मराठी बिग बॉस तिसरे पर्व

Submitted by सूलू_८२ on 19 September, 2021 - 05:02

आजपासून बिग बॉस मराठी ३ सुरु होत आहे. खर तर हा धागा काढायला जरा उशीरच झाला मला!

सो, स्वागत आहे तुमचे, या चर्चा करु या!

मराठी बिग बॉस

आज ७.३० वा.

सोमवार ते शनिवार ९.३० वाजता.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

स्नेहा येडी आहे..... जयचे नाव घेऊन स्वताच्याच पायावर धोंडा मारुन घेतला तिने; नाहीतर तिचा कॅप्टन्सीचा चान्स वाढला असता!!.. अरे तुम्ही तिला अजूनही ओळखले नाही. तिच्या अंदाज होता जय तिच्या प्रेमात आहे फार चिडणार नाही, पण मीरा च्या गुड बुक्स मध्ये ती फार मेहनत करून पोहचली आहे. सो शी प्लेड स्मार्ट. उत्कर्षने तिला सुमडीत अनसेफ केले. ठकाला महाठक भेटला.
जय बाबा कुणीही ऊचकवल की तिसऱ्या सेकंदाला चिडतो. चौथ्या सेकंदाला डोळ्यात वेडसर खुनशी भाव, पाचव्या सेकंदाला हात वर आणि आवाज चिरकायला लागतो.

>>अरे तुम्ही तिला अजूनही ओळखले नाही.

अरे समोर सोनाली आली असती तरी जयसकट जास्त मेंबर तिच्या बाजुला येऊन तिचे चान्सेस वाढ्ले असते किंवा समोर गायत्री आली असती तरी बी टीममधली सगळ्यांची आणि जय असे परत जास्त मेंबर तिच्या बाजुला आले असते..... एकुणात आत्तापेक्षा जास्त चान्सेस होते तिला जिंकायचे!!
पण ती नको तिथे ओव्हरस्मार्ट बनायला गेली!!

काकू फायनलचे कॉंट्रॅक्ट करून आल्या असणार, त्यामुळे अस नाही तसे bb त्यांना ठेवतोय.

स्नेहा मूर्ख नाही चॅप्टर आहे एक नंबर अस मागे मी लिहिलेलं तेच खरं वाटायला लागलं.

स्नेहाने जयचे नाव का घेतले. मग ती जयला सांगत होती की मला वाटलं तूझं नाव घ्यायचंय. तिला ती जयला कॅप्टनसीसाठी उमेदवारी देतेय असे वाटत होते का. सोनालीने मस्त काडी टाकली. तरी नंतर पकडापकडी चालू होती आणि स्नेहाकाकू सॅंडल घालून बेडवर लोळत होत्या.
मीरा म्हणत होती, सोनाली आणि मीनल किती आठवडे झाले जातच नाहीयेत. ती बाहेर जायचं म्हणत असेल तर मीनल बाहेर जाईल असे तिला वाटतेय का. वाटत असेल तर तिच्यासारखी मूर्ख तिच. सोनालीने टास्क साठी काय ड्रेस घातला होता. स्नेहा जयचं नाव नं घेता काय गोलमाल बोलत होती. सोना चिडलीच पटकन आणि त्यांचीच आपापसात भांडणे चालू झाली. विकास गप्प बसायला सांगत होता तरी सोनाली किती बोलत होती.
काल उत्कर्ष का खेळत नव्हता जेव्हा मीरा बसली होती खुर्चीवर (की यानात?) स्नेहाच्या वेळी बी टीम जशी खेळली तशी आधी का नाही खेळली. गायत्रीला सोनाचा आवाज कर्कश वाटतो, स्वतः जशी कोकिळाच आहे.

टिम ए ला वाटत की गायत्रीला इन्ज्युरी विकासमुळे झाली आहे. कालच्या टास्कमध्ये त्याने तिला धरल होत. विकास मात्र तसे मानायला तयार नाही.

एवढी इन्ज्युरी झाली आहे तरी तिचा चिवचिवाट चालू होता. उत्कर्षने एलियनचा आवाज कधी काढला ते कळलच नाही. मला वाटल एलियनच बोलला.

