खादाडी: प्रभादेवी

Submitted by webmaster on 26 May, 2009 - 21:25

प्रभादेवी आणि आसपासच्या परिसरातल्या खादाडीबद्दल हितगुज

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वरळी ला आणि येक - वरळी च्या म्युन्सिपल मार्केट मधे मातृछाया कि असच काहीसं नाव आहे. जागा फार चांगली नाहिये पण चव मस्त

सगळेजण आस्वाद, सुजाता, प्रकाश विसररलात वाटत.

मी आजीबात विसरले नाही...आस्वाद, सुजाता

माझ्या खुप आठवणी आहेत दोन्ही हॉटेल च्या..

Happy

हाय स्ट्रीट फिनिक्समध्ये "कोमलाज" म्हणून साऊथ इंडियन रेस्टॉरन्टमध्ये गेलो होतो. T2 आणि T3 अश्या २ थाळी मागवल्या. पैकी T2 (किंमत १२०) मध्ये कर्ड राईस, बिसी बेळे भात, फरसबी + गवारीची तूरडाळ घालून केलेली भाजी, दह्याचं काकडी वगैरे घालून केलेलं रायतं, लोणचं, तळलेला पापड आणि शेवयाचं पायसम असे पदार्थ होते. भाजीची चव चांगली होती पण फार सुकी वाटली. कर्ड राईस चांगला होता (बनवायचं म्हटलं तरी हा वाईट कसा बनवणार?), बिसी बेळे भात काही खास वाटला नाही पण मला तो एनीवे आवडत नाहीच.

T3 (किंमत १५०) मध्ये फरसबीची तीच भाजी, फ्लॉवरची भाजी, भाताचा डोंगर (!), २ चपात्या (त्रिकोणी आकारात), लोणचं, तळलेला पापड, तळलेली लाल मिरची, ताक, प्लेन दही, रसम, सांबार, चिंचेचं सार, अप्पमबरोबर असतो तसा व्हेज स्ट्यू आणि गोड शिरा असे पदार्थ होते. फ्लॉवरची भाजी फारच सुकी होती. चपात्या चांगल्या केल्या होत्या पण बहुधा तुपात बुडवून काढल्या असाव्यात अशी शंका चवीवरून येत होती. खाताना हा विचार मी दाबून टाकला Proud सांबार, चिंचेचं सार,व्हेज स्ट्यू झक्कास होते. रसम हा प्रकार मला कधीच आवडत नाही. शिर्‍यात अननसाची चव लागत होती पण छान होता. क्कान्टिटी थोडी जास्त असती तरी चाललं असतं Happy

एकंदरीत एक्दा ट्राय करण्याजोगं. सर्व्हिसही प्रॉम्प्ट.

स्वप्ना, त्या कँपसमध्ये आधी ते सीझलर्स (कोबे?) होतं ते दिसत नाही हल्ली!
T3..भाताचा डोंगर ट्राय केला पाहिजे. Happy
मागच्या बाजूला, उकडलेले मक्याचे दाणे मसाला घालून मस्त मिळतात.

>>स्वप्ना, त्या कँपसमध्ये आधी ते सीझलर्स (कोबे?) होतं ते दिसत नाही हल्ली!

हो, नॅचरल आणि त्या कबाबच्या दुकानावरून परतीच्या मार्गाला लागलं की डावीकडे होतं तेच ना? नाही दिसत. बंद पडलं असावं बहुतेक. Sad ते डोसा हट का डायनर काय होतं ते पण बंद होतं मागल्यावेळी.

