मराठी बिग बॉस तिसरे पर्व

Submitted by सूलू_८२ on 19 September, 2021 - 05:02

आजपासून बिग बॉस मराठी ३ सुरु होत आहे. खर तर हा धागा काढायला जरा उशीरच झाला मला!

सो, स्वागत आहे तुमचे, या चर्चा करु या!

मराठी बिग बॉस

आज ७.३० वा.

सोमवार ते शनिवार ९.३० वाजता.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

गायत्री मीराला सुवर्णसंधी मिळालीये इमेज बदलण्याची. विकासला अंदाज आलाय आपण विशालैतके पॉप्युलर नाहीत याचा. मीनल- विकास- सोनाली विशालवर डुख धरून राहणार एखाद दुसरा आठवडा तरी.
तृप्तीला फार स्कोप नाही राहणार दादूस गेला की.
मला फार वाटतंय आज विशालच्या सोनाली, विकासला हाडतूड करण्यावरून मांजरेकरांनी झापायला हवं.
वाईल्ड कार्ड मुलगी जर विशालच्या गृपला जॉइन न होता तृप्ती, विकास, मीरा, गायत्रीची मोट बांधू शकली तर समीकरणे बदलतील अन्यथा तोच बिनडोकपणा सुरू राहील.
मला मीनल, विकास सध्या तरी सगळ्यात जबरदस्त वाटतायंत. खुप मॅच्युअर आहेत दोघेही.
उत्क्या आता स्नेहा- जयला आणखी पेटवेल. त्याला कळलं असणार स्नेहा जय प्रकरण पब्लिकला आवडत नसावं. तो पोळी भाजून घेईल आता.

मन्दार म्हणून कुणि युट्युबर आहे तो प्रत्येक एपिसोडवर व्हिडीयो बनवतो त्याच्या मते जयने मिनलला मुद्दाम ढकलले आणी ती ज्या पद्धतिने पडली ते त्याच्या व्हिडीयो मुद्दाम नाही दाखवल ते बघुन पब्लिक खवळल असत आणी हिन्सा केली म्हणून जयला काढावा लागल असत, कितिही अ‍ॅरोगन्ट असला तरी तो टीआरपी खेचतो आहेच त्याचे हिन्दी ओडीयन्स पण फॅन आहेत जे त्याच्यामुळेच शो बघतात त्यामुळे जय दुधाणे आरामात फायनल पर्यत असणार पण जिन्कणार नाही त्याला गेम समजला आहेच त्यामुळेच तो ग्रुप मधे याला त्याला बोलणे हे काम आपल्या अस्टीतन्ट करुन घेतो,लव्ह अ‍ॅन्गलही एस्टॅब्लिश करुन ठेवलाय, त्याने अ‍ॅरोगन्स कमी करायला हवा त्याने तो पब्लिकशी कनेक्ट होत नाही,

काला ममा म्हटले सगळ्यानी मासे विका त्यावर विशालने स्नेहाची नक्कल केली पापलेट बिग बॉस, एवढ हसु येत होत मला,एकदम क्युट दिसत होता.

डॉक्टरचा किती गोड गैरसमज झालाय की त्याला महाराष्ट्रात mastermind म्हणून ओळख मिळाली आहे. Proud
त्याच्या भावाला सांगा म्हणावं एखादी मोठी पोस्ट लिहून डॉक्टरचा गैरसमज दूर कर.
विशालचं पत्र खरंच 'दिल से' वाटले.
सोनालीने पण मस्त लिहिले..

काला ममा म्हटले सगळ्यानी मासे विका त्यावर विशालने स्नेहाची नक्कल केली पापलेट बिग बॉस, एवढ हसु येत होत मला,एकदम क्युट दिसत होता.>>हो funny होतं ते.विशाल छान actor आहे.दादूस राजा असताना पण एकदा मस्त अ‍ॅक्टींग केली त्याने.आधी सगळ्यांना घाबरवलं त्याने आणि शेवटी खूप हसवले. Extra मसाला मध्ये आहे .तो घरात मस्त गेम्स वगैरे घेतो.खेळकर आहे.आणि मला सगळ्यात जास्त आवडते ते त्याचं sporting nature.

विकास, विशाल, सोनालीचे निबंध छान होते. जेन्यूइन वाटले. मीरा गायत्री मजबुरीमें, परिस्थितीमुळे मित्र झाल्या असं वाटलं
आविष्कारला कोणीही मित्र नाही.
स्नेहा फेक वाटली.
बाकीचे फक्त गेमसाठी आले आहेत.
चुगल्या ऐकताना जय डिफेन्सिव्ह पोझ मध्ये बसला होता. हाताची घडी.

