अमेरिकेत दिवाळी फराळ ऑर्डर करणे

Submitted by sneha1 on 9 October, 2021 - 18:02

नमस्कार मंडळी!
दिवाळी आहे आता पुढच्या महिन्यात. तर, तुम्ही लोक दिवाळीचा फराळ कुठून ऑर्डर करता? अमेरिकेतल्या आणि भारतातल्या, दोन्ही वेबसाईट्स सांगा ना प्लीज.
धन्यवाद!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक उमासे येतील खाताना अस अजीब रसायन तयार होत .... खरंय.
मानव,घरी काढलेल्या लोण्याची चव बाहेरच्या लोण्याला नसते.त्याचे तूपही तितके चांगले होत नाही हा स्वानुभव.आता अवल, उ.बो.नी सांगितल्याप्रमाणे केलत तर पहा.
बाकी सागर, अमूल, वारणा आणि dynamix he सर्व एका माळेचे मणी आहेत.
U.bo.,parsi डेअरी चे तूप आणवले आहे.

हम्. देवकी, घरी रोजच्या दुधाची साय काढून ठेवणे होतच नाही.

लोणी विकत आणण्यापेक्षा क्रीम आणुन घरी विरजण लावणे बरे असेल का?

विषयावर वरून चर्चा बरीच घसरलीय.
तर विषयावर:
तेजो यांनी दिलेल्या स्वादबंध, डोंबिवली इथून फराळ मागवला आहे. चिवडा, चकली, शेव, करंजी, अनारसे.
मिळालाय काल, अजून बॉक्स उघडला नाही.
नंतर कसा आहे याची प्रतिक्रिया देईन.

साजूक तुप कढवणं पण एक कौशल्य आहे. लोणी धूवून घेणे, ठराविक वेळेत उकळवून मग गाळणं वगैरे केले की मस्त दाणेदार होते.
काही जणं, तो उकळतानाचा फेस न काढताच( लॅक्टोज), बेरी कच्ची असताना तुप गाळतात , त्यात लोणी सुद्धा तीन चार वेळा धूवून पाणी निथळून घेत नाहीत. मग तो ओशट वास रहातो.

आज इतकी वर्षे आमच्याकडे आजी, आई , मावशी , काकी ते मी , अनारसे, करंजी ते लाडु पासून घरच्याच साजूक तुपात पदार्थ केले आहेत्/गेले व आरामात रहातात. घरच्यांच साठी खायचे आहे व वर्षातून कराचे तर कशाला इतकं विचार आणि कंजुषी अ. आ. म.

रंग बदलला आणि डालड्याचा वास आला की फेकावे.
२) जराही पांढरे झाले नाही; तेच बाहेरचे १-३ महिन्यात सफेद होइल.
व डालड्याचा वास येइल.
आम्ही खालील विकतच्या शुद्ध(?) तुपांची चाचणी केलीय,
चितळे,
अमूल
नानक
सागर
वारणा
सोहम का काय तो ब्रँड

डालडाच विकतात ते.

झंपी शक्य असल्यास तूप कसे कढवावे यावर वेगळा धागा काढा, आणि तिथे हे बाकी अनुभव पण लिहा, उपयोगी धागा होईल.

तुपात तळत नाही, पण घरच्या साजुक तुपात व्यवस्थित तळलं तर वास आलेला आठवत नाही. आजी तुपात तळत असे, पण आईने तेलात चालू केल्यावर आजीला पण तीच सवय लागली, त्यामुळे तुपात तळले साखरेत घोळले हे फक्त म्हणी पुरतेच उरले Proud
तुपाचा बॉईलिंग पॉईंट तेलापेक्षा कमी असतो, त्यामुळे बहुतेक कमी आचेवर करावं लागत असेल. बाकी आयता फराळ कुठून मागवायचा वरुन चर्चा घरी लोणी कसं कढवायचं वर गेली! :डोक्याला हातः

होय, "अमेरिकेत भारतीय फराळ ऑर्डर करणे आणि दिवाळीचे पदार्थ तुपात तळावेत का अस नाव करायला हवं आहे."☺️

इथे लिहावे की डी मार्ट च्या धाग्यावर..?
असो

'आबाद' चे तूप डी-मार्ट मध्ये मिळते
349 ला 1kg गाय-- 2 वर्षे वापरत आहे, अगदी वरण-भातावर सुद्धा, लाडू वगैरे खूप छान होतात. (अर्थात घरी कढवलेल्या तुपाची सर नाही)

369 ला 1kg म्हैस-- डालडा बरा, इतकं वाईट(अन्नाला नाव ठेवू नयेत,तरी)

