Submitted by सूलू_८२ on 19 September, 2021 - 05:02

आजपासून बिग बॉस मराठी ३ सुरु होत आहे. खर तर हा धागा काढायला जरा उशीरच झाला मला!
सो, स्वागत आहे तुमचे, या चर्चा करु या!
मराठी बिग बॉस
आज ७.३० वा.
सोमवार ते शनिवार ९.३० वाजता.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
दादुस सेफ ऐकून फारच आश्चर्य
दादुस सेफ ऐकून फारच आश्चर्य वाटले! सगळ्या प्रेडिक्शन्स खोट्या ठरल्या की
मग आता नीता किंवा सोनाली? उत्क्या ला सिक्रेट रूम इ. केले तर ते लक्षात येण्याइतके सर्व सदस्य हुषार आहेत.
मला सोनाली एवढी वाईट नाही
मला सोनाली एवढी वाईट नाही वाटत. तिच्याआधी नक्कीच दादूस, स्नेहा आणि गायत्री जायला हवेत. एक तर हे तिघे कुठलाही स्वतःचा स्टॅंड कधीही घेत नाहीत आणि सोनालीपेक्षा नक्कीच कमी एंटरटेनिंग आहेत.
बाकी, उत्क्याचे ग्रह खरेच फिरले आहेत. त्याचे पत्ते सगळे निकामी ठरताहेत.
विशाल विकास आर रॉकिंग!!
स्नेहा वरचेवर अधिकाधिक गर्तेत जातेय.
मीनल नक्कीच टॉप ३ मध्ये असेल.
मीराला आता जयच्या पुढे हात पसरण्यावाचून गत्यंतर नाही.
गायत्री इज गुड फॉर नथिंग ॲंड शी हॅज ॲक्सेप्टेड इट, इट सीम्स.
दादुसला वोटींग पण कमी होतंना.
दादुसला वोटींग पण कमी होतंना. यावेळी तेच जायला हवे होते. सोनालीलाच घालवतील बहुतेक. स्नेहा, गा दा सोनाली आधी जायला हव्यात असं मलाही वाटतं.
सोनाली यावेळी किरकिर जाम करत होती बहुतेक. पाटी नव्हती घालायची तिने गळ्यात एवढं होतं तर.
दादुस खरंतर आदीशच्या वेळीच जायला हवे होते पण त्यांचा वशिला जबरी दिसतोय, यावेळी तर काय टक्कल केलं जयसाठी, मग लगेच ठेवलं बिग बॉसने.
महेश नी त्याच्या मतानुसार
महेश नी त्याच्या मतानुसार दिलेले क्रम बघितले ....सोनाली ११ नंबर वर सांगितले म्हणजे सोनाली नाय जात ... दुसऱ्या कुणाचीच विकेट पडली असावी ....
उत्कर्ष ?
स्नेहा पुढच्या आठवड्यात...
स्नेहा पुढच्या आठवड्यात...
त्या विकासच्या डोक्यावर
त्या विकासच्या डोक्यावर टांगती तलवार का ठेवतात, तो दुसरा असेल ना वोटींगमधे मग दोन वि आणि जय सेफ सांगायचं होतं. दादुसला कुठुन आणला मधेच.
स्नेहा पुढच्या आठवड्यात... >>> तुमचं खरं होऊदे.
स्नेहाचा मेन्दु काढून
स्नेहाचा मेन्दु काढून तपासायला द्यायला पाहिजे, ममानी एवढि पिस काढली तरी नतर हसत होती, निर्लज्जम सदा सुखी, तिने जे निथा विषयी बोलल ते एकल्यावर निथा आणी बी टीम अवाक होती.गायत्रीला पण आश्च्र्य वाटल होत, निथा प्रचन्ड फ्युरियस होती तिचा चेहरा साफ पडला होता... माझ्यामते तर तिने तिथेच स्नेहाला सुनवायला हव होत.