सोनालीला चुगली एकुण शॉक का बसला? हिला कुठुन वाटल होत की जय तिला सपोर्ट करेल? ममा ३ आठ्वडे कुणाची शाळा घेतायत ते तर बघायच ना.
मिरा आणि गायत्रीला इतके दिवस सगळे चुगल्या एकवुन उत्क्या-जय विषयी सावध करतायत तरी याना समजत नव्हत आज अचानक त्याना ते जाणवतय तरी मला वाटत हे गादाला फार आधि कळल होत पण बहुधा तिला हे नक्की कस हॅन्डल कराव ते कळत नव्हत म्हणुन ती एक दिवस झोपाळ्यावर बसुन रडताना दिसत होती.
आपण प्रेक्षकाना बघताना वाटत पण एखादा ग्रुप सोडुन एकट्याने खेळायला लागणे तेवढ सोप नसणार

आविष्कार आउट.
त्याची एव्ही बघताना तो थोडा बारीक होऊन बाहेर येतोय असं वाटलं.

वाइल्ड कार्ड अ‍ॅक्ट्रेस शनिता शेट्टी एक्स्पिरियन्स च्या बाबतीत सगळ्यांपेक्षा उजवी आहे, कितीतरी हिन्दी सिरीयल्स मधे पाहिलय तिला आणि सिनेमे केलेली ती एकटीच असावी या घरात्,इतर कोणी केलेत का मुव्हीज ?
जय म्हणु शकणार नाही कोण नीता शेट्टी Happy
ती कोणाला सपोर्ट करतेय बघणं इंटरेस्टिंग असेल, जय उत्कर्षला जाऊन जर ते व्हिलन बनतायेत सांगितलं आणि पॉझिटिव वागायला शिकवल तर पंचाइत होईल बी टिमची !

मिरा आणि गायत्रीला इतके दिवस सगळे चुगल्या एकवुन उत्क्या-जय विषयी सावध करतायत तरी याना समजत नव्हत आज अचानक त्याना ते जाणवतय.. त्या दोघी स्पाइनलेस आहेत. मला नाही वाटत ग्रुप सोडतील. जय चुगलीच्या वेळेस ह. उ. ला मस्त एक्सप्रेशन दिले. काही काळजी करू नकोस, आपण सहज गुंडाळून टाकु यांना.

सोनालीला चुगली एकुण शॉक का बसला? हिला कुठुन वाटल होत की जय तिला सपोर्ट करेल? ... दॅट प्रुव्हज ती त्याच्या ताब्यात होती, तो तिला झुलवु शकतो. मग ज्या स्नेहा ला आपण नावं ठेवली तिने किमान इम्युनिटी तरी मिळवली. ह्या तिघींना ठेंगा.

सोनाली पण भुलली होतीच जय च्या चार्म ला. उगीच म्हणत होती जय चे नि माझे बाँडिंग आहे इ. आता कळले असेल.
जय उत्कर्षला जाऊन जर ते व्हिलन बनतायेत सांगितलं आणि पॉझिटिव वागायला शिकवल तर >>> बहुतेक असे डायरेक्ट फीडबॅक द्यायला परवानगी नसणार. तसेही आत जाताना सुरुवातीला बिबॉ ने सांगितलेलेच करावे लागत असेल.

जय आणी स्नेहाच जे काय चालल आहे त्यात जयपेक्षा स्नेहाला पब्लिक जास्त दोष देत आहे तस बघायला गेल तर सुरवात जयनेच केलीये.
असो जे काय असेल ते त्यान्च पण काल ममा बोलल्यावर स्नेहाच्या सगळ्या रिअ‍ॅक्शन वेड्यासारख्या होत्या.
जयला एक कामिन्ग फॅक्टर मिळालाय ही कॉमेन्ट सगळ्यात बेकार होती

मला नाही वाटत.टीम ए फुटेल.म्हणजे बिबॉस फोडेल.कंटेंट कुठून मिळेल.?
गायत्रीला आणि कदाचित मीरालाही हे कळून चुकल असेल की आता एकट खेळण्याची वैळ गेली .गायत्रीकडे तर बघून वाटतही नाही की ती एकटी खेळू शकेल.
उलट मीराला आणि गायत्रीला स्नेहा आवडत नाही,आणि जय स्नेहाच वढत चाललेल बॉन्डिंग.बिबॉस भरपूर कंटेंट घेणार.
हे नवीन आलेल कार्ड फार काही छाप पाडेल अस वाटत तरी नाही .बघू.
पण आता जर मीरा आणि गायत्री जय उत्कर्षबरोबर राहिल्या तर मात्र गायत्रीबरोबर मीराचाही पुढचा प्रवास कठीण होईल.

जय उत्कर्षला जाऊन जर ते व्हिलन बनतायेत सांगितलं आणि पॉझिटिव वागायला शिकवल तर पंचाइत होईल बी टिमची >>
मला नाही वाटत तस काही ती सान्गेल कारण दोन स्पर्धक जितके व्हिलनिश दिसतिल त्या बॅकग्राउन्ड वर तुम्ही थोडे जरी पॉझिटिव्ह असाल तर अजुन उठुन दिसता फक्त बिबी टिमने तस काही तिला सान्गितल तरच आहे पण बीबी टिमला ही ते नको असणार कारण मग पब्लिक चर्चा कशावर करणार? शिव्या कुणाला घालणार? टीआरपी कसा वाढणार?
उत्कर्ष म्हणत होता ना परवा की हे खेळत नाहियेत कारण त्याना सिम्पथी गेन करायची आहे आता ग्रुपने न खेळायच काहिही कारण असल तरी त्याना सिम्पथी मिळालिच की तुम्ही जर मिनलचि चौकशी केली असती तर तुम्हालाही मिळाली असती.

