मराठी बिग बॉस तिसरे पर्व

Submitted by सूलू_८२ on 19 September, 2021 - 05:02

आजपासून बिग बॉस मराठी ३ सुरु होत आहे. खर तर हा धागा काढायला जरा उशीरच झाला मला!

सो, स्वागत आहे तुमचे, या चर्चा करु या!

मराठी बिग बॉस

आज ७.३० वा.

सोमवार ते शनिवार ९.३० वाजता.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

स्नेहा एकच उमेदवार आली.पण दुसरा असायलाच हवा असा नियम आहे.
मग सारंगेने जयच्या टीमकडे चोंबडेपणा केला की बहुमत असेल तर सोनालीने त्यांच्या ग्रुपमधून तिला उमेदवारी द्यायला सांगितले आहे,त्यावर ते टीमने अर्थातच खोडून काढल.
पण उद्या बिबॉसने काही सदस्यांना टास्क मुद्दाम अनिर्णित करत असल्याच्या कारणावरून जेलमध्ये टाकले आहे.
तुपारेला काही इंज्युरी झाली आहे का.
उद्या पहिल्यांदाच बहुतेक कन्फेशन रुममध्ये तिला बोलावले आहे.
नंतर मला खूप वाईट वाटत आहे अस चांडाळ चौकडीला सांगून रडत होती.

आजच्या कलकलाटात कोण काय बोलत होत तेच कळत नव्हत. विकासने म्हणे मुलीन्ना शिव्या दिल्या, सोनाली मीराला फिजीकल प्रॉब्लेमवरुन बोलली वै वै. मीराला कुठला फिजीकल प्रॉब्लेम आहे?

स्नेहाने रडून रडून कॅप्टनशिप उमेदवारी मिळवली.

दादूस फनी होते आज. ते आरश्यात बघून दिल क्या करे भारी होत. नन्तर टास्कमध्ये विशाल त्यान्ना म्हणाला ते तर भन्नाटच! विशाल-

" दादूस हा टास्क आहे. लाडात येऊ नका? दादूस- हो का, मग ठीक आहे. हा हा हा हा

बी टिम ए टिमशी भाण्डत असताना विशाल कोपर्यात बसून मिश्किलपणे हसत होता.

स्नेहाला एकटीलाच उमेदवारी मिळाली.म्हणजे टीम ए ने बीची पाईपलाईन तोडली नाही.बाकी मीरा,जय विशाल बाद झाले.त्यामुळे टीम बी जिंकली आणि स्नेहा उमेदवारी मिळाली.पण दुसरा उमेदवार आवश्यक आहे असे बिबॉसने सांगून त्याबाबतचा निर्णय आज होणार आहे.

ओके. पण विकास ला दगा दिला जयने. कारण विकासाच्या वेळी पाईप फोडणार नाही असे ठरले होते.
विकास दरवेळी त्यांच्या वर विश्वास ठेवतो आणि तोंडावर पडतो.

तुपारेला तीन आठवडे टास्क न करण्याचा सल्ला बिबॉसने दिला आहे.तिला काय झाल,कालपर्यंत तर मँडम फुल फॉर्ममध्ये होत्या.
तसही सोमिच्या लेटेस्ट न्यूजनुसार परत सारंगे कँप्टन.झाली आहे,म्हणजे नक्की खात्री नाही पण असेल तर डेंजर झोन मधून बिबॉसने सारंगेला सेफ केल.
आता दादूस पेक्षा तुपारेला थोडी जास्त वोट्स आहेत,म्हणजे राहिलेल्या दोन डेंजर झोन स्पर्धकांपैकी तुपारेला सहज बिबॉसला बाहेर काढता येईल,तसही बिबॉसला तिलाच या आठवड्यात बाहेर काढायच होतच,मस्त कारण मिळाल.
पण दादूसला का ठेवत आहे बिबॉस ,कळत नाही.सारंगेच जयक्रुपा आहे,समजत.पण दादूस का?

विकासने गायत्रीला आणि सोनालीने मीराला स्नेहा रॉकेटमध्बये बसलेली असतानाच अडकवून ठेवलं होतं ना?

शेवटचा डाव मीराचा होता तेव्हा ए वाल्यांनी टेप लावून पाइप चिकटवले होते.

मीरा उत्कर्षला कानात सांगतो होती - आम्हांला हवं तेच झालंय असं बोलू का? ( स्नेहा त्यांचीच म्हणून) उत्कर्षचा चेहरा एरंडेल प्याला सारखा झाला होता.

