मराठी बिग बॉस पर्व तिसरे- २

Submitted by सूलू_८२ on 20 November, 2021 - 17:33

फायनलला थोडेच आठवडे उरले आहेत. स्पर्धा चुरशीची चालू आहे.

सो, हा आहे दुसरा धागा.

चला, चर्चा करुया!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कालच्या भागात जेव्हा विकास हुकूमशहांच्या मंचावर असलेले चिन्ह नष्ट करत असताना घोषणा देत होता तेव्हा विशाल हम दो हमारे दो अस म्हणाला. विशाल खरंच अतिशय विचित्र आहे.

सोनालीच्या अदा मस्त होत्या. टेक्निकली मीनल पण छान डान्स करत असली तरी सोनालीच्या अदांमुळे तिच्याकडेच लक्ष जात होतं. तिला बिबॉ संपल्यावर सिनेमा- सिरियल्स मधे भरपूर कामं मिळू शकतील.
सोनाली - विकास ची कॉमेडी Happy दाखवायचे होते ना एपिसोड मधे. नुस्त्या लंगड्या उठाबशा दाखवायच्याऐवजी!
https://youtu.be/AkaIwN0Y2Ns
मला जय-उत्क्याचा नागिन डान्स पण जाम धमाल वाटला. जय ने पोटावरची नागिण आणि जमिनीवरचा नागिन डान्स मुळे मजा आणली Happy मीरा-गायत्रीने काय केले ते लक्षात पण राहिले नाही. मला तृप्ती ची हुकुम्शाहा गिरी एंटरटेनिंग वाटली सर्वात. आदिश आणि स्नेहा ने आपापले स्कोर जास्त सेटल करून घेतले. आदिश स्मार्ट पण स्नेहा महा मठ्ठ वाटली. काय ठरवून आली होती काय माहित पण आता उलट अजून हसं करून घेतले तिने.

तृप्ती, स्नेहा सोमि वाचून आल्या होत्या वाटतं. सतत विशालची भलावण करत होत्या. उगाच काही बोललो तर विशाल फॅन्स शिव्या घालायचे म्हणून घाबरल्या असाव्यात. Proud
विशाल ने सोनाली ला सॉरी कधी म्हटले?
रात्री सोनाली बोलायला आली तेव्हा का स्पष्ट बोलला नाही काय त्रास झाला ते? तिच्या कडे बोलत नाही मग चावडीवर सगळ्यांसमोर उगाच का बोलला?
एक्स्ट्रा शॉट्स मध्ये मिनल सोनालीची समजूत घालताना म्हणत होती की आम्ही बोलत नाही , नाही तर आम्ही पण बरंच काही सांगू शकतो विशाल बद्दल. सोनालीला स्नेहा विशालला जे म्हणाली (स्फोट झाला वगैरे) त्यावर अपसेट झाली होती.

परफेक्ट च्रप्स, हाहाहा.

काल छान झालेला दिसतोय एपिसोड पण सारंगेबाईला बघावं लागेल म्हणून बघू की नको विचार करतेय. नाहीतर तिला स्कीप करायचं.

छान एपिसोड, बघाच. अवार्ड्स, सीक्रेट टास्क, डान्ससाठी बघा. सारंगे बाई लो प्रोफाइल होती पूर्ण ऐपिसोड.

काय भनकला यार विशाल! नुसता आपटत होता जयला! अंगावर काटा आला अगदी, बघतांना! मजा आली!
जिंकलंस भावा आज Lol जयचा उरलासुरला माज ही उतरवला!
विकासने तर अक्षरशः विशालला मिठीच मारली!
का कुणास ठाऊक, पण मला आजचा टास्क स्क्रिप्टड वाटला! सगळे धरूनच चालले होते की मीनललाच केप्टन करायचं!

पुढचा सिझन लगेच एप्रिलमधे सुरु करणार आहेत अस म्हणतायत त्यामुळे डिमान्ड असुनही हा वाढवला नाही, पुढच्या सिझनला आदिशची वर्णी लागु शकते, या तिघाना बाहेरच काय सान्गायच नाही हे सान्गुन पाठवलेल असणार नाहितर त्यादिवशी त्रुप्ती ताइनी फक्त निगेटिव्ह दिसतायत एवढच नसत सान्गितल.
सोनालीचा चेहरा खुप एक्सप्रेसिव्ह आहे तिला छान छान काम मिळु शकते, गादा मेकप अर्धनारिनटेश्वर टाइप करुन आली होती पण त्यामानाने काहिच खास केले नाही, एक-दोन कार्टव्हिल सोडून.

