मराठी बिग बॉस तिसरे पर्व

Submitted by सूलू_८२ on 19 September, 2021 - 05:02

आजपासून बिग बॉस मराठी ३ सुरु होत आहे. खर तर हा धागा काढायला जरा उशीरच झाला मला!

सो, स्वागत आहे तुमचे, या चर्चा करु या!

मराठी बिग बॉस

आज ७.३० वा.

सोमवार ते शनिवार ९.३० वाजता.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

गा दा शी बाकी कोणी कसंही वागोत पण मीराने नीट वागायला हवं, त्या दोघींची जोडी होती. एकजण बाहेर पडेपर्यंत दुसरीने साथ सोडता कामा नये.

एवढे करून गायत्रीला समजले का पण हे लोक तिच्याशी तसं वागतायत ते. ती तरी पण हात दाबत बसेल त्यांचे. किती ती लाचारी. विकास म्हणत होता ते करेक्ट होतं. हीचे घराघरात पोचलेलं नाव आहे आणि असे काय लोकांचे हात पाय दाबते इथे.
मीरासुद्धा उत्क्यासाठी बलिदान देतेय पण उत्क्याने हेच का नाही केले तिच्यासाठी? ती उत्क्याला लट़कतेय फ्युचर सपोर्ट साठी. एका व्हिडिओत उत्क्या म्हणतो दादुस तुमच्यासाठी नॉमिनेट झालो तरी हरकत नाही. अरे मग काल त्याला का नाही दिली बॉटल? ममांनी हे बोलाय्ला पाहिजे शनिवारी Happy अर्थात बांड्गुळांना ते कळून पण न कळल्यासारखे दाखवतील.

काय केलं मीराने गादाबरोबर. सो कू आणि गोडबोले आल्या होत्या ते थोडं आणि ढोम्या चांदेकर आले होते ते थोडं बघितलं. चांदेकर जयला का चढवत होता तू महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेस वगैरे बोलून, जय आधीच गर्विष्ठ आहे. मीनल आणि विशालने मिठी मारली ते आवडलं. स्नेहा तर जयच्या अंगावरच चढून बसली मिठीच्या नावाखाली. रेशम आणि राजेश होत चाललेत हे दोघे.

विकास म्हणत होता ते करेक्ट होतं. हीचे घराघरात पोचलेलं नाव आहे आणि असे काय लोकांचे हात पाय दाबते इथे.>> हो पन ते चुगलित वाचताना वेगळच वाटल गायत्रिला, विकास बिचारा गायत्रिच्या इमेजसाठि बोलला पण झाल भलतच!
विकेन्डची चावडी आवडते पण काहिवेळेस चुगल्या दाखवुन आणी ममा पण सगळ्याची खुसर पुसर सान्गुन सगळा गेम फोडुन टाकतात अस वाटत.

काय केलं मीराने गादाबरोबर. >>> माहीती नाही, पण यु ट्युबवर मीरा उत्क्या आणि जय एकत्र आणि गा दा ला वेगळं पाडलं असं दिसलं, व्हीडीओ बघितला नाही, टायटल आणि फोटो वरुन समजलं, ख खो माहीती नाही.

https://www.youtube.com/watch?v=4YsoRIegEOM हा तो व्हिडिओ. मीरा, उत्कर्ष, जयने गायत्रीला वाळीत टाकलं का, अस टायटल आहे, आत्ता बघितला.

आत्ता कालचा एपिसोड बघितला. टास्क बघितला फक्त. लय भारी बी टीम, शक्ति आणि युक्ति दोन्हीचा उत्तम वापर केला. गायत्री जाम भिडली होती, चांगलं खेळली ती पण विशालसमोर काही चालले नाही. विशाल एक नंबर सर्वात, तात्याला सलामी पण छान देत होता आणि शेवटी उतक्याला मस्त लॉक केलं दोन वि नी की बास रे बास, जयची फालतू बडबड चाललेली. मीनल मस्त दोन वि च्या bottles लावण्याचे काम करत होती, हॅट्स ऑफ टीम बीला.

बी टीम हरली अथवा जिंकली तरी आपल्या मनात तीच. ह्या टास्कमध्ये जिंकून कमाल केली.

