रवींद्र आणि राजश्री

Submitted by धनि on 27 October, 2021 - 17:47

हिंदी चित्रपट  सृष्टीमध्ये राजश्री प्रॉडक्शनची  स्वतंत्र ओळख आहे.  नेहमीच्या मारधाडपटांहून आगळे चित्रपट निर्माण करणारे  म्हणून ते प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबरीने सुश्राव्य संगीतमय चित्रपट अशीही त्यांची ओळख आहे.  आरती या त्यांच्या पहिल्याच चित्रपटापासून हा संगीतमय चित्रपटांचा सिलसिला सुरू आहे.  दोस्ती पासून त्यांना साथ मिळाली ती लक्ष्मीकांत - प्यारेलाल यांची. एल-पींना पहिला हीट चित्रपट हा दोस्तीच्या स्वरूपात राजश्रीकडूनच मिळाला. १९७२ च्या पिया का घर पर्यंत एल-पी राजश्रीच्या चित्रपटांना संगीत देत  होते.

१९७३ मध्ये राजश्रीने अजून एका नविन संगितकाराला संधी देण्याचा निर्णय घेतला.  हा  संगितकार पुढे बरीच वर्षे राजश्रीबरोबर राहिला आणि त्याने बर्‍याच हीट चित्रपटांना  संगीत दिले. हा चित्रपट होता सौदागर आणि संगितकार  होते रविंद्र  जैन.  जन्मतः अंध असणार्‍या रविंद्र जैन यांची प्रतिभा त्यांच्या पालकांनी ओळखली होती.  लहानपणापासूनच त्यांच्यावर संगीताचे संस्कार झाले. असे रविंद्र राजश्रीकडे दाखल झाले आणि सौदागर मध्ये त्यांनी नूतन करता एक से एक  गाणी दिली.  सजना है मुझे, तेरा मेरा साथ रहे अशी गाणी गाजली.  एका वेगळ्याच विषयावर असलेला हा चित्रपट त्यातील गाण्यांमुळे लोकांच्या लक्षात राहिला.

त्यापुढे रविंद्र आणि राजश्रीने गीत गाता चल आणला.  सचिन - सारीका असे ताजे चेहरे आणि रविंद्र जैन यांचे संगीत या बळावर हा चित्रपट  चांगला चालला.  गीत गाता चल,  श्याम तेरी बन्सी ही गाणी प्रसिद्ध झाली. या  चित्रपटात रविंद्र जैन यांनी संगिताबरोबर गाणी लिहीण्याचीही  जबाबदारी पार पाडली.  पुढे १९७६ मध्ये चितचोर आला. यातली चारही गाणी प्रसिद्ध झाली. गोरी तेरा गांव बडा प्यारा हे  गाणे तर अजूनही लोकांच्या मनावर भूरळ पाडून आहे. येसुदास हिंदी चित्रपटसृष्टीत  प्रसिद्ध या चित्रपटामुळे झाला. त्याला फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. राजश्रीला अजून एक हीट चित्रपट मिळाला.   रविंद्र आणि राजश्री यांचे असे हीट नाते सुरू राहीले ते पुढील अखियोंके झरोंखोंसे  मध्ये.  पुन्हा एकदा सचिन असलेल्या चित्रपटात १९७८ मधले  नंबर वन असलेले गाणे अखियोंके झरोंखोंसे होते.

 थोड्या खंडानंतर रविंद्र आणि राजश्री पुन्हा एकत्र आले ते  नदिया के पार मध्ये.  सचिनचा हा चित्रपट १९८२ मध्ये सुपर हीट होता जो सुरज बडजात्याने हम आपके है कौन म्हणून परत आणला.  यातले कौन दिसा में  लेके चला रे बटोहिया, गुंजा रे चंदन ही गाणी प्रसिद्ध झाली आणि अजुनही  जनतेच्या मनात घर करून आहेत.  माधुरीचे चित्रपटसृष्टीत पदार्पण झाले ते राजश्रीच्याच अबोध चित्रपटामधून आणि १९८४ च्या या चित्रपटाला रविंद्र  जैन यांनीच संगीत दिले होते.