हो, पुढचा सिझन एप्रिल मधे आहे असे अ‍ॅक्ट रायडर्स कडून ऐकले, मज्जा येइल , हा सिझन सर्वात भारी झाला, काँटेस्टन्ट्स आणि होस्ट्ला फुल्ल क्रेडिट!
होप, मांजरेकरांची उरलेली रिकव्हरी फास्ट होऊन अजुन जास्त फ्रेश होऊन येतील..

मीनल कॅप्टन झाली असेल तर फिनालेला पोचणारी ती पहीली सदस्य ठरणार.

सोनालीचा चेहरा खुप एक्सप्रेसिव्ह आहे तिला छान छान काम मिळु शकते >>> हो ती सहज करते अभिनय, पहीली सिरीयल दोन तीन भाग बघितले होते. त्यात बरेच फेमस कलाकार होते पण सिरीयल चालली नाही जास्त, वेळही रात्री उशीराची होती.

मीनल डिझर्विंग आहेच फायनलिस्ट व्हायला. छान झालं.
उत्क्या, जय आता अगदी भोले भाले बिचारे चेहरे घेऊन फिरतायत २-३ दिवस पण अगदी काहीच दिवसांपूर्वीपर्यन्त कसला माज असायचा त्यांच्या बोलण्या वागण्यात! सतत याला काढू त्याला उडवू अशी भाषा!
मीरा गायत्री स्वतःच्या जिवावर काहीही करू शकत नसल्या तरी त्या सुद्धा किती अ‍ॅटीट्यूड दाखवायच्या सतत. जय ची प्रायॉरिटी स्नेहा व्हायला लागली तर इनसिक्युअर झाल्या होत्या लगेच. कारण जिंकणार्‍या टीम मधे असण्याची एन्टायटलमेन्ट .
गायत्री तरी आता ताळ्यावर आली आहे पण मीराबाई मात्र आहे तशीच आहे. आता तिला हेही सांगता येणार नाही की आपण कशाबद्दल माज करत आहोत! पण तिचा तोच अ‍ॅटिट्यूड कायम आहे.

गा दा अजुनही अॅटीट्यूड दाखवते. तिची बोलण्याची पद्धत तशीच आहे. सोना मोनाला फार आवडत नाही ती.

मीरा गायत्री दोघी उद्या एकत्र गेल्या तरी चालतील. एकीला ठेवणार असतील तर मला मीराला घरात बघायला आवडेल पण तिला सर्वांत कमी votes आहेत.

जाउ दे दोघींना !
मीरा इज गुड फॉर नथिंग, ना फिजिकल टास्क्स, ना डोकं , ना व्यवस्थित बोलता येत, अति भयंकर मराठी !
गायत्री तिच्यापेक्षा बरी , टास्क्स मधे प्रयत्नं तरी करते, शिवाय योग्य वेळी स्मार्ट मुव्ह घेतला!

त्क्या, जय आता अगदी भोले भाले बिचारे चेहरे घेऊन फिरतायत २-३ दिवस पण अगदी काहीच दिवसांपूर्वीपर्यन्त कसला माज असायचा त्यांच्या बोलण्या वागण्यात! सतत याला काढू त्याला उडवू अशी भाषा!>> हो हो ! उत्क्या म्हटला मीनल कॅप्टन झाली तर मला छान वाटल म्हणे अय्यो! खर की काय?? ब्राउनी पोईन्ट का चक्कर, पण आता गेम सन्पायला २ विक राहिल्यावर लक्षात येवुन काय उपयोग?? आता कुणी त्याना ब्राउनी काय शिळी पोळि पोईन्ट पण देणार नाही.

फायनली टिम बीमधला कुणीतरी कॅप्टन झाला. आजचा टास्क छान झाला. कुठच्याही राडयाशिवाय झाला. गुड! मीनल जिन्कल्यानन्तर दोन्ही टिम्स ने मिळून केलेला जल्लोष आवडला.

विकासने विशाल- सोनालीमध्ये पॅचअप घडवून आणल.

टास्कनन्तर स्नेहाने जयला हाताला लागल का हे हात लावून विचारल, जयने तो हात जोरात झटकला.

आज गायत्रीचा हात पुन्हा स्लिन्गमध्ये गेला. तिच्या नाकालाही लागल.