स्नेहाने धक्काप्रकरण पुन्हा आणल बाहेर गायत्रीच्या इन्ज्युरीच निमित्त घेऊन.

गायत्री दादुसपैकी कोणी जाईल उद्या, ते दोघे लास्ट आहेत. काकू आता फायनलपर्यन्त राहतील.

विकासला शिव्या खायला लागणार म्हणजे या विकेंडला, गा दा त्याच्यामुळे injured झाली असेल तर.

स्नेहाने जयचे नाव का घेतले. मग ती जयला सांगत होती की मला वाटलं तूझं नाव घ्यायचंय. तिला ती जयला कॅप्टनसीसाठी उमेदवारी देतेय असे वाटत होते का. >> कसली महाबनेल बाइ आहे, ज्याच्या मुळे टास्क अनिर्णीत राहिला त्याना कॅप्टनशिप कशी मिळेल त्याना जेल मधेच जायला लागणार हे स्प्श्ट सान्गितल होत तरी आपण त्या गावचेच नाही अस दाखवत होती जेव्हा जयने विचारल तेव्हा गोलमाल उत्तर देत होती आणि रडायची रुसायचि नाटक चालु होती... जय म्हटला ना सोनाली काय म्हणते ते जाउ दे इथे सोफ्यावरही तु क्लियर सान्गत नव्हती तेव्हा म्हणे मला वाटल तुमच नाव घ्यायचय,जयने चिडून विचारल तुला हा गेम कळतो का? तर साळसुदपणे म्हणे मे बी नाही कळत, बी टिमने जिन्कुन दिल तरी लॉयल्टी सगळि ए टिमलाच.
डिस्कशनच्या वेळेस पण जयच नाव तिला घ्यायचच नव्हत तिला वाटत होत की यानी कूणी जयच नाव घ्याव आणी बहुमताचा निर्णय घ्यावा तो डायरेक्ट जाहिर करावा पण विकासला ते कळल त्यामुळे त्याने सोफ्यावर स्प्श्ट सान्गितल की आम्ही तिघ मिरा म्हणतोय पण काकू जयच नाव घेतायत.
उत्क्याने काकुचा फुगा गोड बोलुन फोडला.
बहोत येडा बनके पेढा खा रहि है!
विकेन्ड के चावडी मे ममाके निशाणे पे है--- जय, मिरा आणि विकास, नुसती धुलाई असणार आहे.
हिन्दी बीग बॉसचा टीआरपी जाम घसरला आहे म्हणे त्यामुळे ममा एक विक तिकडे होस्ट करुन वाइल्ड कार्ड एन्ट्री म्हणून बिचकुले ना पाठवणार आहेत... बहुधा हिन्दी बीबॉस वाले स्पर्धक म्हणतिल यानाच बनवा विनर आम्ही जातो घरी.

तिला ती जयला कॅप्टनसीसाठी उमेदवारी देतेय असे वाटत होते का... तीला माहिती होते की हा जेलमध्ये जायचा फुलका टास्क आहे. तिथे खायला प्यायला मिळते. झोपता येते. सेपरेट बाथरूम आहे. महत्त्वाचे टास्क खेळायला बाहेर काढतात. सो जय आत गेला तरी तिचे नुकसान काही नव्हते. मीरा सारख्या बावळट मुलीला डिवचण्यात काय पॉईंट आहे?
खरा टास्क कॅप्टनसीचा होता. तिथे बहुमताचे टास्क असते तर मीराचा सपोर्ट आवश्यक आहे. जय प्रेमाखातर करेलच असे तिचे गणित असणार. जय तरी कुठे फार वेळ रुसला. नंतर प्रेमाचे चाळे सुरू केले की दोघांनी.
उत्कर्षने तिचा गेम केला. मला खात्री आहे जर मीराला दगड मिळाले असते तर बावळटने स्नेहा ला नक्की वाचवले असते. किमान एक तरी तिला दिला असता.
दादूस आणि स्नेहा हे वयाने अनुभवी आहेत. ह्या सगळ्या बच्चे कंपनीला व्यवस्थित गुंडाळूत आहेत.