लग्नं ठरलय का आविष्कारचं ?
स्नेहाला जोडीने लग्नाला जायची इच्छा असेल पण जय विचारणार नाही शो संपल्यावर !

अचानक माझ्यावर मांज्याला गाईड करण्याची मोठी जबाबदारी आली आहे. >>> हाहाहा.

अविष्कार चे दूसरे लग्न झालेय, >>> हो कधीच झालेय, त्याच्या बायकोची आणि आईची एकत्रित मुलाखत फार मागे टीव्ही वर बघितलेली. दिसायला चांगल्या आहेत दोघी आणि आई डॉक्टर आहे बहुतेक. मुलाबद्दल माहिती नाही मला. आता तिसरे असेल तर माहिती नाही. असो ज्याचा त्याचा पर्सनल issue .

आविष्कारला आधीच घालवायचे असणार पण आदिशमुळे नाईलाज झाला बिग बॉस चा, तिथेच आदिशची विकेट काढली होती bb ने. वोटिंग वगैरे उगाच दीखावा.

विकेंड पहिला भाग बघितला, टोमणे छान मारले म मांनी. स्नेहा मठ्ठ आहे पण चॅप्टर पण वाटते, आता जयशी अजून जवळीक वाढवेल, ह्या दोघींना बाजूला केलं आहे आधीच. ती bb ची लाडकी आपण म्हणत होतो ते म मां ही म्हणाले. अर्थात इतर सो मि वर ही लिहिलं असेल कोणी.

विकासला नंबर वन votes होती पण त्याचा समज झाला असेल, आपण तीन नंबर वर आहोत. स्नेहा चावते, तिने आदिशला पण मागे मारलेले ही दखल घेतली जात नाही. सोनाली छान दिसत होती.

अविष्कारचं लग्न झालय तर मग आता कोणाचं लग्नं ? कि स्नेहा-अविष्कार दोघांचेही २ डिव्होर्स झालेत?

त्याच्या घरच्या कोणाचं तरी लग्न असेल.

आज मीरा बिछान्यात डोकं खुपसून रडतेय आणि जय उत्कर्ष तिच्यावर डाफरताहेत असा प्रोमो दाखवला. साहिब बीबी गुलाम आठवला.

#snehajai

शेट्टी ने डायरेक्ट फीडबॅक द्यायची काय गरज आहे? ममा सतत तेच तर करत आहेत.
गादाला आविष्कार पेक्षा जास्त मते असतील ?मला नाही खरे वाटत. त्याचा तो ग्यारंटी पिरियड संपला असणार.
गादासारख्या श्रीमंत मुलीने टेचात खेळावे खरे तर. एक लाखासाठी एवढा इज्जत का फालुदा कशाला.

आजच्या पत्रां मधे सोनालीनी मीनल साठी लिहिलेलं , विशालनी सोनासाठी आणि उत्कर्षनी जय साठी लिहिलेल पत्रं चांगली लिहिलेली आणि मनापासून वाटली.. स्नेहाचं सर्वात नाटकी !
मला ती वाइल्डकार्ड नीथा मराठीमधे अगदीच कच्ची वाटली, बोलताना आणि वाचतानाही किती अडखळत होती Uhoh
तिचं फस्ट इंप्रेशन काही खास नाही वाटलं, त्यात कोणाला नडणार नाही, सगळ्यांशी दोस्ती करणार वगैरे म्हंटली.. त्यापेक्षा आदिशला काढायला नको होतं , मस्तं नडायचा जयला , स्ट्राँग होता .. जाउद्या झालं !

निथा साऊथ इंडियन आहे तर तिचं मराठी तसं च असणार पण मला मज्जा या साठी अली की आता मीरा स्नेहा सारख्या स्वयंघोषित सुंदर्या जरा line वर येतील
नीता शेट्टी या लोकांपेक्षा हॉट आहे आणि सुंदर ही

किती ते जय आणि ऊत्कर्ष स्वत:च्या प्रेमात आहेत, मांजरेकर इतकं सांगून ही त्यांना काही फरक पडत नाही उलट गायत्री मीरा ला नावं ठेवतायत अजूनच निगेटिव्ह होतायत, आता निथाच्या मागे लागलेत ग्रुप मध्ये येइला हवं तिने म्हणून!

निथा साऊथ इंडियन आहे तर तिचं मराठी तसं च असणार पण मला मज्जा या साठी अली की आता मीरा स्नेहा सारख्या स्वयंघोषित सुंदर्या जरा line वर येतील
<<<
हो, बरोबर पण मीनल चांगली बोलते मराठी, बोलीभाषा व्यवस्थित आहे.
बाकी हॉटनेस, फिटनेस लेव्हल मस्तं आहे नीथाची , होपफुली ती मीनल बरोबर खेळेल !

Pages