सोनालीला रात्री ४ वाजता काय झाल? एकटीच स्विमिन्गपूलच्या कोपर्यात बसली होती. जरा लो वाटत होती.

उद्या ममा जय- स्नेहासाठी 'तडप तडप के' गाण म्हणतील.

आज गायत्रीचा हात पुन्हा स्लिन्गमध्ये गेला. तिच्या नाकालाही लागल. >>> अरेरे वाईट झालं. आता पाठवा घरी. बाकी तिने उड्या मस्त मारल्या, तिच्या आणि मीराच्या डान्समध्ये.

सोनाली, उतक्या, जय, मीरा छान नाचले असं मला वाटतं. विशाल आणि विकास डान्स एवढा खास नाही वाटला. मीनलचे प्रयत्न छान होते पण सोना मुळे तिच्याकडे लक्ष नव्हतं जात. सोनाली एक नंबर, लय भारी.

स्नेहाचा राणी gown छान होता पण ती दिसली मात्र भयानक. तृप्ती ताई छान दिसत होत्या. आदिश पण छा गया.

सोनाली, मीरा, उतक्या आणि विकासने कामगिरी चोख बजावली. मजा आली त्यांचं हुकूमशाही उलटवणे कार्य बघताना.

अवार्डसवरून सिद्ध झालं की विशालच जिंकणार, त्याला पॉझिटिव दिलं सर्वात. बिग बॉसनाही तोच जिंकायला हवाय.

काय तो टास्क! लयच भारी, शेवटचा कॅप्टनसी टास्क फार फार भारी, विशाल काय जबरदस्त ताकदवान आहे, जयला अक्षरक्ष: एका बाहुल्या सारखा बरोबर घेवुन गेला आणी एका हाताने गोळाही फोडला... जय पुर्ण हताश झाला होता. ज्या ताकदिचा माज त्याने सिझनभर केला "कसा आडवा घातला हे तो सिझनभर फक्त बोलत राहिला त्याला विशालने जी टाचणी लावली बाबो ! त्यानतर विकासने जाउन विशालला जी मिठि मारलिये एकदम कडक!
आदिश खरच फार डोकेबाज प्राणी आहे त्याने पुर्ण टास्क असा हुशारिने बोलुन पटवुन केला की बी टिम त्याने बरोबर विनर ठरली,आज सगळे मस्त मिळुन मिसळुन टास्क खेळले अनेक अर्थाने आजचा टास्क भारी झाला, सगळे एकमेकाना खुप एनकरेज करत होते.
सगळी टिम बी प्रचन्ड इमोशनल झाली होती.

येस मजा आली आज! जय- वि. विशाल बघताना तर फार मजा आली. बी टीम चे एकदाचे पॅच अप पण झाले बर्‍यापैकी. सोनालीला आधी चान्स न मिळाल्याने नंतर विशाल ने समर्थक म्हणुन सोनालीची निवड केली हे फार आवडलं. टीम बीचं सेलिब्रेशन आवडलंच, साहजिक होतं ते! पण जय उत्क्या लगेच ग्रुप हग वगैरे करून एकमेकाचं सांत्वन कशाला करत होते? त्यांच्यावर काही अन्याय वगैरे करून नव्हती जिंकली मीनल, उगीच ते तीन की यारी वगैरे जरा बळेच वाटले ते.
हे ३ पाहुणे आता उद्या जाणार नाहीयेत का घरी? कामाच्या वाटाण्यांमधे त्यांनाही कामे दिलेली बघून काही समजले नाही मला.

फायनल राउंडला जयने मीनलच्या बाजूने खेळताना आधीच्या राउंडमधल्या विशालकडून झालेल्या पराभवाची परतफेड केली.

बिग बॉसने जोड्या बरोबर मित्रामित्रांच्या ठेवून सेमिफायनलमध्ये दोन्ही टीमचे दोघे दोघे येतील याची सोय केली.

उत्कर्षला पॉझिटिव्हिटीचं भरतं आलं. त्याला इतकं ओपनली बोलताना पहिल्यांदाच पाहिलं. नेहमी कुणाचे तरी कान खात असतो.

विकास पॅच अप करवत असताना विशाल आणि सोनाली त्याच्यासमोर एकाचवेळी बसून एकमेकां बद्दल तृतीयपुरुषी बोलत होते ते मजेशीर होतं.

आदिश छा गया. त्याने स्नेहाला आल्यापासून व्यवस्थित कोपर्‍यात उभं ठेवलं . हुकुमशहा म्हणूनही तिचं स्टेटस इक्वल असताना तिचं काही चालू दिलं नाही.