बाकी मिराला माहिती असतच की तिला कशावरुन बोलणे बसणार आहेत , त्यामुळे सरानी बोलायच्या आधिच रडक तोन्ड घेवुन बसते, आज सगळ्यात जास्त निराश तर मास्टरमाइन्ड झाला होता रॅन्किन्ग एकल्यावर त्याचा चेहरा जो पडला एकदम लॉस्ट वाटत होता तो पुढे...विकासही नाराज होता, आता इन्डीव्युजल गेम खेळायला हवा प्रत्येकाने.
विकासला सर तेवढ अॅप्रिशियेट करत नाहित अस वाटत राहत, मिनलला सरानी मुलिसारख म्हटल ती भारी मोमेन्ट होती.मिनल रॉक्स!
मिनल-विशालचा समेट घडवायचा प्रयत्न केला त्यानी पण फार उपयोग नाही झाला ,मिनलचे एक्स्प्लेनेशन गोलगोल फिरत होते नक्की काय म्हणायचय ते काय कळत नाही.
दादुस वाचले म्हणजे सोनाली जाणार की काय? युट्युबवर वोटिन्ग ट्रेन्ड मधे दादुस सगळ्यात शेवटी आहेत सान्गत होते सेकन्ड लास्ट उत्कर्ष होता अस वोटिन्ग ट्रेन्ड् मधे म्हणतायत... नक्की काय ते उद्या कळेलच.
विकासला सर तेवढ अॅप्रिशियेट
विकासला सर तेवढ अॅप्रिशियेट करत नाहित अस वाटत राहत >>> मलाही वाटतं.
स्नेहावर चिडले, गा दा ला काडी टाकणारी म्हणाले ते प्रोमोज बघून जीवाला शांतता लाभली.
जितके स्नेहा वर चिडायला
जितके स्नेहा वर चिडायला पाहिजे तितके मीरा वर चिडले... आणि जितके मीराला बोलायला पाहिजे तितके स्नेहा ला बोलले...
ममानी विकास- विशालची केस
ममानी विकास- विशालची केस कापले म्हणून तारीफ नाही केली पण दादूसची स्तुती केली. उलट विविना टक्कल का केली हे विचारल.
सोनाली आऊट होईल असे वाटते.
सोनाली आऊट होईल असे वाटते. आधी तिला सांगायचे तरी कि फक्त रुसवे-फुगवे आणि कुजबुज करू नकोस आज तर तेव्हढेही नाही बोलले.
होना सुलु, केलं नसतं तर
होना सुलु, केलं नसतं तर टास्क खेळला नाहीत तुम्ही, अर्धवट सोडलात म्हणाले असते. दोन वि मधे भांडण लावायला बसलेत.
च्रप्स यावेळी मीरा जाम चुकलीय त्यामुळे चिडले असतील तर बरोबर असेल पण आधी बरेचदा मीरावर उगाच उखडलेत, तिची आवळ्याएवढी चूक असेल तर भोपळ्याएवढे भडकलेत, असं मला वाटतं.
जर दादुस वाचु शकतो तर सोनाली
जर दादुस वाचु शकतो तर सोनाली पण टिकून राहिली. नीता जाईल कदाचित.
युट्युब चॅनेलवाले सांगतात
युट्युब चॅनेलवाले सांगतात त्या वोटिंग ट्रेंडवर विश्वास नका ठेऊ. पाच पैशे जास्त मिळावेत म्हणून काहीही ठोकून देतात आणि लोकांची दिशाभूल करतात. खरे व्होटिंग काय आहे हे कलर्स शिवाय बाकी कोणालाही माहीत नसतं.
सोनाला अक्कलच कमी आहे.
सोनाला अक्कलच कमी आहे. काहीतरी बरळत असते. जाऊदेच ती. अब आयेगा मजा.
स्नेहाला लाजच नाहीये. अत्यंत नाटकी वाटते ती.
