Submitted by म्हाळसा on 27 December, 2021 - 10:22
आत्ताच एक ‘प्रयोगशील’ चारोळी सुचलीए..सांभाळून घ्या
तुझा लाईक येणार असेल तर स्टेटस बदलण्यात मजा आहे..
तुझा लाईक येणार असेल तर स्टेटस बदलण्यात मजा आहे.......
तूच पाहणार नसशील तर डीपी सुद्धा चेंज करण्यात काय अर्थ आहे?
आधीच म्हटलंय प्रयोगशील चारोळी त्यामुळे यमक तरी जुळव असं कोणी म्हणू नये..
बरं एकट्यानेच प्रयोग करण्यात काय मजा..त्यामुळे येऊद्यात तुमच्याही चार ओळी
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
नव्याने बोलावले पाणीपुरी
नव्याने बोलावले पाणीपुरी खायला, जुना तिथेच टपकला
दोघांचा राडा काय सांगू , भैय्यालाच चटणीत बुचकळला...
जन्म मरणाच्या मध्ये
जन्म मरणाच्या मध्ये
असा आयुष्याचा छळ
जेथे टेकवावा पाय
तेथे नेमके शेवाळ
'चांद'च्या जागी 'सांड' टाकून
'चांद'च्या जागी 'सांड' टाकून कितीतरी वात्रट गाणी तयार करता येतील.
>>असे आम्ही प्यार च्या जागी पाद टाकून करतो...
लाईक्स हवे असतील तर
लाईक्स हवे असतील तर
थोडासा बदल होऊ दे
स्टेटस नको, डीपी नको
आता टिकटॉक व्हिडिओ येऊ दे
एफ बी, व्हॅाट्सॲप आणि टिकटॅाक
एफ बी, व्हॅाट्सॲप आणि टिकटॅाक
ह्यातच सगळे अडकले
भविष्यात तुमच्या जीवाला धोका आहे
कारण आज इन्स्टा रील्स मी शिकले
तुज्या माज्या व्हिडीयोला आणि
तुज्या माज्या व्हिडीयोला आणि काय हवं
तुज्या माज्या चॅनलला सबस्क्राईबर्सचं न्हवं
नव्या व्हिडीयो मंदी काही हॅशटॅग दडवं
व्हिडीयो कधी न्हवं तो व्हायरल होईल...
डिस जातील लाईक येतील
भोग सरलं सुख येईल...
(हे ओरिजिनल https://youtu.be/vGMayCWrMeY?t=43 मला चारोळी येत नाही. गाणी येतात हे नम्रपणे नोंदवू इच्छिते)
बघणारे कोणी असेल तर
बघणारे कोणी असेल तर
DP change करण्यात अर्थ आहे
कुणी DP ch बघणार नसेल तर
whats app च व्यर्थ आहे
गाणी येतात हे नम्रपणे नोंदवू
गाणी येतात हे नम्रपणे नोंदवू इच्छिते>> ते माझ्यातही उपजत आहे .. सकाळी खाऊ गल्लीवर मटार आप्पे बघूनच आठवलेलं.. तीथे लिहायचं तेवढं टाळलं .. पण आता कू पिन मारलीच आहेस तर टाकतेच
मटर के आप्पे बनाते हुए
ओ जानेतमन्ना किधर जा रही हो
जरा सॅास लाओ
तो चैन आ जाए
<<असे आम्ही प्यार च्या जागी
<<असे आम्ही प्यार च्या जागी पाद टाकून करतो>>>

दिल च्या जागी Bum (हिंदी अर्थपूर्ण शब्द) घालून वात्रटपणा करायचो
बिल भरणारे कोणी असेल तर
बिल भरणारे कोणी असेल तर प्यायला अर्थ आहे,
स्वतःच्याच पैशाने प्यायची असेल तर पिणे व्यर्थ आहे.....
(No subject)
मोक्ष हा पुरुषार्थ,
मोक्ष हा पुरुषार्थ,
प्यायल्याने म्हणे मिळतो.
ज्याला प्यायला मिळत नाही,
तो पिणार्यांवर का जळतो?
दारूच्या विनोदांमध्ये विनोद
दारूच्या विनोदांमध्ये विनोद गरजेचे नसतात
केवळ उल्लेख आहे म्हणुनही लोक हसतात.
मानिम्याऊ हे भारी आहे...
मानिम्याऊ हे भारी आहे...
