शशक पूर्ण करा : संपलेली काळरात्र: अवल

Submitted by अवल on 16 September, 2021 - 15:10

काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो.

वर्षभरानंतर खाली उतरतोय. माहित नाही यावर्षी काय वाढून ठेवलय. गेल्यावर्षी एक एक जवळचे कितीतरी लोकं माघारी फिरताना दिसलेले.

ढोल वाजंत्री नव्हती, रोषणाई नव्हती , सगळं सुनसान! एरवी भरभरून वाहणारे रस्ते ओस पडलेले.

यावेळी मनात घोकत आलो, निभू दे सगळं नीटपणे. जुने आप्त दिसू देत.

आलो घाबरतच. पण भेटले काही जणं. तशी शांतताच होती पण दिसले लोकं. बराच जामानिमा होता काही ओळखू आले काही नाही. पण प्रेमाने भेटून गेले. जरा जीवात जीव आला.

आता परततो. पुढच्या वर्षी तरी आलबेल असू दे!

Group content visibility: 
Use group defaults