कालपण सोनाने मजा आणली. आधी मिनल आणि तिची रात्रीच्या जेवणावरुन चर्चा चालु होती तेव्हा..मिनल ने बडबड केली तरी नो रीअ‍ॅक्शन आणि मग एकदम... " आता बोलायचय का मी ? " ..फस्कन हासु येतं तिच्या टोन आणि डायलॉग ला...
टास्क मधे मीरा ला मस्त भिडली..मीरा ची नुसती चरफड झालेली काल.... स्नेहा बाई ने रडुन गोंधळ घातला....जय चिडल्याचं जास्त रडायला आलं बाईंना.....विकास तिला काय बोलला त्याने तिला कितपत फरक पडत असेल देव जाणे...
स्नेहा ला कॅप्टन उमेदवार करु द्यायला मीरा आणि गादा का तयार झाल्या ते कळलं नाही मला... मीरा , गादा फक्त आणि फक्त जय म्हणेल तेच कसं काय करतात ?
विकास चिडला तेव्हा विशाल भाउ शांत का बसुन होते ? विकास ला म्हणाले की तुझी एनर्जी वाचव नको भांडु
सगळं शांत असताना उकरुन काढायचं म्हणुन जय नंतर आला विकास शी भांडायला... मागे पण "डोकी फोडा" वरुन त्याने हेच केलेलं..
विकास रागात असताना सुद्धा त्याचा आवाज, टोन आणि मुद्दे बरोबर बोलतो...बाकीच्यांचे खासकरुन जय चा आवाज लगेच चिरकायला लागतो.

गादा ला काढायचं नक्की केलय बिबॉ ने... ३ आठवडे गळ्यात हात घालुन बसायचंय तर इथे कशाला ..घरी बसेल ना... .. गेम खेळायचा नसेल तर बिबॉ च्या घरात बसुन काय फायदा.
तिला घालवण्यासाठी मेडीकल चं कारण देतील म्हणजे तिच्या सो कॉल्ड इमेज ला पण धक्का नको लागायला...

<<जय आणि उत्कर्षचे आवाज बसले<< हो ना... जय तर नंतर नंतर नुसता भ्या भ्या ... करत होता. काही कळत नव्ह्ते.
सोनानेही भारी टशन दिले मीराला Biggrin

बिबॉ बहुधा स्नेहाची इमेज चांगली बनवण्यासाठी प्रेक्षकांची सिंपथी तिला मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत. ३-४ दा रडतांना दाखवली तिला. पण खरोखर बिचारी वाटली. म्हणजे तिने काय गादाचा हात मुद्दाम सोडला नव्ह्ता. पण विकास तिच्यावर ओरडल्याने, तिचे जे रडणे होते ते नाटकी वाटले नाही.

मला बी टीम चा निर्णय फारसा पटला नही, कशाला स्नेहाला करतायत कॅप्टन? ती गोड बोलून फेवर घेते पण नंतर कधी परतफेड करताना दिसत नाही. त्यामागे काही स्ट्रॅटेजी होती का असंच आपलं टास्क जिंकायच्या मागे लागले ते कळत नाही.
खेळले मस्त पण. सोनाली या आठवड्यात भारी खेळतेय. काल मस्त मीराला उचकवले Happy अ‍ॅक्चुअली दादुस पण नॉट बॅड. तेही खेळत आहेत टास्क्स.
मी काल मुद्दाम गायत्रीकडे लक्ष देऊन बघत होते पण कुठेच तिला काही दुखापत झाल्यासारखे वाटले नाही. हात गळ्यात अडकवण्याइतके कधी लागले तिला?

विशाल- विकासचा भांडणात ही सेन्स ऑफ ह्युमर शाबूत असतो. काल उत्कर्ष लोलवतो म्हणाला तर विकास त्याला म्हणतो लोळवतो म्हणालो लोलवतो नाही , ह्यानंतर उत्क्याने भयंकर चरफड केली Lol
तर दुसरीकडे विशाल बसला होता तेव्हा
मीरा विशाल ला - तू हट
विशाल - तू हाड
मीरा- हट म्हटलं मी
विशाल - मग तू हट Lol

हो ते हट आणि हाड भारी मजेशीर होतं Lol
लाडात येऊ नका दादूस Lol
सोना: ती कोण मोठी जहागीरदारीण आहे का तिचं ऐकायला Proud
सोना: मग काय खाली झोपून बोलायचं का तुझ्याशी Happy
सोना पैलवानासारखे दंड आणि मांडी थोपटत मीराला आव्हान करत होती तेही भारी होतं. मीराच्या फक्त तोंडातच दम आहे.

मुळात उत्कर्ष विकासला बोलायला लागला की जे करतोय जे बोलतोय ते तुला बरोबर वाटतय का.. पण एकदाही जयला समजवण्याचा प्रयत्नसुद्धा करता येत नाही... जय घाणेरडे हातवारे करतो.. तुझ्यासारख्याला मी कामावर पण ठेवणार नाही म्हणतो त्याकडे सोयीस्कर पणे काणाडोळा करतो.. आणि विकास थिल्लर आहे साले म्हणाला त्याचा इश्यू केला... असो.. मग इथे सोनाली पाहीजे बोलायला... कोन हाये तू? हायेस कोन तू? Rofl
ममांनी यावर त्याला बोलायलाच पाहिजे