ओम साई कुरियरने लेकीला घरी केलेला फराळ पाठवला. कुरुयरवाल्याचा नवरात्रातच मेसेज आला होती लवकर पाठवा म्हणून पण काही वैयक्तिक अडचणीमुळे उशीर झाला दोन दिवस झाले मुंबईतच आहे. दिवाळीपूर्वी मिळावा ...
अवांतर : तळलेले सगळे पदार्थ मी तेलात (लकडी घाणी ब्रॅंड नाही) तळते. चिरोट्याचा साटा तुपाचा असतो. मोहन जे घालतो ते घरी केलेल्या तुपाचं घालते. घरचं तूप पुरतं सहसा विकत आणावं लागत नाही.

कृषीकेंद्राच्या संकेतस्थळावरूनही दिवाळी फराळ ऑर्डर करता येतो. आम्ही आधीच स्वादबंधला ऑर्डर दिली होती म्हणुन इथून फक्त चिवडा मागवला अर्धा किलो. छान आहे पण चांगलाच तिखट आहे. कमी तिखट खाणाऱ्यांना चालणार नाही एवढा.

तेजो, स्वादबंध चकली, इतर फराळाबद्दल २ ता. ला कळवेन.

स्वादबंधचा फराळ:
चकल्या : उत्तम.
करंज्या (साध्या): छान.
शेव: ऍव्हरेज.
चिवडा: बिलो ऍव्हरेज. आता यात काही घालून चव वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
अनारसे: चव ओके, पण जास्तच वातड. रोज एक अनारसा १५ दिवस खाल्ला तर जबड्याचे स्नायू दणकट होऊन दिसू लागतील. सात दिवस जुने आहेत अनारसे म्हणुन हे झाले असावे का? आम्ही एका डब्यात नीट झाकण लावून कपाटात ठेवलं होते.

मानव, तुम्ही चिवड्यात कांदा, कोथिंबीर, भरपूर ओलं खोबरं आणि वर लिंबू पिळून खाल्लं आहे का? नसल्यास खाऊन बघा. तिखट चिवडा खोबरं आणि लिंबामुळे जरा सौम्य होईल. मला नुसता चिवडा बोअर होतो त्यामुळे प्रत्येक वेळी असाच खाते.

सायो, छान आयडिया. मी तो दही घालून खाल्ला, बायकोला तेवढं तिखट चालतं तिने तसाच संपवला. कृषीकेंद्राचा मस्तच होता चिवडा.

स्वादबंधचा तिखट नाहीय अजिबात. त्यात आता परत चिवडा मसाला आणि अजून काही घालून चांगला करून दिला आईने.

चिवड्यात कांदा मलाही आवडतो, कोथिंबीर, ओलं खोबरं, लिंबू घालून पाहीन.

अनारसे मावे मधून काढुन बघतो, काही फरक पडतो का.

कांदा खोबरं कोथिंबीर घालून चिवडा फारच आवडतो.
रोज एक अनारसा १५ दिवस खाल्ला तर जबड्याचे स्नायू दणकट होऊन दिसू लागतील. >> मी एक वर्ष करंज्या ऑर्डर केल्या होत्या त्या एवढया कडक होत्या की मुलांचे गाल आतून हुळहुळे झाले होते थोडी शी खाऊन ही. विकतचा फराळ कसा निघेल ही लॉटरी च असते.

यावेळी एका नातेवाईकांनी त्यांच्या सोसायटी स्टॉल मधून बालूशाही आणली होती.80% बालूशाही आतून कडक आणि कच्च्या होत्या,बाहेरचा भाग खाऊन आतले कोअर फेकून दिले.असा पदार्थ स्टॉल वर विकायला अतीव धाडस हवे.
मला इथल्या किल्ली च्या रेसिपी मधल्या कढईत उडी मारून वर येणाऱ्या हलक्या बालूशाई ची आठवण आली

हा पदार्थ फारसा आवडत नव्हताच, आता अजून वाईट आठवण तयार झाली.

भावाने मला फराळ बास्केट गिफ्ट पाठवली, माझ्या मित्राच्या दुकानातून घेतली (त्याचं ईस्ट वेस्ट दोन्हीकडे दुकान आहे). सर्व पदार्थ (फराळ) आवडले मला, चकल्या जरा कमी आवडल्या पण भावाकडे सर्वांना त्याही आवडल्या, त्याने स्वत:साठीही घेतली फराळ बास्केट. चकल्या त्याच्याकडे फार स्वस्त आहेत मात्र.

