कल ओळखण्याचे विज्ञानाधारीत मार्ग

Submitted by केअशु on 24 November, 2021 - 21:44

फलज्योतिषाचा उपयोग हा त्या व्यक्तीच्या स्वभावाबद्दल आणि रुपाबद्दल अंदाज करणे, त्या व्यक्तीचा उपजीविकेचा प्रांत अंदाजे कोणता असेल? त्याला कोणता दखल घेण्याजोगा आजार/विकार आहे का याचा अंदाज करणे, आयुष्याचा जोडीदार म्हणून योग्य ठरेल का याबद्दल अंदाज करणे, जातकाचा प्रेमविवाह होईल का? तसेच जातकाच्या आयुष्यातला मानसिक संतुलन बिघडवणारा कालावधी ओळखणे, त्या व्यक्तीची एखादी इच्छा पूर्ण होईल की नाही आणि कधी होईल अशा कामांसाठी केला जातो.
ही वर लिहिलेली कामे करण्यासाठी विज्ञानाचा आधार असलेल्या अशा काही पद्धती किंवा टूल्स उपलब्ध आहेत का? त्यातल्या एखाद्या पद्धतीचा , टूलच्या वापराचा तुमचा अनुभव असेल तर तो सुद्धा लिहा. सर्वांचे आधीच आभार _/\_

Group content visibility: 
Use group defaults

तुमच्या प्रश्नातच विरोधाभास आहे. फलज्योतिष हे थोतांड असल्यामुळे वैज्ञानिक पातळीवर कधीच सिद्ध न झालेले आहे, मग अश्या परिस्थितीत "कामे करण्यासाठी विज्ञानाचा आधार असलेल्या काही पद्धती" कशा काय मिळणार तुम्हाला?

उपाशी बोका - सहमत.

फलज्योतिष आणि विज्ञान हे दोन विरुद्ध टोके आहेत.

नदीजवळ प्रेते जाळण्याची जागा पाहून तिथल्या चिंचेच्या (नसेल तर वडाच्या) झाडाला उलटे टांगून घ्यावे.
या अवस्थेत हा मंत्र जपत रहावा. कर्णपिशाच्च वश झाले कि आपोआप हवे ते कळू लागते.
अनुभव हीच खात्री.

म्हणजे
फलज्योतिष हे विज्ञान नाही असे धागाकर्त्याचे म्हणणे आहे काय

फलज्योतिष हे विज्ञानाधारीत नाही हे धाग्यात जो प्रश्न विचारलाय त्यापासून भरकटू नये म्हणून लिहिलंय. माझ्यापुरते फलज्योतिष हे विज्ञानाधारीतच आहे.(ते कसं ते मी फलज्योतिष थोतांड संघटनेला सांगत,पटवत आणि शाब्दिक झुंज देण्याची इच्छा नसल्याने टाळतो आहे)

माझ्यापुरते फलज्योतिष हे विज्ञानाधारीतच आहे.(ते कसं ते मी फलज्योतिष थोतांड संघटनेला सांगत,पटवत आणि शाब्दिक झुंज देण्याची इच्छा नसल्याने टाळतो आहे)>>>>>>>>कल ओळखण्याचे "ज्योतिषशास्त्रीय" आडाखे/ नियम असे तुम्हाला म्हणायचे आहे असे दिसते.

काही ही म्हणा.
विज्ञान ह्या शब्दाचा मोठा आधार असतो प्रत्येकाला.
विज्ञान म्हणजे काय ?कोणी तरी सांगितलेली त्याची व्याख्या म्हणजेच विज्ञान समजणे ह्या सारखे अज्ञान दुसरे नाही.

विज्ञान खूप गहन आणि खोल आहे. आता या धाग्यावर सात कमेंट आहेत असं मी लिहिलं तर आठ कमेंट होतील. त्यामुळे वैज्ञानिकदृष्ट्या मी लिहिलेलं खोटं होईल. त्यामुळे आपण जे महत्वाचे शोध लागले आहेत त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नये.आपण सगळ्यांनी जे पूर्वीपासून आहे ते पडताळून पाहणे योग्य.

