादंबरी 35 दिवसात लिहून काढली. तेव्हा फ्रान्सचे अध्यक्ष हयात असल्यामुळे ती कादंबरी छापायला कोणी तयार होईना पण अखेर एक प्रकाशक मिळाला. कादंबरी विश्वविख्यात झाली हेवेसांनल . . .
. . . इंग्लंडच्या एमआय 6 या गुप्तचर यंत्रणेत काम करणाऱ्या हेरांना फ्रेडरिक यांची पुस्तके अभ्यासाप्रमाणे वाचायला लावतात. . .
आदरांजली
< विद्याधर गोखले यांनी
< विद्याधर गोखले यांनी सांगितलेली एक ‘सांगीतिक’ तुलना> मस्तच. आवडली
< Frederick Forsyth> आवडता लेखक. ‘द डे ऑफ द जॅकल’ जबरी !
कहता है ‘नीरज’ . . . !
कहता है ‘नीरज’ . . . !
बहुतेक हिंदी चित्रपटांच्या बाबतीत त्यांचा एकच गीतकार असतो. अर्थात याला अपवाद आहेत आणि एक मोठा अपवाद आणि मोठा प्रयोग म्हणून ‘मेरा नाम जोकर’कडे पाहता येईल. यातील दहा गाण्यांसाठी राज कपूरनी तब्बल चार गीतकार वापरलेले आहेत : शैलेंद्र- चार गाणी, ह. जयपुरी तीन, नीरज दोन आणि प्रेम धवन एक.
नीरज वगळता अन्य जणांची गाणी तयार झाल्यानंतरही राज कपूर अस्वस्थ होते आणि त्यांना एक तरी गाणे असे हवे होते की ज्यामध्ये आपल्या संपूर्ण चित्रपटाचा सार म्हणजेच विदूषकाची जीवनकहाणी येईल. मग विचारांती त्यांनी त्यासाठी नीरज यांची निवड केली. नीरज यांनी ‘कहता है जोकरच्या’ पहिल्या दोन ओळी शीघ्र सादर करून राजपुढे ठेवल्या आणि राज भलतेच खुश झाले.
नीरज यांचे दुसरे गाणे ‘ए भाई जरा देख के चलो’ हे आहे. ते गाणे जेव्हा शंकर जयकिशन यांच्यापुढे ठेवले गेले तेव्हा दोघांनीही नापसंती व्यक्त केली होती. त्यांच्या मते हे गीत नसून या गद्य ओळी लिहिल्यात. परंतु राज कपूरना ते गाणे भलतेच आवडलेले असल्यामुळे त्यांनी नीरजना ते त्या दोघांपुढे चालीत म्हणून दाखवायला लावले आणि मग शंकर जयकिशन राजी झाले.
कला हा आपल्या जगण्याचा
कला हा आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग आहे. त्या संदर्भातील हा एक किस्सा :
जेव्हा दुसरं महायुद्ध चालू होतं तेव्हा इंग्लंडमध्ये अशी चर्चा होऊ लागली की आता कलाक्षेत्रासाठी जो सरकारचा निधी आहे तो खूप कमी केला पाहिजे कारण सैन्यावर आता भरपूर खर्च होत आहे. मग असा प्रस्ताव चर्चिलपुढे आला. तर त्यावर बोलताना ते म्हणाले,
“मग आपण युद्ध कशासाठी करतो आहोत ? हे युद्ध, हा देश, ही माणसे आणि ही संस्कृती जपण्यासाठीच चालले आहे ना ? अशा परिस्थितीत आपण कलांचा निधी काढून त्या नष्ट करु लागलो तर या युद्धाचा काय उपयोग?”.
व्हायोलिन हे वाद्य वाजवताना
व्हायोलिन हे वाद्य वाजवताना विशिष्ट प्रकारे धरावे लागते. त्यामुळे व्यावसायिक व्हायोलिन वादकांच्या बाबतीत कालांतराने पाठदुखीची समस्या उद्भवते. यावर एक चांगला तोडगा या क्षेत्रातील दिग्गज पंडित मिलिंद रायकर यांनी काढला आहे. त्यांनी विचारपूर्वक एका छोट्या टेकूची निर्मिती केली आहे. हा टेकू वादकासमोर ठेवला जातो आणि व्हायोलिनचे खालचे निमुळते टोक त्यावर टेकवून मग ते वादन करतात :
चित्रसौजन्य : सह्याद्री वाहिनी, दूरदर्शन
< विद्याधर गोखले यांनी
< विद्याधर गोखले यांनी सांगितलेली एक ‘सांगीतिक’ तुलना> मस्त.