>>T3..भाताचा डोंगर ट्राय केला पाहिजे.
खरं सांगू का? मला साऊथ इंडियन फूड फारसं आवडत नाही. पण हाय स्ट्रीटमध्ये तेच तेच (मॅकडी, सबवे, टीजीआय, कैलाश पर्बत, त्याच्या जवळचं ते थाय फूडचं दुकान) खाऊन वैतागलो होतो. कॉपर चिमनी आणि ते इटालियन हॉटेल कुठलं आहे तिथे जायचं तर सगळ्यांच्यात एकवाक्यता नसते. नूडल बारमध्ये पैसे वसूल करायला अधिक खाल्लं जातं म्हणून ते आऊट. Proud तीच गत राजधानीची. पंजाब ग्रिलमध्ये जायचा मूड नव्हता. आणि त्याच्या बाजूचं ओरियन्टल फूडवालं रेस्तॉरन्ट (नावं म्हणून आठवत नाहीत!) आधीच ट्राय करून झालंय ते आवडलं नव्हतं. असं गाळत गाळत शेवटी 'घरका खाना' वाटेल अशी जागा हवी होती म्हणून इथे गेलो. आता आम्हाला भूक लागली होती म्हणून का काय माहित नाही पण जेवण आवडया Happy

नॅचरलमध्ये 'काला जामून' फ्लेवर ट्राय केला. खास आवडला नाही. नेक्स्ट टाईम 'थंडाई' ट्राय करणार आहे. Happy

>>मागच्या बाजूला, उकडलेले मक्याचे दाणे मसाला घालून मस्त मिळतात
अनुमोदन. बिग बझारच्या बाहेर पाणीपुरी, सॅन्डविचेस वगैरे विकतात तिथली पावभाजीही छान असते. उभं राहून खायला लागतं इतकंच.

स्वप्ना कोमलाज आमचं फेवरीट गं. घरीही मागवतोच. पण तिथे जाऊनही थाळी खातो. पण एवढं असतं की शेअर करावं लागतं. वर जे आवडेल ते सेपरेटली मागवायचं. भाताचा डोंगर नको असेल तर ३ चपात्या एक्स्ट्रॉ देतात.

पंजाब ग्रीलशेजारचं ते सेवन एशिया की एशिया सेवन किंवा अशाचपैकी काहीतरी. ते नाव माझ्याही जामच लक्षात रहात नाही. मी तिथे सुशी खाल्ली होती. मलातरी आवडली. पंजाब ग्रीलतर झक्कासच. तिथे जायला रीझर्व्हेशन हवे.

TGIF मध्ये कोणी फुकट नेलं तरी जाऊ नका. महाबेक्कार! त्याच्यासारखंच असलेलं Ruby Tuesday मात्र अतिशय आवडीचं. मी नरीमन पॉईंटच्या रुचुला गेलेय. (मालाडच्या इनऑरबीट मॉलमध्ये, मुलुंडच्या निर्मल लाईफस्टाईलमध्ये सुध्दा आहे.)

इंडिगो डेलीला मी अजून भेट दिली नाहीये. मात्र मैत्रिणींचे रीव्हूज एकदम छान आहेत. कोणी गेलंय का?

मामी, बरोबर ते 'एशिया सेव्हन' च आहे. तिथेच आता शेजारी एक ग्रोसरी स्टोअर आलंय. मोठ्या उत्सुकतेने गेले खरी पण जास्त करून सगळा देसी मालच आहे तिथे Sad कॉपर चिमनीच्या वरचं ते इटालियन हॉटेल म्हणजे 'स्पॅघेटी किचन'.

इंडीया & बियाँड चे लोकेशन च्या डिस्क्रिप्शन वरुन "मेला" रेस्टॉरंट चेच लोकेशन वाटतेय. मेला बंद करुन नविन रेस्टॉरंट चालु केलेले दिसतेय. मेला खुप छान होते.

माटुंगा पश्चिमेला असलेले `दिवा महाराष्ट्राचा` सुध्दा छान आहे टिपीकल महाराष्टियन पघ्दतीचे रुचकर व चविष्ट जेवण मिळते व quantity पण व्यव॑स्थित असते. महत्वाचे म्हणजे सर्विस छानच

लोअर परळला पेनिन्सुलासमोर मॉडर्न फॅमिली रेस्टॉरंट आहे. विविध बिरयाण्या / सीफूड साठी भारी आहे असे अनेक मित्रांनी सांगितले. मी व्हेज बिर्याणी खाल्ली. खानदानी वाटली एकदम! वीक डेजमध्ये लंच अवरला फार गर्दी असते. रेस्टॉरंट रविवारी चालू असते.

