शशक पूर्ण करा - फुफाटा - हाडळीचा आशिक

Submitted by हाडळीचा आशिक on 12 September, 2021 - 07:57

फुफाटा

काहीच सुचत नाहीये. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला गेला आणि बाळाप्पाची तंद्री भंगली.
कोणीतरी तिला केसांना धरून फरफटत आणत होतं. लक्ष्मी ? तो शहारला. आरडतओरडत त्या आडदांडाला ती प्रतिकार करीत होती. ते बाळाप्पासमोर पोहोचले. अशक्त झालेला तो उठू लागला.. भेलकांडला..

आडदांडानं तिला सामोरं केलं. पदर सुटलेल्या तिनं नवऱ्यासमोर लाजेनं मान खाली घातली.

"भेन्चो* ! पैशे आण न् ह्या रां*ला ने. पिंट्या जा, सोड याला.

पिंट्या पुढे झाला.

"मालक, मालक..." दीनवाणी हवेत विरली. पिंट्यानं त्याला बाहेर काढलं होतं.

रस्त्यावरील फुफाट्यानं डोळे डबडबले. पाणीच पाणी...नुसतं पाणी ! फुफाटा...पाणी ? फुफाटा......फुफाटा........................

_हाडळीचा आशिक

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला कधीही हा अंदाज बांधता आला नसता कारण मी जिथे राहते तिथे पाणीच पाणी आहे. बिन पाण्याचा फुफाटा ऐकुनही माहित नाही.>>>
हो, बरेच जणांना हे माहित नसेल याची कल्पना होती.

ओह ,आता कळली. मला फक्त आगीतून फुफाट्यात ही म्हण माहिती आहे. पण त्याचा नेमका अर्थ माहिती नव्हता. जबरदस्त लिहीलंयत.

ओह Sad वाईट वाटलं

फुफाट्याची कल्पना माहीत नव्हती. आता कळली

Pages