मराठी बिग बॉस तिसरे पर्व

Submitted by सूलू_८२ on 19 September, 2021 - 05:02

आजपासून बिग बॉस मराठी ३ सुरु होत आहे. खर तर हा धागा काढायला जरा उशीरच झाला मला!

सो, स्वागत आहे तुमचे, या चर्चा करु या!

मराठी बिग बॉस

आज ७.३० वा.

सोमवार ते शनिवार ९.३० वाजता.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

शिवलीला ला कस बाहेर काढलं ? तिने काही नियम मोडला होता का? का काय केलं होत?. सुशांत ला कस बाहेर काढलं होत त्यानें नियम मोडला होता का? सतत गायत्री ला शिव्या बसत आहेत सगळ्याच ग्रूप वरती एवढी जर ती लोकांना खूपत असेल- नकोशी झाली असेल तर कशाला पोल घ्यायचा.? दुसरे स्पर्धक काय वागतात -कसे वागतात त्याची चर्चाच नाही गायत्रीला शिव्या देण्यात पब्लीक इतक बिझी आहे की मधल्या मध्ये ईतर स्पर्धक झाकोळले जातात. त्यांचं पुरेस कौतुक च होत नाही ना त्यांची चर्चा. जिकडे तिकडे गायत्रीला शिव्या वाचून वाचून कंटाळा आला. दुसार्या स्पर्धकां बद्दल बोलणंच नाही ते पण खेळायला च आलेत ना? का फक्त एकटी गायत्री खेळतेय अख्खा बिग बॉस मध्ये?

टीम ए ला वाटत होतं की आपलं खूप कौतुक होईल यावेळी ,आपण फारच भारी खेळलो आहे. विकास ला शिव्या पडतील ई ई तसं काहीच झालं नाही ,ममांनी झाप झाप झापलं, अर्धे पेक्षा जास्त मुद्दे मायबोली वरचेच उचलून घेतल्यासारखे वाटले Happy
मीरा, गायत्री, उत्कर्ष ,जय सगळे च्या सगळे बेक्कार तोंडावर 12 वाजवून बसले होते. गायत्री चं तोंड पण बघू नये असं वाटतं. फारच वाईट reactions देते ती. त्याउलट सुरेखा ने बरंच खेळीमेळीत मान्य केलं ही झाली चूक म्हणून.

उत्कर्ष ला नक्की च कळलं असेल त्याला बेक्कार शिव्या पडल्यात बाहेर ते.
स्नेहा आणि मीरा चं काय वाजलं ते कळलंच नाही मला.
छकुला ची काय भानगड होती ते मला कळलंच नाही. आधी चा काय रेफरन्स होता बघावं लागेल.

विशाल आणि सोनाली चं जुळवायचं चाललंय का इथे ? तसं झालं तर गावरान कोल्हापुरी लव्ह स्टोरी बघायला मिळेल Lol
सोनाली कधी कधी एकदम आवडून जाते तर कधी कधी एकदम हँग होते. काही कळत नाही तिचं नीट.

काल मीनल च कौतुक केलं तर मीरा आणि गायत्री चा जळफळाट झाला होता.

गायत्री आणि तिच्या घरचे इंडस्ट्री मध्ये कोणीतरी बिग शॉट आहेत का ? महेश ला पण जुमानत नाही ती.

उद्या पन पंच टास्क मध्ये बरीच इक्वेशन बदलतील आता बघुयात

पब्लिक ची मतं बदलतात म्हणे आज अशी असतात तर पुढच्या वीक ला तशी >>>>हे मात्र खरं आहे हं सुजा.... सीजन 1 मध्ये आधी सगळ्यांना आवडणारे सई , पुष्कर नंतर नावडते झाले होते.... तर आधी अजिबातच न आवडणारी रेशम नंतर तिच्या बर्‍या वागण्यामुळे चांगली वाटायला लागली होती...

