भेंडीची वेगळ्या पद्धतीची भाजी

Submitted by अश्विनीमामी on 28 December, 2021 - 23:30
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

ताजी कोवळी भेंडी पाव किलो, भाजलेल्या धन्या-जिर्‍याची पूड एक टी स्पून. गरम मसाला एक टीस्पून, मीठ चवीनुसार, मूठ भर काजू, एक मध्यम कांदा( लाल - भारतातला) हिरवी मिरची दोन- तीन , फोडणीस तेल, हळद, हिंग जिरे व मोहरी, बारीक चिरलेली कोथिंबीर वरून पेरायला.

क्रमवार पाककृती: 

भेंड्या पुसून लांब लांब कापून घ्या. एका भेंडीचे लांबी अनुसार करंगळी एवढे तुकडे करायचे मग ते अर्धे किंवा चार भागात कापायचे साइज अनुसार.

कांदा अर्धा कापून लांब लांब कापून घ्या.

मिरच्या पण लांब कापून घ्या.

काजू खलबत्त्यात अर्धवट ठेचून घ्या

आता गॅस मध्यम आचेवर ठेवुन फोडणीस तेल गरम करा व मोहरी जिरे, हिंग हळद, मिरची थोडी कापलेली कोथिंबीर हे सर्व घालून एकदा परता.
मग कांदा घालून एक दोन मिनिटे परतुन घ्या. फार ब्राउन करायचे नाही. कांदा फ्रें ड झोन मध्ये आहे. मग भेंड्या टाका व परतून घ्या. धने जिरे पूड गरम मसाला घालु न परतौन घ्या. तुमच्या पद्धतीने भेंडी शिजवून घ्या. मी दोन तीन मिनिटे झाक ण ठेवते. मग ओपन शिजवते. तार येत नाही पण खरपूस शिजते. व ह्यात काजूचे तुकडे घाला आणि कमी आचे वर थोडे परतत ठेवा. जळली नाही पाहिजे. चवी नुसार मीठ घाला घालत असल्यास चिमूट भर साखर घाला.

भाजी उतरवल्यावर अगदी थोडा लिंबू रस पिळून घाला व कोथिंबीर पेरून लगेच गरम पोळी बरोबर खायला घ्या.

आज भेंड्या आल्या आहेत - सध्या बिग बास्केट वर उत्तम भेंडी येत आहे. बनवली की फोटो टाकेन. काजू हा ह्यातला नटखट हिरो आहे. माधुरीचा जुते दो पैसे लो गाण्यातला हिरवा ब्लाउज व व्हाइट घागरा आठवा. भाजी अशीच नटखट झाली पाहिजे.

वाढणी/प्रमाण: 
मी एकट्यानेच खाते संपेपरेन्त. म्हणजे सकाळी ब्रेफा दोन पोळ्या करता करता व दोन डब्याला झिंदा बाद. पण पोरांच्या डब्याला व दोन लोकांना पुरेशी होईल.
अधिक टिपा: 

भाजी करायच्या आधी कणीक भिजवून रेडी ठेवा मी पिठीमध्येच तीळ कलुंजी, ओवा व थोडेसे मीठ घालते पोळ्या करताना हे सर्व बच्चे कंपनी पोळीत येतात व एकदम साध्या पोळीची टेस्ट वाढते. मी घडीची पोळी करते. व भाजताना थोडेसे तेल लावते. पण तुमच्या इच्छेनुसार तेल लावा. अगदीच बिन तेलाची ही पोळी चांगली लागत नाही.

भाजी उतरवली की लगेच पोळ्या करून लगेच गरमा गरम वाढा व खा. बरोबर चांगले आंब्याचे लोणचे पण छान लागेल.

माहितीचा स्रोत: 
एकदा हैद्राबादेत आयटीसी फॉर्चुन मध्ये( घराजवळ आहे) तिथे अशी शाबुत काजु घातलेली व भेंडी काचर्‍या भाजी खाल्ली होती. त्यात सुधार केला.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमा, हैद्राबादेत अशी भाजी आमच्या कँटीनला महिन्यातून एक दोनदा तरी होतेच! मस्त लागते. कधी काजू, कधी खरपूस तळलेले शेंगदाणे कधी दोन्ही! मी तोंडीलावणे म्हणून नुसती खातो!

