मायबोली गणेशोत्सव २०२१ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू आणि आजचा विषय आहे 'घरातील आवडती जागा'.
घरातील आवडती जागा
तुम्हाला तुमच्याकडे असलेली जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा -
आवडती लोळायची जागा
आवडती लोळायची जागा
rr - मस्तच. केवढी प्रशस्त,
rr - मस्तच. केवढी प्रशस्त, ऐसपैस जागा आहे.
किल्ली अशा फोटोचीच वाट बघत
किल्ली
अशा फोटोचीच वाट बघत होते..

हि माझी ठाण्यातल्या घरातली आवडती भिंत, आवडीची लोळायची/पेपर वाचायची/फोन चाळायची जागा
किल्ली मस्त.
किल्ली मस्त.
म्हा-ळ-सा SSSSS ................. मी येते बघ तुझ्याकडे रहायला
आमच्या लिव्हिंगरुम मधला सोफा
आमच्या लिव्हिंगरुम मधला सोफा म्हणजे खरं तर सोफा-कम-डबल बेड.
कधी पाहुणे आलेच तर सोय म्हणून..
पण त्या सोफ्याचा खरा उपयोग झाला तो पहिल्या लाॅकडाऊन मधे.
पाहुणे काय कोणीच बाहेरचे घरामधे येणार नव्हते. कामवाल्या बायांना पण रजा दिलेल्या होत्या. ऑफिसेस ठार बंद होती. त्यामुळे टी.व्ही. पहायला, वाटल तर तिथेच आराम करायला हा सोफा उघडला. त्या लाॅकडाऊनच्या काळातला हा कोझी काॅर्नर..
निरु किती सुंदर आहे तुमचं घर.
निरु किती सुंदर आहे तुमचं घर.
अरे काय मस्त घर आहे !
अरे काय मस्त घर आहे !



तो पार्टनरमध्ये गोविंदा म्हणतो ना, ईतनी खुशी मुझ से बरदाश्त नही होती तसे म्हणावेसे वाटतेय, ईतना नीटनेटकापणा मुझ से बरदाश्त नही होता
हे असले आम्ही कुठे फिरायला गेलो की हॉटेलमध्येच अनुभवतो. ते देखील पहिल्याच दिवशी. दुसऱ्या दिवशी त्यालाही आम्ही आमचे घर करून टाकतो
पुढच्या वर्षी झब्बूला पसारा विषय घ्यायला हवा. नाहीतर मधल्या काळात मी एक धागाच काढतो यावर
@ अनु, येस्स गॅझेबो .. त्या
@ अनु, येस्स गॅझेबो .. त्या दिवशी बायकोच्या तोंडून हा शब्द ऐकलेला. लक्षात नव्हता राहिला आणि राहणारही नाही म्हणून आपले तंबूच म्हटले

बरेचदा बिल्डींगमधील लहान मुलांचे बड्डे गार्डनमध्ये साजरे होतात. तेव्हा या गॅझेबोला डेकोरेट करून केक कटींग तिथे करतो
हा घरातला आवडता पहाटेचा कट्टा
हा घरातला आवडता पहाटेचा कट्टा. मागून लेफ्ट साईडने डोंगरापलीकडून सुर्यनारायण उगवतात. बिल्डींगच्या ईतर सर्व बाल्कनीपेक्षा आमचा हा पिंजरा पुढे डोकावत असल्याने ईथे वाराही नेहमीच मुबलक असतो. सकाळी तर अशी मस्त बोचरी थंडी असते की दिवसभराच्या कामासाठी मूड छान फ्रेश होऊन जातो
पोरं कधी पहाटे उठली तर माझी झोपमोड करून मला ईथे बसायला नेतात. काय करणार, मीच सवय लावली आहे. तरी मला अगदीच जीवावर आले तर आज्जीची झोपमोड करतात
सुंदर photos १००
सुंदर photos
१००
आमचं घरातलं किचन जरा लहानच
आमचं घरातलं किचन जरा लहानच आहे.. ब्रेकफास्ट, शेगडीवरचा स्वयंपाक होतो तिथे नाही म्हणायला..
पण ऐसपैस नाही..
म्हणून आणि विशेषतः चुलीवरचं जेवण बनवायला हे आऊटडोअर किचन...
हेच रात्रीच्या अंधारात असं दिसतं.. धूर बीर एकदम गुढरम्य..
आणि हे मग फायनल प्राॅडक्ट..
चुलीवरचे मटण..
किचनच्या बाजूलाच टेबल खुर्च्या टाकून गरम गरम जेवायची मजाच न्यारी. आणि बऱ्यापैकी शिजल्याचा तो धुंद करणारा वास आला की येता जाता मटण शिजलं का ते पहायला आणि एक एक पिस खायला किचनच्या वाऱ्या चालूच असतात..
निरु, काय सुंदर स्पॉट आहे
निरु, काय सुंदर स्पॉट आहे
इथे रात्री मस्त बार्बेक्यू.
बार्बेक्यूचेही फोटो देतो..
बार्बेक्यूचेही फोटो देतो..
धन्यवाद सामो, गणपतीची कृपा.
धन्यवाद सामो, गणपतीची कृपा. त्याने योग्य वेळी योग्य कृतीची बुद्धी दिली. संपूर्ण घराचा योग्य उपयोग मात्र लॉक डाऊन मध्येच झाला.
निरु, तुमचं किचन किती मस्त आणि निसर्गरम्य आहे! चारी ठाव स्वयंपाक रोज केला तरी कंटाळा येणार नाही
निरु ,अप्रतिम जागा आणि फोटो
निरु ,अप्रतिम जागा आणि फोटो ही
वाह निरू मस्त.. कोकणातले गाव
वाह निरू मस्त.. कोकणातले गाव आठवले. अश्याच शेडमध्ये स्वयंपाकघर, त्यात चूल, बाजूला विहीर, पाणी गरम करायचा बंब, आजूबाजूला हिरवळ नारळाची झाडे.. फोटो सापडला तर शोधतो जुन्या लॅपटॉपमध्ये..
माझी लोळायची जागा..सगळ्यात
माझी लोळायची जागा..सगळ्यात fav
छान आहे जागा
छान आहे जागा
निरु, मस्त.
निरु, मस्त.
किल्ली - गोड आहे दोन्ही फोटोज
किल्ली - गोड आहे दोन्ही फोटोज. निरु - अगदी मस्त आयडिया आणि जागाही छानच! लोळायच्या जागा तर आवडत्याच असतात! मामी, मैत्रेयी आणि सगळ्यांचेच फोटो अफलातून.
अह्हा निरू काय सुरेख आहे आडो
अह्हा निरू काय सुरेख आहे आडो किचन
नयनरम्य...
हा धागा नयनरम्य आहे. निरु
हा धागा नयनरम्य आहे. निरु तुमचे घर तर अतिशय सुंंदर.
Pages