<. ‘द डे ऑफ द जॅकल> भारी.
खूप छान माहिती आणि किस्से.
मेंदू आणि मज्जासंस्थेचा
मेंदू आणि मज्जासंस्थेचा सखोल अभ्यास करणाऱ्या दोन ब्रिटिश डॉ. वैज्ञानिकांची आडनावे ब्रेन आणि हेड असावीत हा योगायोग विलक्षण आहे !
Dr. Russell Brain, (1895-1966)
Dr. Henry Head (1861-1940)
“मग आपण युद्ध कशासाठी करतो
“मग आपण युद्ध कशासाठी करतो आहोत ? हे युद्ध, हा देश, ही माणसे आणि ही संस्कृती जपण्यासाठीच चालले आहे ना ? अशा परिस्थितीत आपण कलांचा निधी काढून त्या नष्ट करु लागलो तर या युद्धाचा काय उपयोग?”.>>>>>> व्वा.
मेंदू आणि मज्जासंस्थेचा सखोल अभ्यास करणाऱ्या दोन ब्रिटिश डॉ. वैज्ञानिकांची आडनावे ब्रेन आणि हेड असावीत हा योगायोग विलक्षण आहे !>>>>>>> रोचक.
लेखक- दिग्दर्शक सचिन
लेखक- दिग्दर्शक सचिन कुंडलकरांनी सांगितलेला किस्सा
त्यांच्या आई लेखन करीत असत परंतु सचिनच्या आजोबांनी संतापून त्यांच्या आईची लेखनवही विहिरीत फेकून दिली होती. “लेखक होणे हे श्रीमंतांचे उद्योग आहेत, आपल्याला त्यात पडायचे नाही” हा त्यांचा उपदेश !
या घटनेचा ‘सूड’ म्हणून सचिन यांच्या आईने सचिनना लेखनासाठी सर्वतोपरी उद्युक्त केले. तसेच त्यासाठी वयाच्या १७ व्या वर्षीपासून घरदार सोडून अन्यत्र जाण्यासही प्रोत्साहन दिले. एक प्रकारे सचिनच्या लेखनातून त्या स्वतःचे स्वप्न पूर्ण करत होत्या.
सचिन पुढे म्हणतात, की आईचे निधन झाल्यानंतर आता खऱ्या अर्थाने ‘मी माझ्यासाठी जगत आहे आणि माझ्या मनाप्रमाणे लेखन करीत आहे”.
महेश एलकुंचवार हे मराठी साहित्यातील राजपुत्र आहेत अशी टिपणी त्यांनी केली असून महेश यांच्याप्रमाणे लेखक व्हायचेय, हा आपला ध्यास असल्याचे ते म्हणतात.
https://www.youtube.com/watch?v=Gy3kb1HabFY&t=3571s
'तब तो आपको ये भी पता हो गया
'तब तो आपको ये भी पता हो गया होगा की मै एक नामचीन डकैत भी रह चुका हूं. क्यों की गब्बरके डॉयलॉग भी तो मैनेही लिखे है..!' >>>
सचिन व त्याचे कुटुंब यांना मी माझ्या लहानपणीपासून ओळखतो. अशा सेलेब्रिटीजशी असलेल्या ओळखीची टिमकी इतर कोणी गाजवली तर मी हसतो पण इथे त्यांच्याबद्दलच लिहीत असल्याने हरकत नसावी. ते आमचे दूरचे नातेवाईक. त्याच्या आईला आम्ही निमामावशी म्हणायचो. त्यांच्या घरी मी अनेकदा गेलो आहे. एकदा तर २-३ दिवस राहिलो होतो. त्यांना नातेवाईकांना बोलवायला, त्यांना खाऊ घालायला खूप आवडायचे. त्यांच्या हाताला अफलातून चव होती व अगत्यही खूप होते. गेल्या काही वर्षांत संपर्क कमी झाला पण पूर्वी खूप होता. पण त्या लेखिका होत्या - म्हणजे ती कला त्यांच्याकडे होती- याचा अजिबात आम्हाला पत्ता नव्हता. कधी बोलण्यातही आले नाही. ही वरची पोस्ट वाचूनच समजले.
सचिनचे बहुतांश पिक्चर मात्र मला बाउन्सर जातात
<सचिन कुंडलकर> मुलाखत छान
<सचिन कुंडलकर> मुलाखत छान आहे.
त्याचा गंध सिनेमा चांगला होता.
+१
+१
गंध व गुलाबजाम दोन्ही आवडले होते.
गंधमधील एक कथा त्यांच्या आईने लिहिलेली आहे.
Pages