तृप्ती आणखी काही आठवडे राहायला हवी होती. मीरा सोनाली गायत्री आणि इव्हन उत्कर्षपेक्षा जास्त डिझर्विंग आहे.

ए टिम आज पुर्ण ढेपाळलेली दिसली. पुर्वीचा तो माज, ती खुन्नस, ... कुठेच दिसली नाही. उलट मीनल कॅप्टन झालेली आवडल अस म्हणत होते ना मीरा, उत्कर्ष..! जयही म्हणाला, मिनलच्या बाजुने खेळणारच. सुरवातीला, हाच जय मीनल त्याच्याजवळ जायची तेव्हा तिला उडवुन लावायचा. शनिवार जवळ आला म्हणुन फेअर दाखवण्याच्या नादात असेल. Biggrin किंवा मीनलला बाहेर किती सपोर्ट आहे अन तिला विरोध केला तर आपली उरली शेवटच्या पाचात यायची शक्यता ही जाईल हे कळुन चुकले असेल, सर्वाना. Biggrin
पहिल्यांदा कॅप्टन्सीचा टास्क असा आनंदात अन दोन्ही टिमला अ‍ॅक्सेप्टेबल असा झाला.

आदिश सर्वात हुशार पोरगं निघालं. तो रहायला हवा होता यार. त्याने स्नेहा, तृप्तीताईलाही गुंडाळुन ठेवले, टॅक्टफुली.

काय भारी झाला टास्क.. विशाल एकदम बाहुबली टाइप जय ला निवांत फरफटत नेत होता.. मजा आली बघायला.आणि नंतर अत्यानंदाने विकास ने मारलेली मिठी... बेस्ट बेस्ट बेस्ट... मीनल कॅप्टन झाली त्याचा मनापासून आनंद झाला..
जय, उतक्या आणि मीरा एकदमच बिचारे वाटायला लागलेत.
गायत्री ना घर का न घाट का झाली आहे.. टीम बी तिला स्वतः चं मानत नाहीत आणि टीम ए कडे ती स्वतः हुन जात नाहीये.
विशाल, सोना चं एकदाच कसंबसं ठिगळ लावून जुळवलं बाबा विकासने....
पाहुणे कधी जाणारेत कोण जाणे..
मीनल ला शेवटची कॅप्टन म्हणाले पण पहिली फायनलिस्ट असं नाही म्हणाले बिबॉ.. इंस्टा वर सगळीकडे पहिली फायनलिस्ट असं येत होतं.
गादा ला परत लागलं असेल तर आता तिला काढतील या वीक मध्ये

यावेळेस टफ आहे कॉम्पीटिशन
तीन तीन strong प्लेयर मिनल्,विशाल्,जय
जय-विशालला आणतिल फायनलला आणी विशालला विनर करतिल.

आहाहा काय भारी झाला आजचा एपिसोड , विशाल छा गया.. कसा आडवा केला स्कोअर सेट्ल्ड !
आदिश पण झकास संचालक म्हणून.. डोकं चालवलं तेही फेअर राहून.. पुढच्या सिझनला नक्की त्याला पहिल्या पासून चान्स देतील !
मीनल-सोना राउंड मधे सोनालीला डिसक्वालिफाय केले बरोबर होते पण ती सुद्धा मीनलला खूप भारी फाइट देत होती .
खरं तर सोनाली कॅप्टन झाली असती तर जास्तं मजा आली असती Happy
पण मीनल डिझर्व्ड, टिम बी च सेलिब्रेशन खूप इमोशनल.. आता मला टिम बी चे चौघेही हवेत फिनालेला.. गादा-मीरा दोघींना काढल्यावर साही जणांना ठेवतील फिनालेला बहुदा.
१.विशाल २.मीनल ३.विकास ४.जय ५.सोनाली असे झाले तर खूप आवडेल पण बहुदा जयला टाकतील पुढे !

ते तीन की यारी वगैरे जरा बळेच वाटले ते.
<<<
‘तीन कि यारी सबपे भारी‘ हा स्प्लिट्सविला मधे जय गृपचा नारा होता , परवा जयच्या बाबांनी त्याला आठवण करून दिली जयला.
तिथे जय-शिवम- निखिल मायनॉरीटी मधे होते, ३ विरुद्ध १० चा गृप होता, समोरचे सगळे गळले आणि हे तिघे राहिले फिनाले मधे.

Pages