छान रेसिपी.
मी खाल्ली आहे अशी भाजी. मस्त लागते.हैदराबाद वाली शेजारीण बनवायची.काजुऐवजी तळलेले शेंगदाणे घालून.

चूक दुरुस्त केली आहे. भाजीत भाजी भेंडीची. मायबोली आमच्या प्रीतीची.

हो खरेतर शेंगदाणे तळून घातलेली पण मस्त लागते. पण ह्यावेळी दिवाळीचे गिफ्ट आलेले काजू बदाम होते. मग ते काजू वापरून टाकले.

काजू चांगले खरंगटुन घ्यायचे. छोटे छोटे तुकडे भुगा असले की भुगा थोडे भाजी मिळून घेतो व काजू तुकडे थोडे टेक्श्चर.

मी घरी आले की कधी कधी शक्ती असेल तर मक्याचे पोहे दोन मूठ तव्यातच तळून घेते व त्यावर थोडे तिखट मीठ पेरून युट्युब बघत खात बसते. ह्या चिवड्यातही एकदा काजू गुलाबी तळून घातले होते काय फर्मास चव येते महाराजा. जीवनाचा रेटा असा की काजू शेंगदाणे खोबरे तळून घेउन अर्धा किलोचा चिव डा करून ठेवावा तर वेळ नाही. व सर्व घटक पदार्थ असेच संपतात. सुके खोबरे पण कुरतडुन खायला आव डते. कधी कधी ऑफिसात जाता ना बॅगेत अर्धी वाटी ठेवून देते.

शेंगदाणे पण ताजे न कुजके निव डून घ्या. नाहीतर रसभंग होतो. मला विचारा.

ही शाही भेंडी झाली. पण जबरा कृती आणी अमा तुम्ही छान लिहीले आहे. एक छानशी चटपटीत पणे कामे करणारी ( तुम्हीच ) गृहिणी नजरेसमोर आली.

वैनी , धन्यवाद या की एकदा सें ट्रल साइड. गरम गरम खाउ घालते. मग माबो वाचत पडी टाकू. लेक वेस्टरन ला शिफ्ट होणार असल्याने माझेच राज्य आहे आता.

छान आहे पाकृ. भेंडीमधे काजू म्हटल्यावर जरा कावळ्याच्या तोंडातला मोती आठवला. पण चांगली लागेल बहुतेक.

काजू भाजीत सहसा आवडत नाहीत परंतू आमचेपण दिवाळीचे भेट काजू तसेच पडलेत त्यामुळे भेंडीत वापरून टाकते. Happy

एकदा भेंडीचा खर्डा करायचा आहे >>> मस्त लागतो. माझ्या साबा करायच्या. भेंडी डायरेक्ट गॅसवर भाजून घ्यायच्या. ज्यांच्याकडे ग्रील किंवा तंदूर शेगडी असेल त्यांना एकावेळी जास्त प्रमाणात भेंडी भाजता येतील. नंतर खलबत्त्यात मिरची, भरपूर लसूण, मीठ आणि भाजलेली भेंडी कुटून घायच्या. गरमागरम भाकरी आणि भेंडीचा ठेचा मस्त लागतो.

होतो चिकट.
मिरची, लसूण, मीठ, चिंच जराशी आणि तेलावर परतून घेतलेली भेंडी. खलबत्त्यात कुटुन सासू बाई पण करतात.भेंडीची चटणी.
भाताबरोबर खातात.मला विशेष नाही आवडली.

चिकट होत नाही का भेंडीचा ठेचा >>> भेंडी चांगली भाजली तर जास्त चिकट नाही वाटत. आणि हो आम्ही वरून कच्चे तेल घालून खातो (मिरच्यांचे प्रमाण भरपूर असते आमच्याकडे) त्यामुळे कदाचित चिकटपणा जाणवत नसावा.

अगदी छान, कोवळी भेंडी मिळाली होती शनिवारी. मग लगेच या पद्धतीने भाजी केली होती. फोडणीत कोथिंबीर घातल्याने वेगळाच स्वाद आला. इथे ‘काजू तुकडा’ पाकिटं मिळतात त्यातले काजू कोरडेच मंद आचेवर परतले आणि शेवटी शेवटी घातले भाजीत. मस्त झाली होती भाजी. एरवी भेंडीला नाकं मुरडणार्‍या पब्लिकने पण दुसर्‍यांदा घेऊन खाल्ली भाजी. कधी ओले काजू मिळाले तर ते घालून पण भाजी भारी लागेल.