'इंडिया अ‍ॅन्ड बियॉन्ड' आवडलं. पब लॉन्ज तर झकासच. अ‍ॅन्ग्लोइन्डियन एसेन्स चांगला आलाय. काल धो धो पावसात तिथलं मोरोक्कन पनीर (अप्रतिम), व्हेज कबाब प्लॅटर, स्ट्फ्ड मश्रूम्स आणि काही अगम्य कॉकटेल्स. इंडियन आणि कॉन्टिनेन्टल असे दोन्ही भाग छान आहेत. मोठा ग्रूप असेल तर मजा करायला मस्त अ‍ॅम्बियन्स. किंमती थोड्या जास्त साईडला पण एकंदर वातवरण, सर्व्हिस बघता वर्थ वाटल्या.

"मुंबईतली खादाडी" हा धागा बंद झालाय का? तिथे पोस्टायचं होतं ते इथे पोस्टते आता. कैलाश परबतमध्ये 'सिंधी मेन्यू' पाहून मोठ्या उत्साहाने 'कोकी' मागवली. मेन्यूमध्ये ही एक प्रकारची spiced roti आहे असं म्हटलं होतं. मला वाटतं ही खरं तर गव्हाच्या पीठाची बनवतात. पण रोटी आली तेव्हा त्याची चव साधारण आपल्या जोंधळ्याच्या पीठाच्या थालीपीठासारखी लागत होती. अर्थात वाईट नव्हती पण चव ओळखीची वाटल्याने थोडा भ्रमनिरास झाला एव्हढंच. त्याच्यासोबत एक तळलेला पापड होता आणि दही होतं ते मात्र झक्कास घट्ट होतं. बाजूसे लोणचं होतंच. Happy

पूर्वी वरळीच्या मेला रेष्टारंटासमोर बाबूची "चायनिस" गाडी लागायची संध्याकाळी. बाबू हा चिनी तोंडवळ्याचा नेपाळी! Happy त्याच्या हातचे चायनीज कैच्याकै अफाट चवीचे असायचे. नवीन ब्रिज बांधल्यावर तिथेच कुठेतरी त्याने हाटेल काढले. आता जाऊन बघायला हवे अजून आहे की नाही ते!

परवाच थमनक थाईला गेले होते. अ प्र ति म!

आम्ही क्रिस्पी व्हेजिटेबल्स, व्हेज स्प्रिंग रोल्स, स्टीम्ड राईस, ग्रीन प्रॉन्स करी आणि रेड चिकन करी मागवली होती. खुपच चविष्ट. स्टाफही फ्रेंडली, हसतमुख आणि प्रॉम्ट! क्विक सर्व्हिस. काहिसं महागडं पण दिल खुष!

परवाच थमनक थाईला गेले होते. अ प्र ति म!>>> अगदी अगदी... एकदम झकास आहे ते हॉटेल. जेवण झाल्यावर शेजारी नॅचरल्समधे आईसक्रिम खायचे Happy

