शशक पुर्ण करा - २ - सवय - साधना

Submitted by साधना on 17 September, 2021 - 12:13

गाडीत एकटी, दूरचा प्रवास आणि हवी ती गाणी लावायचं स्वातंत्र्य. आणखी काय हवं वाटत असतानाच समोर लक्ष गेलं आणि आॅफिस कॅाम्प्लेक्स आल्याचे तिच्या लक्षात आले. ईंडीकेटर देत गाडी वळवुन गाडीतल्या घड्याळाकडे नजर टाकत ती कॅम्पसमध्ये आली. आज ती नेहमीपेक्षा लवकर पोचली होती, स्वाईपची घाई करायची गरज नव्हती. पार्कींग लॅाटमध्ये गाडी लाऊन लॅपटॅाप बॅग घेण्यासाठी तिने मागचा दरवाजा ऊघडला आणि गोंधळून आतल्या मोठ्या बॅगेकडे पाहात राहिली.

“शिट!!!!”, तिच्या तोंडुन मोठ्याने हे ऊद्गार बाहेर पडले आणि तिला जोरात हसु कोसळले. आॅफिसातुन काही दिवस सुट्टी मिळालीय हे सांगितल्यावर आईने चार दिवस
राहायला बोलावले होते. ट्रॅफीकच्या आधीच
निघावे म्हणुन ती सकाळी लवकर निघाली होती आणि नेहमीच्या सवयीने आॅफीसात आली होती.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा!! मस्तच ट्विस्ट.

मिस ऑटोपायलट, जा ग बाई धूम सुट आता ऑफिसाच्या प्रांगणातून आणि जा आईला भेट Happy

छान ट्विस्ट.
खरं म्हणजे ह्या दुसऱ्या कथेचा क्यू "गाडीत एकटी, दूरचा प्रवास आणि हवी ती गाणी लावायचं स्वातंत्र्य. आणखी काय हवं वाटत असतानाच समोर लक्ष गेलं आणि ........ " एवढाच आहे. आणि नंतर तिला ते दृष्य दिसले हे नाहीये.
हे बघा

भारी आहे ट्विस्ट Lol

मी असाच प्रकार फार फार फारच पुर्वी केलाय. सासर पश्चिमेला आणि माहेर पुर्वेला. ट्रेनमधून उतरून एकदिवस तंद्रीत पुर्वेला उतरुन चालायला सुरवात केली. अर्धा किलोमिटर चालल्यावर घर आलं कसं नाही अस वाटून तंद्री मोडून आजुबाजूला नीट बघितल्यावर लक्षात आलं मी कुठल्या घरचा रस्ता पकडलाय ते Lol जवळच पुर्व पश्चिम जोडलेला पादचारी पूल होता म्हणून अबाऊट टर्न करुन पुल गाठून सासरी पोहोचले Lol

मस्त.

मी एकदा टू व्हीलर घेऊन कॉलेज ला गेले, आणी रोजच्या सवयीने बस ने घरी आले.

मस्तय Lol

मी एकदा टू व्हीलर घेऊन कॉलेज ला गेले, आणी रोजच्या सवयीने बस ने घरी आले. >>> Rofl