मीरा कधी आवडते कधी संताप येतो पण स्नेहापेक्षा बरी वाटते. टास्क तरी खेळते.
दादूसला सेफ करून जे युट्युबर
दादूसला सेफ करून जे युट्युबर लोकांना सांगत होते दादूस शेवटी आहे आणि बाहेर जाणार अशा दिशाभूल करणाऱ्यांच्या पेकाटात कलर्सने चांगलीच लाथ हाणले.
आपल्याच हजार एक चंगु मंगू सबस्क्रायबरची मतं घ्यायचे आणि लोकांना सांगायचे हे बघा व्होटिंग ट्रेंड. ऍक्ट रायडर आणि अजून एक दोन जण आहेत. पब्लिक चांगलंच भडकलंय त्यांच्यावर.
स्नेहावर फारच सौम्य स्वरूपात
स्नेहावर फारच सौम्य स्वरूपात चिडले अस वाटतय! अन वरून अजून शेवटी तुमचं चालू दे जे काय चाललंय अश्या अर्थाचे म्हणाले. पण बाई एवढं होऊनही खदाखदा हसत होत्या.
विशालला काय म्हणे, तुला कशावरून वाटलं स्नेहा तुला मत देईल. काय तरी पुचाट पॉइंट्सवर बोलत राहायचं.
गादाचे एकच ड्रेस घालतेय म्हणून केवढं कौतुक अन वि वि च कौतुक का नाही?
मीरा कधी आवडते कधी संताप येतो
मीरा कधी आवडते कधी संताप येतो पण स्नेहापेक्षा बरी वाटते. टास्क तरी खेळते.>>>
+1
स्नेहावर फारच सौम्य स्वरूपात चिडले अस वाटतय!>>> हो. त्यामानाने मिराला फारच बोलले. ती शेवटी म्हणाली की असं काहीच न बोलता मी नाही राहू शकणार. मला काय वाटतं ते मी मैत्रिणीकडे बोलणारच की. तेव्हा एकदम बिचारी वाटली. तसं तर सगळेच बोलतात की. स्नेहा सारखी हापा जयकडे येऊन तक्रार करत असतेच की. सोना मोना बोलतातच की. उत्कर्ष जयपण सतत बोलत असतातच.
विशालला काय म्हणे, तुला
विशालला काय म्हणे, तुला कशावरून वाटलं स्नेहा तुला मत देईल. काय तरी पुचाट पॉइंट्सवर बोलत राहायचं.>>> +१
मग तर बिग बॉस ला तरी कशावरून वाटलं की विशाल जिंकेल... उगाच टास्क करवला. सरळ जयला विनर जाहीर करून टाकायचं आवाजी मतदान घेऊन. तो जिंकणार हे क्लिअरच होते.
या आठवड्यात सोनालीला जर
या आठवड्यात सोनालीला जर काढायच असेल ते ही ती बॉटम3.मध्ये नसताना,कंटेंटचा मुद्दा पकडून,तर दादूसपेक्षा ती नक्कीच कंटेंट देत आहे.मग आधीच्या आठवड्यातच काढायच होत ,त्रुप्तीला ठेवून,कारण त्यावेळी त्या दोघी एकतर बॉटम2 मध्ये होत्या आणि कंटेंटप्रमाणे त्रुप्ती कक्कीच बेटर होती.
वोटिंग ट्रेंड बोगस नाहीत,आतापर्यंत ते खरे ठरत आले आहेत.
कदाचित नीथा जाईल,पण ममां बनवत तर नाहीत ना,प्रँक वगैरे नसेल ना,तस असेल तर दादूसबद्दल खरच वाईट वाटेल.
परवा ती पाटी गळ्यात
परवा ती पाटी गळ्यात घालण्याआधी स्नेहा सारखी जयला विचारत होती - किती आठवडे झाले इकडे येऊन? तेव्हा
ती मिनिमम स्टे गॅरंटी घेऊन आली असावी अशी शंका आली मला. म्हणजे पहिले सहा/सात आठवडे बाहेर काढणार नाहीत असे काही करार करून आली असेल का?