अच्छा असे होते काय स्नेहाचे गणित. महालबाड आहे म्हणजे ती. विकासने बरे झाले स्पष्ट सांगितले आम्ही तीन मीरा आणि स्नेहा जयचे नाव घेतेय म्हणून. जयला म्हणते मेबी नसेल कळत मला गेम Lol वाह रे निरागसपणा.

स्नेहा सर्वात अनॉयिंग अतिशय चीप बाई आहे !
ती जे नीथा शेट्टीला म्हंटली ती खर तर हिची स्वतःची स्ट्रॅटजी आहे, पुरुषांना गुंडाळून अनएथिकल पद्धतीने पुढे जाणे , जय बरोबर तर कायम डोळ्यात डोळे घालून चावट इशारे !
इतका बेकार आठवडा कुठलाच झाला नाही.. कॅप्टन सिलेक्ट करायचा तर घरातल्या २ मोस्ट अनॉयिंग अनडिझर्विंग बायकां मधून !
टिम बी ने तरी कशाला जिंकून दिला स्नेहाला टास्क.. बनवायचीच नाहीना पाइपलाइन.. चिडचिड नुसती !
गायत्री विकासला ब्लेम करतेय ते चूक आहे, दादुसने ऑलरेडी पिरगाळले होते तिचे हात. स्नेहानी सुद्धा !
पण तिला विकासला ब्लेम करायचेय..खोटारडी आहे आणि जर झेपत नाही तर टास्क कशाला करते , पाठवा तिला घरी !

इतका बेकार आठवडा कुठलाच झाला नाही.. कॅप्टन सिलेक्ट करायचा तर घरातल्या २ मोस्ट अनॉयिंग अनडिझर्विंग बायकां मधून>> सहमत!
मिरा मठ्ठ आहे, तिने हा टास्क विचारपुर्वल खेळला असता तर तिला परत उमेदवारी मिळाली असती पण तिच एकच पालुप्द होत सोनालीला कॅप्टन करायच नाही त्यात तिला उत्क्या घुमवुन ठेवतो.

प्रोमोज मस्त येतायेत, मीरा दादुस स्नेहा जयला तासतायेत म मां.

विकासने धक्का दिला नाही म्हणाले.

गा दा कॅप्टन झाली, म्हणजे दादुस जाणार.

जय , स्नेहा मांजरेकरांना अजिबात भीक घालत नाहीत.
https://twitter.com/ColorsMarathi/status/1462048447029080066
जयचं नाव घेतल्यावर तो बाह्या सरसावून बसला

https://twitter.com/ColorsMarathi/status/1462059380937953290
स्नेहाला ओरडल्यावर तिची रिअ‍ॅक्शन .

ते तर आहेच, दोघे फायनलचं कॉन्ट्रँक्ट करुन आले असणार, त्यामुळे बिनधास्त आहेत.

तरी म मां ओरडले ते आवडलं.

जयला काय अ‍ॅक्टिंगमध्ये करियर करायचं नाहीए. त्याचा सेट बिझिनेस असावा. श्रीमंतीचा माज आहेच. त्यामुळे मांजरेकरांना घाबरत नसेल.

मीराला असे वाटतय की ती टॉप थ्री मध्ये आहे आणि ममा तिला मुद्दाम सांगत नाहीत.
जयला आणि उत्कर्ष ला पण असेच वाटतय तिच्या बद्दल.

सोनाली आणि गायत्री सेफ....

शुअर दादूस जाणार. मला वाटते की उत्क्याला हाकलावे. तसाही तो गेला तर काही फरक पडणार नाही. उत्क्या नाहीतर स्नेहाला घालवावे. पण बिबॉ दादूसना घालवतील.

कसला भयाण मेकअप करतात या मुली..मीरा आणि गादा, शाळेतल्या गॅदरींग सारखा. जुनियर काॅलेजच्या १६-१७ वर्षांच्या निब्बि लोक पण छान मेकअप करतात आजकाल.
एक्स्ट्रा डार्क लिपस्टिक, या जमान्यात.
डेली सोप्स अभिनेत्रींना येवढं येऊ नये.

Pages