सोकुलचा मेकअप भयाण होता.

विशालने गायत्रीला जॅकॅट दिल ते गेश्चर आवडल. तिचा ड्रेस झटापटीत फाटला.

'तेरे मस्त मस्त दो नैन' गाण्याचे ईमोजीस किती कठीण होते? उत्कर्ष-मीरा ने कसे काय ओळखले?

मीरा- मीनलचे इक्वेशन काही कळत नाही मला काल भाण्डत होत्या एकमेकान्शी, आज टाळया देत होत्या एकमेकान्ना.

मीरा गायत्रीच स्नेहाशी पॅचअप झाल का?

सोनालीला किचन टास्कवरुन प्रत्येकाशी भाण्डायच असत. आधी सुरेखाताई, मग तृप्तीताई, आणि आता मीरा.

एवढे करून गायत्रीला समजले का पण हे लोक तिच्याशी तसं वागतायत ते. >>>>>> कळल असेल. गायत्री आज वेगळया बेडवर झोपलेली दिसली.

मीरा म्हणत होती की गायत्री सतत तिच्या मागे मागे असते. तिला हलूही देत नाही. तिला एकटीला स्पेस हवीये तेही देत नाहीये.

उत्कर्षने मीराला सांगितलं की तो तिला मुलींचं टॉप टू मध्ये पाहतो. त्यामुळे ती सेफ आहे. पण मुलांत चौघेजण सारख्याच लेव्हलचे आहेत ( स्वतः:बद्दल किती गैरसमज) त्यामुळे तो सेफ नाही.
स्त्री पुरुष स्पर्धकांच्या वेगळ्या कॅटेगरीत आहेत, त्यांची संख्या शेवटपर्यंत समान ठेवायची आणि अंतिम दोघांत एक स्त्री एक पुरुष असले पाहिजेत असे जणू नियम आहेत

दादुसने टीम बीला जाऊन मिळू नये म्हणून त्याला चुचकारत ठेवायचं

उत्कर्ष जय स्वतः:ला चाणक्य चंद्रगुप्त समजत असतील पण दिसतात शकुनी दुर्योधन.
मराठीत महाभारतावर मालिका काढली तर जय दुर्योधनाच्या रोलसाठी पर्फेक्ट फिट आहे.
परवा स्नेहाची मान बगलेत दाबून धरून तिला फिरवत होता आणि ती हसत होती.

समजा गादा या आठवड्यात वाचली आणि दादूस बाहेर पडले तर गादा मीराला चांगली फाईट देउ शकते. आजच्या टास्क मधे दिसले तसे. मीरा बरोबर उत्कया होता म्हणून, गादा एकटी चांगली खेळू शकते. पण तीची पास्ट हिस्ट्री बघता परत लोचटासारखी जाईल मागे.

काल उत्कर्ष मनातून उतरला पार.शो च्या सुरवातीला मिराने त्याच्यासाठी टेम्पटेशनचा त्याग केला होता आणि आज त्याने त्याची जाणीव न ठेवता स्वतः सेफ होऊन मिराला नॉमीनेट केलं. उलट्या काळजाचा माणूस आहे.

जय पण गायत्रीच्या मागून तिला बोल लावत होता. त्याच्यासाठी तिने सगळं सामान त्याग केलं हे आठवडा पण नाही संपला आणि हा विसरला. बरोबर नाही टीम A. तुपारे बिचारी एकटीच वाळीत टाकल्यासारखी वाटत होती काल.

उत्कर्ष मनातून उतरला पार... हि हॅज बीन कंन्सिस्टंट थृ आउट. ह्या कणाहिन बायका त्याच्या पुढे लोटांगण घालतात त्याला तो काय करणार बिचारा. त्याने आधीच क्लिअर केलय तो भांडी घासायला आणि मैत्री करायला नाही आलाय. त्याचा कपटी चेहरा त्याने कधीही नाही लपवला. मराठी सिरियल च्या नटी सारखं त्याग मूर्ती व्हायची हौस असेल तर तो काय करणार?

