खादाडी: प्रभादेवी

Submitted by webmaster on 26 May, 2009 - 21:25

प्रभादेवी आणि आसपासच्या परिसरातल्या खादाडीबद्दल हितगुज

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मामे, बाफच्या नावात 'प्रभादेवी' असलं तरी ग्रूपाचं नाव 'मुंबईतली खादाडी' आहे, त्यामुळे बिन्धास!!! Proud

'रान' दोघांना पुरेल इतके असते.. Happy अर्थात ते ड्राय असल्याने स्टार्टर म्हणून घेतलेले चांगले.

ओ रायगड, तुम्हाला इंडियातल्या सीपीके बद्दल का बरं चौकश्या? इथे यायचा विचार दिसतोय. आमच्या अंगणातच आहे म्हटल्यावर तुम्ही खुश व्हालच.

>>>> CPK म्हणजे कॉपर चिमणी म्हणायचे आहे का? २ ठिकाणी आहे नक्की. एक फिनिक्स मिल, लोअर परेल, सेनापती बापट रोड वर. आणि अजून एक नेमके कुठे हे ते सांगता नाही येणार. पण सेंच्युरी बझार वरून वरळीला जाताना मध्येच कुठेतरी आहे...
>>>> दुसरं कॉपर चिमणी पूनम चेंबर्स समोर वरळीला आहे. अजून एक मला वाटतं काळाघोड्यालापण आहे. सीपीके एक फिनिक्स मिलमध्ये आणि दुसरं बीकेसीत आहे.

'रान' दोघांना पुरेल इतके असते>> धन्यवाद. Happy मला कोणीतरी ते सहा जणांना पुरते असे सांगीतले होते. म्हणून कधी घेतले नाही.

माहिम ला फ्रेश कॅच म्हवुन गोवन फूड रेस्स्त. आहे .. बिबिंका मिळतो तेथे एक्दम खास .. फिश साठी खुप छान आहे ..ट्राय करा नक्कि

नेहरु प्लॅनेटोरियम च्या बाजूला नॅबची जी बिल्डींग होती तिथे कॉपर चिमनी होती. मग काही वाद झाला त्यावेळी त्यांनी बापनु घरच्या बाजूच्या बिल्डींगमधे बस्तान हलवले. या साधारण १९८५-९० सालातल्या घटना आहेत. दोन्ही ठिकाणी मी जेवलो आहे.

भारतवारीत प्रकाश आणि पणशीकर यांच्याकडे एकदातरी भेट दिली जातेच.
डाळींबी ऊसळ, मटार पॅटीस पण छान असतात.

हो हो. धन्स स्वप्ना. जाऊन आलीस का खाद्य महोत्सवाला?

मला आता खालील ठिकाणांचा कंटाळा आला आहे.
१. कोमलाज (तरी अधून मधून जातोच.)
२. सीपीके (फारच लिमिटेड मेन्यु आहे)
३. रूबी च्युजडे (हे आयनॉक्स मध्ये आहे. स्टँडर्ड खूपच खाली गेलं आहे. यावेळी गेलो तर सगळ्या पदार्थात मीठ जरा जास्तच वाटलं.)

जाऊ दे, काही दिवस घरचचं जेवण जेवीन. Proud Wink

अगं ए मामी, रुबी ट्युसडेला कंटाळा यावा इतक्या वेळा येतेस का?
माझ्या ऑफिसच्या तिरक्या समोर असलेल्या इमारतीत आहे ते.

आता पुन्हा आलीस की एक फोन कर, मग आपण रेलिशला जाऊ Wink

कालच आस्वाद ला गेलेलो. पिठल भकरी आणि थालिपीठ घेतल. पिठल भकरी बरोबर वांग दिलेल ते फारच गोड लागत होत. बाकी सगळ फारच छान.

>>हो हो. धन्स स्वप्ना. जाऊन आलीस का खाद्य महोत्सवाला?

मामी, महोत्सव आजपासून सुरु होतोय. मी बहुतेक शुक्रवारी जाईन. Happy रच्याकने, तुम्ही दिलेल्या दुव्यावर बातमी टाकली आहे. त्याची लिंक दिल्याबद्दल धन्स. मला तो माहित नव्हता. Happy

शनिवारी फार दिवसानी क्रॉफर्ड मार्केट हाज बिल्डींग बाजुच्या ग्रँट हाऊस ( पोलिस कँटिन) ला गेलो, मासे नेहमी प्रमाणेच मस्त. खिमा खायला परत त्या भागात जायला कारण शोधायला हवे.

अरे, इथे येत नाही का आजकाल कोणी? असो. शिवाजीपार्कला ३०१ F चं आऊटलेट आलंय तिथे पेरू-चिली cremelette नक्की ट्राय करा.

Pages