चकल्या माझे मोठे दीर, आमच्या मदतनीस ताई, नालासोपारा इथल्या शेजारी (आता तेही तिथे राहत नाहीत, मुंबईत शिफ्ट झाले) superb करतात.

आमचा दिवाळी फराळ कॅनडात येऊन कस्टम मधुन पोस्टल कोड न मिळणे/ ज्या कुरिअर कंपनीने ड्युटी भरुन सोडवुन घ्यायचा तो न करणे का इतर काही... कोण जाणे! अशा अगम्य कारणांनी परत दिल्लीला गेला. आता त्यांनी डीएचएलला निस्तरायला सांगुन परत पाठवलाय. तो जर्मनी पर्यंत पोहोचलाय, असं त्यांनी सांगितलय. मुखी कुणाच्या पडते चकली कुणा मुखी पोहे कधी घडतंय ते बघुया.

एक भाबडी शंका.
भारतातून फराळ मागविण्यापेक्षा तिथेच फराळ करणे अजून चालू झाले नाही का? कारण बऱ्याच पटेलणी, पोळीभाजीचे डबे ,जेवण देतात असं कझिनकडून ऐकून आहे.कदाचित जास्त तळा तळी झाल्यास फायर अलार्म vajat असेलही.

अमित, काहीही!!!!
देवकी, इथेही मिळतो. पण मराठी चव मिळेलच ह्याची गॅरंटी नाही. चकल्या, चिवडा आपल्याला घरच्या चवीचाच हवा असतो. पुन्हा किंमत आहेच. भारतातून फराळ मागवणं तुलनेने स्वस्त पडतं. मी इथे फक्त करंज्यांनाच $६० मोजतेय.

इथे ढीगभर मराठी लोक फराळ विकतात पण सायो म्हणते तसे शिपिंग ची किम्मत धरून सुद्धा भारतातून मागवणे स्वस्त पडते.

परांजपे फराळ एकदम बेचव असा रीपोर्ट मिळाला एकांकडून. लाडवात, साधी वेलची सुद्धा नाही म्हणे.
अनारसे तर दगड... करंजी सारण नुसती साखर आणि नावाला खोबरं.

अमेरीकेत तर पोहोचलाच नाही एका आणखी ओळखींच्याकडे.

"भारतातून फराळ मागविण्यापेक्षा तिथेच फराळ करणे अजून चालू झाले नाही का? "

त्याचे काय आहे, इथे घरटी तीन तीन चार चार नोकर नसतात - जेमतेम घर स्वच्छ करण्यापुरते लोक सुद्धा दररोज बोलावणे परवडण्यासारखे
नसते. बहुधा सर्व लाँड्री घरीच.
त्यामुळे घरकामांत वेळ जातो. आजच गप्पा चालू होत्या - आपण कष्ट करून करायचे नि आपल्या मुलांना त्याचे काहीच कौतुक नाही. उपकार केल्यासारखे थोडेसे खातात, होस्टेलवर घेऊन जा म्हंटले तर नको म्हणतात.
मग आपले आपण स्वतःचे इतके कौतुक करायचे कष्ट का घ्या? आपल्याला तर इथलेच पदार्थ जास्त आवडायला लागले आहेत, तेच करून बघू.

आता भारतातून बोंबाबोंब! भारतीय संस्कृतीचा अमेरिकेत सत्यानाश!!
भारतातली भारतीय संस्कृति हिंदी सिनेमात पहातोच - पोषाख, बोलण्या लिहिण्याची भाषा अगदी अगदी भारतीय, परकीय संस्कृतीचे वारे पण नाही.

>>आता भारतातून बोंबाबोंब! भारतीय संस्कृतीचा अमेरिकेत सत्यानाश!!<<
अहो, फराळ हा फक्त एक इंडिकेटर आहे, मूळात हा डिसकनेक्ट - नेव्हर बॉदर्ड, ऑर हॅड अ‍ॅन अपार्च्युनिटि टु अलाइन यामुळे आलेला आहे.
आणि असं का होतंं - कारण भारतात रहाणारे त्यांच्या लेन्समधुन अमेरिकेत काय चाललंय हे बघतात, (विच इज ओके, अँड अनसर्प्रायजिंग गिवन देर लिमिटेड एक्स्पोजर); पण अमेरिकेत रहाणारे -
१. इंडियन-अमेरिकन म्हणुन भारतीयांकडे त्यांच्या न्युली अ‍ॅक्वाय्र्ड लेन्स्मधुन बघतात; शी! कित्ती बुरसटलेले विचार इ. आणि तेच महानुभाव
२. भारतीय म्हणुन अमेरिकन सोसायटि, पोलिटिकल लँडस्केप इ. कडे त्यांच्या "भारतीय" लेन्समधुन बघतात.