पण गायत्री मीरा हेच्च डिझर्व करतात, अशा डंब लाचार बांडगुळांना अजुन काही मिळायची लायकी नाहीच आहे !
गायत्रीला तर काहीही समजत नाही, ती किव येण्या पलिकडे लाचारी करते , मीराही बिनडोक समाधानाने हसत होती उत्क्याने तिला नॉमिनेट करून स्वतः सेफ झाल्यावर !
आय टेक माय वर्ड्स बॅक.. मला आता नाही वाटत ती टॉप ५ मधे जायच्या लायकीची आहे इतकही डोकं नसेल तर !
आजचा एपिसोड लिटरली फॉरवर्ड केला मी, हे असले बंडल स्पॉन्सर्ड टास्क्स रविवारी आणायचे आता विकडे मधेही Uhoh

मला तरी यात त्याची काही चुक वाटली नाही, उत्कर्शचा गेम असाच आहे, तो माचिस आहे,काड्या करतो,खोटे वचन देतो हे सगळ सगळ ममानी सान्गुन झाल्,चुगली बुथ मधे एकुन झाल तरी या मुली एखाद्या ट्रॅप मधे अडकल्यासारख्या जय-उत्क्याच्या मागे जातात.
उत्क्याने पटवल आणी मिराने पटवुन घेतल एरवी कुणाच आणी काय एकूण घेते मिरा?
तुपारे बिचारी एकटीच वाळीत टाकल्यासारखी वाटत होती काल.<<<< खरतर हा अगदी गोल्डन चान्स आहे गादाला ग्रुप सोडून एकट नेटाने खेळायचा, पब्लिकची सिम्पथि मिळेल, एक्टी खेळली तर लोक स्वाभिमानी आहेस म्हणून कौतुक करतिल आणि वाचवतीलही.

मला तरी यात त्याची काही चुक वाटली नाही, उत्कर्शचा गेम असाच आहे, तो माचिस आहे,काड्या करतो,खोटे वचन देतो हे सगळ सगळ ममानी सान्गुन झाल्,चुगली बुथ मधे एकुन झाल तरी या मुली एखाद्या ट्रॅप मधे अडकल्यासारख्या जय-उत्क्याच्या मागे जातात.
<<
एग्झॅक्ट्ली, मीरा डिझर्व्ह्स इट, अतिशय डंब , ओव्हर कॉन्फिडन्ट, बिनडोक वाटली.
हिला कुठून कॉन्फिडन्स आला नॉमिनेट होण्याचा, अजुन कधी नॉमिनेशन मधे आलीही नाहीये, प्रेक्षक किती वोट्स देतात माहित नाही, आत्ता पहिल्यांदा आली आहे नॉमिनेशन मधे आणि झाली नॉमिनेट येडपट नवव्या आठवड्यात.. माझी फार इच्छा आहे या बावळट बलिदान देणार्‍या स्नेहा मीरा बायकांना एलिमिनेट होताना बघायची.. बिगबॉस टिम, वाचत असाल( असालच Wink ) तर इच्छा पूर्ण करा.. दुवाए मिळतील प्रेक्षकांच्या Proud

मीरा nominate झाल्यावर खुश झाली >>>> मला तर तिचा पोपट झाला अस वाटलं.... उत्क्या बाराचा आहे एकदम Lol

अरेरे! गायत्रीचं काय करून ठेवलंय यार! बिचारीची कीव येतेय आता! जय, उत्क्या, मीरा असल्या लोकांसाठी स्वत्व विसरून खेळली ती.
उत्क्यासारखा नालायक माणूस दुसरा कुणीच नसेल तिथे. मीरा, स्नेहा, दादूस यांचा तो कधीही काटा काढू शकतो.
विकास जर खरेच यांच्याबरोबर डील करत असेल तर त्याच्याइतका मुर्ख तोच असेल.

'खरतर हा अगदी गोल्डन चान्स आहे गादाला ग्रुप सोडून एकट नेटाने खेळायचा, पब्लिकची सिम्पथि मिळेल, एक्टी खेळली तर लोक स्वाभिमानी आहेस म्हणून कौतुक करतिल आणि वाचवतीलही.'

एक्झॅक्टली.

काकू वोटिंग मध्ये सर्वात शेवटी आहेत पण घालवतील दादुसना.