चॅनल ला बिग बॉस चा खेळ जर एकसुरी ठेवायचा नसेल तसचं सतत गायत्रीला शिव्या देणाऱ्या पोस्ट भोवती फिरता ठेवायचा नसेल तर चॅनल ने तिला बाहेर काढावं अस मला वाटतं. फेसबुकवर तीन बिग बॉस ग्रूप वर होते. जिकडे तिकडे गायत्रीला शिव्या वाचून दोन ग्रूप मधून बाहेर पडले. एकच ठेवला आहे. बघु या काही वेगळ्या पोस्ट येताहेत का नाहीतर तो पण सोडेन. मजा नाही येत त्याचं त्याचं पोस्ट वाचुन. आता म्हणजे अगदी अजीर्ण झालंय गायत्री बद्दल शिव्या वाचून. शांती पाहिजे डोक्याला Bw

शिवलिला ला कस बर नाही म्हणून बाहेर काढलं>> शिवलिला ला बाहेर काढा अस किर्तनकार मन्च ,समुह जे काय असेल त्याच म्हणण होत अशी पोस्ट फेसबुक वाचली, किर्तनकाराचे नियम तिथे राहुन कसे पाळणार वैगरे आक्षेप होते त्याच्या दबाव असेल.

टास्क चे प्रोमो बघितले, किती टास्क रिपिट करतात , सारखे तेच तेच टास्क आणी राडा गोन्धळ बघायचा कन्टाळा आला, विकेन्ड एपिसोड बघावा झाल

टीम ए छान खेळत असूनही सगळे लोक्स टीम बी ला सपोर्ट करत आहे. यावरून स्पष्ट होते की हे जग विनाशाच्या मार्गावर चालले आहे. माणसाने केलेल्या चुका भयंकर आहेत. अन्नपदार्थात भेसळ होत आहे, पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे त्यामुळेच मनुष्यावर ही परिस्थिती ओढवली आहे. काहीतरी चमत्कार होऊनच माणूस यातून बाहेर पडू शकतो.

<<ममांनी आज स्पष्टच सांगितलं की टीम बी ला बाहेर सीपंथी आहे<एक्झेकटली! हे नको होत सांगायला! राहू द्यायचं होतं भ्रमात.. कशाला जागे केले! बघू, किती अजून उड्या मारल्या असत्या टीम ए ने! त्या जोरावरच नॉमीनेट झाले असते ना!
काल तृप्ती ताईंना ही झापलं. पण त्या तश्या मनाच्या साफ वाटतात. खुन्नसने खेळत नाही. अन ते बरोबरच आहे. टास्कपुरती खुन्नस ठीक आहे.. नंतर खेळीमेळीने राहावं ना सगळ्यानी! त्या "सगळ्यांसाठी स्वयंपाक करेल " म्हणाल्या, हे छान वाटलं!
विकासने शिवीबद्दल लगेच, सॉरी पुन्हा अस होणार नाही, हे ग्रेसफुली म्हटलं! ममांनी त्याच्या टीमचं कौतुक करत तरी तो काहीतरी संभ्रमात होता की विचारात पडलेला होता.
पण बावळट गादा तोंडेतोंड येत होती. अन अक्षय ने ही शिवी दिली होती ना? ते म्युट केलं होतं!
मीरा कसली भोळेपणाचा आव आणते बिबॉसमोर! पक्की खेळाडू आहे! स्ट्रॅटेजी ठरवताना कसले भाव असतात चेहऱ्यावर. तिचं आधीच्या एका एपी मध्ये,' दया अजिबात नाही दाखवायची' हे वाक्य खटकलेलं.

अविष्कारला बुजलेला दिसतो म्हणाले बिबॉ! एक्स वाइफ समोर असल्याने असेल. तो काय बोलला लेडीजना? हा मुद्दा बिबॉनिही काढला! त्याला उचकावलय आता बिबॉने! बघूया या आठवड्यात.

स्नेहा कशी काय लगेच टीम सी मध्ये आली, कळलं नाही!, म्हणजे मत काऊंट होत नसेल, पण मग लगेच पलटी? ती, अविष्कार, दादूसने काही कंटेंट नाही दिले तर त्यांना काढा!
तृप्ती ताई चमकू लागल्यात, विचारपूर्वक बोलतात! त्यांना राहू दे!

आपल्या ( +टीमच्या) हातून झालेल्या चुकाच गायत्री अभिमानाने मिरवते असं गेल्या आठवड्यात (कामाची वाटणी) आणि कालही ( हल्ला बोल फेअर होतं का?) दिसलं.
तिचा वरचा मजला रिकामा आहे की त्यात खूप सारी हवा भरलेली आहे?

