परत लिफाफे

Submitted by धनुडी on 1 December, 2021 - 01:54

परत एकदा लिफाफे करण्याची उर्मी आली. मध्ये दिवाळीसाठी केले तेव्हा फोटो स्टेटस वर टाकले. तर बऱ्याच जणांनी लिफाफ्यासाठी विचारलं. आणि एक मैत्रिण बजाजभवन मध्ये प्रदर्शन लावणार आहे साड्यांचे तर तिथे ठेव म्हणाली. म्हंटलं बघू तर जमतय का, तर चक्क 117 लिफाफे झाले करून दोन दिवसात.

1) 20211129_104521-COLLAGE.jpg

2) हे पण
20211201_112542-COLLAGE.jpg

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

सध्या परत लिफाफे करण्यावर भर आहे. माझ्या एका मैत्रिणीला ५० लिफाफे हवे आहेत. मग त्या निमित्ताने अजून केले. १०० झाले.

IMG_20220529_173804~2.jpg

आणि हा कचरा

IMG_20220528_220436~2.jpg

देवकी, सस्मित, किल्ली, सामो, सायो, निर्मल, वर्णिता, लंपन आणि किशोर मुंढे सगळ्यांचे आभार एन्वलप्स आवडल्याचं सांगितल्याबद्दल. :). राहिलं होतं, आज परत फोटो अपलोड केले तेव्हा लक्षात आलं.

वाह भारीच..
मला तर रंगीबेरंगी कचराही आवडला Happy

थॅंक्यु थॅंक्यु सगळ्यांना, अन्जू, ( दंडवत वगैरे नको गं) अमा, वावे, ऋ, सामो Happy
ऋन्मेष कचरा पण जपूनच ठेवते मी, त्यातूनच लिफाफ्यांवरचं डेकोरेशन केलंय.
स्टेप बाय स्टेप फोटो टाकायचे म्हणजे प्रश्न च आहे हेच फोटो कितीवेळा प्रयत्न करून शेवटी अपलोड झाले. तरी बघते प्रयत्न करून.

हेहेहेहे सी सही आयडिया. माझ्या बहिणी म्हणतात आम्ही कोणाला देणारच नाही पाकिटं जपून जपून वापरू, आणि मी त्यांना म्हणते उलट द्या मी तुम्हांला सारखी देईन. पण असं होत नाही मला जेव्हा मुड असतो तेव्हा मी भस्म्या झाल्यासारखी लिफाफे करते Lol आणि नाही तर सगळं सामान आत.
सी, म्हाळसा थॅंक्यु.

फारच सुंदर लिफाफे!

त्यांचं बाह्यांग इतकं सुंदर आहे की उघडून आत काही आहे का हे पहायचंच विसरायला होईल!

Btw, ते फुलांचे, पानांचे एकसारखे आकार कसे काय कट केलेत ?

धनुडी , काय ग्रेट आहेस , मस्तच केली आहेस पाकिटं.
मला ही इतकं सुंदर पाकीट कोणाला द्यायचं डेरिंग होणार नाही , मी दिलंच तर समारंभात न देता , one to one देईन म्हणजे नाव न घालता देता येईल आणि reuse पण करता येईल घेणाऱ्याला. Happy

सुंदर लिफाफे आहेत!

मला तर रंगीबेरंगी कचराही आवडला >> +१ केवळ रंगीबेरंगी नाही, नक्षीदारही आहे तो. Happy

धन्यवाद ममो, जाई, हर्पा Happy ममो, बहुतेक जण माझी पाकिटं नावं न घालताच देतात, परत वापरता यावीत म्हणून Happy .
हर्पा हे सगळं उरलेलं वापरून केलेली एक दोन ग्रिटींगज चे फोटो देते.

IMG_20220102_223533.jpg
हे एक पान आहे ग्रिटींग मधलं

IMG_20200127_143903.jpg

आणि हे एक ग्रिटींग आहे

उरलेल्या नक्षीतून (कचरा म्हणवत नाही त्याला) केलेली ग्रीटिंग्सही छान आहेत. किती जिकीरीचं आहे हे कापणं! मी त्या नक्षीबरहुकुम कात्री वळत नसेल तर बाजूचा कागद जरा जास्तच कापतो. पण तुम्ही इतकी नीट कापली आहे की कापलेला भाग आणि ऊर्वरित भाग - दोन्ही वापरता येतात. विशेषतः वरती लाल नक्षीत जी फुलं आहेत (रेडमी नोट ६ प्रो मी ड्युअल कॅमेरा लिहिलेला फोटो), ती कापणं फारच अवघड आहे.

हर्पा Happy धन्यवाद, मलाही हि फुलं, आणि दुसरे वळसेवाले आकार कापायला खुप आवडतं. मी कुठलीही चित्र / आउट लाइन काढून घेत नाही . हि फुलं डायरेक्ट कापते, पण मुड असावा लागतो. Happy
जयु, डॉक्टर, निलाक्षी, वावे धन्यवाद _/\_

ऋन्मेष तुझ्या घरी या पेक्षाही छान छान ग्रिटींग करणारी लोकं आहेत. तुला कशासाठी कल्पना चोरायचीये. ह्याचं काहीतरी वेगळंच.

अहो म्हणजे लेकीला दाखवतो. आवड आहे तिला तर मायबोलीवर, फेसबूकवर, तिच्या ईंटरेस्टचे काही दिसले तर तिला दाखवत असतो.

Pages