हाय स्ट्रीट फिनिक्समधल्या 'पंजाब ग्रील' मध्ये खाल्लं. मुर्ग मलाई टिक्का सुरेख होता पण कढाई मुर्ग अजिबात आवडलं नाही. एखाद्या व्हेजिटेरियन, उदा. पनीरच्या, डिशसाठी केलेल्या ग्रेव्हीमध्ये चिकन घालून आणल्यासारखं वाटत होतं. जेवणाच्या शेवटी एका छोट्या ग्लासातून एक हिरव्या रंगाचं ड्रिंक आलं, साधारण लस्सीइतपत दाट. फारसं appetizing दिसत नव्हतं. आम्ही प्रश्नार्थक चेहेर्याने त्या ग्लासकडे पाहायला लागल्यावर शेजारच्या टेबलावरचा माणूस समोरचा चिकन टिक्का विसरून आम्ही ते ड्रिंक घेतल्यावर जगतो का मरतो तो पहायला सरसावून बसला Happy मजा अशी की त्या द्रवपदार्थाची चव खायच्या पानासारखी होती. म्हण्जे खायचं पान मिक्सरमधुन काढलं तर कसं लागेल तसं लागत होतं. पण मस्त वाटलं एकूणात. काहीतरी पाचकाचा प्रकार असावा. अजून एकदा जाऊन कबाब प्लॅटर ट्राय करेन म्हणते. कोणी केलं असेल तर सांगा.

अंधेरीच्या इन्फिनिटी मॉलमध्ये बर्‍याच दिवसांनी गेलो. तिथे वरच्या फूडकोर्टमध्ये Buckets and Tuckets नावाचं नवं आऊटलेट दिसलं. Bucket मधला तिखा चिकन नावाचा एक मील ऑप्शन ट्राय केला. ह्यात:

१. तिखा चिकन - तंदुरी ग्रेव्हीमधले चिकनचे तुकडे बिर्याणी स्टाईल भातावर घालून बकेटमधून सर्व्ह केले होते. हे सॉलिड मस्त होतं.
२. फ्रेंच फ्राईज किंवा स्वीट - स्वीट्मध्ये अंगूरीचा ऑप्शन घेतला. ठीकठाक होतं. रबडीच्या स्वादाचं पण पातळ दूघ आणि त्यात छोटे रसगुल्ल्यासारखे तुकडे. स्वीट्मध्ये गुलाबजाम किंवा chocolate mousse हे पर्याय आहेत.
३.Chillers - काला खट्टा किंवा कच्ची कैरी. कच्ची कैरी ट्राय केलं पण खास आवडलं नाही.

मील ऑप्शन मधले स्वीट किंवा Chillers फारसं न आवडल्याने मलाई चिकनची नुस्ती बकेट घेतली - म्हणजे चीज आणि क्रिमच्या सॉसमधलं चिकन आणि भात. हेही झक्कास होतं.

Tuckets म्हणजे व्हेज किंवा नॉन्व्हेज पर्याय भाताऐवजी ब्रेडमधे घालून देतात.

हे आऊटलेट लोखंडवाला आणि मालाडमधलं इन्फिनिटी तसंच ठाण्यातल्या कोरम मॉलमधेही आहे असं त्यांच्या pamphlet मध्ये आहे.

हाय स्ट्रीट फिनिक्समध्ये क्रीम सेन्टर ट्राय केलं. जे मागवलं त्याची चव ठीक होती. पण पुन्हा जाण्याइतकं मेन्यूमध्ये वैविध्य नाही. फार लिमिटेड वाटला. Sad

बॉम्बे ब्ल्यू आणि न्यूडल बार पुन्हा चालू झालेत. न्यूडल बारचा बफे बंद झालाय Sad Gelato मध्ये रॉयल कुल्फी नावाचा धम्माल नवा फ्लेवर आलाय. Gelato च्या पंख्यांनी नक्की ट्राय करा.

रच्याकने, रानडे रोडच्या टायटन शोरूम (नक्षत्र मॉलच्या आधीच्या सिग्नलला आहे ते) समोर मागच्या रविवारी सकाळी एक माणूस ज्वारी आणि गव्हाचा हुरडा विकत होता. दर दिवशी असतो का फक्त विकांताला ते माहित नाही. आम्ही दोन्ही प्रकारचा हुरडा आणला होता. खायला मजा आली. फक्त त्याच्याकडून तिखट-मीठाची पुडी घ्यायला विसरू नका. Happy

Pages