त्यानंतर राजश्री  आणि रविंद्र वेगळ्या वाटांनी गेले. राजश्री ने  सुरजबरोबरचे काही हीट चित्रपट राम-लक्ष्मण यांच्याबरोबर केले. रविंद्र जैन यांनी रामायण मालिकेला संगीत दिले आणि ते भक्तीगीतांमध्ये रमले. त्याचबरोबर त्यांनी राज कपूरच्या राम तेरी गंगा मैली, हीना अशा चित्रपटांनाही संगीत दिले.

मैं प्रेम की दीवानी हूं नंतर सुरजला जरा राजश्रीच्या धाटणीचा चित्रपट काढायचा होता  तेव्हा त्याने परत रविंद्र जैनांना बोलावले आणि २००६ मध्ये विवाहचे संगीत रविंद्र   जैनांनी दिले.  काही अपयशानंतर राजश्रीला विवाहच्या रूपाने एक हीट चित्रपट मिळाला.  मिलन अभी आधा अधुरा, मुझे हक है, दो अनजाने अजनबी सारखी गाणी प्रसिद्ध झाली.  अमृता राव आणि शाहिद कपूरच्या करीयरला एक  उठाव मिळाला.

 राजश्रीच्या कौटुंबिक चित्रपटांकरता रविंद्र  जैन यांचे संगीत एकदम चपखल होते त्यामुळे त्या दोघांनी एक सफल सफर केली आणि प्रेक्षकांना सुश्राव्य गाण्यांची मेजवानी दिली.  

एकत्र चित्रपट -
सौदागर १९७३
गीत गाता  चल  १९७५
चितचोर १९७६
अखियोंके झरोकोंसे  १९७८
नादिया के पार १९८२
अबोध १९८४
विवाह २००६

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>हुतेक अजून तरी राजश्रीच्या पिक्चर मध्ये दिसली नाहीये - ते झाले की ती जन्माजन्मांकरता कृतकृत्य होईल
ती म्हणजे राजश्री पिक्चर्स ना? Proud

छानच लेख आहे. मी फोन वरून वाचला होता पण प्रतिसाद मराठीतून लिहायचा होता.
रविद्र जैन व हेमलता ह्यांचे गाण्याचे कार्यक्रम तेव्हा दूरदर्शन वर नेहमी होत. मी ते बघत असे कायम हेमलता ह्यांचा आवाज पण गोड व वेगळा होता आहे. सौदाग र माझा ऑटाफे चित्रपटां पैकी एक आहे. सजना है मुझे व तेरा मेरा साथ रहे. नवर्‍याचा बिझनेस खूप चालावा ह्या प्रेमाने मेहनत करणार री हुषार नुतन व तिची झालेली प्रतारणा स्टोरी चांगली व वेगळी होती.

गीत गाता चल सिनेमा तर मी बाकायदा पुण्यात आई बरोब र थेटरात जाउन बघितला आहे व गाणी तेव्हा फार हिट होती. साधा सचिन तेव्हा तो म्हागुरू व्हायचा होता. कथा मला तेव्हा कळली नव्हती पण सारिका लाडावलेली श्रीमं त मुलगी तिचे सचीन वर प्रेम बसते व एक साधी दुसरी मुलगी असते तिची हिला जेलसी होते. हे कळले होते. सारीका तेव्हा फार जबरदस्त दिसत असे लांब केस गोरा रंग व घारे डोळे. त्या सिनेमात तिला एक गड द निळा सिल्व्हर बॉर्ड र पट्टी लावलेला घागरा चोली ओढणी दिला आहे. त्यात तर ती फार छान दिस ते. पहला पह् ला प्यार फीलिन्ग चे अनेक व्हेरिएश न ह्यांच्या गाण्यात दिसून येत.

गीत गाता चल गाणे त्या वर्शी बिनाका गीत मालेत टॉप की पायदान पर था. व फारच लोकप्रिय. नदिया के पार मी सिनेमा नाही पाहिला
पण गाणी रेडि ओ वर सारखी लागत. व आम्ही गात पण असू.

