श्रीखंड Pie

Submitted by स्वाती_आंबोळे on 6 December, 2021 - 11:42
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० तास
लागणारे जिन्नस: 

१४ औंसांचा स्वीटन्ड कन्डेन्स्ड मिल्कचा कॅन
अर्धा कप होल फॅट प्लेन ग्रीक योगर्ट
एक तृतियांश कप लिंबूरस
८ ईंची तयार ग्रॅहॅम क्रॅकर Pie क्रस्ट
आवडीनुसार सुका मेवा, वेलची, केशर, जायफळ इ.

क्रमवार पाककृती: 

ओव्हन ३५० डिग्री फॅरनहाइटला प्रीहीट करत ठेवा.
मिक्सिंग बोलमध्ये कन्डेन्स्ड मिल्क, योगर्ट आणि लिंबाचा रस फेटून छान एकजीव करा.
त्यात वेलचीपूड, केशर, सुक्यामेव्याची पूड (मिल्क मसाला) आवडीप्रमाणे मिसळा.
Pie क्रस्टमध्ये हे मिश्रण ओतून १० मिनिटं ३५० डिग्रीजना बेक करा.
ओव्हन बंद करा, पण आणखी अर्धा तास Pie आतच राहू दे.
अर्ध्या तासाने Pie बाहेर काढून निवू द्या.
रात्रभर (किमान पाच-सहा तास) फ्रीजमध्ये ठेवून सेट होऊ द्या.
खाताना माझी आठवण काढा. Proud

वाढणी/प्रमाण: 
आठ मोठे किंवा बारा बेताच्या आकाराचे पीस
अधिक टिपा: 

लिंबूरस इतका लागतो - Pie आंबट होत नाही.
'कप' म्हणजे मेजरिंग कप. Happy
'मिनि' Pie क्रस्ट्स वापरून सिंगल सर्व्ह व्हर्जन करू शकता - तशी करताना बेकिंगचा वेळ कमी (पाच ते सहा मिनिटं इतकाच) करायचा - बाकी कृती तशीच.
ही माझी रेसिपी अर्थातच नाही, मी खाली स्त्रोत नमूद केला आहे, तिथल्या सूचनांप्रमाणे (शेवटचे व्हिपिंग क्रीम वगैरे लाड वगळून Proud ) तंतोतंत केली.
इतकी सोपी आणि इतकी चवदार रेसिपी शेअर केल्यावाचून राहावलं नाही.
पॉटलकला वगैरे न्यायला परफेक्ट पदार्थ आहे - यात अंडी नसल्यामुळे शाकाहारी व्यक्तींनाही आस्वाद घेता येईल.

फोटो छान आलेला नाहीये याची धागाकर्तीला कल्पना आहे, कधी एकदा खाऊन बघते असं झाल्यामुळे घाईत काढला गेला आहे. Proud

माहितीचा स्रोत: 
https://www.instagram.com/reel/CVxu4byg0-a/?utm_medium=copy_link
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह! मस्तच रेसिपी.. रेडिमेड एवरेस्टचा मिल्क मसाला चांगला लागेल.
'मिनि' Pie क्रस्ट्स वापरून सिंगल सर्व्ह व्हर्जन करू शकता ->>>>> येस्स हे नक्की करून बघण्यात येईल.

आमच्या इथे हे केशर पिस्ता , मँगो, रोझ , व्हॅनिला अश्या प्रकाराचे श्रिखंड रेडीच मिळते. ते करून बघता येइल. हवे ते फ्लेवर घालता येतील.

सध्या मिक्स फ्रूट ़ किवी, क्रॅन बेरी पायनापल हे फ्लेवर एव्हर ग्रीन आहेत.

ख्रिसमस ब्रेकसाठी घरी आलेल्या कॉलेजच्या मंडळींसाठी आज वेल्कम होम आम्रखंड पाय केला होता... जामच खूष झाली जनता ! Happy
इतकी सुंदर,सोपी पाककृती शेअर केल्याबद्दल धन्यवाद, स्वाती ! #aGratefulMom

@स्वस्ति, फक्त लिंबाच्या रसाऐवजी थोडा, साधारण २ चमचे संत्र्याचा रस वापरला. आणि अर्थातच आम्रखंड होते म्हणून हापूस आंब्याचा पल्प वापरला. मी नेहेमीच सर्व अंदाजाने घेते. चव, कन्सिस्टन्सी आणि गोडवा टेस्ट करून प्रमाण ठरविते. बाकी वरचेच ingredients वापरले.
मी खरे तर हा मँगो पाय करणार होते, जो मी नेहेमी करते. पण घरात असलेल्या जिलेटीनची expiration date उलटून गेली होती. म्हणून मग ही रेसिपी ट्राय करण्याचे ठरविले. ग्रीक योगर्ट (सॅन्डविच, कोशिंबीर... बनवण्यासाठी ) मी घरीच करते. त्यासाठी हे स्ट्रेनर वापरते. तेच अर्धा कप घेतले.
मी नेहेमी करते त्यापेक्षा ह्या पायचे texture मला जास्त smooth आणि delicious वाटले. The pieces were firm too.
वीकेंडला माझा आवडता Key Lime Pie ही रेसिपी वापरून करून बघेन. इथे अपडेट देईनच. Happy

स्वातीताई, हा प्रकार शनिवारी करून बघितला. ओबड्धोबड फोटो खाऊ गल्लीत टाकलाय.
ज्येष्ठ तज्ञ आणि ज्युनियर तज्ञांनी तोंडात बोटे घातली. त्यांना हा प्रकार माहित नव्हता. Happy
चव छानच होती. पण रेडिमेड क्रस्ट न मिळाल्याने शॉर्ट क्रस्ट (गुंडाळलेली पोळी) आणून त्याचा बेस पहिल्यांदा ओव्हन मधे करावा लागला. तो ओबडधोबड झाला.
बाकी काही न सुचल्याने ब्ल्यू बेरिज सजवायला लावल्यात.

मँगो फ्लेवर्ड श्रीखंड पाय बनवायचं असेल तर ह्यात मँगो पल्प लिटी घालायचा? अजून काय कमी जास्त करायचे?
तयार पाय क्रस्टला काय ऑप्शन आहे?

Pages