Submitted by धनुडी on 1 December, 2021 - 01:54
परत एकदा लिफाफे करण्याची उर्मी आली. मध्ये दिवाळीसाठी केले तेव्हा फोटो स्टेटस वर टाकले. तर बऱ्याच जणांनी लिफाफ्यासाठी विचारलं. आणि एक मैत्रिण बजाजभवन मध्ये प्रदर्शन लावणार आहे साड्यांचे तर तिथे ठेव म्हणाली. म्हंटलं बघू तर जमतय का, तर चक्क 117 लिफाफे झाले करून दोन दिवसात.
1)
2) हे पण
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
आकर्षक लिफाफे. सुंदर रंगसंगती
आकर्षक लिफाफे. सुंदर रंगसंगती.
सध्या परत लिफाफे करण्यावर भर
सध्या परत लिफाफे करण्यावर भर आहे. माझ्या एका मैत्रिणीला ५० लिफाफे हवे आहेत. मग त्या निमित्ताने अजून केले. १०० झाले.
आणि हा कचरा
देवकी, सस्मित, किल्ली, सामो,
देवकी, सस्मित, किल्ली, सामो, सायो, निर्मल, वर्णिता, लंपन आणि किशोर मुंढे सगळ्यांचे आभार एन्वलप्स आवडल्याचं सांगितल्याबद्दल. :). राहिलं होतं, आज परत फोटो अपलोड केले तेव्हा लक्षात आलं.
ग्रेट धनुडी, दंडवत तुला, फार
ग्रेट धनुडी, दंडवत तुला, फार गोड आहेत.
Awesome. Please give a step
Awesome. Please give a step by step tutorial. Teach us.
फारच छान लिफाफे आहेत धनुडी!
फारच छान लिफाफे आहेत धनुडी! मस्तच.
वाह भारीच..
वाह भारीच..
मला तर रंगीबेरंगी कचराही आवडला
>>>>>>>>>>मला तर रंगीबेरंगी
>>>>>>>>>>मला तर रंगीबेरंगी कचराही आवडला Happy
हाहाहा
थॅंक्यु थॅंक्यु सगळ्यांना,
थॅंक्यु थॅंक्यु सगळ्यांना, अन्जू, ( दंडवत वगैरे नको गं) अमा, वावे, ऋ, सामो
ऋन्मेष कचरा पण जपूनच ठेवते मी, त्यातूनच लिफाफ्यांवरचं डेकोरेशन केलंय.
स्टेप बाय स्टेप फोटो टाकायचे म्हणजे प्रश्न च आहे हेच फोटो कितीवेळा प्रयत्न करून शेवटी अपलोड झाले. तरी बघते प्रयत्न करून.
फारच मस्त, सुबक डिझाईन वाले
फारच मस्त, सुबक डिझाईन वाले रंगीबेरंगी लिफाफे आवडले.
मृ थॅंक्यु
मृ थॅंक्यु
अरे काय सही आहे!!! असं सुरेख
अरे काय सही आहे!!! असं सुरेख पाकीट पाहून आत अगदी रू११/- फक्त घातले तरी लोकं वाईट नाही वाटून घ्यायचे...
वा धन्स, मस्त आहेत लिफाफे
वा धन्स, मस्त आहेत लिफाफे
हेहेहेहे सी सही आयडिया.
हेहेहेहे सी सही आयडिया. माझ्या बहिणी म्हणतात आम्ही कोणाला देणारच नाही पाकिटं जपून जपून वापरू, आणि मी त्यांना म्हणते उलट द्या मी तुम्हांला सारखी देईन. पण असं होत नाही मला जेव्हा मुड असतो तेव्हा मी भस्म्या झाल्यासारखी लिफाफे करते आणि नाही तर सगळं सामान आत.
सी, म्हाळसा थॅंक्यु.
सुरेख बनवता तुम्ही लिफाफे
सुरेख बनवता तुम्ही लिफाफे
फारच सुंदर लिफाफे!
फारच सुंदर लिफाफे!
