शशक पूर्ण करा- अलविदा - धनि

Submitted by धनि on 22 September, 2021 - 11:22

काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो.
बाहेरून उजेडाचा एक कवडसा आत येतो त्याचवेळेस आतलाही दिवा लागतो. एकदम सगळे प्रकाशीत झाल्याने आजूबाजूला काय आहे ते दिसते. आज कोण जाणार काय माहिती? मी इकडे तिकडे पाहतोय.

डोळ्यांचे हिरवे केस दिसतात, सगळ्या रोमा जागेवर दिसतात. मला जरा बरे वाटते. पण अजून धाकधूक आहेच. तेवढ्यात एक हात आतमध्ये येतो. सगळे एकदम भयचकीत होऊन पहात राहतात.

तो हात पुढे येत काहीतरी शोधतो. त्याच्या हाताला मीच लागतो. अलविदा दोस्तांनो भेटू पुढच्या जन्मात.

आज सफरचंदच खावे असे शेवटचे मला ऐकू येते.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users