पूर्णविराम! - भाग १

Submitted by अक्षय समेळ on 1 November, 2021 - 03:32

"आरू! तुझे काम थांबव आता आणि चल, नाहीतर आपल्याला वेळेत पोहचता येणार नाही." संयुक्ता आरवची बालमैत्रिण आणि पत्नी आधिकार वाणीने आरावला म्हणाली.

"हो, अगं एवढे संपले की निघू आपण. थांब जरा!" आरव आगतिकिने संयुक्ताला म्हणाला.

"ठीक आहे! तू कर तुझे काम; मी निघते." संयुक्ता थोड्या लटक्या रागाने उत्तरली.

"बरं! चल निघू आपण!" आरव खुर्चीतून उठून आपले जॅकेट, लॅपटॉप सोबत घेत नाराजीच्या सुरात म्हणाला.

आरव आणि संयुक्ता दोघे ऑफिसच्या बाहेर उभ्या असलेल्या काळया मर्सिडिज गाडीमध्ये बसले आणि संयुक्ताने ड्रायवरला गाडी मंत्रा रिसॉर्टकडे घेण्यासाठी सांगितले.

"आरु, आपण पोहचलो आहोत; आता तरी आपल्या लॅपटॉप थोडी विश्रांती दे!" संयुक्ताने आरवला वैतागून म्हटले.

आरवचे तिच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष नसलेले पाहून मग शेवटी संयुक्ताने लॅपटॉप बंद केला. आरवने आपली मान वर करत डोळ्यांवरचा चष्मा काढत रागीट नजरेने संयुक्ता कडे पाहिले.

"अरे, बापरे! साहेबांना राग आला वाटतं; पर जहाँपनाह आपकी मंजिल पर हम पहुंच चुके हैं और आपका हमारी बातों पे ध्यान नहीं था इसलिये इस कनिज ने जो सही समझा वही किया, इस गरीब कनिज को माफ कर दो, जहाँपनाह!" संयुक्ताने मस्करीच्या सुरात लडिवाळपणे असे म्हणताच आरवचा राग कुठच्या कुठे पळाला आणि त्याला हसू अनावर झाले. ते पाहून संयुक्ता ही हसू लागली.

"बरं! आरु, आजच्या कार्यक्रमासाठी लागणाऱ्या भाषणाची तयारी तू व्यवस्थित केली आहेस ना? कामाच्या गडबडीत तयारी करायला विसरला तर नाहीस ना?" संयुक्ताने गंभीर स्वरात चिंता व्यक्त केली.

"संयु, अगं किती काळजी करतेस. तू मला आज का ओळखते आहेस? काळजी करू नकोस, माझी सर्व तयारी एकदम व्यवस्थित झाली आहे. तू बघशील,नेहमी सारखेच तुझ्या नवऱ्याच्या भाषणाचे सर्वत्र कौतुक होईल!" आरव संयुक्ताला समजावत म्हणाला.

"ठीक आहे, चल मग उतर आता!" संयुक्ता स्मितहास्य करत म्हणाली.

दोघे मंत्रा रिसॉर्टच्या भव्य प्रवेश द्वारापाशी उतरतात. ड्रायव्हर गाडी पार्क करण्यासाठी निघून जातो.

क्रमशः

- अक्षय समेळ

Group content visibility: 
Public - accessible to all site users

@सहृद, नाही, कथा शंभर शब्दांपेक्षा मोठी आहे त्यामुळे शशक नक्कीच नाही. हो, मित्राच्या मोबाईलमध्ये कथा लिहली असल्याकारणाने मायबोलीवर लवकर अपलोड करून ठेवली एवढेच. त्यामुळे, हा भाग छोटा आहे पण यापुढील येणारे भाग बऱ्यापैकी मोठे असतील. प्रतिसाद दिल्याबद्दल आपले मान:पूर्वक आभार!