त्या स्नेहाला काकू म्हणाले म मां तरी जयच्या डोक्यात प्रकाश पडला नाही, तो काकुबाईनबरोबरच असतो.

अरेरे! गायत्रीचं काय करून ठेवलंय यार! >>> तिची कर्म सर्व. अजून हातपाय चेपत बस जयचे, तो बघणार स्नेहाकडेच, तुझी किंमत शून्य. पण मिराने तिला दगा द्यायला नको अस मनापासून वाटतं.

अरेरे! गायत्रीचं काय करून ठेवलंय यार! बिचारीची कीव येतेय आता! >>> मला कीव नाही येत, तिचं कर्मफळ आहे ते. अजून चेपत बस जयचे हात पाय, तो काकूलाच भाव देणार, तुला नाही. पण मीराने तिला दगा देऊ नये अस मानपासून वाटतं.

( स्वतः:बद्दल किती गैरसमज) >>> हाहाहा, खरं आहे. बिग बॉसकडे वशिला असेल पण पब्लिक भडकेल पहिल्या तिघांत आला तर.

विकास जर खरेच यांच्याबरोबर डील करत असेल तर त्याच्याइतका मुर्ख तोच असेल. >>> अगदी अगदी, टास्कमध्ये कमावले ते कॅप्टनशिपमध्ये गमावणार टीम बी. किंवा विकासला सोनाला कॅप्टन होऊ द्यायचं नसेल, स्वत:ला व्हायचे असेल म्हणून मुद्दाम वागला असेल तरी ते चूक आहे. एक प्रोमो बघितला त्यात सोना म्हणत होती तू माझ्यासाठी नाही खेळलास पण मी तुझ्यासाठी खेळेन.

खरतर हा अगदी गोल्डन चान्स आहे गादाला ग्रुप सोडून एकट नेटाने खेळायचा ….>>>+१
मीरा nominate झाल्यावर खुश झाली >>>> मला तर तिचा पोपट झाला अस वाटलं..>>+१ पण तिने तसे का केले? ममा बोलतील तिला यावरूनही.
यावेळी चुगल्याच चुगल्या असणार आहेत. सोनाली विशाल विरूद्ध बोलत होती, मीरा गायत्रीबद्दल बोलत होती, मीरा आणि उत्कर्ष स्नेहाला बाहेर काढायचे बोलत होते.

खरतर हा अगदी गोल्डन चान्स आहे गादाला ग्रुप सोडून एकट नेटाने खेळायचा ….>>>+१
तुपिरेकडे बघून वाटत का की ती एकटी खेळू शकेल?
तिला एकटीला खेळायच असेल तर प्रसंगी टीम एच्याही विरोधात जाव लागेल.
कालच स्वत:ची एनर्जी टीम बीशी फाईट करून सिलेंडर मिळवण्यात घालवत होती ,जे तिला कधीच मिळणार नव्हते,पण बाजूला तो उत्कर्ष शांतपणे उभा राहून फाईट करण्याच मस्त नाटक करत होता,तेव्हा त्याचे सिलेंडर घेण्याच नाही सुचल की हिंमत झाली नाही.
काल तर ,गायत्री थांब येऊ नको,अस सांगूनही अक्षरश: लाचार होऊन ,लोचटासारखी बाहेर थांबून नंतर कोणीही भाव देत नसताना आत आली,अशी मुलगी एकटी खेळू शकेल?
अगदी त्या दिवशीच्या नंबरच्या टास्कमध्ये पण विकासने ऑलमोस्ट तिला कन्विन्स केल होत,मँडम तयार पण झाल्या असत्या,पण बिबॉसला नको होत्या त्या नॉमिनेशन मध्ये, म्हणून बझर वाजला.
ही एकटी खेळण मुश्कील आहे.