हल्ला बोल आणि कॅप्टन्सीनंतर मीरा उत्कर्षला तू संचालक म्हणून काहीही चुकीचं केलं नाही, आपण टीम म्हणूनही नाही, तेव्हाच हसू येत होतं.

आविष्कारला कानकोंडं करण्याच्या नादात स्नेहाचीच ती अवस्था झाली.

"विकासने शिवी देऊन त्याबद्दल माफी मागितली तरी आम्ही त्याचा ठरवून इश्यू करणार.
अक्षयने दिली ती शिवी कुठे होती?"- टीम एच्या वागण्याचं सार

टी

मला ममांच होस्ट करणे पटतच नाही. ते सोमी वरच्या कमेंट वाचून दाखवल्या सारखं करतात. त्यांचं स्वतः च मत कुठेच दिसत नाही. बाहेर पब्लिक काय विचार करतोय हे स्पर्धकांना सांगण्यात काय हाशील? बाहेरच्या रिएक्शन समजल्यावर वागण्यात बंधन येणारच ना. स्पर्धकांना चूक बरोबर हे सांगावे पण डायरेक्ट बाहेर तुमची अमकी तमकी प्रतिमा होते हे सांगायची काय गरज. रिॲलिटी शो आहे ना मग येऊ द्या ना सगळ्यांची रिअल personality बाहेर. खेळू दे त्यांना त्यांच्या मर्जीने.

<<द्या ना सगळ्यांची रिअल personality बाहेर. खेळू दे त्यांना त्यांच्या मर्जीने.<< हेच तर , सगळ्यांचे खरे गुण बाहेर येऊ द्या ना!
<<ममां - दादुस,ह्या आठवड्यातील बेस्ट प्लेअर सांगून टाकतो
दादुस- थँक्यु Wink<< Lol

मी आता यापुढे या धाग्यावर काहीच लिहिणार नाही. कारण तुम्ही सगळे चुकीच्या दिशेला वाहवत जाताय. शेवटी विनर जेव्हा टीम ए मधलाच कोणीतरी होईल तेव्हाच मी याच प्रतिसादाला कोट करेन.

विकास एकदम छान खेळतो आहे.त्याचा टास्क चालू असतानाच मीरा आणि स्नेहा ला ओपन challenge दिल ( ते सफल नाही झालं हे वेगळं). संचालक असताना कुठेही भडक न होता शांत पने निर्णय सांगितलं. विशाल खूप काही गेम प्लांनिंग मध्ये नसतो पण त्याच्या ताकद चा उपयोग करून घ्याचा. एकंदरीतच गुड गोईंग.

महेशने सुरुवातीला मोबाईलमध्ये बघितलं सुद्धा ते मुद्दा विसरले तेव्हा. मायबोलीच उघडून ठेवली असेल Happy दादूसला वाटलं ते परत बेस्ट प्ल्येअर आहेत Lol
बोकलत तुमच्यासारखं इतरांनी गायत्री जिंकल्यावरच यावं. इथे खरडून काहीच होणार नाही, ज्यांना शिव्या बसायच्या त्या बसणारच.

म.मां नी आजपण झकास फटकेबाजी केली . इकुडची तिकुडची बेष्ट Proud
मिनलला अ‍ॅप्रिशिएट केलं गेलं बरं झालं , तिला खूप बुलिंग करत होते सगळे !
टिम बी ची स्तुति केली तशी टास्क क्विट केल्याबद्दल समज दिली चांगलं केलं !
पण बाहेरच्या जगात काय चाललय, कोणाला सिंपथी मिळतेय काही सांगायची गरज नाही .
सर्वात उत्कर्षचा चेहरा पडला होता, त्याला कल्पना आली असावी बाहेर लोक काय म्हणतायेत, बघु आता सुधारतो का !
Btw त्या जयच्या मागे नक्की कोण कोण आहे,? गायत्री, स्नेहा आणि मीरा पण ?
सोनाली आणि मिनल कोणाबद्दल कुजबुजत होत्या सकाळी बेडवर कि तो जिमला गेल्यावर ती कन्टेन्ट साठी मागे जाते ?

बोकलत,
टिम ए काही कायमची टिम ए रहाणार नाहीये Proud
गायत्री सोडून कोणीही जिंकुदे कि चांगलं खेळून !