अंखियोंके झरोकोंसे गाणॅ हे पण मी चि त्रपट रिलीज झाला तेव्हाच ऐकले आहे. हे ही हिट होते फार. ह्या चित्रपट च्या रिलीज पूर्व रेडिओ प्रोग्राम लागत रात्री हवाम हल नंतर. तेव्हा ही सर्व गाणी लागत व ट्रान्झिस्टर वर रात्री पुण्याच्या गार वार्‍याचा झुळुका समवेत ऐकण्यात फार सुख होते. तेव्हा आपली उमर पण तशी स्वप्ने बघायचीच होती. आठवीतली स्कर्ट ब्लाउज वाली मुलगी फार प्रेमाने ऐकत असे व गात पण असे.

चितचोर ही त्यामानाने मोठ्या वयाच्या लोकांची स्टोरी. पण गाणी मी अजूनही ऐकते. आमच्याकडे रेकोर्ड प्लेयर होता व ह्या चार गाण्यांची
छोटी रेकॉ र्ड होती. ती ऐकून ऐकून घासली. जब दीप जले आना. ऑटाफे.

हीना व राम तेरी गंगा मैली पण मी कॅसेट आणून ऐकली आहेत व येतात सुद्धा म्हणायला. अनारदाना सुन सायबा सुन हुस्न पहाडो का वगैरे

हे दोन्ही सिनेमे थेट्रात बघितले आहेत गाणी फार सुरेख दिसत निसर्ग व नट्या पण मंदाकिनी वॉज अ रिअल थिंग दोज डेज. आणि हिना वाली नटी. काय गोड लुक्स.

जनरली क्लीन फॅमिली ड्रामा. भाबीबरोबर होली खेळ णारा धाकटा दीर साध्या भावना वगैरे त्यामुळॅ फार अपील व्हायचे.
त्यामानाने पचास लाख के हीरे बेल्ट मे रखे है वाला हम किसीसे कम नही फारच ग्लॅमरस होता व पुढे आरडी ची काँप्लेक्स गाणी ऐकायला मिळाली तेव्हा ही एका वेगळ्ञा प्लेलिस्ट वर गेली.

अतिशय यशस्वी आणि गुणी संगीतकार !
प्रत्येक गाणं सुंदर आहे आणि उदंड लोकप्रिय पण !

धन्यवाद अमा आणि पशुपत.

अमा तुम्ही बरेच वेळा गाणी ऐकलली दिसतात ही. तसे आरडी आणि ही गाणी अगदी वेगळी आहेत असे वाटते. एसडींनी अशी शांत काही गाणी दिलेली आहेत. आरडींनी दिलेली मला डायरेक्ट १९४२ मधलीच आठवतात. नाही तर आरडी म्हटले की हम किसी से कम नहीं किंवा यादोंकी बारात मधल्या एकदम तुम्ही म्ह्टल्या प्रमाणे कॉम्प्लेक्स चालीची धिंगाणा गाणी आठवतात.

छान लिहीलं आहेत अमा.

मी हा लेख वाचल्यानंतर गेल्या ४-५ दिवसांत पुन्हा यातली बरीच गाणी ऐकली.

आर डी ची पण शांत गाणी आहेत. शोधून लिहि ते वेगळे. त्या का ळात खरेतर खूपच संगीत कार व गायक गायिका ह्यांची रेलचेल होती त्यामुळे एकेकाचे वेगळे पण लक्षात यायचे. तेव्हा जाहिराती व एकूण डिस्ट्रॅक्षन्स कमी होती त्यामुळे एकदम लक्ष देउन ऐकायचो काही पण.

बोनी एम चे डॅडी कूल ह्याची फक्त सुरुवात मी पारेख इलेक्ट्रोनि क्स टिळक रोडला पुढे होते तिथे टेप रेकॉर्डर रिपेअर ला दिला गेला होता तो आणायला गेले होते तेवा तो माणूस एकाला ट्रायल देत होता रिपेअर नंतरची तेव्हा ऐकलेले. आमच्या इथे एकदमच क्लासिकल म्युझिक वातावरण असल्याने पॉप फिल्मी रॉक वगैरे एकदम नो नो होते. पण शोधून शोधून ट्रान्सिस्टरची बटणे फिरवून काय काय शोधून ऐकायचो.
१९४२ खरे तर आर्डीचा लास्ट अल्बम सुवर्ण काळ आधीच होता.
लेकर हम दीवाना दिल मध्ये नीतु सिंग काय दिसते सोनेरी मिनि ड्रेस मध्ये. हमारे ममव पन की धज्जियां उडगयी.

