कल ओळखण्याचे विज्ञानाधारीत मार्ग

Submitted by केअशु on 24 November, 2021 - 21:44

फलज्योतिषाचा उपयोग हा त्या व्यक्तीच्या स्वभावाबद्दल आणि रुपाबद्दल अंदाज करणे, त्या व्यक्तीचा उपजीविकेचा प्रांत अंदाजे कोणता असेल? त्याला कोणता दखल घेण्याजोगा आजार/विकार आहे का याचा अंदाज करणे, आयुष्याचा जोडीदार म्हणून योग्य ठरेल का याबद्दल अंदाज करणे, जातकाचा प्रेमविवाह होईल का? तसेच जातकाच्या आयुष्यातला मानसिक संतुलन बिघडवणारा कालावधी ओळखणे, त्या व्यक्तीची एखादी इच्छा पूर्ण होईल की नाही आणि कधी होईल अशा कामांसाठी केला जातो.
ही वर लिहिलेली कामे करण्यासाठी विज्ञानाचा आधार असलेल्या अशा काही पद्धती किंवा टूल्स उपलब्ध आहेत का? त्यातल्या एखाद्या पद्धतीचा , टूलच्या वापराचा तुमचा अनुभव असेल तर तो सुद्धा लिहा. सर्वांचे आधीच आभार _/\_

Group content visibility: 
Use group defaults

>>त्याला कोणता दखल घेण्याजोगा आजार/विकार आहे का याचा अंदाज करणे<<
आर्टिफिशियल इंटेलिजंस अर्ली स्टेजमधे असलेला कँसर डिटेक्ट करु शकतो...

>>विज्ञान जे आपल्याला माहीत आहे ते चुकीचं असू शकतं <<
काहि शास्त्रज्ञांचं मत आहे कि आइनस्टाइअनची रिलेटिविटि थियरी चूक आहे. आता बोला... Wink

राशीनुसार उपजीविकेसाठी कोणते क्षेत्र निवडावे, कोणत्या अवयवाला आजार होऊ शकतो या प्रश्नांची उत्तरं लिंडा गुंडमनच्या पुस्तकात दिली आहेत.

मी छापील पुस्तकं वाचली होती. सन साइन्स आणि स्टार साइन्स
सन साइन्स हे सूर्य राशीवरून ठोकताळे सांगतं. स्टार साइन्स न्युमरॉलॉजी बद्दल होतं बहुतेक. नक्की आठवत नाही.

ही वर लिहिलेली कामे करण्यासाठी विज्ञानाचा आधार असलेल्या अशा काही पद्धती किंवा टूल्स उपलब्ध आहेत का?>> सुरेश शहासने यांचे कृष्णमूर्ती ज्योतिष रहस्य घ्या. रुपये ८२५ फक्त.

धाग्याचे नाव - कल ओळखण्याचे विज्ञानाधारीत मार्ग
"ही वर लिहिलेली कामे करण्यासाठी विज्ञानाचा आधार असलेल्या अशा काही पद्धती किंवा टूल्स उपलब्ध आहेत का? त्यातल्या एखाद्या पद्धतीचा , टूलच्या वापराचा तुमचा अनुभव असेल तर तो सुद्धा लिहा." --- हे कोणी वाचले नाही का ?
मुळात त्यांनी अमुकतमूक गोष्टींसाठी ज्योतिषमध्ये काही पद्धती/ठोकताळे दिलेले आहेत तसे व्यावहारिक विज्ञानात काही टूल्स आहेत का असा प्रश्न विचारला आहे तर लोकं ज्योतिषावरच बोलत बसलेत. AI वाला प्रतिसाद सोडला तर बाकी सगळे प्रतिसाद ट्रॅक सोडून गेलेले आहेत.

कल ओळखण्याचे काही विज्ञानातील मार्ग -
१. दोरीला दगड लावून त्याचा लंबक करावा आणि लटकवावा. दगडाच्या दोरीच्या सापेक्ष तुमची वस्तू काय कोन करते ह्यावरून त्या वस्तूचा कल कळेल.
२. दिवे घ्या. म्हणजे, खरे दिवे घ्या. तुमच्या वस्तूच्या बरोबर डोक्यावर आणि मध्यभागी दिवा लावा. सावली कुठे पडते ह्यावरून कल ओळखता येईल.

फलज्योतिषाचे तंत्र वापरून शांत माणूस / ऋन्मेष पुढचा धागा कधी, कुठल्या वेळेला कुठल्या विषयावर काढेल हे सांगता येते का ? असल्यास त्याच्या पद्धती / टूल्स याबद्दल माहिती द्यावी.

भविष्य म्हणजे ,

आपल्या डोक्यात एकच असते.
सर्व वैयतीक.
1), लग्न कधी होईल,पैसा कधी येईल,घर बांधून होईल का!
बायको शी पटेल का?
मृत्यू कधी येईल ,नोकरी लागेल का? नोकरी टिकेल का? धंदा चालेल का?,
हे असले प्रश्न असतात आपले .
आणि ह्यालाच भविष्य समजतो आपण
तसे ह्या प्रश्नानं ची विज्ञाना सांगता येणारी उत्तर नाहीत .
सरळ आहे.
पण माणसाचे पृथ्वी वरील अस्तित्व किती वर्ष टिकेल ह्याचा अंदाज शास्त्रीय पुराव्यांवर करता येवू शकतो.
माणूस किती जगू शकतो ह्याचा अंदाज सर्व टेस्ट करून काढता येवू शकतो.
असे आणि ह्या प्रकार चे भविष्य नक्कीच शास्त्रीय आधारावर व्यक्त करता येवू शकते.

म्हणजे धागालेखकाने उद्देशालाच काळिमा फासला म्हणा कि..
माणूस कधीपर्यंत जगेल हे जाणून घेतल्याने धागालेखकाचा प्रेमविवाह कसा होणार ? त्यासाठी कायतरी जुगाड करा राव.
एक्स = माणूस कधी जगेल
वाय = पृथ्वीचा अंत कधी होईल
झेड = प्रेमविप्रेकरू इच्छिणा-या व्यक्तीचे सध्याचे वय
तर वायझेड = ?
इथे वायझेड ही प्रेमविवाह कधी होईल याची येणारी किंमत होय.
( मला शांतपणे युट्यूब बघूही देत नाहीत. तिकडे खूनी पळून गेला असेल. आता त्याला कसा शोधायचा याची वैज्ञानिक मेथड सांगा)

शांत माणूस
तिथे कुठे ?
>>>
ईथे
https://www.maayboli.com/node/79872
त्या धाग्याशी संबंधित प्रश्न मला ईथे विचारू नका.
जर तिथे पोस्ट करून माझा धागा वर यायला हातभार लावायचा नसेल तर मग सॉरी, मी ईथे अवांतर चर्चा वाढवणार नाही Happy
हेमाशेपो Happy

Pages