गायत्री म्हणजे जुई गडकरी आणि अभिजीत केळकर मिक्स आहे.
(अभिजीत केळकर nominate होत नव्हता पण जेव्हा पहिल्यांदा झाला तेव्हा बाहेर गेला होता.)

मीरा या आठवड्यात बरीच टोन डाउन झाली होती तरी तिलाही बोलणी बसली..... गायत्री दोन्ही तिन्ही टास्कमध्ये चांगली खेळली..... बुगुबुगु केले नाही तरी तिला बोलणी बसली!!
मीनलच्या कौतुकाच्या नादात विशाल आणि विकास झाकोळले गेले..... उत्कर्षला बोलले ते अपेक्षितच होते पण अक्षय फारसे काही न करता निसटला.... अर्थात त्याला हॉलिडे पॅकेज देउन एक सटल मारलाय बिग बॉसने बघू आता त्याच्यात काही फरक पडतो का ते!!
सुरेखाताई आणि गायत्री जर मागच्या आठवड्याचा परफॉर्मन्स कंपेअर केला तर सुरेखाताई त्यांच्या टीम कडून खेळतायत का नाही इतपत शंका व्यक्त केली लोकांनी आणि गायत्री पूर्णपणे तिच्या टीमच्या बाजुने खेळली पण सुरेखाताई इकुडची का तिकुडची वर निसटल्या आणि गायत्रीला चांगले फैलावर घेतले.
मुळात टास्क ठरवणार बिग बॉस, टीम पाडणार बिग बॉस, संचालकाला खुली छूट देणार बिग बॉस आणि स्पर्धकांना काय विचारताय गेम फेअर होता का नाही ते..... काहीही!
गेम फेअर होता का नाही ते माहित नाही पण मी गेमच्या नियमात राहून फेअर खेळले असे उत्तर द्यायला पाहिजे होते गायत्रीने!!
मला गायत्री आवडते अश्यातला भाग नाही.... काल विकासला शिवीचे भांडवल करणार नाही असे म्हणून ते केलेच तिने पण ते सोडता बरी खेळली होती की ती!!

मीनलच्या तोंडाने मीठ फोडण्याचा मुद्दाही विसरले घ्यायचे मांजरेकर!!
कॅप्टन्सी टास्क रद्द झाल्यानंतर टीम A च्या सुरात सूर मिसळण्याऐवजी पुढाकार घेऊन कामाची वाटणी केल्याबद्दल तृप्ती यांचे कौतुक अपेक्षित होते
अविष्कारच्या विगबद्दल आतल्या लोकांपेक्षा मांजरेकरांनीच काल चर्चा केली जास्त.... मला तर एखाद दुसरे वाक्य सोडले तर आत त्याबद्दल फारशी चर्चा झाल्याचे दिसले नाही!!
बाकी मांजरेकर गायत्रीच्या दातांबद्दल बोलताना अविष्कार काय मध्ये थॅंक्यू म्हणाला!! कुठल्या दुनियेत असतो हा माणूस?

बिग बॉसने टास्क्समध्ये वैविध्य आणले पाहिजेल असे कुणीतरी वरती लिहलेय त्याबद्दल सहमत..... फारच तेच तेच होतायत टास्क!!
प्रॉपर्टी बघून स्पर्धकच काय पण प्रेक्षकपण आता ओळखायला लागलेत कुठला टास्क असेल ते!

बाकी हे लोक स्ट्रॅटेजीला स्टॅटर्जी का म्हणतात? मागच्या सीझनमध्ये पण कुणीतरी म्हणत होते बहुतेक आणि कालपण अक्षय स्टॅटर्जी म्हणाल्यासारखा वाटला.

Task तर सेम असतातच परंतू टीम पण तशाच असतात. ज्यांचा ग्रूप त्यांचीच टीम. अरे मित्रांना एकमेकांवरोधात खेळावा ना मग जास्त मज्जा येईल.

बाकी हे लोक स्ट्रॅटेजीला स्टॅटर्जी का म्हणतात? मागच्या सीझनमध्ये पण कुणीतरी म्हणत होते बहुतेक आणि कालपण अक्षय स्टॅटर्जी म्हणाल्यासारखा वाटला.
<<
हो Proud
तो भूषण कडु सुद्धा एकदम चॅटर्जी म्हंटल्या सारखा स्पष्ट स्टॅटर्जी म्हणायचा !