त्यांचं बाह्यांग इतकं सुंदर आहे की उघडून आत काही आहे का हे पहायचंच विसरायला होईल!
Btw, ते फुलांचे, पानांचे एकसारखे आकार कसे काय कट केलेत ?
धन्यवाद मनिम्याऊ, रमा85.
धन्यवाद मनिम्याऊ, रमा85. फुलाच्या आकाराचे पंच आहेत. पानं आणि बाकीचे आकार मी कापते
धनुडी , काय ग्रेट आहेस ,
धनुडी , काय ग्रेट आहेस , मस्तच केली आहेस पाकिटं.
मला ही इतकं सुंदर पाकीट कोणाला द्यायचं डेरिंग होणार नाही , मी दिलंच तर समारंभात न देता , one to one देईन म्हणजे नाव न घालता देता येईल आणि reuse पण करता येईल घेणाऱ्याला.
सुंदर काम झालेय हे धनुडी
सुंदर काम झालेय हे धनुडी
सुंदर लिफाफे आहेत!
सुंदर लिफाफे आहेत!
मला तर रंगीबेरंगी कचराही आवडला >> +१ केवळ रंगीबेरंगी नाही, नक्षीदारही आहे तो.
धन्यवाद ममो, जाई, हर्पा ममो
धन्यवाद ममो, जाई, हर्पा ममो, बहुतेक जण माझी पाकिटं नावं न घालताच देतात, परत वापरता यावीत म्हणून .
हर्पा हे सगळं उरलेलं वापरून केलेली एक दोन ग्रिटींगज चे फोटो देते.
हे एक पान आहे ग्रिटींग मधलं
आणि हे एक ग्रिटींग आहे
खूपच छान लिफाफे. ग्रिटिंग्ज
खूपच छान लिफाफे. ग्रिटिंग्ज ही सुंदर.
खूपच छान लिफाफे.
खूपच छान लिफाफे.
उरलेल्या नक्षीतून (कचरा
उरलेल्या नक्षीतून (कचरा म्हणवत नाही त्याला) केलेली ग्रीटिंग्सही छान आहेत. किती जिकीरीचं आहे हे कापणं! मी त्या नक्षीबरहुकुम कात्री वळत नसेल तर बाजूचा कागद जरा जास्तच कापतो. पण तुम्ही इतकी नीट कापली आहे की कापलेला भाग आणि ऊर्वरित भाग - दोन्ही वापरता येतात. विशेषतः वरती लाल नक्षीत जी फुलं आहेत (रेडमी नोट ६ प्रो मी ड्युअल कॅमेरा लिहिलेला फोटो), ती कापणं फारच अवघड आहे.
खुपच सुंदर! अप्रतिम !!! कला
खुपच सुंदर! अप्रतिम !!! कला आहे हातात!
शुभेच्छापत्रंही सुंदर आहे
शुभेच्छापत्रंही सुंदर आहेत धनुडी! कला आहे तुझ्या हातात.
हर्पा धन्यवाद, मलाही हि
हर्पा धन्यवाद, मलाही हि फुलं, आणि दुसरे वळसेवाले आकार कापायला खुप आवडतं. मी कुठलीही चित्र / आउट लाइन काढून घेत नाही . हि फुलं डायरेक्ट कापते, पण मुड असावा लागतो.
जयु, डॉक्टर, निलाक्षी, वावे धन्यवाद _/\_
छान आहेत ग्रीटींग्ज.. आणि
छान आहेत ग्रीटींग्ज.. आणि कल्पनाही.. चोरायला हरकत नाही
ऋन्मेष तुझ्या घरी या पेक्षाही
ऋन्मेष तुझ्या घरी या पेक्षाही छान छान ग्रिटींग करणारी लोकं आहेत. तुला कशासाठी कल्पना चोरायचीये. ह्याचं काहीतरी वेगळंच.
अहो म्हणजे लेकीला दाखवतो. आवड
अहो म्हणजे लेकीला दाखवतो. आवड आहे तिला तर मायबोलीवर, फेसबूकवर, तिच्या ईंटरेस्टचे काही दिसले तर तिला दाखवत असतो.
Pages