गेल्या काही गणेशोत्सवांमधे लोकप्रिय झालेला : खेळ शब्दांचा !
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या वर्षीही आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
आजचा विषय : व्यक्ती विशेषण ( व्यक्ती/पाळीव प्राणी/ नाते संबंधी) यांना वापरायचे विशेषण
उदा. सासू म्हटली की हेच आठवणार
?ष्ट (उत्तर खाष्ट)
हा भामटा अंगात काय घालून येईल आणि कसा फसवेल सांगता येत नाही.
?फं?
हटेल, नाही
हटेल, नाही
हट्टी, निर्ढावलेला या अर्थी
हट्टी, निर्ढावलेला या अर्थी
रगेल
रगेल
रगेल, बरोबर
रगेल, बरोबर
मला वाटत, हट्टी जरा सौम्य आहे
मला वाटत, हट्टी जरा सौम्य आहे! हट्टी म्हणजे दुराग्रही!
रगेल म्हणजे ज्याच्या अंगात रग आहे, मारामारी करायची खुमखुमी आहे..थोडक्यात माजलेला! निर्ढावलेला बरोबर सूट होतं त्याला!
चू.भु.दे.घे.
कणखर ? ड ? ? ?
कणखर
? ड ? ? ?
लहान मूल बिलकुल ऐकत नाही
लहान मूल बिलकुल ऐकत नाही,तेव्हा आजी रगेल म्हणायची,so तो हट्टी या अर्थी वापरला जात असावा अशी माझी समजूत,
चू.भु.दे.घे
रगेल म्हणजे खुमखुमी असलेला.
रगेल म्हणजे खुमखुमी असलेला. आर्या यांचे बरोबर आहे. रग असलेला.
रगेल-वि. अंगात पुष्कळ रग
रगेल-वि. अंगात पुष्कळ रग असलेला. (मनुष्य; घोडा); ताठलेला; गर्विष्ठ; मस्त; गुर्मीखोर, अहंमन्य; मिजासखोर; बेगुमान; दिमाखी
कणखर ? ड ? ? ? तडफदार?
कणखर
? ड ? ? ?
तडफदार?
तडफदार बरोबर
तडफदार बरोबर
वासनारहीत, शांत चित्ताचा
वासनारहीत, शांत चित्ताचा माणूस
? त ? ?
स्थितप्रज्ञ
स्थितप्रज्ञ
चालवून घ्या! मला दुसरा शब्द
चालवून घ्या!
मला दुसरा शब्द अपेक्षित होता
द्या कोणीपण
द्या कोणीपण
अभिलाषा ?हा
व्यक्ती विशेष नाही होणार
सॉरी,लक्षात नाही आले
द्या कोणीही,खेळ सुरू राहूदे
व्यक्तिविशेष ?
सोप्प देते.
आठवण काढताक्षणीच हजर होणारा
? ? गा ?
आर्या स्मर्तृगामी
आर्या स्मर्तृगामी
फुलराणी सा*भो*
फुलराणी
सा*भो*
साधीभोळी
साधीभोळी
बरोबर. तू दे झब्बु आता.
शूर शब्दाला पर्यायी ? ड ?
? ड ?
निडर
निडर
मला धाडसी म्हणायचे होते पण
मला धाडसी म्हणायचे होते पण तुझेही जुळले, बरोबर. आता तू दे.
नशीले सौंदर्य असलेली स्त्री
नशीले सौंदर्य असलेली स्त्री
@@@क
दुसरे अक्षर जोडाक्षर आहे.
(सूर्याशी संबंधीत + नशीले) असा पूर्ण शब्द आहे.
उन्मादक
उन्मादक
बरोबर
बरोबर
खोटारडा, जसा नाही तसा
खोटारडा, जसा नाही तसा दाखवणारा
? ? क
भंपक
भंपक
थोडा अजून मिळताजुळता शब्द आहे
थोडा अजून मिळताजुळता शब्द आहे
Pages