आर डी ची पण शांत गाणी आहेत. शोधून लिहि ते वेगळे. त्या का ळात खरेतर खूपच संगीत कार व गायक गायिका ह्यांची रेलचेल होती त्यामुळे एकेकाचे वेगळे पण लक्षात यायचे. तेव्हा जाहिराती व एकूण डिस्ट्रॅक्षन्स कमी होती त्यामुळे एकदम लक्ष देउन ऐकायचो काही पण.

बोनी एम चे डॅडी कूल ह्याची फक्त सुरुवात मी पारेख इलेक्ट्रोनि क्स टिळक रोडला पुढे होते तिथे टेप रेकॉर्डर रिपेअर ला दिला गेला होता तो आणायला गेले होते तेवा तो माणूस एकाला ट्रायल देत होता रिपेअर नंतरची तेव्हा ऐकलेले. आमच्या इथे एकदमच क्लासिकल म्युझिक वातावरण असल्याने पॉप फिल्मी रॉक वगैरे एकदम नो नो होते. पण शोधून शोधून ट्रान्सिस्टरची बटणे फिरवून काय काय शोधून ऐकायचो.
१९४२ खरे तर आर्डीचा लास्ट अल्बम सुवर्ण काळ आधीच होता.
लेकर हम दीवाना दिल मध्ये नीतु सिंग काय दिसते सोनेरी मिनि ड्रेस मध्ये. हमारे ममव पन की धज्जियां उडगयी.

शर्म आती है मगर आज ये कहना होगा

कहना है आज उनसे ये पहली बार

ही दोन गाणी पडोसनमधली.

अमर प्रेम मधली सगळी गाणी , कटी पतंग मधली बहुतेक, आप की क्षण मधली दोन. राजेश खन्नाची आणखीही बरीच आहेत.

इजाजत - मेरा कुछ सामान

अशी असंख्य गाणी आहेत. आर डी ची म्हणून लक्षात येत नसतील.

घर आजा घिर आए बदरा सांवरिया हे त्याचं पहिलं गाणं.

आर डीं ची दुर्लक्षित म्हणता येतील अशी ही दोन अप्रतिम आणि शांत गाणी -

फिर वही रात है, रात है ख्वाब की, ख्वाब की रात है, फिर वही - घर
दो नैना और एक कहानी - मासूम

नेहा कक्कडचा जन्म सफल झाला. Lol
२वर्षांपुर्वी आली होती गावात. अस्सा वैताग आणलाय गाऊन गाऊन की मला पळता भुई थोडी झाली. Lol (मुख्य गायक सोनु निगम होता म्हणून गेलो पण ही काही गायचं थांबवेना).

Spoiler :

.
.
.
.
.

उदितच्या गाण्यात श्वासोच्छ्वास इतका ऐकू येतो की तो मला दमेकरी वाटतो.
कुमार सानू सिगरेटचा धूर सोडत सोडत गातोय असं वाटतं.

>उदितच्या गाण्यात श्वासोच्छ्वास इतका ऐकू येतो की तो मला दमेकरी वाटतो.
>कुमार सानू सिगरेटचा धूर सोडत सोडत गातोय असं वाटतं.
माझा एक गायक मित्र कुमार सानु चे गाणे गातानाची नक्कल करताना शेवटी नाक शिंकरण्याची अ‍ॅक्टींग करायचा.
अजुन एक म्हणजे सगळ्या गायकांची जवळपास नक्कल केली गेली आहे पण उदीत नारायण ची गातानाची नक्कल करताना अजुन कोणाला पाहीले /ऐकले नाही.

>सर सर सर सर... सोनू निगम करतो उदीतची नक्कल...
सोनु निगम उदीत नारायणच्या फक्त बोलण्या चालण्याची नक्कल करतो.आवाजाची नाही.

छान लेख!
रवींद्र आणि राजश्री मध्ये सचिन पण कॉमन दुवा आहे का ?

सचिन!!... अवांतर पोस्टी इतक्या झाल्या की आता धाग्याचे नाव बदलून 'रविंद्र, राजश्री, और वो' करा... Wink Proud

Pages