कालची टास्क्स फार पुचाट होती. त्यात टेम्प्टेशन रूम चा चान्स असताना मीरा उत्कर्स। आणि गाय्त्री सोडून बाकीचे लोक गंमत बघायला बसल्यासारखे कॅजुअली बसले होते, मग काय मिळाला चान्स मीरा -उत्क्याला - म्हणाजे पर्यायाने एकट्या उत्क्याला.
ते पुरुषांमधे मला जास्त स्पर्धा आहे अन बायांमधे तू नं १ याचे लॉजिक कळलेच नाही मला. असा वेगवेगळा बिबॉ आहे का पुरुषांचा अन बायकांचा?! काहीही असो तो जिंकला अन मीराने माघार घेतली.
सगळ्यात फनी म्हणजे झिम्मा टीम ला सोमि वर मधल्या मधे पब्लिक धुतायत उगीच. त्यांनी फक्त जय चे अन मीराचे कौतुक केलेले दिसले काल. सॉलिड ट्रोलिंग झाल्याने हैराण होऊनते लोक सोमि वर इंटरव्ह्यू देत आहेत. "अहो आम्ही सग़ळ्यंना छान म्हटले होते पण बिबॉ ने एडिट च तसे केले अन पब्लिक आमच्यावरच भडकले!!" Lol
https://www.youtube.com/watch?v=YZjZ8CtYt7g&ab_channel=NeelimaKulkarni हा एक बघा Happy

>>सोमि वर मधल्या मधे पब्लिक धुतायत उगीच. त्यांनी फक्त जय चे अन मीराचे कौतुक केलेले दिसले काल. सॉलिड ट्रोलिंग झाल्याने हैराण होऊनते लोक सोमि वर इंटरव्ह्यू देत आहेत

त्यांना A टीम कुठली आणि B टीम कुठली माहित नाही आणि आव तर असे आणत होते की ते सगळे एपिसोड मन लावून बघतात आणि बिग बॉस फॉलो करतात म्हणे! काहीच्या काही!

ते पुरुषांमधे मला जास्त स्पर्धा आहे अन बायांमधे तू नं १ याचे लॉजिक कळलेच नाही मला.>>>
तो नेहमीच असले काही तरी विचित्र मुद्दे मांडत असतो आणि आव तर अगदी गहन विचार मांडायचा असतो. मजा म्हणजे ते बाकिच्या लोकांना पटते. मिरा लगेच का तयार झाली कळलंच नाही.

तो नेहमीच असले काही तरी विचित्र मुद्दे मांडत असतो आणि आव तर अगदी गहन विचार मांडायचा असतो. >>> सही कमेंट.

त्यांना A टीम कुठली आणि B टीम कुठली माहित नाही आणि आव तर असे आणत होते की ते सगळे एपिसोड मन लावून बघतात आणि बिग बॉस फॉलो करतात म्हणे! काहीच्या काही! >>> चला म्हणजे आज बघण्यात वेळ घालवण्यात अर्थ नाही, थॅंक यु.

मिरा लगेच का तयार झाली कळलंच नाही... कारण ती बावळट आहे Happy
गायत्री थांब येऊ नको,अस सांगूनही अक्षरश: लाचार होऊन ,लोचटासारखी बाहेर थांबून नंतर कोणीही भाव देत नसताना आत आली,अशी मुलगी एकटी खेळू शकेल?... ती श्रीमंत आहे असे बरेच लोक म्हणतात. मग एवढी लाचारी का? श्रीमंतीमुळे थोडा तरी ऍटिड्युड हवा.
जयला कॅप्टन करा बी टीम.

गायत्री एकटी नाही खेळू शकणार हे तर दिसतच आहे .
सगळ्यात फनी म्हणजे झिम्मा टीम ला सोमि वर मधल्या मधे पब्लिक धुतायत उगीच. त्यांनी फक्त जय चे अन मीराचे कौतुक केलेले दिसले काल. >>> हो, विशाल प्रचन्ड पॉप्युलर आहे आणी त्याच नाव न घेतल्याबद्दल काल बीबॉ फॅननी बॉयकॉट झिम्माच सुरु केल होत, बिचारी झिम्मा टिम
कालचे टास्क किती सिम्पल होते यार पण टिम ए इतके एफर्ट बी टिम दाखवत नव्हती. टिम ए म्हणजे जितने के लिए कुछ भि करेगा.
काल विकास एवजी मिनलने पट्टी बान्धायला हवी होती.
मला जेन्युइनली वाटते उत्क्याने राजकारणात जावे, सगल्याना बोलबच्चन देवुन सुमडित स्वतःचा मतलब काढुन घेतो.

Pages