आहे कि नाहि गंमत... Lol

कारण भारतात रहाणारे त्यांच्या लेन्समधुन अमेरिकेत काय चाललंय हे बघतात, (विच इज ओके, अँड अनसर्प्रायजिंग गिवन देर लिमिटेड एक्स्पोजर); >> असंच सग ळ्यांचं नाही होत. कारण तिथे जाउन बघून आलेले असतात व ट्विटर मुळे जगात कुठे काही झाले तर लगेच कळते. इतर देश पण बघून आलेले असतो राहून आलेले अस्तो. बरे वाइट समजू शकते. डोक्याला झापडे नसावीत मात्र.

आले का फराळ? सो स्वीट. काल माहेर मासीक आणले त्यात एका बाईंची जाहिरात आहे त्यात खास अमेरिका व इंगलंड मध्ये पुरण पोळ्या पाठिवतो अशी जाहिरात आहे. शोधून् इथे नंबर शेअर करते.

शुभ दीपावली. आज रजा काढून दिवाळीची खरेदी. काल मार्केट मध्ये अभूत पूर्व गर्दी होती स्टेशन परेन्त चालत जाउन दिवाळी अंक आणले फक्त बाकी रांगोळ्या कंदिल दिव्यांच्या माळा फुले पूजेची तयारी फराळ ऑर्डर करनॅ राहिले आहे. ते आज करीन.

ऑफिसात आज ट्रेडिशनल डे ड्रेसिन्ग आहे व फोटो काढून एच आर ला पाठवण्यातच त्यांचा अर्धा दिवस जाईल. पब्लिक मध्ये उत्साह फारच भर बरून आहे.

आमचा पुण्याहून पाठवलेला लेकीच्या ओरिजिनल माहेरात (नागपूर) राहून Paris अजून एक अमेरिकेत मुक्काम करून आठव्या दिवशी ह्युस्टनला पोचला. सगळं सामान पोचलं. ... एक वर्षी अमेरिकेत असताना फराळ करून विकला होता फक्त केटीतल्या भारतीयांसाठी आणि मग इथे पुण्यात न हासर्या अनारश्याचा विस्तार झाला . लेक जावई Canada शिफ्ट होताहेत..... आता दिवाळीतच चक्कर मारीन .....

आहे, इथे घरटी तीन तीन चार चार नोकर नसतात......आता कसं, गार गार वाटलं.
असच काहीस अमेरिकास्थित कझिनने म्हटले."इकडे काही गंगूबाई नसतात, सगळे आम्हालाच करावे लागते" वगैरे.एकदा सोडले,दोनदा सोडले.तिसऱ्यावेळी mhatale इतकी गंगूबाई हवी असेल तर भारतात ये की कायमची रहायला.त्यानंतर तो विषय परत आला नाही.

इकडे काही गंगूबाई नसतात, सगळे आम्हालाच करावे लागते" >> असतात की. भरपूर हवे तितके नोकर नॅन्या असिस्टंट असतात. पण ते परवडायला जो पैसा लाग्तो तो मात्र मोजावा लागतो. तिथली गणिते जमली की सर्व जमते. नॉट अ व्हेरी बिग डील. पेपर्स मॅनेज करायचे नाहीतर.

असे अनेक भारतीय आहेत ज्यांना परवडायचा प्रॉब्लेम नाही. पण इथे ते कल्चरच नाही. इथले अमेरिकन लोकही काही वेगळे करत नाहीत. इथेही दैनंदिन कामे असतात पण भारतापेक्षा वेगळी, आणि ती घरातील सर्वांनीच करायची याची एकदा सवय लागली की ते कामाला लोक वगैरे काही गरज वाटत नाही. उलट मला तर आता घरात भलतेच लोक येउन काम करत आहेत हेच आवडणार नाही. तेच मी पुण्यात आलो की तेथे गेली अनेक वर्षे आमच्याकडे येत असलेल्या मावशी वगैरे ते काही ऑड वाटत नाही. तिकडे गेल्यावर तिकडच्याप्रमाणे.

क्लीनिंग मेड सगळेच बोलावतात, काही आठवड्यातून एकदा,काही बायवीकली ... दररोज मेड शक्यतो कोणी ठेवत नाही...
नॅनी ठेवतात खूप जण कारण डेकेयर पेक्षा स्वस्त पडते...

उलट मला तर आता घरात भलतेच लोक येउन काम करत आहेत हेच आवडणार नाही........ खरंय. lockdown नंतर हेच वाटले होते.बरेच जणांनी परत कामवाली ठेवली नाही त्यांनतर.

