प्रकाशचित्रांचा झब्बू क्र. ६ - घरातील आवडती जागा

Submitted by संयोजक on 16 September, 2021 - 07:23

मायबोली गणेशोत्सव २०२१ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू आणि आजचा विषय आहे 'घरातील आवडती जागा'.

घरातील आवडती जागा

तुम्हाला तुमच्याकडे असलेली जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा -

Group content visibility: 
Use group defaults

FB_IMG_1584689959514.jpg
पुण्यात जेथे राहत होतो तिथे खूप सुंदर garden होतं सोसायटी चं.
तिथला आवडता बाक. ह्या जागेवर बसून खूप गप्पा मारल्या आहेत, कॉफी घेतली आहे, आता फक्त आठवणी. कारण ते घर सोडलं आम्ही
बाकावर बसलेल्या मला ignore करा Happy
आज फोटो टाकायचेच असं ठरवून शोधून upload करत आहे Happy
FB_IMG_1547523625004.jpg
हा आळंदी च्या देवळातला फोटो
पहाटे इथेच जाऊन बसायचं
खूप शांत relaxing आणि प्रसन्न वाटतं
आळंदीला राहत असताना रोज येथे मी ५ मिनिटे का होईना बसत असे, वेळ असेल तेव्हा तर निवांत बसून जप करणे म्हणजे, आहा हा, परम आनंद!!!

गार्डन मस्त आहे किल्ली..
आणि अमेरीकेतले तर सगळेच गार्डन भारी वाटतात.. ईथे असे शांत आणि निर्मनुष्य वातावरण हुडकावे लागते Happy

ही एक पूलच्या बाजूची आवडती जागा. संध्याकाळच्या वेळेची. कारण समोर सनसेट दिसतो. आणि वीकडेजना बरेपैकी शांतता असते. विकेंडला मात्र पूलमध्ये पोरांचा धुडगूस असतो. अर्थात त्याचीही आपली एक मजा वेगळी. पण सोसायटीत शांतता दुर्मिळ म्हणून त्याचे अप्रूप जास्त Happy

1632075105996.jpg

ही माझ्या घरातील माझी आवडती जागाच नाही तर हा क्षणही फार आवडता आहे. फोटो तसा जुना आहे २०१८ च्या डिसेंबरमधला. पण यात माझी आई तिच्या नातवंडांचा खेळ बघतीये आणि सगळे अगदी गुंगून गेले असताना मी हा फोटो काढला आहे. जागा मीच सजवली असल्याने मला हा फोटो खूप आवडतो.

007EAF97-B8ED-448A-8BE2-2FBBAF7120E7.jpeg

माझी (त्यापेक्षा माउईची) आवडती जागा Happy खिडक्यांमधून फुल्ल आजू बाजूचा व्ह्यू दिसत असल्यामुळे.
kopara_0.jpg

PSX_20200705_100800.jpg
माझ्या घरच्या वर्क स्टेशनवरून दिसणारं पावसाळी वातावरण. एव्हढी वर्षं ऑफिसमध्ये चारी बाजूला भिंती पाहिल्यावर हा बदल अतिशय सुखद वाटतो

वर्कफ्रॉम होम करताना जेव्हा छान थंडगार वारा सुटून रिमझिम पावसाला सुरुवात होते. तेव्हा मी काम थांबवून चहाचा कप घेतो. बाल्कनीत येऊन बसतो आणि याच तंबूकडे बघत पाऊसाचा फील घेतो.

थोड्यावेळाने पोरगी जवळ येते आणि कानात कुजबुजते, पप्पा जाऊया...
दुसऱ्याच क्षणाला मी अंगावर पाऊसाचे तुषार झेलत त्या तंबूत बसलो असतो आणि पोरगी बाहेर गवतातल्या चिखलात मनसोक्त लोळत असते Happy

1632513618031.jpg

अस्मिताला मम.

त्याआधीचे पण सर्वच जबरदस्त आहेत.

सर्वांचे आभार, वरचे सगळे फोटो आणि जागा सुंदर! निवांत चहा घेऊन बसावं असं वाटतं.
सामो, हा आमच्या L शेप ओपन टेरेसचा एक भाग आहे, आतल्या छप्पर घातलेल्या टेरेसवर मी ऑफिसकाम करते. मोठं आणि रिकामं टेबल उपलब्ध असल्याने पसारा मांडून बसता येतं, मध्ये उठून बागेत एक चक्कर टाकणे, स्ट्रेचिंग करणे सहज शक्य होतं.
आज ऊन आलं आहे, हा दुसरा भाग आहे.
PSX_20210925_085500.jpg

Pages