व्हुट वरती तिचा एक व्हिडिओ आला होता ज्यामधे जय सांगत होता कि मराठी रिअ‍ॅलिटी आणि हिन्दी मधे फक्त भाषेचा फरक आहे पण गायत्री म्हणाली कि मराठी पब्लिक खूप वेगळं अहे, हिन्दी सेलिब्रिटीजना वेगळी आणि मराठी सेलेब्जना वेगळी ट्रिटमेन्ट देतात मराठी लोक.
मराठी अ‍ॅक्टर्सने काही जरी केले तर लगेच ऑफेंड होते पब्लिक , बिबॉ सिझन १ ला बरेच काँटेस्टन्ट्स खूप ट्रोल झाली होते, ती स्वतः निगेटिव कन्टेन्ट इग्नोअर करते किंवा कॉमेंट्स लिमिटेड करते ट्रोल केलं तर असं ती तिच्या गृपला सांगत होती.
>>
हे खरंय. .पहिल्या सिझनला स्मिताने पोहताना बिकिनी घातलेली तर तिला लोकांनी ही आपली मराठी संस्कृती नाही म्हणून खूप नावे ठेवली (ब्रह्मचारीतील मीनाक्षीला तेव्हा विसरले). मेघा रात्री शॉर्ट nighty घालायची तर तिलाही बंद करायला लावली.
आता हिंदी बिग बॉसही आलाय. लगेच दोन्हीत फरक दिसून येईल. विशेषतः कपड्यांमध्ये. हिंदी स्पर्धक कपड्यांवर लाखो रुपये खर्च करून येतात. मराठीतल्या मुली आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या मुलीसारखे कपडे घालतात. बजेटमध्ये खूप मागे आहे मराठी बिग बॉस.

सर्वच प्लेयर्सना विकास नकोसा झालाय.
<<
More they target , more power he gets from audience !
सगळं विकसला हवं तस चालु आहे Happy
त्याला गेम नीट माहित आहे, कायम बोलताना दिसतो कि मायनॉरीटी गृप प्रेक्षकसंची मनं जिंकतो, दुसरा गृप व्हिलन बनतो, निगेटिव दिसलं नाही पाहिजे वगैरे..
एक स्टेज येइलच जेंव्हा विकास वि. विशाल सुरु होईल !

<<एक स्टेज येइलच जेंव्हा विकास वि. विशाल सुरु होईल !<< हे मात्र नको व्हायला! शेवटपर्यंत टिकायला पाहिजे ही जोडी. पण ज्याप्रमाणे विशालचे ब्रेन wash सुरुय त्यावरून शंका येतेय!
More they target , more power he gets from audience !<<
येस! Happy

  1. विकास पोचलेला खेळाडू वाटतो, त्याला हवं तसं व्यवस्थित खेळून घेतो आणि दुसऱ्यांनाही खेळवतोय. तो आणि उत्कर्ष शेवटपर्यंत टिकतील, डोकं तर आहेच, पण कुठे शांत रहायचं, चांगलं दिसायचं, sympathy मिळवायची ते त्यांना perfect कळतं. मीराला पण डोकं आहे, पण ती aggresive होते, समोरच्याचा जराही विचार करत नाही, त्यामुळे negative दिसते, सो लोकांना ती आवडेनाशी होत आहे.
  2. Btw आजचा शेवटचा अविष्कारचा घराबाहेर जायचा किंवा त्याला घालवायचा आणि नंतर त्यावरून ममांनी त्याचे कान उपटण्याचा प्रकार अतिशय बालिश वाटला ! Very poor choice ! बिलकूल आवडला नाही तो भाग.
  3. आणि आता उद्याच्या भागात काय दाखवणार तर तो कसा बिचारा होऊन रडला आणि मग स्नेहाकडे गेला. नक्की काय झालं त्या दोघांत हे त्यांनाच स्पष्ट माहीत आहे, शो साठी त्यांचा हा असा वापर करून घेणं, हे म्हणजे TRP साठी अतिशय वाईट खेळी, दुसरे काही उपाय नाहीत का या शो वाल्यांकडे ? मला तरी हे पटलं नाही आणि झेपलं तर बिलकूलच नाही !