धन्यवाद इन्दुसुता. मावे करण्यापूर्वी तुमची पोस्ट बघितली नाही तर मी २ मिनीट वगैरे लावले असते आणि कोळसा झाला असता. १० सेकंदात तर काही नाही झालं पण ३० सेकंदात चांगले गरम होऊन मऊ पडले आणि फार त्रास न होता खाता आले. पण आलेल्यांना देता नाही येणार.

चिवडा मात्र आता छानच झालाय, आलेल्यांना देऊ शकतो.

चांगले असतील अनारसे तर तसं पण अनारसे आलेल्यांना देऊ नयेत. Wink मायेची किंवा महत्त्वाची मंडळी असतील तरच द्यावे... पारले-जी आणून ठेवावं चहाबरोबर द्यायला Light 1

अमेरिकेतही जरी उशा पायथ्याशी नोकर नसले आणि सगळं काम आपलं आपणच करावं लागलं तरीही ज्यांना आवड आणि उरक असतो अशा कितीतरी जणी सगळा फराळ घरीच करतात. नोकर नाहीत वगैरे निमित्त आहेत तक्रार करायची. खायची आवड असेल आणि बाहेर ऑर्डर करवत नसेल तर खपा स्वत:.

<<त्यानंतर तो विषय परत आला नाही.>>
त्याचे कारण इथे बरीच वर्षे राहून नंतर भारतातहि बरीच वर्षे राहून परत इथे रहायला आलेल्या लोकांना विचारा!
<<<असतात की. भरपूर हवे तितके नोकर नॅन्या असिस्टंट असतात. पण ते परवडायला जो पैसा लाग्तो तो मात्र मोजावा लागतो. तिथली गणिते जमली की सर्व जमते. नॉट अ व्हेरी बिग डील. पेपर्स मॅनेज करायचे नाहीतर.>>>
अमा, तुम्ही इथे असताना जमवले वाटते? मज्जा आहे न् काय तुमची.
तसेहि आजकाल भारतात सुद्धा बाहेरचे खाणे बरेचदा मागवतात म्हणे. मग का नाही करत घरी असे विचारू का? म्हणजे त्यांची कारणे बाहेर येतील. पण दुसर्‍यांची कारणे मात्र फुसकी!!

<< न्युली अ‍ॅक्वाय्र्ड लेन्स्मधुन >>
आमचे लेन्स दर दोन तीन वर्षांनी न्युली अ‍ॅक्वाय्र्ड च असतात. पण ती फक्त जवळचे वाचायला नि लांबचे स्पष्ट दिसायला असतात. भारतीयांकडे बघण्याचे चष्मे काही मला इथे सापडले नाहीत.
एकदा भारतात आलो असताना भारतीय लेन्स घेतले होते, दिसण्यात काही फरक वाटला नाही. अमेरिकेत येऊनहि.
दुसर्‍याचे विचार बुरसटलेले नि आपले चांगले असे असणारे लोक जगात अनेक आहेत, त्यात भारतीय, गोरे, काळे, पिवळे सगळ्या प्रकारचे लोक आहेत. तसेच भारताचा अभिमान असणारेहि बरेच भारतीय इथे आहेत. तुम्ही ज्यांच्याबरोबर वावरता त्यांना सोडून जरा इतर लोकांना भेटा म्हणजे कळेल. यापुढे तुम्ही "काही" हा शब्द वापरत चला. सरसकट सगळे असेच असतात असे म्हणू नका.
म्हणजे मग तुमच्या लिखाणावरून कल्पना येईल की तुम्ही कोणत्या लोकांत वावरता. मग ठरवता येईल आपणहि त्यांच्या नादी लागावे की सोडून द्यावे.

कशाला भांडताय ऐन दिवाळीत? हा बघा स्वहस्ते अमेरीकेत केलेला फराळ. या सगळे फराळाला. वेळ, आवड, इच्छा असल्यास अमेरीका काय अन भारत काय, सगळीकडे गॅस नाहीतर इलेक्ट्रीकच्या चुली Wink

WhatsApp Image 2021-11-03 at 9.44.51 AM(3).jpegWhatsApp Image 2021-11-03 at 9.44.51 AM(2).jpegWhatsApp Image 2021-11-03 at 9.44.51 AM(1).jpegWhatsApp Image 2021-11-03 at 9.44.51 AM.jpegWhatsApp Image 2021-11-03 at 9.44.16 AM.jpegWhatsApp Image 2021-11-03 at 9.44.16 AM(1).jpeg

अबाबा
बरेच केलेय आणि सगळे छान दिसतेय
श्रमाला सलाम.

Pages