Submitted by म्हाळसा on 27 December, 2021 - 10:22
आत्ताच एक ‘प्रयोगशील’ चारोळी सुचलीए..सांभाळून घ्या
तुझा लाईक येणार असेल तर स्टेटस बदलण्यात मजा आहे..
तुझा लाईक येणार असेल तर स्टेटस बदलण्यात मजा आहे.......
तूच पाहणार नसशील तर डीपी सुद्धा चेंज करण्यात काय अर्थ आहे?
आधीच म्हटलंय प्रयोगशील चारोळी त्यामुळे यमक तरी जुळव असं कोणी म्हणू नये..
बरं एकट्यानेच प्रयोग करण्यात काय मजा..त्यामुळे येऊद्यात तुमच्याही चार ओळी
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
आहे का कुणी इथे तीन दिवे
हायकू...??
<< Lol आहे का कुणी इथे तीन दिवे लावणारं?? >>
हायकू...??
<{ हायकू...??
चालेल की... (चारोळी ऐवजी
चालेल की... (चारोळी ऐवजी तिरोळी होईल... पण तेवढं चालायचंच...)
चारोळी असते मोलाची
चारोळी असते मोलाची
हा उपयोग पाहीजे केला
सांबारात घालतात खोबरं
हे सी ने शिकविले मला.
--------------------------------------------
सी ने शिकविले, सामोने आचरीले
चारोळीने उत्तमोत्तम शेफ घडीवले
घरी पदार्थ खायची वेळ आली तेव्हा
घरच्यांनी सुमडित काढते पाय घेतले
मोकाट सुटलेल्या एंजलांनो
मोकाट सुटलेल्या एंजलांनो
गुपित व्हिक्टोरियाचे पुसू नका
सामोची चारोळी गंडली म्हणोनि
मायबोलीवर रूसू नका
>>>>>>>>मोकाट सुटलेल्या
>>>>>>>>मोकाट सुटलेल्या एंजलांनो

गुपित व्हिक्टोरियाचे पुसू नका
गुपित व्हिक्टोरियाचे पुसू नका >> अर्रर्र !
सामो आहे ती. तिला कुठल्या
लाटलेली पोळी खायला
लाटलेली पोळी खायला
कुणाचं तरी असावं नरडं घरात,
नाही तर चव घेण्यासाठी
सगळ्यांचीच निघेल वरात
: दिवे घ्या 3 :
वरात निघाली तरी
वरात निघाली तरी
आकस नसतो साधूत
पुरुषप्रधान वाटते 'वरात'
म्हणून का म्हणावे 'वधूत'
आईला म्हणतात अम्मा
आईला म्हणतात अम्मा
गाईला म्हणतात हम्मा
ओमीक्रोन पसरतोय
आता घरातच खेळा झिम्मा
(आठवर्षांपुर्वी एका फेसबूक
(आठवर्षांपुर्वी एका फेसबूक मैत्रीणीच्या चारोळीला दिलेला रिप्लाय आज तिच्या मेमरीत आला)
मैत्रीणीची चारोळी -
डोळे मिटले की तू दिसतोस
उघडले की हे जग
तुलाही मी दिसते का??
जरा डोळे मिटून बघ.
..
माझा रिप्लाय -
ओठ मिटून तू हसतेस
उघडले की हे जग
किडलेयत तुझे दात पोरी
आरश्यात जाऊन बघ..
चांगली आहे.
चांगली आहे.
आरशात कसे जाणार
आरशात कसे जाणार
'जाऊन आरशात ' लिहा
चेहरा एवढा पांढराफट्ट
बिघडलीय काय प्लिहा?
अरे वावा. धमाल सुरू आहे की
अरे वावा. धमाल सुरू आहे की इथे...
सोऱ्या घेऊन बसलोच आहे मी चारोळ्या पाडत. तर हा धागा दिसला. भोगा आता घ्या :
कसं ते नातं होतं

तो राजा ती राणी
तो अळवाचं पातं
ती त्यावरचं पाणी
अळवावरचं पाणी
अळवावरचं पाणी
कशाला ढवळिलं
माय्बोलीच्या लोकांना तुम्ही
का हो खवळिलं
रारंगढंग मस्तीत दंग
रारंगढंग मस्तीत दंग
रानात गुंग वार्याच्या संग
चंदनगंध धाग्याचे वस्त्र
चोळी बी तंग, जाळी हे अंग
रंगात रंग दमला श्रीरंग
अगं नाच नाच नाच राधे
उडवूया रंग
रंगामधे भिजंल तुझं
गोरं गोरं अंग...
चंदनाची चोळी माझे अंग अंग जाळी
अंग अंग जाळी
माझ्या बकरीचा
समद्यास्नी लागलाय लळा
Pages