हेमंत सरांच्या युक्तीवादाचा मी पंखा आहे. अनेक गोष्टी नव्याने समजतात.
मी पण आता हाच विचार करतोय की २ हे २ चा का ? ३ का नाही ? कुणी तरी सांगितले की हे २ आहेत आणि आपण विश्वास ठेवतो. ते दहा पण असू शकतात किंवा कोट्यवधी पण. सापेक्षतावादाचा सिद्धांत इथे लागू होतो. अर्थात आईनस्टाईनचं नशीब बलवत्तर की बेट्याच्या वेळी मायबोली नव्हती. नाहीतर असा हासडला असता कि एकही सिद्धांत न मांडता गाशा गुंडाळून रस्त्याच्या कडेला पोपटाचा पिंजरा घेऊन बसला असता.

शामा बरोबर. मी तर म्हणतोय कशावरून एक रुपया एक कोटी रुपयांपेक्षा छोटा आहे. रुपयापती करोडपतीपेक्षा मोठा माणूस असू शकतो.

काही घटना आपल्या बाजूला घडतात त्या अशा का घडल्या ह्याचे उत्तर नसते.
खरी घटना आहे .
काही वर्षांपूर्वी माझ्या buliding च्या टेरेस वरून खेळताना एक मुलगा. खाली पडला.
चार मळ्याची बिल्डिंग आहे.
पण त्याला फक्त खरचटने ह्या पलीकडे काहीच झाले नाही.
बिल्डिंग च्या बाजूला असलेल्या चाळी मधील घराच्या छतावर पडून तो आत मध्ये खाटेवर पडला.
पण हे असेच घडेल परत दुसऱ्या कोणी उडी मारली तर हे सांगता येईल का कोणत्या ही नियमाने .
नाही सांगता येणार.
आणि तो असा कोणत्या पद्धतीनी पडला की त्याला काहीच झाले नाही.
हे तरी कोणत्या नियमाने सांगता येईल का?
चवथा माळ्या वरून पडलेला व्यक्ती मारणार च .
हेच सत्य आपण मानतो ना.
पण काही घटना अशा घडतात त्याचे विश्लेषण करता येत नाही.
मग शक्यता व्यक्त केली जाते दहा वेळा उडी मारल्यावर एकाध्या वेळी तसाच प्रसंग घडण्याची शक्यता असते .(इथे पण शक्यता च खात्री नाही)
विज्ञान मध्ये पण असले प्रकार वापरले जातात.
ह्यालाच भविष्य वर्तवणे म्हणत असतील.

<< कोणी तरी सांगितलेली त्याची व्याख्या म्हणजेच विज्ञान >>

हेमंत सर,
Scientific method म्हणजे काय हे सोप्या शब्दात कळण्यासाठी हा व्हिडिओ कृपया एकदा बघा.

आता विज्ञानाचा विषय निघाला आहे तर मला शाळेतील किस्सा आठवला. आमच्या विज्ञानाच्या मॅडम नेहमी म्हणायच्या की हे विज्ञान जे आपल्याला माहीत आहे ते चुकीचं असू शकतं त्यामुळे हे असंच का तसंच का यावर जास्त विचार करून माथेफोड करू नका. पास होण्यापूरते मार्क मिळवले तरी पुरे. आपण या दुनियेत रेंटवर आलोय, छोटंसं आयुष्य आहे. जगण्याचा आनंद घ्या.

<< यावर जास्त विचार करून माथेफोड करू नका. पास होण्यापूरते मार्क मिळवले तरी पुरे >>
मला वाटतंय की त्यांनी विज्ञानापेक्षा तत्वज्ञान (philosophy) विषय चांगला शिकवला असता.

विज्ञानाच्या मॅडम नेहमी म्हणायच्या की हे विज्ञान जे आपल्याला माहीत आहे ते चुकीचं असू शकतं

ह्या बाबत दुमत असण्याचे काहीच कारण नाही.