वरचे सर्व सावकाश वाचते.

मी कालचा भाग आत्ता बघितला, शेवटचा काही भाग नाही बघितला. टीम ए ला योग्य बोलले म मां. त्यांनी त्यांच्या टास्कमध्ये लढवलेल्या शक्कलीचे पण कौतुक केलं. मलाही ती शक्कल लढवली ते आवडलं होतं.

सर्व आधीचं बघितलं नसल्याने फार लिहू शकत नाही पण मीराला अति बोलत होते अस वाटलं. पूर्ण टार्गेट मीरा होती बहुतेक. मीरा मिनलचे कौतुक ऐकून टाळ्या वाजवत होती, गायत्रीने मात्र अजिबात वाजवल्या नाहीत किंवा तिला ते आवडलं नाही हे समजत होतं. उत्कर्षला मस्त झापले, अगदी योग्य. स्नेहालाही योग्य समज दिली. सुरेखालाही जरा झापले ते योग्य होतं.

गायत्रीला लोकांच्या मनात स्थान मिळवायला प्रयत्न करावे लागतील, विकेंड चावडीच्या पहिल्या भागात तरी तस दिसलं नाही. मीरा बरीच चांगली वाटत होती तिच्यापुढे.

जयने खरंच अतिरेकीपणा, धाऊन जाणे कमी करावे. जास्तीतजास्त गेमकडे लक्ष द्यावं.

विकास आणि अजून कोणीही अगदी अक्षय, मीनल यांनी शिव्या देऊ नयेत, म मां नी आज स्पष्ट सांगितलं आहे.

सोनाली दिसायला छान आहे. मला सोनाली आणि मीरा आवडलया दिसण्यात आज, मीराचा ड्रेस छान होता.

पब्लिकची मतं काही प्रमाणात बदलतात. मला मेघा धाडे आधी झुंज मराठमोळी आणि bb मध्येही सुरुवातीला अजिबात आवडत नव्हती. नंतर तिच्या काही गुणांमुळे मला आवडायला लागली ती. पुष्कर खूप आवडायचा, तो नंतर आवडेनासा झाला.

सुरेखा ताई, उत्कर्ष यांना चुकांची जाणीव झाली अस वाटलं, आचरणात आणतात का बघूया. गायत्रीचा अॅटीट्यूड मात्र म मां चे काही ऐकून घेण्याचा दिसला नाही, आपलं तेच खरं आणि आपण योग्य असा होता.

जय, मीरा तरी ऐकून घेत होते त्यांचे आणि समजून घेण्याचा प्रयत्न करत होते.

त्यामुळे पब्लिकला गायत्री आवडत नसेल तर ते तिच्या स्वत:च्या वागणुकीमुळे अस माझं पर्सनल मत.

मीनलच्या कौतुकाच्या नादात विशाल आणि विकास झाकोळले गेले.... >>> खरं आहे. मीनलचे कौतुक योग्यच होतं पण त्या दोघांचे व्हायला हवं होतं.

मीठाची पिशवी तोंडाने फोडली तो इश्यू झाला नाही का, की दुसऱ्या भागात असेल. मी ते बघितलं नव्हतं, इथे वाचले होतं.

मीनलच्या तोंडाने मीठ फोडण्याचा मुद्दाही विसरले घ्यायचे मांजरेकर!! >>> ओहह हे आत्ता वाचलं. त्याबद्दल तिलाही समज द्यायला हवी होती.

मुळात दोन सीझन झाल्यावर इथल्या सर्वच स्पर्धकांना जाणीव हवी की मोठा grp करणे आणि वर दादागिरी करणे, अॅटीट्यूड दाखवणे, संचालक अनफेअर असणे हे प्रेक्षकांना आवडत नाही. आता तिसऱ्या सीझनमध्ये येताना बरेच जण आधीचे बघून आले असतीलना मग तेच तेच म मां ना परत परत सांगायला लागतेय.

शिवलीला ने हेल्थ इश्यू मुळे शो सोडला असं सांगितलं जात आहे.
व्हिडिओ देखील शेअर झाला आहे.
आणि ही तीन दिवसांपूर्वीची शिळी बातमी मी आज वाचली :|

Pages