१. आपण स्नेहाला मुर्ख म्हणतो पण सगळ्यात चालू तीच आहे. सगळे फायदे काढून घेते ती. जयच्या जीवावर उड्या मारते पण कधीच त्याच्या भांडणात किंवा मारामारीत साथ देत नाही. दादूस, जय, विशाल सगळ्यांना वापरून घेते.
२. मीरा खरंच बावळट आहे. स्नेहाला कॅप्टन बनवण्यात तिला काय फायदा दिसतो काय माहित.
३. उत्क्याला दादूस तो जेव्हा नॉमिनेशनला येईल तेव्हा हवाय नॉमिनेशनमध्ये. ह्या दादूसचे पण ग्रह मानले पाहिजेत. काहीही न करता 'हो बेटा. असंच आहे बेटा. आपण मजा करू. ते काय आपण ठरवलंय तसं करू.' असं काही तरी गोलमाल बोलून ठिय्या मांडून बसलेत.
४. गायत्री या आठवड्यात नक्कीच जाईल. उत्क्याला अंदाज आलाय. म्हणून तो तिला हिडीसफिडीस करतोय.
५. विकास भारीच उचकवतो जयला. जय उत्क्या त्याच्यापुढे गळपटले भांडता भांडता.
६. या आठवड्यात मीनलला फारच कमी फुटेज मिळालं. ५०% तर सोनालीच दिसली.

<<विशाल- विकासचा भांडणात ही सेन्स ऑफ ह्युमर शाबूत असतो. >>
हो. विशेषतः विकास. इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे त्याचं. डोकं चांगलं चालतं. उत्क्याची उरलीसुरली काढून टाकणार आहे तो. विशाल मात्र उत्क्या-जयशी थेट पंगे घ्यायला जात नाही शक्यतो.

अँक्ट रायडरनुसार तुपारे अचानक लास्ट नंबरवर आली आहे आणि सारंगे 5वर गेली आहे.
स्लिंग घालण्याएवढ काय झाल की आपल्याला दाखवल नाही?
पण काही सोमि न्यूजनुसार तुपारे कँप्टन झाली आहे,टास्क तर 3 आठवडे खेळायचा नाही आहे.
म्हणजे हिला काढायच,मग कँप्टन आहे म्हणून जाताना स्पेशल पॉवर द्यायची की दुसर्या कुणालाही कँप्टन कर.मग ही मीरा किंवा जयला करणार ,मीराला केल तर मीरा नॉमिनेशनमधून बाहेर.
हाच गेम आहे का बिबॉसचा

ऍक्ट रायडरच्या म्हणण्याप्रमाणे मागच्या आठवड्यात दादूस जायला पाहिजे होते. या असल्या बेरोजगार युट्युबरर्स वर जास्त विश्वास ठेऊ नका. पाच पैशे जास्त मिळावेत म्हणून काहीही व्हिडिओ टाकतात.

त्याचे एक जाऊ द्या पण एकंदरीतच सोनालीला बाहेर खुप जबरदस्त सपोर्ट दिसतोय..... आणि ती खेळतीय पण चांगली या आठवड्यात!!

गेम पॉईंट ऑफ व्ह्यू ने पाहिले तर तिन्ही बायका टिकल्या तर बिग बॉस चा फायदा आहे. 1. सोनाली अचानक चांगले खेळायला लागली 2. स्नेहा चालूगिरी आणि जय बरोबर फालतू चाळे करायला 3. गायत्री आणि मिरा चेंजिंग रिलेशनशिप आणि त्यातून निर्माण होणारे नाट्य.
दादूस ला ठेवले तर आता लोकांना सवय झालेली आहे, यापलिकडे काही फायदा नाही.

गायत्री च्या बाबतीत माझा एक अंदाज असाही आहे की तिच्या घरच्या लोकांनी विनंती केली असेल काढा म्हणून, कारण फारच मानहानी होत आहे तिची.

स्नेहा सुमडित कोन्बडी आहे,सगळ्याशी चान्गल ठेवुन बरोबर स्वतःचा फायदा करुन घेतेय.मिराला ते कळत नाहिये पण उत्कर्षला कळलय तरी त्याला चरफडत राहाव लागतय.
गायत्रीला मिरा-उत्कर्श ने डिस्कशनच्या बाहेर ठेवल तरी तिला कळल नाही का? काल भान्डत होतिच की याच्या बरोबरिने, जयची वकिली करायला सगळे तयार असतात काल विकास सगळ्याना पुरुन उरला.जयचा आवाज बसला पार!!
सोनालीच्या मेकपची फार चर्चा होते पण स्नेहाही करते की मेकप्,एकदरित स्नेहा साठी बिबॉस फारच सॉफ्ट कॉर्नर आहे बुवा!

स्नेहा येडी आहे..... जयचे नाव घेऊन स्वताच्याच पायावर धोंडा मारुन घेतला तिने; नाहीतर तिचा कॅप्टन्सीचा चान्स वाढला असता!!

Pages