विना शर्त ते मान्य मला

Submitted by कविन on 5 October, 2021 - 04:34

'सोडून जाशील अर्ध्यावरती'
दिलास हा अभिशाप मला
जाता जाता विस्मरणाचा
दिलास तू उ:शाप मला

तुला, नशीबा..; बोल लावू मी (?)
कणखर केले तूच मला
चौकट व्यापक करण्याचेही
तूच दिले सामर्थ्य मला

तुझ्या नि माझ्या मधले अंतर
'मिटावेच', ना ध्यास मला
जसे नि जेव्हा, जे जे होईल
विना शर्त ते मान्य मला

(तशी जुनीच आहे ही कविता. इथे आणली नव्हती हेच लक्षात नव्हत, ते आज लक्षात आलं म्हणून इथे आणली)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्या बात !!
खूप छान आणि गेय कविता आहे. हातावर ताल धरून म्हणायला खूप मजा येतेय. पण तिसरी ओळ दाताखाली एकदम खडा आल्यासारखी खटकली कारण एक मात्रा जास्त होतेय.
'सोडून जाशील अर्ध्यावरती'
दिलास हा अभिशाप मला
अन् जाताना विस्मरणाचा
दिलास तू उ:शाप मला

किंवा

'सोडून जाशील अर्ध्यावरती'
दिलास हा अभिशाप मला
जाता जाता विस्मरणाचा
दिलास तू उ:शाप मला
( अन् )

हे जास्त चपखल बसतंय मीटर मधे असे वाटले

'सोडून जाशील अर्ध्यावरती'
दिलास हा अभिशाप मला
जाता जाता विस्मरणाचा
दिलास तू उ:शाप मला>> बरिबर अजय, हे चपखल बसतय. धन्यवाद

धन्यवाद मानव, अमितव, अन्जू, अक्षय

छान आहे कविता.

विस्मरणाचा उ:शाप कन्सेप्ट सॅड पण फारच भारी आहे >> +१

एकंदरीत उदास मूडने सुरवात होणारी , पण पुढे तो मूड टिकत नाही. सामो म्हणते तसं संपूर्ण शरणागती. खुप छान छोटीशी. शब्द बंबाळ नाही.