वि म्हणजे विरूद्ध, विज्ञान म्हणजे ज्ञानाच्या विरूद्ध. त्यामुळेच विद्वान म्हणतात कि विज्ञान चुकीचं असतं.
एकदाचं गुरूत्वाकर्षण चुकीचं असतं हे सिद्ध झालं की मग मी उडायला मोकळा. फार त्रास होतो ट्रॅफीकमधे.

२५/११/२१ ही आज तारीख आहे .
ही तरी खरी आहे का?
कोणी तरी सांगितले १ जानेवारी १ पासून आपण काल गणना करू या म्हणून आज २५/११/२१ .
पण आज ची तारीख काही तरी वेगळीच असेल ती आपल्याला माहीत नाही.

पण आज ची तारीख काही तरी वेगळीच असेल ती आपल्याला माहीत नाही.

>>>

अशक्य कोटी ब्रह्मांड नायक आहात आपण. तोहफा कुबुल करो.

आपण ज्या रंगाला लाल रंग म्हणतो तो प्रत्यक्षात निळा आहे व ज्याला निळा म्हणतो तो लाल आहे. उत्क्रांतीच्या ओघात मानवी डोळ्यात म्युटेशन मुळे दोष उत्पन्न झाला आहे व तो दुर्दैवाने सर्वच माणसांच्या डोळ्यात असल्याने जगात सारेच ही चूक करतात.

आपण ज्याला माणूस समजतो तो माणूस नाहीच. त्यातले काही पाणघोडे असतात, तर काही गेंडे असतात. ते मायबोलीवर पण असतात. पाघो इनोसन्ट असतात आणि गेंडा ?

ब्रम्हांडनायक Rofl

तारखा वैगेरे आपण ठरवलेल्या कल्पना आहेत हेमंत राव. त्यात काही ऑब्जेक्टिव्ह सत्य नसते खरे किंवा खोटे असायला...

व्यवसायाचा कल ओळखण्यासाठी पर्सनॅलिटी टेस्टस असतात.

भविष्य वर्तवणे शक्य नसल्याने विज्ञानाधारीत मार्ग अस्तित्वात नाहीत.

तारखा वैगेरे आपण ठरवलेल्या कल्पना आहेत हेमंत राव. त्यात काही ऑब्जेक्टिव्ह सत्य नसते खरे किंवा खोटे असायला...

हा तर पॉइंट आहे.तारीख कोणती असावी हे आपण नाही ठरवले .

उद्या माणूस पृथ्वी वरून काही कारणाने नष्ट झाला .पृथ्वी सजीव विरहित झाली.
आणि aliens पृथ्वी वर आले .त्यांना तारीख अनेक ठिकाणी वापरलेली दिसेल.
त्यांच्या बापा ला तरी कळेल का २०२१. म्हणजे नक्की कोणते वर्ष.
आणि माणूस नक्की कधी नष्ट झाला.

असेच आपले विज्ञान पण गंडत असेल.
शक्यता आहे .

आता मराठी साल १९४३ सुरु आहे. म्हणजे अजूनही आपण पारतंत्र्यात आहोत. दुसरं महायुद्ध सुरु आहे. आपण कधी स्वतंत्र होणार? मी टाइम ट्रॅव्हल करून पुढे आलोय कि मागे गेलोय? माझी टाइम मशीन कुठे आहे? मला डायनोसॉर बघायला जायचे होते मग मायबोलीसॉर का दिसताहेत?

त्यांच्या बापा ला तरी कळेल का २०२१. म्हणजे नक्की कोणते वर्ष. >>> एलिअन्स म्हणजे अंतराळातील ज्योतिषी. ते फलज्योतिषशास्त्राचा उपयोग करतील आणि सगळे जाणून घेतील.
विज्ञान गंडलेलंच आहे. न्यूटन गणितात एक नंबर होता. पण फलज्योतिषात त्याची दांडी उडायची. आजवर एकाही वैज्ञानिकाला आज बायको कोणते भांडे फेकून मारणार आहे याचे गणित करणे शक्य झाले नाही. फलज्योतिषाचा अभ्यास असेल तर नेमके भांडे लपवता येते. यातून जो न्यूनगंड वैज्ञानिकांमधे आला त्यातून त्यांनी ज्योतिषशास्त्राला बदनाम केले.

Pages