दगडापेक्षा विट मौ या न्यायाने
दगडापेक्षा विट मौ या न्यायाने स्नेहा पेक्षा मिरा परवडली अस म्हणायची वेळ येते, बाकी ही चौकडी निगरगट्ट झालिये बोलणी एकूण एकुण, जयच सन्चालन फेअर होत कारण टास्क लक्झरी बजेटचा होता हाच निर्णायक असता तर केलिच असती की चालूगिरी.
>>मांजरेकरांनी क्रम सांगुन
>>मांजरेकरांनी क्रम सांगुन गम्मत घालवली.
अगदीच!! म्हणजे आपण इथे क्रम लिहणे किंवा लोकांनी FB/Twitter वर लिहणे ठीक आहे पण होस्टनी तो डायरेक्ट आतल्या स्पर्धकांना सांगणे अज्जिबात संयुक्तिक वाटत नाही!!
आतल्या लोकांच्या मोरालवर खुप जास्त परिणाम होईल याचा..... तुम्ही चांगले खेळताय, लोकांना आवडताय किंवा तुम्ही वाईट खेळताय इतपत ठीक आहे पण डायरेक्ट पहीला ते अकरावी सांगण्यात काय मजा?
सारखेसारखे बांडगुळ, काकू वगैरे म्हंटलेले पण बरोबर वाटत नाही..... भले आतल्या लोकांचे कितीही चुकत असुदे पण हे national televison वर खुप अपमानास्पद आहे!!
सोशलमिडियावरचे ट्रोल्स आणि शो चे होस्ट यांच्यात काही फरक असूद्या!!
जय कधी नव्हे ते फेअर खेळला आणि त्याचा मांजरेकारांनी उल्लेखपण केला नाही हे बघून न राहवून विचारलेच त्याने!! सोनाली पण अशीच करते (माझ्याबद्दल काहितरी बोला टाइप्स आर्जवे) विशाल आणि विकास हे कधीच करताना दिसत नाहीत..... मीनलपण मांजरेकर तिच्याबद्दल काही चांगले बोलत असताना लगेच व्होकल दुजोरा देत बसते..... अग समोरचा तेच बोलतोय.... शांतपणे ऐक ना!! नावे ठेवत असला तर एकवेळ ठीक आहे पण चांगल्र बोलत असताना पण त्यावर स्वताचे एक पावशेर कशाला??
मांजरेकरांनी स्वता डायरेक्ट आरोप करण्यापेक्षा वकिली खाक्याने बोलण्यात गुंडाळत नेउन पोकर फेसने आतल्यांकडूनच चुका वदवून घेतल्या पाहिजेत म्हणजे आतल्यांना मी? कधी? कुठे? असले हावभाव करायला स्कोपच नाही राहिला पाहिजेल!!
नीथा एव्हिक्ट झाली आहे.(90%
नीथा एव्हिक्ट झाली आहे.(90% बातमी अँक्ट रायडर्सवाल्या मंदारने सांगितल आहे)
बिबॉसने ठरवल असाव,की या वेळी वाईल्डकार्डला न्यायच नाही.म्हणजे आता
जय,विकास,विशाल,मीनल,उत्कर्ष ,मीरा हे टॉप 6 समजून जायला हरकत नाही.
टॉप 2 जय विशाल,विशाल विकास, सांगता येत नाही.
पण विनर विशाल निकम
आता बिबॉस म्हणजे एक फॉर्मँलिटी उरली आहे,राहिलेल्यांपैकी कोण कधी जात ते बघाव.
बाकी बिबॉस यावेळी सदस्यां
च्या इच्छा पूर्ण करत आहे,नीथा म्हणालीच होती की गेम फेअर होणार नसेल तर मला नाही खेळायच,मला जाऊ देत,लगेच ऐकल.