मैफिलीला बसल्यावर पिणारे
मैफिलीला बसल्यावर पिणारे विचारतात दारुविना तु कसा काय जगतो
हळूच एक अफिमीची फक्की घेत मग मी त्यांची बिनपाण्याने करतो
तुझ्या आठवणीत मी
तुझ्या आठवणीत मी
रात्र रात्र जागवतो
सकाळी उशीरा उठलो
म्हणून बाप रोज रागवतो
दिवसा गावभर उंडारतोस
कुठल्या वळूचा हा वाण
बाहेर खूप दिवे लावतोस
संध्याकाळी थोडे घरात आण
माझ्या जडणघडणीत
तुझा मोठा वाटा आहे
एका कानाने बहिरा/दिव्यांग/अपंग/विधुर/योरशॉर्टफॉल झालो
कारण तुझा सणसणीत "चांटा" आहे
ठाम मते मांडायला
आपण उगाच लाजतो
क्रिकेटवर बोलताना
ऋन्मेश कुठे काय वाचतो
अरे ए
अरे ए
अळम टळम करताना मायबोलीवर
अळम टळम करताना मायबोलीवर धडकले ।
पहिल्या पानावरची गुंतवळ सोडवता सोडवता ऋ ची चाहती झाले ।
मागे उभा ऋन्मेष (चा धागा) पुढे उभा ऋन्मेष ( चा धागा) ।
माझ्याकडे मायबोली माझी पाहते आहे ।।
काथ्याकूट जरी करी ।
विणकला हाती धरी ।
जीवनपट मांडी सारी ।
ऋ चा कीबोर्ड सर्वांगास स्पर्शून राहे ।
( रुमाल, ड्रायर, कोतबो, प्रेमविवाह, जात, खाउगल्ली ., व्हॅक्युम , बायजु .... )
माझ्याकडे मायबोली माझी पाहते आहे ।।
डू आयडीचा हा योगी ।
माबोवरी आनंद भोगी ।
काहींना धडकी भरी ।
काहींना छळवाद भारी ।
मैगीसंगे गटारीचा रस्सा वाहे ।
धागा हायजॅक करुनि राहे ।
माझ्याकडे मायबोली माझी पाहते आहे ।।
( फक्त चाल घ्या गंमत म्हणून , बाकी कुणाला दुखवायचा हेतू नाही )
(No subject)
(मी एफबी,व्हॅाट्सॲपवर
(मी एफबी,व्हॅाट्सॲपवर लिहीलेले स्वत:वरचे जोक जेव्हा बऱयाच जणांना कळत नाहीत तेव्हा)
खुदिको कर खुदसे ट्याग इतना
कि हर विनोदसे पहले
खुदा खुदसेहि ये पूछे
कि ये बंदीने लिखा क्या है
(आता हेही बऱयाच जणांना कळणार नाही :D)
आशिकाची हडळ
आशिकाची हडळ

आता वाचले हे.. भारी.. आणि धन्यवाद
ये दिल एकहि पे, कहीं टिकता
ये दिल एकहि पे, कहीं टिकता नहीं, हम क्या करें
सुने वडमे में कोई बसता नहीं, हम क्या करें
तुम्ही कह दो, अब ऐ म्हाळसाक्का हम क्या करें
पाहशील तू मागे वळून,
पाहशील तू मागे वळून,
तेव्हा उरात माझ्या धडधड होईल
चालत्या मोटारपुढे म्हैस आली
तर ती मरेल, नाहीतर काय दूध देईल?
नको चालूस दुडक्या चाली
नको चालूस दुडक्या चाली
जिना होतोय वरतीखाली
हे छाताड चिपळ्यावानी
पिचकेल पायाखाली
सनीताई सनीताई रूसलीस का
सनीताई सनीताई रूसलीस का
कपड्यात गुरफटून बसलीस का ?
तुझ्या पेन ड्राईव्ह मधे माझा
तुझ्या पेन ड्राईव्ह मधे माझा ठिपकाही नाही
माझ्या गुगलड्राईव्हात तुझ्याशिवाय काही नाही
कधी तरी बघशील डी पी माझा या आशेवर आहे
तुला तर माझा ब्लॉक काढायचेही लक्षात नाही
काल तुला पाहिलं
काल तुला पाहिलं
वाटलं पडावं प्रेमात
कॉफी घोट घेताना
घुसावं थेट हृदयात
भावना मांडायला
भावना मांडायला
असावं कोणीतरी हृदयात
तेव्हाच करू शकतो
सार्या संकटावर मात
खोबरं वाटायला
खोबरं वाटायला
)
असावं कोणीतरी घरात
तेव्हाच करू शकतो
सार्या सांबारासह भात
(
पोळी लाटायला
पोळी लाटायला
)
असावं रोटीमेकर घरात
तेव्हाच देऊ शकतो
तव्यावरनं पोळी ताटात
(
Pages