मायबोली गणेशोत्सव २०२१ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू आणि आजचा विषय आहे 'घरातील आवडती जागा'.
घरातील आवडती जागा
तुम्हाला तुमच्याकडे असलेली जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा -
(No subject)
Sunroom

कसले एकेक सही फोटो आहेत.
कसले एकेक सही फोटो आहेत.
सही आहेत सगळे फोटो ! V ताई
सही आहेत सगळे फोटो ! V ताई - हा फोटो पाहूनच ओळखले
खूप मस्त !
(No subject)
सध्याच्या घरात तिन्ही रूम्सना फुलसाईज बाल्कनी आहेत. तरी त्यातही ही आमची फेव्हरेट. कारण ईथे ग्रिलचा कठडा करत बसायची सोय केली आहे. यावर बसून गाड्या बघत खाता पिता येते.
त्या गाड्यांच्या झब्बूवर टाकलेला फोटो ईथूनच टिपलेला
सुंदर फोटो. पण भीती वाटते हो.
सुंदर फोटो. पण भीती वाटते हो. नका बसवत जाऊ लेकराला असं.
सामो तुम्ही jersey city मधे
सामो तुम्ही jersey city मधे Grove street ला राहता का? मला फोटोत पाथ स्टेशन दिसतंय.
आमच्या घरातली आवडती जागा
आमच्या घरातली आवडती जागा

(मागचे ड्रेनेज पाईप वगैरे कौशल्याने लपवले आहेत.)
हि आत्ताच्या घरातील आवडती
हि आत्ताच्या घरातील आवडती जागा.
इथे बसून सूर्यास्त पाहणे, पाऊस पाहणे, फेरीवाले पाहणे हि आवडती कामं.
सध्या याच बाल्कनीत कोपर्यात थोडी रोपं पण लावलीएत.मस्त रमतो मी आणि मुलं इथं
कसलं मस्त आहे.नारळाचं झाड
कसलं मस्त आहे.नारळाचं झाड.कॉलनी पण शांत दिसते.
टीचभर बाल्कनीतली बाग आणि
टीचभर बाल्कनीतली बाग आणि त्याचं प्रतिबिंब... बाल्कनीही आवडती आणि प्रतिबिंब जिथून दिसतं ती जागाही आवडती
सामो मजबूत आहे ती ग्रिलची
सामो मजबूत आहे ती ग्रिलची चौकट. आमची पुर्ण फॅमिली बसते त्यावर. फक्त बघायला डेंजर वाटतेय. पण तसे नाहीये.
आणि ही दुसरी बाल्कनी. डेंजर तर काय जिथे वाटत नाही तिथेही मुले निर्माण करू शकतात
सामो - खूपच सुंदर कोपरा आहे.
सामो - खूपच सुंदर कोपरा आहे. व्ह्यू मस्तच आहे. (तुम्ही वाराणसीत असता काय ?)
सर्वांच्या घराच्या कोपरे खूपच
सर्वांच्या घराच्या कोपरे खूपच सुंदर ..!
मृणाली, संध्याकाळचे दृश्य छान दिसतेयं गॅलरीतून...
@अनु - घराचा कोपरा शांत वाटतो.. मला आवडला..
@ ऋन्मेष - लेक फार उचापती दिसतेयं... तुमच्यावर गेलीयं का..?? ( ह. घ्या)
रुपाली हलके घ्या कश्याला..
रुपाली हलके घ्या कश्याला.. अभिमानाने घेतो मी ऊचापती
कोणीतरी लवकर फोटो टाका रे.. म्हणजे मला पुढच्या ऊचापतीचा झब्बू देता येईल
सर्व छान फोटो.
सर्व छान फोटो.
अभ्यास करायची आवडती जागा
अभ्यास करायची आवडती जागा
@म्हाळसा होय पाथच्या समोर
@म्हाळसा होय पाथच्या समोर रहाते मी
मृ, ललितप्रीती फार सुंदर.
मृ, ललिताप्रीती फार सुंदर.
--------------
अनु, कुमार - फोटो आवडले.
एकदा माझा लेक(७-८ वर्षे) असाच
एकदा माझा लेक(७-८ वर्षे) असाच ग्रीलमधे बसला असता सोसायटीतले काका खालून ओरडले.तेव्हापासून ग्रीलमधे नाही बसला.
@देवकी - मलाही फार धोकादायक
@देवकी - मलाही फार धोकादायक वाटतं ते
(No subject)
सोसायटी गार्डनमधील आवडती जागा
सोसायटी गार्डनमधील आवडती जागा. समोर जसा बेंच आहे तसाच ईथे आहे ज्यावर बसून हा फोटो काढलाय. मला ईथून समोर दिसणारा व्यू आवडतो.
दिवसभर कोणीच फोटो न टाकल्याने
दिवसभर कोणीच फोटो न टाकल्याने मीच टाकतो.
हे आधीच्या बिल्डींगमधील टेरेस ज्याचा उल्लेख गेल्या गणपतीत लिहिलेल्या लेखात होता. पहिल्या लॉकडाऊनमध्ये या टेरेसने आणि या टाकीने आम्हाला फार फार साथ दिली होती. या जागेचे ऊपकार कधीच विसरू शकणार नाही
ऋन्मेस। सर्व फोटो गोड आहेत.
ऋन्मेष सर्व फोटो गोड आहेत.
तु अ, छान व्ह्यू!
तु अ, छान व्ह्यू!
वीरु जबरदस्त कैर्या आहेत.
वीरु जबरदस्त कैर्या आहेत.
सर्व जागा खूप सुंदर आहेत.
सर्व जागा खूप सुंदर आहेत. विशेषत: गार्डन्स...
(No subject)
लहान ग्रीलमध्ये दोन चार कुंड्या ठेवल्यात, तिथे त्यांना भेट देणे आवडती जागा.
अजून एक आवडती जागा जिथे मी पडीक असते, डेस्कटॉपसमोर, तिथला फोटो देण्यासारखा नाही, फार पसारा आहे. सर्वजण घर कसं नीटनेटकं ठेवतात, तसं मला ठेवता येत नाही.
(No subject)
हा फोटो जरा जुना आहे. नवीन एक मिरच्या आलेल्या रोपांना तो आहे. दुसराही दिला तर चालेल का.
वीरु जबरदस्त कैर्या आहेत.>
वीरु जबरदस्त कैर्या आहेत.>>धन्यवाद सामो.
गावच्या घराच्या अंगणाचा फोटो आहे.
Pages