त्याआधी सारंगे म्हणाली की मला कँप्टन व्हायच आहे,लगेच केल
आता काल म्हणाली आहे की पुढच्या आठवड्यात मी.हे पण ऐकाव बिबॉसने.
फँमिली विकसाठी नको ती।
स्नेहा किती निर्लज्ज आहे ,
स्नेहा किती निर्लज्ज आहे , काही अक्कलच नाही.. ममा सिरीयसली ओरडत होते तिला , इन्सल्ट वाटण्या ऐवजी लाडालाडात बोलत होती सर मला नका ना रागवु. गाणी म्हणा
ममांचे रँकिंग बर्यापैकी आपल्या सारखेच होते, सोनालीने आता तरी जागे व्हावे !
दादुस फार टिकलेत, आदिश - नीथा अगदीच व्हेकेशनला आल्या सारखे आणले थोडक्यात !
बायदवे एखादी गोष्ट बारकाईने
बायदवे एखादी गोष्ट बारकाईने बघण्यासाठी आपण स्लो स्पीडवर बघतो ना की हाय स्पीडवर?
हाय फ्रेम रेट असं म्हणत होते
हाय फ्रेम रेट असं म्हणत होते ते, हाय स्पीड नाही.
पहिल्या हंगामातले वाइल्ड
पहिल्या हंगामातले वाइल्ड कार्ड भारी होते. किशोर आणि शर्मिष्ठा. तो 'नशिबानं गंडवलंन' वाला असाच पटकन गेला होता पण किशोर आणि शर्मिष्ठाने चांगलाच जम बसवला होता. किशोर टास्क भारी करायचाच पण चांगलाच कंटेंट द्यायचा. आदिशला काढलं नसतं तर मजा आली असती.
बादवे, यंदा डिक्टेटर टास्क नाही वाटतं. किशोरने भारी केलेला. सेम इदी अमीनचं बेअरिंग.
>>हाय फ्रेम रेट असं म्हणत
>>हाय फ्रेम रेट असं म्हणत होते ते, हाय स्पीड नाही.
म्हणायचे त्यांना काहीही असूदे पण ते म्हंटले हाय स्पीडच!!
आणि जरी अगदी हाय फ्रेम रेट असले तरी ते चुकीचेच आहे ना..... जनरली sports मध्ये सुद्धा आपण action replay बघतो तेंव्हा तो slower frame rate (less frames per seconds) च असतो ना? जेणेकरुन आपल्याला exact deciding moment capture करता येईल.... डीटेल्स बघता येतील!!
आणि जरी अगदी हाय फ्रेम रेट
आणि जरी अगदी हाय फ्रेम रेट असले तरी ते चुकीचेच आहे ना..
>>>> नाही तसं नसतं. नॉर्मल फ्रेम रेट 24fps असतो आणि जे स्लो व्हिडिओ असतात त्यांचा 60fps पासून पुढे सुरू होतो. जेव्हढा फ्रेम रेट जास्त तेव्हढा व्हिडिओ स्लो आणि फ्रेम जास्त ड्रॉप न होता क्लिअर येतो. मला वाटतंय त्यांनी आकडा पण सांगितला गमतीत किती फ्रेम रेटने बघतात ते. तुम्ही म्हणताय की स्पोर्टसमध्ये स्लो फ्रेम रेट असतो तो बरोबर आहे. क्रिकेटमध्ये 24fps ने रेकॉर्डिंग होत असावी आणि आपण रन आऊट होताना स्लो मोशनमध्ये बघतो त्यामध्ये फ्रेम पण ड्रॉप होतात. त्यामुळे बऱ्याचदा अंपायर पण गोंधळून जातात की पोहचला असेल की नसेल. तेच जर हायर फ्रेम रेटने बघितल तर अंपायरला अजून क्लिअर होईल. आणि तोच हायर फ्रेम रेटचा कन्सेप्ट काल ममा बोलत होते.
Pages